पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय पाटील यांचा हेरवाड येथे सत्कार

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार येथील शिक्षक विजय पाटील यांना सावंतवाडी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हेरवाड येथील एकता युवा ग्रुप च्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विजय पाटील म्हणाले, आजपर्यंत शैक्षणिक विभागात केलेल्या कामाची या पुरस्काराने पोहोचपावती मिळाली आहे. यापुढेही शैक्षणिक कार्यात अग्रभागी राहून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून या पुरस्कारामुळे पुढील कार्य करण्यासाठी बळ मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी राजू ढोणे, माजी उपसरपंच विकास माळी, श्रीकांत ईटाज, श्रेणीक ढोणे, हरिष कुन्नुरे, संतोष शिरोळे, राहूल ईटाज यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोडावत विद्यापीठास उत्कृष्ट विद्यापीठासह पायाभूत सुविधा,ग्रीन कॅम्पस पुरस्कार

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : ऑडो॔र कॉम यांचेकडून संजय घोडावत विद्यापीठास उत्कृष्ट विद्यापीठासह पायाभूत सुविधा, ग्रीन कॅम्पस पुरस्कार प्राप्त झाला. हॉटेल रेडिसन ब्ल्यू पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विश्वस्त विनायक भोसले यांनी ऑडो॔र कॉम चे सह-संस्थापक चंदन आनंद यांच्या हस्ते स्वीकारला.       विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पडणाऱ्या पावसाची बचत विद्यापीठाने केली आहे.तसेच विद्यापीठाच्या आवारात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.ज्यामध्ये काही परदेशी व देशी वाणांचा समावेश आहे. यामुळे विद्यापीठाचा परिसर हिरवागार झाला आहे. त्यामुळे येथील वातावरण एकदम प्रसन्न राहते. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेताना होत आहे.      विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वार...

भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून जगण्याची समान संधी : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

इमेज
                कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : भारतीय संविधानामुळेच माणूस म्हणून जगण्याची समान संधी सर्वांना मिळाली आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरातील बिंदू चौकात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. भारतीय संविधानाचे रक्षण ही आम्हा सर्व भारतीयांची जबाबदारीच आहे, असेही ते म्हणाले.  संविधान दिनानिमित्त कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये भारतरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी संविधान रॅलीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅली सुरू झाली. संविधान रॅलीमध्ये 'भारतीय संविधानाचा विजय असो', यासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्म...

स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्याकडून कबड्डीला उभारी देण्याचे कार्य : ई प्रसाद राव

इमेज
प्रो कबड्डीतील अधिकारी पंचांची दत्त कारखान्यास सदिच्छा भेट शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास प्रो कबड्डी या क्षेत्रातील टेक्निकल अधिकारी व पंचांनी सदिच्छा भेट दिली.  प्रो कबड्डीचे टेक्निशन डायरेक्टर ई प्रसाद राव, टेक्निकल सुपरवायझर श्री नटराजन, विश्वास मोरे , मैत्री मॅडम, प्रो कबड्डीचे संयोजक व मशाल स्पोर्ट्सचे अधिकारी ओंकार प्रभू, स्टार स्पोर्ट्स टी व्हीचे अधिकारी राहुल सर आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ.रमेश भेंडीगिरी व पंचांनी शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली आलेल्या सर्व मान्यवरांचा श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इ प्रसाद राव बोलताना म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कबड्डी खेळा रुजलेला आहे हा कबड्डी खेळ वाढवण्यासाठी माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. तसेच शेतीतील निर्जीवमातीला सजीव करण्याचे ऐतिहासिक कार्य गणपतराव पाटील यांनी केले आहे. श्री नटराजन व विश्वास मोरे ह...

हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बोरगाव बावाढंगवली दर्गा उरूस

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली गुलखा व हजरत पीर हैदरशा मदरशा यांचा उरूस बुधूवार 29 नोव्हेंबर 2023 ते शनिवार 2 डिसेंबर 2023 अखेर साजरा होत आहे. त्या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार 1 डिसेंबर रोजी उरुसाचा मुख्य दिवस आहे त्यानिमित्ताने. निपाणी तालुक्यातील बोरगाव हे दूधगंगा नदी काठावर वसलेले शहर. तालुक्यातील सदन गावांपैकी एक.शहराला बारा महिने वाहणाऱ्या दूधगंगा नदीचे वरदान आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्या सहकार व राजकीय क्षेत्रामुळे राज्यात नालोकिक मिळवलेले शहराची लोकसंख्या सुमारे 19 हजारांवर आहे.गावातील श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर ,जैन बसदी, ज्योतिबा, हनुमान ,मातंगी, बिरदेव , वाशिकान, संतुबाई,यल्लमा ,महादेव थलोबा ,मल्लय्या, मारागुबाई देवांची मंदिर आहेत .त्यापैकीच बावाढंगवली दर्गा शरीफ हे ग्रामदैवत मानले जाते. बावाढंगवली यांचे मूळ नाव अब्दुल वगळू आलिशा बावाढंग हे बगदाद देशातील काटारी येथील आह...

