मराठा आरक्षण : आमदार यड्रावकर मराठा समाजासोबत
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मागील अनेक वर्षापासून सरकारकडे मागणी करत आहे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सुरुवातीपासून मराठा समाजाच्या या न्याय मागणी सोबत होते,या पुढच्या काळात देखील मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ते नेहमीच मराठा समाजासोबत कायम राहतील अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र आदित्य राजेंद्र यड्रावकर यांनी दिली, अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले श्री. मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिरोळ येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या साखळी उपोषणास आदित्य यड्रावकर यांनी मंगळवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला यावेळी ते बोलत होते, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या खासदार व आमदारांच्या बैठकीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईला गेले आहेत असे सांगताना सोमवारी त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून मराठा समाजाच्या मागणीबाबत आपण मराठा समाजा सोबत निर्धाराने उभे राहणार असल्याचे सांगितले होते,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या...