पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शरद फार्मसीचे पेपर सादरीकरणात यश

इमेज
यड्राव येथे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना अनिल बागणे. यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :       यड्राव येथील शरद कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थीनींनी राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरणात यश मिळविले. कु. सानिया जमखंडी व कु. तनुजा नार्वेकर यांनी ‘फार्मासिस्ट मिटींग ग्लोबल हेल्थ निड्स्’ या विषयांतर्गत ‘मेडीकेशन थेरपी मॅनेंजमेंट’ या विषयावर पेपर सादर केला. विद्यार्थीनींना प्रा. धनश्री पाटील व प्रा. वैष्णवी मोहिते यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य गौरी फडके यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले. 

विरकुमार मगदुम यांचे दुःखद निधन

इमेज
  बोरगांव : येथील रहिवाशी व सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव या संस्थेचे जत्राट शाखेचे ब्रँच मॅनेजर कै. वीरकुमार अशोक मगदूम ( वय २५) यांचे मंगळवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. वीरकुमार यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता, दोन महिन्यायांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते.  वीरकुमार यांचे अकाली निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, आजी असा परिवार आहे.    

"बेस्ट बॉयलर यूजर" स्पर्धेत श्री दत्त कारखान्याला व्दितीय पारितोषिक

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्पके संचालनालय यांच्या तर्फे आयोजित "बेस्ट बॉयलर यूजर" स्पर्धेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात बाष्पके संचालनालयचे मुख्य संचालक धवल अंतापूरकर व सहसंचालक जी. डी. वानखेडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन कारखान्याला गौरवण्यात आले.     दरम्यान या स्पर्धेसाठी कारखाना क्षेत्र पाहणी करून विविध गोष्टींची माहिती घेऊन कामगार विभाग बाष्पके संचालनालय मार्फत गुण देण्यात आले होते.      बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या हेतूने नवनवीन तंत्रज्ञान, मशीन यांची अद्यावत माहिती आणि रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी व तसेच बाष्पके उद्योगाला चालना देण्यासाठी बाष्पके संचालनालयातर्फे "बॉयलर इंडिया - २०२४" या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व प्रदर्शनीचे आयोजन दिनांक २५ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आले होते...

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी शासनाने साखर आयुक्तांना केले परिपत्रक लागू

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता १०० रूपये व ५० रूपये देण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असून याबाबत साखर आयुक्तांना तसा आदेश देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना काळे झेंडे दाखविण्याच्या आंदोलनाचा धसका घेऊन शासनाने त्याच दिवशी साखर आयुक्तांना परिपत्रक लागू केले.           गतवर्षी झालेल्या आंदोलनात २०२२-२३ या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन १०० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याबाबत तोडगा निघाला होता. सदर प्रस्तावास शासनाने मान्यता न दिल्यामुळे सदरचे पैसे शेतक-यांना मिळू शकले नाहीत. गेल्या १० महिन्यापासून मुख्य सचिव यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सातत्याने विविध आंदोलने करण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखविल्याप्रकरणी कार्यकर्त्यांना चार दिवसाची पोल...

बोरगाव येथे सिद्धेश्वर सोसायटीच्या नूतन वास्तूचे थाटात उद्घाटन

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : बोरगाव तालुका निपाणी येथील श्री सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा व रोप्य महोत्सवी कार्यक्रम जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  याप्रसंगी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले गेल्या २५ वर्षांपूर्वी बोरगाव सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या सिद्धेश्वर सोसायटीने सहकाराला सामाजिकतेची जोड देऊन अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, क्रीडापटूंना सहकार्य याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हित जोपासले आहे.आज या संस्थेची भव्य दिव्य इमारत उभारली असून सहकाराला सामाजिकतेची जोड देणारी ही एक आदर्श संस्था असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.   प्रारंभी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर माझी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, ब...

लंम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करा

इमेज
  आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पशुसंवर्धन विभागाला सूचना  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यात लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यामुळे अनेक जनावरे दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि लंम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी पशुसंवर्धन विभागाला गावोगावी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले, तसेच जनतेमध्ये आजाराबाबत जनजागृती करणे आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. आमदार यड्रावकर यांनी बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, लंम्पी आजारामुळे जनावरांची मोठ्या प्रमाणात हानी होत असून याचा परिणाम थेट पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर होतो आहे. त्यामुळे या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. त्यांनी पशुधन वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. यासाठी गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी करणे, लंम्पीच्या प्रादुर्भाव...

बुबनाळच्या सरपंचपदी सौ.शिवलीला ऐनापुरे बिनविरोध

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : बुबनाळ (ता.शिरोळ)येथील सरपंच पदी बुबनाळ ग्रामविकास आघाडीच्या सौ.शिवलीला नेमाण्णा ऐनापुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याच्या अतिषबाजी केली.   सुकाणू समितीच्या निर्णयानुसार सरपंच सुप्रिया मालगावे यांनी राजीनामा दिला होता . यामुळे हे पद रिक्त झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयात आज सोमवारी दि. ३० रोजी विशेष सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी अमित पडळकर होते. सरपंच पदासाठी शिवलीला ऐनापुरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक भाग्यश्री केदार , तलाठी शिवप्रसाद चौगुले उपस्थित होते.   याप्रसंगी नूतन सरपंच शिवलीला ऐनापुरे म्हणाल्या, गावच्या विकासासाठी मी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करेन. गावात जास्तीत जास्त निधी आणून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.  या निवडीवेळी बापूसो ऐनापुरे ,सुकुमार किनिंगे , सुरेश शहापुरे, नाभिराज ऐनापुरे, सुभाष शहापुरे, राजेश कुमठे, राहुल राजमाने, कुमार ऐनापुरे, याच्या स...

स्व. आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :-  स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. भारती देव (नाशिक) यांच्या मातृत्व आणि संतोष नारायण पाटील (आजरा) यांच्या देव माशाची शेवटची उडी या कथांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे. अशी माहिती इंद्रधनुष्य मासिकाचे कार्यकारी संपादक संजय सुतार व साहित्य सहयोग दिपावलीचे संपादक सुनील इनामदार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.   ते म्हणाले, हे स्पर्धेचे नववे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्पर्धेला लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबई, नवी मुंबई सह महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून 138 कथाकारांनी 147 कथा स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या. मराठी कथा स्पर्धेला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे आम्ही आभार मानत आहोत. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या दर्जेदार कथांना न्याय मिळावा व जास्तीत जास्त नवोदितांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली अंक यांच्यावतीने बक्षिसांच्या संख्येत व...

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते धरणगुत्ती ग्रामस्थांचा सत्कार

इमेज
  धरणगुत्तीला 'माझी वसुंधरा अभियान- चार' मध्ये राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :       राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा अभियान- चार' मध्ये राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक धरणगुत्ती (जिल्हा कोल्हापूर) गावास जाहीर झाला असून 75 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. या निमित्ताने श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सहकार महर्षी, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील गाव विकासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.      पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित 'माझी वसुंधरा अभियान' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2020 पासून राबवण्यास सुरुवात झाली. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत 'माझी वसुंधरा अभियान- चार' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात आले.        या अभियानात राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था व 22,218 ग्रामपंचायती अशा एकूण 22,632 स्थानिक ...

होम पिचवर श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी झेप

इमेज
        कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :    नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय,कुरुंदवाड या महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शनिवार दिनांक २८ मे रोजी १९ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या .या स्पर्धेमध्ये श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडच्या १९ वर्षाखालील मुले व १९ वर्षाखालील मुली खो-खोच्या संघाने प्रथम क्रमांक पटकला.व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी झेप घेतली. विजयी संघाचे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री .आर .जे पाटील यांनी अभिनंदन केले.        या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदविला होता . श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयया १९ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघाचा अंतिम सामना जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या संघाशी झाला. या सामन्यात श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या १डाव २ गुणांनी जयसिंगपूर कॉलेजच्या संघावर विजय मिळविला. तर १९ वर्षाखालील मुलीच्या संघाचा अंतिम सामना कन्या घोडावत महाविद्यालयाच्या संघाबरोबर झाला .यामध्ये श्रीदत्त कनिष्ठ महाविद्याल...