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :      स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊसाला प्रतिटन 400 रुपये जादा दर द्यावा व ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी होणारी आंदोलने, सकल मराठा समाजास ओ.बी.सी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता करण्यात येणारी आंदोलने, साखळी उपोषण, तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 (The Maharashtra Police Act, 1951) चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्या पासून ते दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी मनाई आदेश जारी केला आहे.   कलम 37 (1) अ ते फ :-     शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठया किंवा लाठयाकिंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक ...

कुणबी नोंदीचे अभिलेख जबाबदारीने तपासा : आमदार यड्रावकरांच्या प्रशासनाला सूचना

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्याच्या महसूल, भूमी अभिलेख, पंचायत समितीसह सर्व विभागाकडून कुणबी नोंदी बाबतचे अभिलेख तपासण्याचे काम सुरू आहे पण अद्याप एकही कुणबी नोंद सापडली नाही, असे असले तरी मोडी व उर्दू लिपीत आढळलेल्या अभिलेखांची पडताळणी तातडीने करा व उर्वरित अभिलेख शोधताना कुणबी असल्याच्या नोंदी जबाबदारीने तपासा अशा सूचना माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुका प्रशासनाला दिल्या. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक पद्धतीने सुरू केलेल्या कार्यवाहीला आता गती आली आहे त्यामुळे मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ज्या मराठा समाज बांधवांकडे व्यक्तिगत स्वरूपातील मराठी, उर्दू अथवा मोडी भाषेतील कुणबी नोंदी असल्याबाबतचे अभिलेख उपलब्ध असतील तर त्यांनी ते अभिलेख तातडीने तहसीलदार शिरोळ यांच्याकडे सादर करावेत, उर्दू व मोडी भाषा वाचू व लिहू शकणाऱ्या तज्ज्ञांची नेमणूक शासनाने असे अभिलेख शोधण्यासाठी केली आहे, अभिलेख उपलब्ध होणाऱ्या सर्व मराठा समाज ...

सदलगा शहरातील सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा

इमेज
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरातील सदलगा नगरपालिका सदलगा या संस्थेचे कर्मचारी श्री प्रकाश माळगे हे सफाई कामगार आहेत त्यांची आर्थिक स्थिती देखील बेताचीच आहे. काल संध्याकाळी नवीन बसस्थानक शेजारी सफाई चे काम करताना त्यांना एक पर्स मिळाली. त्यांनी ती पर्स प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष राहून आपले वरिष्ठ मुख्याधिकारी श्री शिवानंद भोसले यांच्याकडे दिली. त्यांनी त्या पर्समधील ओळखीवरून तन्मय कुलकर्णी या व्यक्तींना बोलावून सदर पर्सची खातर जमा केली. पर्स त्यांचीच असल्याची ओळख पटल्यानंतर सदर पर्स मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी यांनी आपल्या सफाई कामगाराचे प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याचा नगरपालिकेच्या वतीने गौरव केला. याप्रसंगी नगरपालिकेचे कर्मचारी संजीव गुढे, विजय कोकणे, कृष्णा बागडी, महंमद अली गवंडी, कुमार स्वामी, प्रकाश मोगली, आय बी सेशम, पी बी गर्दाळ, एल व्ही मधाळे, जी एस कांडेकर ,रुपेश करंगळे, विजय पाटील मोहन राजापुरे.इत्यादी कर्मचाऱ्यांसोबत अनेक नागरिक उपस्थित होते. समाजामध्ये प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चाललेला असताना, समाजातील सफाई काम...

कारदगा येथे दि.२६ रोजी २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील.

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :   कारदगा तालुका निपाणी येथील साहित्य विकास मंडळ कारदगा यांच्यावतीने रविवार दि २६ नोव्हेंबर रोजी २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी कामेरी जिल्हा सांगलीचे जेष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील हे असून सकाळी ८ ते रात्री ९ यावेळेत एकूण चार सत्रात कै. सत्याप्पा माळी व्यासपीठ डी.एस.नाडगे कॉलेज पटांगण येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी दिली.    ते कारदगा येथील डीएस नाडगे हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. प्रारंभी विनोद परीट यांनी स्वागत, तर माजी अध्यक्ष बाळासो नाडगे यांनी प्रास्ताविक केले.तर उपस्थितांची ओळख उपाध्यक्षा सुनीता कोगले यांनी कले    यावेळी बोलताना काशीद पुढे म्हणाले रविवारी होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये सकाळी ८ ते १० यावेळेत ग्रंथदिंडी, तर सत्र पहिल्या मध्ये सकाळी १०: ३० ते १ या वेळेत पुणे येथील आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्...

पत्रकार रंगराव बन्ने यांच्या " आस तुझी रे लागली ' या अभंग संग्रहाचे २३ नोव्हेंबर रोजी होणार पंढरपुरात प्रकाशन

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :   निपाणी तालुक्यातील बारवाड येथील साहित्यिक व पत्रकार रंगराव बन्ने यांच्या " आस तुझी रे लागली " या अभंग संग्रहाचे गुरुवार दि.२३/११/२०२३ रोजी कार्तिकी एकादशी दिवशी पंढरपूर येथे प्रकाशन होणार आहे .       रंगराव बन्ने हे १९८७ पासून साहित्य क्षेत्राबरोबरच १९९० पासून पत्रकार म्हणून सेवा करत आहेत.पत्रकारितेच्या माध्यमातून विविध विषयावर लिखाण करत आले आहेत.तर साहित्य क्षेत्रात आता पर्यंत २५० च्या वर कविता , २५० चारोळी,व ७५ विविध विषयावर कथा,धार्मिक,सामाजिक लेख लिहिले आहेत.तर त्यांचे तीन कथा संग्रह,दोन कविता संग्रह,एक पंढरीच्या वारीवर व धनगर समाजावर ,एक अशी सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.       या सात पुस्तकानंतर आता त्यांचा आस तुझी रे लागली हा अभंग संग्रह वाचकांच्या व वारकरी मंडळींच्या समोर येत असून या अभंग संग्रहात एकूण ७९ अभंग रचना आहेत.या अभंग संग्रहास आडी येथील हार्दायन श्री दत्त देवस्थान मठाचे प.पू.परमात्मराज महाराज यांचे आशीर्वचनपर मार्गदर्शन व कुन्नुर येथील ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प.रामचंद्र कुळकर्णी ...

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे मिळणाऱ्या सवलती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा

इमेज
आढावा बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रशासनाला सूचना शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील सातही महसुली मंडळ महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषित करण्यात आली आहेत त्यामुळे जवळपास सर्वच शिरोळ तालुक्याला दुष्काळ सदृश्य परिस्थिती मुळे शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत आहेत या सर्व सवलतींचा लाभ तालुक्यातील सामान्य जनता व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे आदेश माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले, शिरोळ तालुका दुष्काळ सदृश्य घोषित झाला असल्यामुळे शिरोळ तहसीलदार कार्यालयात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक सोमवारी घेतली यावेळी ते बोलत होते तहसीलदार अनिलकुमार हेळकर प्रमुख उपस्थित होते. यावर्षी ज्या महसुली मंडळामध्ये सरासरी पावसापेक्षा ७५% कमी म्हणजे ७५० मिलिमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे असे सर्व महसूल विभाग शासनाने दुष्काळ सदृश्य जाहीर केले आहेत, शिरोळ तालुक्यातील सातही महसुली सर्कलमध्ये सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला असल्यामुळे आपल्या तालुक्याला शासनाच्या सवलतीच...

आलास -अकीवाट कृष्णा नदीवरील पुलासाठी 23 कोटीची निविदा प्रसिद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : आलास अकीवाट दरम्यान आलास येथून प्रजिमा 23 पासून आलास, अकीवाट, गुरुदत्त साखर कारखाना, टाकळी वरून प्रजिमा 38 ला मिळणारा 4.800 लांबी असलेल्या रस्त्यासाठी प्रजिमा 103 वर आलास गावानजीक कृष्णा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 23 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, शिरोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर दळणवळणासाठी कृष्णा नदीवर पूल व्हावा अशी अनेक वर्षाची या परिसरातील नागरिकांची मागणी होती, मंत्री स्तरावर याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पूल उभारणीच्या कामाला मंजुरी दिली होती, या मार्गाचा सर्वे केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरोळ तालुक्यातील या मोठ्या पुलाच्या कामाची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध केली असल्याने लवकरच आलास अकीवाट दरम्यान कृष्णा नदी पात्रावरती या पुलाच्या कामाची सुरुवात होणार आहे असेही आमदार राजेंद्र पाटील यांनी म्हंटले आहे. हा पूल उभारण्यासाठी मं...

