जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत कनिष्ठ गटात कुमार विद्यामंदिर नं.३ कुरुंदवाड द्वितीय
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे झालेल्या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत कनिष्ठ गटात कुरुंदवाडच्या कुमार विद्या मंदिर नं. ३शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला. कोल्हापूर जिल्हयातील सर्वांत जादा पटसंख्या वाढविलेली शाळा विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविलेला आहे. सांस्कृतिक स्पर्धेमध्येही बौद्धीक गुणवत्तेचे नैपुण्य समजल्या जाणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतही द्वितीय क्रमांक पटकाविलेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.सर्वच्या सर्व फेरीतील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली.मात्र बोनस गुणांची संधी न मिळाल्याने द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी-श्रेयश काकासो डोरले, अवधूत मदन पाटील,देवराज सुनील डोर्लीकर यांना वर्गशिक्षिका - संपदा पाटील,रागिनी पाटील,रंजना माने यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक तथा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील,अध्यापक शिवाजी ठोंबरे,शंकर दिवटे यांचे प्रोत्साहन लाभले.