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून हेरले येथील २८ तर जिल्ह्यातून ८०० ज्येष्ठ नागरिक आयोध्येला रवाना

इमेज
  संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील २१, माले येथील ६ तर चोकाक येथील २ असे एकुण २८ महिला व पुरुष तर जिल्ह्यातून ८oo प्रवासी आयोध्यास रवाना झाले. या यात्रेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, हातकणंगले लोकसभेचे खासदार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापूर्वीपासून फॉर्म भरण्याचे काम सुरु होते, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड व दादासो कटकोळे,अशोक कदम, सुरेश कदम यांचे सहकार्य लाभले.

वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना : मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

इमेज
  ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :      आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे व्हिडीओ संदेशामधून केले. त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरूवात झाली. खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले. या...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्थैर्य सुधारले : छायाताई सूर्यवंशी

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा समन्वयिका छायाताई सूर्यवंशी यांनी दिली. महिलांचे सबलीकरण व आर्थिक स्थैर्य यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महिलांना विविध आर्थिक व सामाजिक लाभ दिले जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला जात आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने कटीबद्धता व्यक्त केली आहे. महिलांना स्वयंनिर्भर बनवणे, त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्या भूमिकेला बळ देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. छायाताई सूर्यवंशी यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना गृहभेटी दिल्या जात आहेत. या भेटी दरम्यान महिलांच्या समस्यांचे ऐकून त्यावर त्वरित उपाय...

पार्वती इंडस्ट्री इस्टेटने परिसरातील औद्योगिक प्रगतीला नवा वेग दिला : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क : शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक व्हावा, या दृष्टिकोनातून ४३ वर्षांपूर्वी स्व. शामराव पाटील यांनी पार्वती इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्यांचा ध्येयवाद आज फळाला आला असून, यड्राव येथे उभ्या असलेल्या पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री इस्टेट लिमिटेडने परिसरातील औद्योगिक प्रगतीला नवा वेग दिला आहे. आज या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २५० ते ३५० उद्योग कार्यरत आहेत. शिरोळ तालुक्यातील अकिवाट आणि उदगाव या ठिकाणीही उद्योग उभारणीचा प्रयत्न सुरू आहे, ज्यामुळे तालुक्याचा औद्योगिक विकास अधिक गतीने होईल, असे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री इस्टेट लिमिटेडची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी चेअरमन आमदार डॉ. पाटील यड्रावकर बोलत होते. त्यांनी शिरोळ तालुक्यातील उद्योगधंद्यांच्या विकासासाठी सोलर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला. सुमारे १३.५ कोटी रुपयांच्या निधीतून पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमधील सर्व ...

VFX च्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना हॉलीवुड आणि बॉलीवूडच्या चित्रपटात काम करण्याची संधी

इमेज
भा गातील विद्यार्थ्यांसाठी VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) क्षेत्रात करिअरची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. चित्रपट, जाहिराती, गेमिंग, आणि अॅनिमेशनमध्ये VFX चा वापर वाढत आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील तज्ञांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी VFX क्षेत्रात करिअर करु शकतात आणि शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट सृष्टीत काम करण्याची संधी मिळावी या हेतूने हेरवाड तालुका शिरोळ येथील मोहसिन जमादार यांनी कुरुंदवाड एस. के. पाटील कॉलेज रोड लगत शुगरकेन मीडिया वर्क्सची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हॉलीवुड आणि बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स च्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जमादार यांनी विद्यार्थ्यांना कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन पुणे मुंबई आणि विविध देशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट सृष्टीत जाण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने अनेक विद्यार्थी यामध्ये करिअर करू शकतात. मोहसीन जमादार यांनी प्रशिक्षण ...

गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळीच्या मुलींचे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : भोसे ता.मिरज येथे 14 वर्षांखालील मुलींच्या शालेय विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेत, "गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी" च्या संघाचं "उपविजेतेपद"अटीतटीच्या लढतीत ग्रामीण भागातील मुलींना मिळालेले यश टाकळी ता शिरोळ पंचक्रोशीतील सर्वांना अभिमान वाटावा असा आहे. क्वार्टर फायनलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा होता. सलग दोन सेट जिंकून 25--8, व 25--11असा जिंकून सेमी फायनलमध्ये सातारा जिल्ह्यातील मुलींच्या संघाला,25--18, व 25--11असे हरवून अंतिम सामन्यात सांगली इस्लामपूर या संघाबरोबर चिवट झुंज दिली व उपविजेतेपद पटकावले. संबंधित स्पर्धेत सहभागी मुलींच्या मधून राज्य संघ निवडण्यात येते त्या साठी गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी मधील दोन नावे संभावित निवडीसाठी पूर्वा मोकाशी व वैदई अनिल पाटील ही नावे घेतली आहेत त्या बद्दल सर्वत्र मुलींचं कौतुक होत आहे. क्रीडा प्रमुख वासमकर व सहाय्यक प्रतिक काटकर,साहिल यांचे मार्गदर्शन लाभले.

साप्ताहिक इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक रविंद्र कांबळे यांना "दर्पण" पुरस्कार जाहीर

इमेज
  जांभळी / शिवार न्यूज नेटवर्क : जांभळी गावचे सुपुत्र व साप्ताहिक इंडियाचा आवाज व न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक रविंद्र कांबळे यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेसतर्फे उत्कृष्ट पत्रकार म्हणून दिल्या जाणाऱ्या "दर्पण" पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.            सर्वसामान्य जनतेच्या व्यथा व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यासारख्या अनेक प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्री. रविंद्र कांबळे यांनी केला आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात ही उल्लेखनीय कार्य करीत आहेत. तसेच सन 2019 ला साप्ताहिक इंडियाचा आवाजची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते सन 2024 पर्यंत चा पत्रकार ते संपादक हा प्रवास करत असताना प्रथम काही वर्ष एका साप्ताहिकांमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना काही लोकांच्या व्यथा न मांडता आल्याने एक ठोस भूमिका घेऊन स्वतःच्या वृत्तपत्राची स्थापना केली. तेव्हापासून अतिशय कष्टातून इंडियाचा आवाज या चॅनेल व साप्ताहिकाची स्थापन करून लोकांच्या सेवेसाठ...

श्री दत्त कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :   ठरल्याप्रमाणे प्रतिटन शंभर रुपये अधिक देण्यास आम्ही तयार असून शासनाने परवानगी द्यावी त्यासाठी आम्हीही खास प्रयत्न करीत असून शासनाने परवानगी दिल्याबरोबर ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा करणार असल्याची माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दिली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपस्थित बहुसंख्य सभासदांनी सर्वच विषय हात उंचावून मंजूर केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील हे होते. यावेळी सभासदांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाचे उत्तर कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी दिली. त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. सुमारे एक तास ही वार्षिक साधारण सभा सुरू होती. यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की चालू वर्षी 15 ते 16 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चालू गळीत हंगामात एफ आर पी ...

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या सत्यतेवर न्यायालयाने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

इमेज
  मुंबई / शिवार न्यूज नेटवर्क : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदे, जो अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली होता, याला पोलिसांनी गोळी घालून ठार केले. पोलिसांनी दावा केला की शिंदेने एका पोलिसाचा पिस्तूल हिसकावून घेतल्याने त्याला ठार करण्यात आले, परंतु न्यायालयाने या दाव्यांवर शंका व्यक्त केली. उच्च न्यायालयाने विचारले की पोलिसांनी शिंदेला थेट डोक्यात गोळी मारण्याऐवजी त्याच्या पायात किंवा हातात गोळी का मारली नाही. यामुळे एन्काऊंटरच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. न्यायालयाने या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची गरज असल्याचे सांगितले. यासोबतच शिंदेच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल करून विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या मते, हा खोटा एन्काऊंटर होता आणि त्यामागे मोठी साजिश आहे. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व CCTV फुटेज जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामध्ये शिंदेच्या तुरुंगातून बाहेर पडण्याच्या क्षणांपासून ते त्याच्या कुटुंबीया...

सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कोळी यांनी जपली सामाजिक बांधीलकी

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      सेवानिवृत्तीनंतरही काही व्यक्ती सामाजिक बांधीलकी विसरत नाहीत. सेवाकाळात समाजाने दिलेले सहकार्य व ऋण विसरले जात नाहीत. समाजासाठी काहीतरी देणे लागतोय या विचाराने भारलेल्या शिरोळ चे सुपुत्र व कुमार विद्या मंदिर घालवाड चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी चन्नाप्पा कोळी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेवून स्पोर्टस कीटसाठी २५,००० रुपयांची देणगी दिली.याबद्दल त्यांचा विशेष सत्कार शिरोळ च्या कर्तबगार गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रकाश रत्नाकर सरांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.           मान्यवरांचे हस्ते स्पोर्टस कीटसचे अनावरण करण्यात आले. तसेच पालकांचे उद्बोधन किरण पाटील यांनी केले.बावडेकर उद्योग समूहाचे शरद बावडेकर व आदिनाथ हुक्कीरे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, केंद्रप्रमुख आण्णा मुंडे, माजी सरपंच देवा तात्या इंगळे,समाजसेवक रफिक शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद खाडे व सदस्य,शिक्षक गफार बैरागदार,बंडू राऊत,बालाजी माकण...

शेडशाळच्या उपसरपंचपदी फैय्याजअहमद सोलापूरे यांची बिनविरोध निवड

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील शेडशाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी फैय्याजअहमद सोलापूरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शेडशाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.भारती शिवाजी लाड यांनी सुकाणू समितीने ठरवून दिलेला कालावधी संपल्यामुळे उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.रिक्त उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुष्पा शिरढोणे होत्या.उपसरपंचपदासाठी फैय्याज अहमद सोलापूरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच गजानन चौगुले, माजी सरपंच किरण संकपाळ, माजी उपसरपंच प्रियांका कल्याणी, माजी उपसरपंच भारती लाड, ग्रामपंचायत सदस्य सुनील संकपाळ, सदाशिव कदम,हैदरअली पाथरवट, ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षी गडगे,सुनिता नाईक,रोहिणी कोल्हापूरे,करिश्मा पाथरवट, ग्रामविकास अधिकारी सुनील वाघमोडे व ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते.निवडीनंतर नूतन उपसरपंच फैय्याज अहमद सोलापूरे यांचा विविध नेत्यांनी आणि समर्थकांनी सत्कार केला.

शहा, राधाकृष्णन यांच्या दौऱ्यात स्वाभिमानी दाखविणार काळे झेंडे

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :      स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सन २०२२ -२३ या गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसास प्रतिटन ४०० रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे बेंगलोर महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफजी यांच्या मध्यस्थीने प्रतिटन १०० रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले. जवळपास १० महिने झाले तरीही सरकारकडून सदर प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या दौ-यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत.      सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता मान्यतेसाठी साखर आयुक्त यांचेमार्फत गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मुख्य सचिव यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आज अखेर जवळपास १० महिने झाले याबाबत मुख्य सचिव यांचेकडून याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. याबाबत जवळपास ६ वेळा मुख्य ...

कवठेगुलंदच्या समरजीत योगेश जगतापचे सुयश

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : इचलकरंजी टँलेट सर्च परिक्षेत कवठेगुलंदचा समरजीत योगेश जगतापने प्रथम क्रमांक पटकावला.       समरजीत जगताप हा बुबनाळ (ता.शिरोळ)येथील कुमार विद्या मंदिर प्रशालेचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे. समरजीतने ३०० पैकी २९४ गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला.तसेच याच प्रशालेचे ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. ही परिक्षा खाजगी प्राथमिक शिक्षक समिती इचलकरंजीमार्फत प्रत्येक वर्षी घेतली जाते.कार्यक्रमाचे बक्षिस वितरण खासदार धैर्यशील माने व इचलकरंजीचे अशोक स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा शहापुरे,वर्गशिक्षक विलास चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

