माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती मॅरेथॉन स्पर्धेत प्रवीण कांबळे प्रथम
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते व श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार माजी आमदार स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या ८ पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या सद् भावना दौड तथा मॅरेथॉन स्पर्धेत सांगलीच्या प्रवीण कांबळे यांने प्रथम क्रमांक मिळवला. कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने माजी आमदार स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौडेंशन यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पारंभी येथील श्री दरगोबा अर्थमूव्हर्स व ट्रान्सपोर्ट कार्यालयात स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला शिवाजी चौक ते जिरगे पेट्रोल पंप ते शिवाजी चौक अशी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली उपस्थितांचे स्वागत श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी केले. या मॅरेथॉन स्पर्धेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत...