सैनिक टाकळीची कन्या कुमारी ऋतुजा घेवडे बनली डॉक्टर
संजय चव्हाण / शिवार न्यूज नेटवर्क : सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील कुमारी ऋतुजा घेवडे बनली डॉक्टर त्यांचे वडील संजय घेवडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या कन्याची जिद्द व अभ्यासाची तयारी खूप चांगले होती. ऋतुजा चे शिक्षण पहिली ते पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी पाचवी ते आठवी शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळी आठवी ते दहावी एस. पी हायस्कूल कुरुंदवाड येथे झाले . दहावी ते बारावी दत कॉलेज कुरुंदवाड पुढील शिक्षण गडकरी मेडिकल कॉलेज गडहिंग्लज मध्ये BHMS परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टरी ही पदवी घेतली. ऋतुजा ने परिस्थितीवर मात करत अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्यांच्या वडिलांचे व आईचे नाव रोशन केले आहे. सैनिक टाकळी मध्ये ऋतुजाचे सत्कार व कौतुक होत आहे. इथून पुढील वाटचालीस सैनिक टाकळी मधून शुभेच्छा दिल्या जात आहेत.