निपाणीच्या सर्वांगीण विकासाची आपण कटिबद्ध : निपाणी आमदार शशिकला जोल्ले
निपाणी नगर पालिकेत नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : अखंड बेळगांव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगर पालिकेत विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्ता मुळे पुन्हा एकदा निपाणी नगर पालिकेत भाजप चे नगराध्यक्ष, व उपनगराध्यक्ष निवडूण आले आहेत.निपाणी च्या इतिहासात नगरपालिकेवर सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आणण्यात आपल्याला मोठ यश आलेलं असून भाजप पक्षाच्या नगरसेविका सोनल कोठाडिया या निपाणीच्या नूतन नगराध्यक्ष्या व उपनगराध्यक्ष म्हणून संतोष सांगावकर यांची निवड झालेली असून येणाऱ्या काळात निपाणी येथील 31 वार्डामध्ये राज्यात कोणतेही सरकार असू दे निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, विकास कामाला कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही असे मत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. त्या निपाणी येथील नगरपालिका कार्यालयांमध्ये नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठाडिया आणि उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांच्या पदभार स्वीका...