मलिकवाड जनशक्तीला 14.19 लाखांवर नफा : अध्यक्ष सुनील भेंडीकटगे यांची माहिती

इमेज
अमर माने / शिवार न्यूज नेटवर्क : मलिकवाड, येथील जनशक्ती को-ऑप.क्रेडिट सोसायटीने सभासद, ठेवीदार, ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे संस्था प्रगतीपथावर पोहचली असून यंदा संस्थेला 14 लाख 19 हजार 429 रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील भेंडीकटगे यांनी दिली. ते संस्थेच्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. प्रारंभी संचालक व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली. संचालक नितीन पाटील यांनी स्वागत केले. संस्थेचे कार्यनिर्वाहक संजय कुन्नूरे ताळेबंद पत्रक व अहवाल वाचनात म्हणाले, सभासद 610, भागभांडवल 14 लाख 56 हजार, निधी 72 लाख 18 हजार, ठेवी 9 कोटी 46 लाख 19 हजार, गुंतवणूक 4 कोटी 49 लाख 7 हजार, कर्जवितरण 5 कोटी 69 लाख 57 हजार असून यंदा 14 लाख 19 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 11 टक्के लाभांश दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील, माजी सदस्य राजेंद्र पाटील, महावीर दुग्गे यांनी मगोगते व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष राजू अंकले, संचालक सुभाष वडगावे, तानाजी सोकांडे, नरसिंग कोळी, दत्ता खोत, सदाशिव वंजी...

बोरगाव येथील जनता सोसायटीला ३६ लाख ३ हजार ६६२ रुपये इतका निव्वळ नफा

इमेज
                                                     अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :           बोरगांव सह परिसरातील एक अग्रगण्य असलेली डॉ शंकर माळी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री जनता को-ऑप - क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात 36 लाख,03 हजार,662 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनामध्ये या संस्थेने आदर निर्माण केला आहे.त्यामुळेच ही संस्था तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर माळी यांनी व्यक्त केले.ते आयोजित संस्थेच्या 25 व्या रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी पदावरून बोलत होते.        प्रारंभी पंचम लिंग महा स्वामिजिंच्या चरण कमलांचे विधिवत पूजन करण्यात आले .यावेळी स्वामीजींनी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभ...

अपात्र कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी : अनिलराव यादव यांची पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे मागणी

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :        शिरोळ तालुक्यात देवस्थान जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून तात्काळ कर्जपुरवठा करावा तसेच अपात्र 44 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शिरोळ तालुक्याचे नेते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात सोमवारी अनिलराव यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील देवस्थान जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांचा थांबवलेला कर्जपुरवठा चालू करणे गरजेचे आहे सदरचे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे महापुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे गरजेचे आहे या कामी आपण जातीने लक्ष घालून तात्काळ कर्ज पुरवठा सुरू करावा तसेच शेतकऱ्यांना महापुरातील नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 112 कोटी अपात्र कर्जमाफी व्याजासह नाबार्डने बेकायदेशीररित्या वसुल केली ...

व्हॉईस ऑफ मिडीयाची निवडणूक उत्साहात ; व्हॉईस ऑफ मिडीयाच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल म्हस्के तर सरचिटणीस पदी दिगंबर महाले

इमेज
  कार्याध्यक्षपदी योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक यांची निवड मुंबई / शिवार न्यूज नेटवर्क :      जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्या द्वारे नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेमध्ये बुलढाण्याचे अनिल मस्के यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली. तर जळगावचे दिगंबर महाले यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लागली. कार्याध्यक्षपदी नंदुरबारचे योगेंद्र दोरकर, परभणीचे विजय चोरडिया आणि चंद्रपूरचे मंगेश खाटीक, उपाध्यक्ष म्हणून सोलापूरचे अजित कुंकुलोळ यांना प्रचंड मताधिक्य मिळवून त्यांची निवड झाली.  गेल्या एक महिन्यापासून व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणुकीमुळे राज्याची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाली होती. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भारतामधल्या संपूर्ण राज्याच्या निवडणुका होणार असे जाहीर केले होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा निवडणुकीचा ...

