दानोळीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळीची चार पिल्ले ठार
दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क : दानोळी (ता. शिरोळ) येथील अहिल्या नगर येथे अर्जुन गावडे यांच्या शेड वजा गोठ्यातील शेळीच्या पिलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.यात शेळीची चार पिले ठार झाली असल्याने गावडे यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. येथे दोन दिवसांपूर्वी अनिल कारंडे यांच्या पिलांवर देखील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता.यात कारंडे यांच्या शेळीचे एक पिल्लू ठार झाले होते.दरम्यान ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री पुन्हा अर्जुन गावडे यांच्या गोठ्यातील शेळीच्या पिलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे.यात शेळीच्या चार पिलांचा कुत्र्यांनी अक्षरशः जाग्यावरच फडशा पाडला आहे.दानोळीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे.येथील नागरिक व पाळीव प्राण्यांवर भटक्या कुत्र्यां कडुन वारंवार हल्ले होत आहेत.पूर्ण वाढ झालेली व निर्ढावलेली भटकी कुत्री, झुंडीने गावात सर्वत्र बेदरकारपणे फिरत आहेत.यामुळे गावात भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेत गावडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी ...