पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

28 देशातून घेण्यात येणाऱ्या अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची कन्या स्वरा बाबर हिने पटकावला दुसरा क्रमांक

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : दि. 28/12/2023 रोजी मुंबई येथे पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कुरुंदवाड मधील कुमार विद्या मंदिर नं ३ या शाळेतील कु स्वरा निलेश बाबर या विदार्थीनीने दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा भारतात प्रथमच घेण्यात आली आहे. या स्पर्धेत एकुण 28 देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कुरुंदवाडची कन्या स्वरा बाबर हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे.तिच्या या यशाबद्दल कुरुंदवाड सह परिसरातून कौतुक होत आहे. या यशात शाळेचे मुख्याध्यापक रवी कुमार पाटील सर इतर शिक्षक व अबँकस टिचर राधिका चव्हाण मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.व तीच्या पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

शिरोळच्या श्रीमती रत्नाबाई शेट्टी , फुलाबाई माने यांना ' आदर्शमाता ' पुरस्कार जाहीर

इमेज
  शिरढोण येथे संवाद साहित्य संमेलनात होणार मान्यवरांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान सोहळा शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषद बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिरोळ येथील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई आण्णा शेट्टी (आऊ ) व ज्येष्ठ पत्रकार डॉ. दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई श्रीपती माने ( शिरोळ ) यांना ' आदर्शमाता पुरस्कार ' जाहीर झाला आहे. रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते शिरढोण येथील श्रीराम कुंज फार्म हाऊस येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.         प्रारंभीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत श्रीमती रत्‍नाबाई शेट्टी यांनी कुटुंबाला भक्कम आधार दिला आहे. शेतकरी चळवळीबरोबर सामान्य जनतेच्या न्यायीक लढ्यासाठी मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना प्रेरणादायी बळ दिले आहे. शेती , शेतकरी व गोरगरिबांसाठी त्याना कळवळा आहे. कौटुंबिक व जिव्हाळ्यातील नातेसंबंध जपत चळवळीतील शेतकरी हा परिवार मानून त्यांनी आभाळमाया दिली आहे.        श्रीमती ...

माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट

इमेज
  अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सपत्नीक संजय घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी संजय घोडावत यांनी त्यांचे स्वागत केले.       भारताचा मध्यम फळीतील फलंदाज, माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने संजय घोडावत विद्यापीठातील शैक्षणिक व क्रीडा सुविधांची माहिती घेतली. इंटरनॅशनल स्कूल,पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट,आयआयटी-मेडिकल अकॅडमी व क्रीडा क्षेत्रात सुरू असलेल्या घोडदौडी बद्दल प्रशंसा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, की येथील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रा संबंधित वातावरण व सोयीसुविधा उत्तम आहेत. सर्व सोयी नियुक्त बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियम मुळे येणाऱ्या काळात येथून उत्तम क्रिकेटपटू घडतील अशी अशा व्यक्त केली.यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्याने सुसंवाद साधला.     याप्रसंगी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,प्राचार्य डॉ.विराट गिरी, प्राध्यापक,विद्यार्थी,कर्मचारी उपस्थित होते.

विक्रीकर निरीक्षक परीक्षेत धीरज ढाले राज्यात प्रथम

इमेज
  तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ऑक्टोंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक(सेल टॅक्स इन्स्पेक्टर) मुख्य परीक्षेत धीरज बाळासाहेब ढाले (तेरवाड तालुका शिरोळ )यांने मागासवर्गीयात (अनुसूचित जाती) महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी ही काय कमी नसतो हे दाखवून दिले. यश कुणाची मक्तेदारी नाही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आणि जिद्द कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते हे धीरज याने दाखवून दिले आहे.     तेरवाड गावासारख्या ग्रामीण भागात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धीरजने विक्रीकर निरीक्षक(सेल टॅक्स इन्स्पेक्टर) परीक्षेत मागासवर्गीयात(अनुसूचित जाती) राज्यात प्रथम येऊन "हम भी किसीसे कम नही" हे धीरजने दाखवून दिले. सुरुवातीपासूनच आपणही शासकीय सेवेत जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.स्वप्नाला सत्यात उतरावयाचे असेल तर कठोर परिश्रमाची तयारी करावी लागते याची जाणीव धीरजला सुरुवाती पासून होती आणि याच अधिकारी होण्याच्या ध्येयाने धीरजला झपाटले होते. वडील बाळासाहेब सेवा...

विकसित भारत संकल्प यात्रेचे शिरोळ शहरात उत्साहात स्वागत

इमेज
    शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोचविण्यासाठी उपक्रम राबविला आहे. या योजनांचा लाभ घेवून नागरिकांनी प्रगती साधावी असे आवाहन आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.         येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम यड्रावकर यांच्या हस्ते संकल्प यात्रेचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रे निमित्ताने केंद्र शासनाच्या लाभाच्या मंजूर योजनांच्या पत्रांचे वाटप आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने केंद्र शासनाच्या विविध शासकीय विकास योजनांची माहिती देवून मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी स्वागत केले. दिली.दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती एलईडी स्क्रीन द्वारे दाखवण्यात आली.       यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, मुकुंद गावडे, नरेंद्र माने, रावसाहेब देसा...

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

इमेज
  अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सलग पाच दिवस चाललेला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना संस्थापक श्री संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना संस्कार करण्याची जबाबदारी पालक व शिक्षक यांची असल्याचे सांगितले. देशाची सुसंस्कृत पिढी ही चांगल्या शाळांमधून घडत असते. म्हणूनच दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था आपण येथे करत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय घोडावत शिक्षण संकुल आपल्याला प्राणापेक्षा प्रिय आहे त्यामुळे ते कोणाच्याही हातात दिले जाणार नाही, पालकांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करेन अशी ग्वाही दिली व शिक्षण संकुल चालवण्यास देण्यासंदर्भात पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला. मार्कांसोबत विद्यार्थ्यांनी संस्काराचेही धडे घेणे गरजेचे आहे. शाळेतल्या मार्कांपेक्षा विद्यार्थी दशेत घेतलेले संस्कारच चिरंतन टिकतात असेही यावेळी त्यांनी सांगितले.          पहिल्या दिवशी केजी विभागाचे स्नेहसंमेलन 'बाल गणेश' या थीमवर आधारित सादर झाले. केजी मधील चिमुकल्यानी गणेशाची विविध गाणी मोठ्या उत्साह...

शेडशाळ येथे एसटीचा भीषण अपघात ; अनेक प्रवासी जखमी ; जखमीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे स्टेरिंग प्रॉब्लेममुळे झालेल्या अपघातात ४७ प्रवासी बसमध्ये अडकून अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान जखमीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.    कुरुंदवाड आगाराहून सदरची बस गणेशवाडीला जात होती अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंग मध्ये प्रॉब्लेम आल्याने चालकाचा ताबा सुटला व बस थेट लागत असलेल्या चरीमध्ये गेल्याची घटनास्थळावरून समजले दरम्यान, बसमध्ये सुमारे ४७ प्रवासी अडकले व अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्वांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे घटनास्थळावरून समजते. दरम्यान सदरची घटना समजतात कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
  अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क : संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या 2022 -23 विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत जेईई, नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा सत्कार डी.वाय पाटील कॉलेजचे कॉम्प्युटर सेन्टर हेड अप्पासाहेब जाधव, ज्ञानदीप क्लासचे संचालक न.स.नीळपंकर, शिवाजी युनिव्हर्सिटी एक्साम डिपार्टमेंटचे हेड सेवानिवृत्त रमेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.     यावेळी अकॅडमीचे संचालक श्री वासू ,सेंट्रल झोनल हेड श्रीधर गुप्ता , राहुल पाडळकर ,नागेंद्र राव ,सुनील हराळे सर व इतर स्टाफ यांची उपस्थिती होती.        अकॅडमीच्या आय आय टी व मेडिकल कोल्हापूर शाखेच्या 40 विद्यार्थ्यांनी जेईई - नीट -2023 या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.अकॅडमीचे IIT,NIT व MH.GOV मध्ये सुमीत गरड (IIT पलक्कड), अर्जुन पाटील (IIT पलक्कड), कार्तीक्येण कुमार (IIT भिलाई), हर्षवर्धन सावंत (NIT सुरत) , अथर्व तांडे (NIT हैदराबाद),पार्थ ताटपुजे (COEP पुणे), शर्वरी सावर्डेकर (VIT पुणे),अथर्व कवडे (VIT पुणे), ,गौरी पाटील (PICT पुणे), केदार कोळसे (V...

शिरोळमध्ये उडणार घोडा गाडी बैलगाडी शर्यतींचा धुरळा..!

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क  :  येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसानिमित्त आयोजित केलेल्या घोडागाडी व बैलगाडी शर्यती बुधवार दिनांक ३ जानेवारी ते शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ या कालावधीत मिठारगी शेतजमीन कनवाड रस्ता येथे होणार आहेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम कायम शिल्ड व चषक पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे अशी माहिती श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस संयोजन समितीच्या समितीच्या वतीने देण्यात आली.  सोमवार दिनांक ४ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस अमाप उत्साहात पार पडला यावर्षी उत्सव आणि उरूस साजरा करण्याचा मान संभाजीनगर येथील पवनपुत्र मित्र मंडळास मिळाला होता युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव आणि माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्सव आणि उरसाचे नेटके नियोजन केले होते उत्सव आणि उरसानिमित्त विविध स्पर्धा शर्यती कुस्त्यांचे जंगी मैदान धार्मिक आणि मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम संप...

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्था निवडणूक : विरोधी गटाला कपबशी सत्ताधारी गटाला विमान

इमेज
   शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूरच्या पंचवार्षिक निवडणूकीत विरोधी गटाला कपबशी तर सत्ताधारी गटाला विमान हे चिन्ह मिळाल्याने उद्यापासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.  सहायक निबंधक ठाकरे यांनी परिपत्रकानुसार विरोधी आघाडीला कपबशी हे चिन्ह तर सत्ताधारी गटाला विमान हे चिन्ह दिले. चिन्हे मिळाल्यामुळे आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्था निवडणूक : कपबशी कोणाला मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेची निवडणूक लागली असून १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आज चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधी गटाने कपबशी चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा केला असून त्यामुळे कपबशी कोणाच्या हातात द्यायची हे मात्र निवडणूक निर्णय अधिकारी ठरवणार आहेत. नियमाप्रमाणे एखादया गटाने ( पॅनेल) छाननी ते उमेदवारी अर्ज माघारी या कालावधीमध्ये कोणत्याही क्षणी निवडणूक कामकाजाच्या वेळी एकाच निवडणूक चिन्हाकरीता सामुहिक अर्ज करणे अपेक्षित आहे. तसेच गट ( पॅनेल ) निर्माण केल्याबाबत सर्व संबंधित उमेदवारांच्या स्वाक्षरीनिशी अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अचूक वेळ व तारीख नोंदवून "प्रथम आलेल्याला प्रथम प्राधान्य" या तत्वानुसार निवडणूक चिन्हाचे वाटप करावे. असे दि. २४ जून२०२२ च्या परिपत्रकात मार्गदर्शन केलेले आहे.मात्र बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्था निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटान...

बॅ. खर्डेकर पतसंस्था निवडणूक : स्वाभिमानी विरुद्ध सत्तारुढ पॅनेल

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेची निवडणूक अखेर लागली असून सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.  विरोधी गटाने बॅरिस्टर खर्डेकर स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेत्तर आघाडीची स्थापणा केली असून यामधील उमेदवार खालीलप्रमाणे -  सर्वसाधारण प्रतिनिधी - ०१. श्री.कुमार गुंडू सिदनाळे ०२. श्री.जयानंद बाबाजी बेरड ०३. श्री.बबलू हसन सनदी ०४. श्री.सुधीर शंकर पाटील ०५. श्री.अरुण सीताराम कदम ०६. श्री.उत्तम शंकर कोळी ०७. श्री.मोअज्जम मकबूल चौगले ०८. श्री.विलास भीमराव जानकर ०९. श्री.नियाज सरवर पटेल १०. श्री.संतोष ईश्वरा कोळी अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी - ०१. श्री.प्रशांत काशिनाथ कांबळे भटक्या जाती-जमाती प्रतिनिधी - ०१.श्री.प्रकाश दत्तात्रय पुजारी इतर मागास वर्ग प्रतिनिधी - ०१. श्री.रमेश अशोक बन्ने महिला प्रतिनिधी - ०१. श्रीम.ज्योत्स्ना श्रीपती कांबळे/कटकोळे ०२. श्रीम.मनीषा सतीश पंढरपुरे तर सत्ताधारी गटाकडून बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिक्षक-शिक्षकेत्तर सत्तारूढ ...

शिरोळ तालुक्यात १० हजार २९५ मयत मतदारांची संख्या घटणार

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक २७ ऑक्टोंबर ते ९ डिसेंबर अखेर पार पडला. या कालावधीत २८० शिरोळ विधानसभेच्या दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीवर नवीन मतदार नोंदणी, स्थलांतर अथवा तपशीलात बदल तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत या कारणाने वगळणी करणेकरीता दावे व हरकती स्विकारणेत आल्या. मतदार यादीमध्ये नव्याने नावाची नोंद करणेसाठी (नमुना अर्ज ६) एकूण ३३५२ इतके अर्ज प्राप्त झाले तसेच स्थलांतर अथवा मतदार यादीमधील तपशीलात बदल करण्यासाठी एकूण ९५७ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन बीएलओ यांनी मतदारांची पडताळणी केली होती. त्यामध्ये १०२९५ इतके मतदार मयत असूनही त्यांचे नावाची नोंद मतदार यादीमध्ये असलेचे आढळून आले होते. अशा मयत मतदारांच्या नावाची वगळणीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सुरु आहे. तरी सर्व नागरीकांनी बीएलओ यांचेशी संपर्क साधू...

हरोली येथून ५ जानेवारीला श्रीक्षेत्र आदमापूरला बाळुमांमाची पायी दिंडी प्रस्थान होणार

इमेज
  हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांच्या पुढाकारातून दिंडीचे आयोजन : धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : हरोली ( ता शिरोळ ) येथील श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर ट्रस्ट व श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीने शुक्रवारी ५ जानेवारी ते मंगळवारी ९ जानेवारी अखेर श्रीक्षेत्र हरोली ते श्रीक्षेत्र आदमापूर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती संत सद्गुरू बाळुमामा मंदिर ट्रस्टचे हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांनी दिली.       दरम्यान, या पायी दिंडी सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह सहभागी भाविकांसाठी निवास , भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.       हरोली (ता शिरोळ) येथील संत सद्गुरु बाळूमामा मंदिरापासून शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र हरोली येथून श्रीक्षेत्र आदमापूर दिशेने पायी दिंडी रवाना होणार आहे. मार्गस्थ झालेली ही दिंडी कबनूर, पट्टणकोडोली ,कोगनोळी , कुरणी येथे दुपारचा विसावा व भोजनासाठी थांबेल . त्यानंतर सायंकाळी उपस्थित भक्...

पै. म्हैबुब नदाफ यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त हेरवाडमध्ये उद्या हभप डॉ. सुहास फडतरे यांचे किर्तन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड येथील पैगंबरवासी म्हैबुब नदाफ यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ विद्रोही कीर्तनकार, वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हभप डॉ. सुहास फडतरे महाराज (सातारा) यांचे कीर्तन बुधवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर जवळ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. पैगंबरवासी म्हैबुब नदाफ हे वारकरी संप्रदायाशी निगडित होते. त्यांनी कित्येकवेळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. विठ्ठल भक्त म्हणून ते हेरवाड मध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ विद्रोही कीर्तनकार, वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हभप डॉ. सुहास फडतरे महाराज (सातारा) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

डिजिटल बोर्डांनी झाकले नृसिंहवाडीचे आरोग्यवर्धिनी केंद्र

इमेज
  नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या गेटवर तसेच समोरच्या बाजूस डिजिटल फलक लावण्यात आल्यामुळे सदरचे आरोग्य केंद्र झाकून गेले आहे. त्यामुळे ऐन दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्राची शोधा - शोध करावी लागणार आहे. त्यामुळे तातडीने ग्रामपंचायतीने सदरची डिजिटल बोर्डे काढावीत, अशी मागणी जोर धरत आहे.  दत्त जयंती निमित्त श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी महाराष्ट्र देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. भाविकांच्या सेवेसाठी येथील आरोग्य केंद्राचे पथक सज्ज झाले आहे. मात्र, आरोग्य केंद्रच डिजिटल फलकात झाकून गेले असल्यामुळे रुग्णांना आरोग्य केंद्र शोधून सुद्धा सापडत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय पक्ष, व्यवसायासह काहीजणांनी डिजिटल बोर्ड लावले असल्यामुळे सदरची बोर्डे तातडीने काढण्यात यावीत, तशी मागणी आता जोर धरत आहे.

दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा टाकळीवाडीत संपन्न

इमेज
टाकळीवाडी / शिवार न्यूज नेटवर्क : दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा विद्या मंदिर टाकळीवाडी येथे दि.१९ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच प्रमिला आवटी,केंदबा कांबळे, तुकाराम चिगरे,भरमू बदामे व व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी खोत यांचे हस्ते संपन्न झाले.तर बक्षिस वितरण समारंभ -खुशाल कांबळे, बाजीराव गोरे,अनिल कांबळे, यांचे हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे, तुकाराम बदामे,कृष्णा कोळी,संतोष चिगरे,रमेश निर्मळे,रमजान शेंडूरे,निशांत गोरे,मनिषा निर्मळे,बाळाबाई कांबळे उपस्थित होते.         सांघिक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - समूहगीत(वरिष्ठ गट) - प्रथम- कन्या दत्तवाड द्वितीय- टाकळीवाडी तृतीय -कन्या घोसरवाड (कनिष्ठ गट )- प्रथम-कन्या दत्तवाड,द्वितीय-कुमार हेरवाड, तृतीय-टाकळीवाडी. समूहनृत्य-(वरिष्ठ गट)-प्रथम -कन्या दत्तवाड द्वितीय-नवे दानवाड तृतीय - कन्या घोसरवाड     (कनिष्ठ गट)-प्रथम -जुने दानवाड,द्वितीय-कन्या दत्तवाड,तृतीय-कन्या घोसरवाड. नाटयीकरण-(वरिष्ठ गट)प्रथम- टाकळीव...

महाराष्ट्र केसरी किताब मिळाल्याबद्दल सोमवारी पैलवान अमृता पुजारीचा नागरी सत्कार

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क  :  चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात शिरोळ येथील पैलवान कु अमृता शशिकांत पुजारी हिने महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवल्याबद्दल शिरोळ नगरपरिषद व शहरवासिय यांच्या वतीने पैलवान अमृता हिला मानपत्र , चांदीची गदा व आरोग्य विमा पॉलिसी देऊनगौ गौरविण्यात येणार आहे. सोमवारी २५ डिसेंबर सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार असून प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर पुजारी हे समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिरोळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान रावसाहेब देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.           ते म्हणाले , सोमवारी दुपारी ४ वाजता कु अमृता पुजारी हिचे शहरात आगमन होताच शिरोळ पंचायत समिती येथून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे . त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौकात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार संज...

दत्त सहकारी साखर कारखाना परिसरातील साखर शाळेस गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : स्थलांतरित कामगारांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना मूलभूत सुविधा देणे संदर्भात पंचायत समिती शिरोळच्या गटशिक्षण अधिकारी भारती कोळी मॅडम यांनी दिली.              मुलांना वर्ग खोली, बसायला बस्कर पट्ट्या, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृह व्यवस्था देण्यात आली आहे.शिक्षणाच्या प्रवाहात मुलं आली पाहिजेत.शिकली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत या धोरणानुसार मुलांना शिकवण्यासाठी कारखाना प्रशासनाने तीन स्वयंसेवक शिक्षकांची निवड केली आहे.            आज साखर शाळेच्या मुलांना खाऊ वाटप करण्यासाठी इनरव्हील क्लब जयसिंगपूर हेरिटेज मार्फत सेक्रेटरी माधुरी शेडबाळे, इंगळे मॅडम,गोंदकर मॅडम,अमित पाटील व कोरे सर यांनी साखर शाळेस भेट दिली.इंगळे मॅडम यांचा मुलगा आर्वी याचा आज पहिला वाढदिवसाच्या निमित्ताने लाडू,शेंगदाणे चिक्की यांचे वाटप करण्यात आले.तसेच मुलांना चित्रकला वही,रंगीत खडू व एक वही असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी भारती कोळी मॅडम यांनी केले. त्यांनी स...

जयसिंगपूर व नृसिंहवाडी बस स्थानकासाठी ४ कोटी ८७ लाखाचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असताना शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जयसिंगपूर शहरातील बसस्थानकासाठी काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी हिंदुऱ्हूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत २ कोटी २२ लाखाचा निधी मंजूर झाला असून तालुक्यातील तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी बस स्थानकासाठी याच योजनेअंतर्गत २ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या निधीमुळे तालुक्यातील या दोन्ही महत्त्वाच्या बस स्थानकाचे रूप पालटणार असून प्रवाशांना चांगल्या सेवा उपलब्ध होणार आहेत, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून ही कामे केली जाणार असून यापूर्वी जयसिंगपूर बस स्थानकासाठी मंजूर २ कोटी रुपयाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून या निधीमधून ५ नवीन प्लॅटफॉर्म व १२ दुकान गाळे उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवेदनात म्हटले आहे, सांगली कोल्हापूर रोड...

उद्या हेरवाड मध्ये श्री स्वामी समर्थ पालखी पालखी परिक्रमेचे होणार आगमन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालखी पालखी परिक्रमाचे हेरवाड येथील सुधीर माळी यांच्या निवासस्थानी उद्या मंगळवारी सकाळी ८ वाजता आगमन होणार असल्याने या पालखी पादुका परिक्रमेच्या दर्शनाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सुधीर माळी यांनी केले आहे.  २५ नोव्हेंबर ते १२ जून २०२४ अखेर संपूर्ण महाराष्ट्रभर श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. उद्या मंगळवार १९ रोजी सकाळी आठ वाजता पालखी पादुका परिक्रमेचे हेरवाड येथे आगमन होणार असून सकाळी आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी हेरवाड सह परिसरातील भाविकांनी या पालखी पादुका परिक्रमेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळी यांनी केले.

अंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याने बेडकिहाळ मध्ये डॉ विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :           बेडकिहाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला स्वतःला वाहून घेतलेले डॉ. विक्रम शिंगाडे यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर 6 रोजी कर्नाटक राज्यांचे माजी मुख्यमंत्री डी व्ही सदानंदगौंडा, माजी केंद्र सचिव, शोभा करंदाजी ,क्रुषी शेतकरी कल्याण राज्य सचिव कर्नाटक सरकार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सी सोमशेखर आय.ए.एस.अधिकारी बेंगळुरू यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व मानधन देऊन आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्ड स्टार अवार्ड, ने दिल्ली मधील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये सन्मानित करण्यात आले. या उद्देशाने काल अमृत गार्डन येथे केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटना न्यु दिल्ली व बेडकिहाळ गौरव समिती यांच्या वतीने डॉ विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार शमणेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.    कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली यावेळी .ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते शेखर प्रभात. एक्संबा, तसेच प्रकाश कदम प्रख्यात कवी व उपस्थित सर्व मान...

केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत राजाराम विद्यालयाचे घवघवीत यश

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      येथील राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेने धरणगुत्ती येथे झालेल्या सांस्कृतिक व अर्जुनवाड येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.      राजाराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धरणगुत्ती येथे झालेल्या केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत मोठा गटातील नाट्यीकरण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. अर्जुनवाड येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजाराम विद्यालयातील विद्यार्थी स्वराज्य संदीप धनगर याने कुस्ती कुस्ती स्पर्धेत 30 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक तर आराध्या सर्जेराव कांबळे, हिने कुस्ती 35 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मनोजकुमार रामफुल प्रजापत , याने मोठा गट थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक रोहित राहुल पोवार, 50 मीटर धावणे,100 मीटर धावणे याने द्वितीय क्रमांक आदिती सर्जेराव कांबळे, हिने २०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक श्रावणी सर्जेराव कांबळे हिने उंच उडी द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव लौकिक केले.    या सर्व सर्व यशस्वी व...

विद्या मंदिर चिंचवाड शाळेचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : चिपरी केंद्रांतर्गत सन २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षातील सांस्कृतिक स्पर्धा केंद्र शाळा चिपरी येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेतील वरिष्ठ गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्या मंदिर चिंचवाड शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.यामध्ये कु.किर्ती रवि सातपुते,कु.श्रद्धा रामदास कदम,साईराज महादेव पाटोळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.          या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक हरिदास घोळवे, सुभाष पडोळकर,संतोष ठोमके, संगीता चव्हाण,ज्योती ठोमके, सुषमा पाटील,आयेशा गोधडे यांचे मार्गदर्शन लाभले.

गणपतराव पाटील यांच्यामुळेच लोक कलाकारांना प्रतिष्ठा : वसंत हंकारे

इमेज
शिरोळमध्ये लोककला महोत्सवात सुमारे 250 कलाकारांचा कला आविष्कार सादर शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :     कला आयुष्याला उर्मी देते. कलाकार आपणाला आनंद देतो पण त्याच्या वेदना कधीच समाजासमोर येत नाहीत. वेदना विसरून तो पिढ्यानपिढ्या कला जिवंत ठेवतो आहे. चांगल्या कलेतून चांगला माणूस बनतो. आनंदी जीवनासाठी कलेशिवाय पर्याय नाही. लोककला महोत्सव भरवून गणपतराव पाटील यांनी लोककलेला आणि लोक कलाकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.      श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित तालुक्यातील कलाकारांचा मेळावा व तालुकास्तरीय निमंत्रित 'आम्ही सारे लोककला महोत्सव' दत्त कारखाना कार्यस्थळावरील कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडला. महोत्सव उदघाटन प्रसंगी वसंत हंकारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते.        तालुक्यातील लोककलाकारांना विविध कला सादर करण्यासा...

ऊस दराचा बैठकीतून राजू शेट्टी तडकाफडकी बाहेर,दीड तास चर्चेनंतर ही तोडगा नाही

इमेज
सांगली / शिवार न्यूज नेटवर्क : ऊस दराचा तिढा सुटावा यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.याबैठकीत स्वाभिमानीचे नेते मा.खा.राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एफ आर पी अधिक शंभर रुपयाचे मागणी केली.मात्र जिल्ह्यातील कारखानदार ३१०० रुपये पहिली उचल देण्यावर ठाम आहेत.मात्र,दुष्काळ पट्ट्यातील कारखानदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य करत बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला या प्रस्तावांमध्ये गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्के पेक्षा अधिक असल्यास पहिली उचल ३२५० रुपये साडेबारा पेक्षा कमी असल्यास ३२०० आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्के आहे.त्या कारखान्यांनी ३ हजार १०० रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला.कारखानदारांनी आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही आमच्या मार्गाने कुठेही आंदोलन करू,असा इशारा राजू शेट्टी यांनी बैठकीत दिला.मात्र दीड तास चर्चेनंतर ही तोडगा निघत नसल्याने राजू शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.या बैठकीला...

लिफ्ट कामास प्रारंभ झालेबदल प्रहार दिव्यांग संघटने तर्फे गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार

इमेज
शिरोळ पंचायत समिती इमारतीमध्ये ७ वर्षानंतर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लिफ्टची सुविधा शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या प्रयत्नामुळे प्रशासकीय इमारतीमधील लिफ्टच्या कामाला ७ वर्षांनंतर कामास सुरुवात झाली . याकामी पाठपुरावा केल्याबददल प्रशासक तथा गटविकास अधिकारी शंकर कवितके यांचा ' प्रहार ' संघटने तर्फे सत्कार करण्यात आला.         येथील पंचायत समिती कार्यालय येथे प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माने होते. यावेळी कवितके यांना सन्मानपत्र कोल्हापुरी फेटा व शाल देऊन प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समितीचे बांधकाम उपाभियंता संदेश बदडे यांचा कुरुंदवाड शहराध्यक्ष सुधाकर तावदारे यांनी सत्कार केला. प्रहारचे राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केले. प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष पिरजादे यांनी प्रास्ताविक भाषणात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कवितके...

शिरोळच्या पै अमृता पुजारीने मिळवला महाराष्ट्र केसरी किताब शिरोळकरांनी केला जल्लोष

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :   चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी व शिरोळची सुकन्या पै अमृता शशिकांत पुजारी हिने महाराष्ट्र केसरी व सांगलीची मल्ल पै प्रतीक्षा बागडीचा ३- २ गुणांनी मात करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला फिरोज इतिहासात प्रथमच पै अमृताच्या रूपाने महाराष्ट्र केसरी किताब मिळाल्याने  शिरोळकरांनी साखर पेढे वाटून व फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. गेली अनेक वर्षे पै अमृता पुजारी ही मुरगड येथील सदाशिव मंडलिक कुस्ती केंद्रात सराव करीत आहे तिने राज्य व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अनेक पदके प्राप्त केली होती गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रतीक्षा बागडीकडून तिला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता पण निराश न होता महाराष्ट्र केसरी किताब मिळवायचंच ही जिद्द मनाशी बाळगून पुन्हा जोमाने वर्षभर सराव करीत विविध स्पर्धेत भाग घेऊन यश प्राप्त करीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चटकदार कामगिरी केली. चंद्रपूर येथे मंगळवारी महाराष्ट्र केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी पै प्रत...

जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्राथमिक शाळांची तपासणी

इमेज
  शिरोळ / प्रतिनिधी :  सरकारी प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देऊन शाळेचे कामकाज व भौतिक सुविधा याबाबत तपासणी करण्यात येत आहे. शाळेच्या भौतिक सुविधा शाळेत असणाऱ्या अडचणी याविषयी सर्वोच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळेची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या तपासणी होत आहेत जयसिंगपूर न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश गिरीष गुरव यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती शिरोळ तालुक्यातील सरकारी शाळांना भेटी देऊन शाळेच्या कामकाज व भौतिक सुविधा बाबत शाळेची इमारत स्वच्छतागृह पिण्याचे पाणी शाळेचा परिसर आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी याची माहिती घेऊन अहवाल तयार करीत आहे. मंगळवारी या समितीने चिंचवाड अर्जुनवाड घालवाड कुटवाड कनवाड हसुर शिरटी शिरोळ या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेटी देऊन संबंधित शाळेतील भौतिक स...

एकतारी भजनी स्पर्धेत माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी व चिंतामणी भजनी मंडळ आरग प्रथम

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :    येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा उरुसानिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या एकतारी भजनी स्पर्धेत माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी व चिंतामणी भजनी मंडळ आरग यांना विभागून प्रथम देण्यात आला त्यांना प्रथम क्रमांकाचे ११ हजार रुपयाचे पारितोषीक विभागुन देण्यात आले . तर मानाचे चषक ट्रॉफी दोन्ही मंडळात नाणेफेक करून वरती माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी यांना देण्यात आली .      श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसानिमित्त शुक्रवारी सायंकाळी एकतारी भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत द्वितीय क्रमांक - ७ हजार रुपये , ओमगणेश भजनीमंडळ आरळहट्टी , तृतीय क्रमांक - ५ हजार रुपये गिरलिंग भजनीमंडळ कुटकुळी , चतुर्थ क्रमांक - ३ हजार रुपये बसवेश्वर भजनीमंडळ खंडेराजुरी, तर पाचवा क्रमांक अवधुत आखाडा इंचलकरंजी व सचिदानंद भजनीमंडळ वाघवे यांना २हजार रुपयाचे पारितोषिक विभागून देण्यात आले . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला या स्पर्धेत १६ संघानी...

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामीण रुग्णालय नविन इमारत व प्रमुख रस्ते व गटर्ससाठी 62 कोटीचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : राज्य विधिमंडळाचे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विकास कामासाठीच्या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करण्यात आला यामध्ये शिरोळ तालुक्यातील राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स कामासाठी 45 कोटी तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकांमासाठी 16 कोटी व शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथे संरक्षक भिंत्त (कंपाउंड) साठी 1 कोटी रुपये असे एकूण 62 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याचे मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स करणे तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले होते व त्यापासून रुग्णांना व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांची गेली अनेक दिवस नवीन इमारत बांधकामासाठी वारंवार मागणी होती, तसेच शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथील संरक्षक भिंत बांधणे कामीही मागणी होती त्यामुळे...

माणकापूर येथे राकेश चौगुले कुटुंबियांच्या प्रयत्नाने मोफत गॅस किटचे वितरण

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  पंचायत अध्यक्षा व विद्यमान ग्राम पंचायत सदस्या सौ रूपाली चौगुले, ग्राम पंचायत सदस्या सौ अलका चौगुले तसेच ग्राम पंचायत सदस्य धनंजय चौगुले व चौगुले परिवाराच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री उज्वल योजनेतून मोफत मंजूर करण्यात आलेल्या गॅस किटचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत समस्त चौगुले कुटुंबियांच्या शुभ हस्ते वितरीत करण्यात आले.       समाज कल्याणासाठी काही ना काही करत सतत जनतेच्या हितासाठी धडपडणाऱ्या युवा नेते धनंजय उर्फ राकेश चौगुले या युवकांने समाजातील गोरगरीब गरजू कुटुंबीयांना आजतागायत 240 गॅस कनेक्शनचे वाटप केले आहे.तसेच बहुतांश दरिद्री कुटुंबीयांना बीपीएल रेशन कार्ड मिळवून देऊन गरीब व विधवा महिलांचा उध्दार केला आहे.त्यातून आज या ठिकाणी 35 कुटुंबीयांना या मोफत गॅस किटचे वाटप करण्यात आले आहे.        निस्वार्थी कार्य आणि अंगी समाजसेवेची आस,यामुळे माणकापुर तत्कालीन ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत राकेश चौगुले सह पत्नी रूपाली,आई अलका चौगुले यांनी जनतेने दिलेल्या पाठिंब्यावर ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत एकाच घरातून एक...

पै संग्राम पाटील यांनी डंकी डावावर पै सुबोध पाटील यास दाखविले आस्मान

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त बुधवारी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पै संग्राम पाटील याने पै . सुबोध पाटील यास त्याने टाकलेला घुटना मोडून काढत डंकी डावावर विजय मिळवून हे कुस्ती मैदान मारले तर पै .श्रीमंत भोसले ,बाळू अपराध , वासिम पठाण यांनी आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानांना चितपट करून विजय मिळवला उपस्थित मान्यवरांचे हस्ते विजयी पैलवानांना रोख रक्कम, चषक ,व चांदीची गदा पारितोषिक म्हणून देण्यात आली.      बुधवारी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त येथील श्री बुवाफन महाराज मंदिरासमोरील कै .माजी आमदार दिनकररावजी यादव कुस्ती आखाडा येथे कुस्त्यांचे जंगी मैदान झाले या मैदानात लहान मध्यम मोठ्या अशा गटातील सुमारे१३० हून अधिक रोमांचक चित्तथरारक व प्रेक्षणीय कुस्त्या हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत पार पडल्या.           या कुस्ती मैदानाचा शुभारंभ श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील , ...

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त स्केटिंग व श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त बुधवारी खुलागट आणि इनलाईन स्केटिंग तसेच गाडी मागून श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्केटिंग स्पर्धेत रोहन माळी व पियुष मेहतर यांनी प्रथम क्रमांक मिळवला .      बुधवारी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात खुलागट व इनलाईन स्केटिंग स्पर्धा तसेच जुना कुरुंदवाड रस्त्यावर कोल्हापूर जिल्हा गाडी मागून श्वान शर्यत असोसिएशनच्या मान्यतेने गाडी मागून श्वान पळविण्याची स्पर्धा पार पडली विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व शिल्ड आणि चषक पारितोषिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .  स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी युवा नेते किरण पाटील सुशांत कुंभार विनोद केपंवडे बाळासाहेब ढाले लक्ष्मण माने गावडे रमजान मुल्लाणी वैभव शिंदे जगन्नाथ साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते खुलागट स...

कुरुदवाडच्या आदित्यराज जोंग या विद्यार्थ्यांचा प्रामाणिक पणा

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड ता शिरोळ येथील अत्यंत अभिमानास्पद गोष्ट गुरुवारी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर एस पी एम इंग्लीश मिडीयम स्कूल शाळेतील विद्यार्थी आदित्यराज सचिन जोंग घरी जात असताना त्यांना एस .पी शाळेसमोर एक छोटी पर्स सापडली त्या पर्समध्ये सुमारे ५५००/- हजार रुपयाची रोख रक्कम तसेच दीड तोळ्याचे गळ्यातले मंगळसूत्र तसेच एटीएम कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी मौल्यवान गोष्टी होत्या एस पी एम इंग्लीश मिडीयम स्कूल  शाळेतील या विद्यार्थ्यांने प्रामाणिकपणे ती पर्स आणून आपल्या शाळेमधील शिक्षकांकडे जमा केली नंतर ती सदर महिला पर्स शोधत असलेली दिसून आली असता आदित्यराज व त्याचे मित्र त्या महिलेस विचारपूस केली व आपल्या शाळेमध्ये घेऊन आले सदरच्या सर्व वस्तू ओळख पटवून त्या महिलेला लगेच परत केल्या. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्या महिलेने अत्यंत कौतुक उद्गार काढले असून या इंग्लिश मीडियम स्कूल कुरुंदवाड ही शाळा संस्कारक्षम पिढी घडत असल्याचे समाधान व्यक्त केले. या मुलांच्या प्रामाणिकपणाबद्दलचे कौतुक करण्यासाठी आज त्यांना आपल्...

कलाविश्‍व रंगभूमीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  येथील कलाविश्‍व रंगभूमी व सोशल फौंडेशन संस्थेच्या वतीने संस्थेचा वर्धापन दिन व मराठी रंगभूमी दिनानिमित्त शिरोळ तालुक्यातील कलाकार, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा समारंभ सोमवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या जनरल ऑफीस सभागृहात होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान व उपाध्यक्ष रावसाहेब भोसले यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान यावेळी सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीबाबत ‘आम्ही रंगकर्मी विशेषांकाचे’ प्रकाशन होणार आहे.          यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तहसिलदार अनिलकुमार हेळकर व गटविकास अधिकारी शंकर कवितके हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराज यादव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आशाताई गाडीवडर-शिंदे, सिनेअभिनेत्री रेश्मा शेख, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, शिरोळ पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.पाटील, सा...

साई सचिन शिंगाडे याचे अबॅकस राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : इचलकरंजी येथील साई शिंगाडे हा डॉ.डी वाय पाटील विद्यानिकेतन सी.बी. एस.ई. स्कूल साळोखे नगर कोल्हापूर येथे साई सचिन शिंगाडे इयत्ता ३ रीत शिकत असून अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे .यासाठी त्याला सांजदीप अबॅकस अकॅडमीच्या शिक्षिका संजना घोडे. व आई वडील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे . साईने मिळवलेल्या यशासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.