उदगांव येथे जोरदार पावसामुळे सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद

इमेज
उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क :  मुसळधार पावसामुळे रविवारी मध्यरात्री कोल्हापूर-सांगली बायपास महामार्गावरील उदगाव येथे ओढ्यावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे. सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने, जयसिंगपूर-उदगाव मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत उसंत घेतलेल्या पावसाने सायंकाळ नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे जयसिंगपूर शहरातून उदगाव येथील कृष्णा नदीला जोडणाऱ्या मुख्य ओढ्याला पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने रविवारी मध्यरात्री सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव टोल नाक्यावर बॅरिकेट लावून वाहतुकीचे नियोजन केले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास वाहत्या पाण्यातूनच मोठी वाहने जात होती. मात्र छोटी वाहने व दुचाकी जात नसल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. जयसिंगपूर-उदगाव मार्गे वाहतूक सुरू असल्याने सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्ग ठप्प झाला आहे.

बोरगांव येथील श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाची वार्षिक सभा खेळीमेळी संपन्न

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :                        सहकार क्षेत्रात अल्पावधीत यश संपादन केलेली बोरगाव येथील श्री जिनलक्ष्मी सौहार्द संस्थेला अहवाल सालात 02 लाख 79 हजारावर नफा झाला असल्याचे मत प्रतिपादन चेअरमन अजित पाटील यांनी केले.तर लवकरच संस्थेच्या नव्या दोन शाखेचे विस्तारीकरण करणार असल्याचेही सांगितले.       ते बोरगाव येथील राजकिचन हॉलमध्ये श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते ,कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरगाव शिक्षण संघाचे निवृत्त मुख्याध्यापक टी डी सावाडे हे होते.                                     कार्यक्रमाचे स्वागत सहशिक्षक बशीर मुजावर यांनी केले. श्री लक्ष्मी देवतेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संघाचे चेअरमन श्री अजित पाटील म्हणाले की आमच्या जनप्रिय जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाची अहवाल सालात एकूण 542 इतकी स...

भावी पिढी सक्षम व सुजाण होण्यासाठी ग्राहक प्रबोधन आवश्यक:डॉ.कुमार पाटील

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : : विद्यार्थी हे देखील ग्राहक असून ते तर भावी पिढीची फसवणूक टळेल व ते सक्षम होतील असे विचार साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ.कुमार रामगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी संस्थापित अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहक प्रबोधनपर व्याख्यानमाला देशभर सुरु आहेत. जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळा नांदणी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुका अध्यक्ष राजेश शंभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक प्रबोधन व्याख्यान मोठया उत्साहात संपन्न झाले.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्गदर्शक डॉ.कुमार पाटील यांनी ग्राहक प्रबोधन व आरोग्य संस्कार याविषयी मार्गदर्शन केले.त्यामध्ये त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या सुरक्षिततेचा हक्क,माहिती मिळवण्याचा हक्क,वस्तू निवडण्याचा हा तक्रार निवारण्याचा हक्क,ग्राहक शिक्षणाचा हक्क व आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क यांची ओळख करून देऊन निरामय आरोग्यासाठी दिनचर्या ऋतुचर्या याची...

हेरवाड गावचे सुपुत्र अजितकुमार पाटील “अमेझिंग इंडियन पर्सनॅलिटी पुरस्काराने सन्मानित

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये ‘अमेझिंग भारत’ या संस्थेकडून आयोजित कार्यक्रमात माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांना “अमेझिंग इंडियन पर्सनॅलिटी” या सन्मानाने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांनी म्हणाले, “हा सन्मान मिळाल्याचा मला अत्यंत आनंद आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले. मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे सांगितले. ‘अमेझिंग भारत’ ही संस्था गेल्या नऊ वर्षांपासून आपल्या कार्यामुळे प्रेरणादायी असलेल्या व्यक्तींना सन्मानित करत आहे. या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुंबई पोलिस महासंचालक, ‘द कपिल शर्मा शो’ चे प्रोड्युसर, बॉलिवूडमधील मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.

हेतू प्रामाणिक असल्यास मदतीचा ओघ अखंड : राहूल घाटगे

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : कोणत्याही कार्यात हेतू प्रामाणिक असल्यास मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरु राहतो. याची अनुभूती २०१९ च्या महापुरात गुरुदत्त कारखान्यावरील छावणी दरम्यान आली. तसाच अनुभव या शाळेबद्दल देखील येत असल्याचे मत गुरूदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी व्यक्त केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील देणगीदारांच्या सत्कार समारंभात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशश्री पॉलीचे चेअरमन टी. बी. पाटील होते.घाटगे पुढे म्हणाले संस्थेने देणगीदारांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .त्याचा वापर योग्य प्रकारे करून आपला शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे . याच बरोबर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी विविध खेळही खेळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शाळेस सिक्युरिटी केबिन देणगी दिल्या बद्दल टी. बी. पाटील यांचा सत्कार संस्थेचे सचिव राजेश पाटील यांच्या हस्ते , खोल्यांचे सीलिंग करून दिल्या बद्दल राहुल घाटगे यांचा सत्कार संचालक पी .जी .पाटील यांच्या हस्ते तर सन १...

यश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत भरारी :आमदार डाॅ.राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेची तयारी करवुन घेऊन त्यांना शासकीय सेवेत निवड होईपर्यंत मार्गदर्शन करण्याचे कार्य प्रा.सागर माळी यांनी यश अकॅडमीच्या माध्यमातुन केले आहे.यामुळे अल्पावधीतच यश अकॅडमीचे १०३ विद्यार्थी विविध शासकीय क्षेत्रात चमकले.प्रा.सागर माळी यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असे गौरवोदगार तालुक्याचे लोकप्रिय आमदार,माजी राज्यमंत्री डाॅ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले.     कुरुंदवाड येथील यश अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे उपस्थित होते.   डाॅ.यड्रावकर पुढे म्हणाले,प्रा.सागर माळी यांनी अत्यंत अल्प फीमध्ये विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल्याने त्यांच्या १०३ विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत नोकरी मिळाली.आज हे विद्यार्थी कमी वयातच स्वतःच्या पायावर उभे राहुन कुटुंबाचे आधार बनले आहेत.यामुळे प्रा.सागर माळी हे यश अकॅडमीच्या माध्यमातुन एकप्रकारे सामाजिक कार्यच करीत आहेत. माजी नगरसेवक रणजीत डांगे यांनीही यशस्वी ...

बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट संघ नेहमीच सभासदांच्या पाठीशी : चेअरमन जावेद चोकावे यांचे मत

इमेज
  आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  कर्जदार व सभासद हा सहकारी संस्थेचा आर्थिक कणा आहे, आज संकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागेपुढे पाहत आहे .अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडीअडचणी येत आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले. कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची प्रगती होत असल्याने बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी ही संस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी राहून त्यांचे हित जोपत असल्याचे मत संस्थेचे चेअरमन जावेद चोकावे यांनी व्यक्त केले. येथे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची आठवी वार्षिक सर्व साधारन खेळी मिळत संपन्न झाली. प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.सहकार क्षेत्रात काम करीत असताना विश्वासहर्ता व प्रामाणिक याला अधिक महत्त्व असते. हे आपण ओळखून कार्य करीत असल्याने आज संस्था प्रगतीपथावर आहे. निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचारी वर्गामुळे ही छोटी ची संस्था आज प्र...

यश अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड येथील यश अकॅडमीतर्फे विविध स्पर्धा परिक्षेतुन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तालुक्याचे लोकप्रिय आमदार, माजी राज्यमंत्री डाॅ.राजेद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती यश अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर माळी यांनी दिली.    सत्कार सोहळा रविवार दि.२२ रोजी सकाळी दहा वाजता.एस.के.पाटील काॅलेज रोडवरील स्पेक्ट्रा अकॅडमी येथे होणार आहे.या कार्यक्रमासाठी कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.    यश अकॅडमीचे विद्यार्थी सागर गावडे,महेश बुबनाळे यांची मुंबई पोलीसपदी,विठ्ठल शिंदे यांची एमपीएससीतुन मंत्रालय क्लाॅर्कपदी,कु.प्रतिक्षा मोरे यांची सिंधूदुर्ग पोलीसपदी,कु.सानिका पाटील हिची रत्नागिरी पोलीसपदी,कु.मोनाली कांबळे,सौ.दिपाली शिंदे,सौ.सुषमा कांबळे यांची आरोग्यसेविकापदी निवड झाली आहे.  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेतुन शासकीय सेवेत निवड झाली आहे.यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहीती प्रा.सागर माळी य...