संजय घोडावत विद्यापीठ येथे मुख्याध्यापकांचे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेल उत्साहात संपन्न

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दोन दिवसीय निवासी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ पुणे अधिवेशन २०२३ मुख्याध्यापकांचे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनामध्ये प्रमुख वक्ते मा. डॉ. विराट गिरी प्राचार्य, संजय घोडावत इन्स्टिट्यूट हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. डॉ. गिरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित माध्यमिक मुख्याध्यापकाच्या समोर मांडताना प्रथमता मुख्याध्यापकांची व्याख्या सांगून सुरुवात केली. 'शिक्षकाचे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक होय' ३४ वर्षानंतर आणि २१ व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा २०२० मध्ये करण्यात आली. २९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली. या शैक्षणिक धोरणाचा सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आनंदाने स्वीकार करून ते समजून घेणे आवश्यक आहे. १९६८, १९८६, १९९२ या शैक्षणिक धोरणात झा...

सदलगा येथे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

इमेज
  अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : प्रत्येक वर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो, चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरी आर के फाउंडेशन व देसाई मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील माध्यमं या विषयावर प्राध्यापक श्रीयुत प्रकाश देसाई यांचे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता याविषयी व्याख्यान झाले, आणि सदलगा शहर व परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.  स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नैतिक निरीक्षक संस्था म्हणून काम करायला सुरुवात केली, जेणेकरून माध्यमांचा उच्च दर्जा राखला जावा आणि कोणत्याही प्रभावाशिवाय निपक्षपातीपणाने पत्रकारितेचे काम सुरू राहावे हा यामागील उद्देश होता. असे यावेळी श्री देसाई यांनी सांगितले. या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सदलगा शहरातील निवृत्त प्राध्यापक श्री प्रकाश देसाई, ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, पत्रकार श्री अनंत दीक्षित, श्री शितल कुडचे, अमर माने, सामाजिक कार्यकर्ते रवींद...

बोरगावची श्री सिध्देश्वर को ऑप क्रेडिट सोसायटी "उत्तम सहकारी संघ" म्हणून सन्मानित

इमेज
 अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :            बोरगांव येथील श्री सिध्देश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीस कर्नाटक राज्य सहकार क्षेत्राच्या पुढाकाराने व कर्नाटक राज्य को ऑप फेडरेशन,कर्नाटक राज्य सहकार महामंडळ,कर्नाटक राज्य सौहार्द सहकार महामंडळ, कर्नाटक राज्य सरकार तोटगारिका महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "उत्तम सहकार संघ" हा मानाचा पुरस्कार देवून धारवाड जिल्ह्यातील कलघटगी येथे शुक्रवार दि 17 रोजी आयोजित 70 व्या अखिल भारतीय सप्ताहात राज्य कामगार व धारवाड पालक मंत्री संतोष लाड यांच्या अध्यक्षतेखाली व नामांकित मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थापक चेअरमन आण्णासाहेब हवले,प्रधान व्यवस्थापक संजय हवले यांच्यासह संचालक मंडळास मान व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.राज्य सरकारकडून देण्यात येणारा हा पुरस्कार श्री सिध्देश्वर पतसंस्थेला मिळाल्याने संस्था व संस्था चालकांचे सर्वत्र अभिनंदन केले होत आहे . संस्थापक चेअरमन आण्णासाहेब हवले यांनी बोरगाव सह पंचक्रोशीतील शेतकरी सभासद व गरजू लोकांना सहकार,कृषी,शैक्षणिक,व्यवसायिक व समाजभिमुख क्षेत्रात आर्...

चक्का जाम आंदोलनातमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे : राजू शेट्टी

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :     मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. ते म्हणाले की, १३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. मी स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलक...

दिल्ली दरबारात तीन रंगाचा झेंडा फडकल...

इमेज
  समान नागरी कायदा होईल, हेरवाडच्या संतुबाई यात्रेत भाकणूक हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई यात्रेला बुधवारी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने यावेळी सिद्धू आरगे, बिरा वाघे, आप्पा आरगे महाराज यांनी भाकणूक कथन केली.  भाकणूकीत भविष्यवाणी कथन करताना सिद्धू आरगे, बिरा वाघे, आप्पा आरगे महाराज म्हणाले, राजकारणाचं वाटोळ होईल, सहा महिनेच भगवा झेंडा राज्य करंल, दिल्ली दरबारात तिन रंगाचा झेंडा फडकल, कळपातलं बाळ कळपात लढल, पायरीचा धोंडा पायरीला बसेल, देशात समान नागरी कायदा होईल, राजकारण करणाऱ्यांनो जरा जपून चला ; दंगा धोपा होईल, रस भांड उदंड पिकेल, कारखान्याचे बाळ दरवाज्याच्या तोंडाला अश्रु गाळल, सहा महिन्यांनंतर साथ रोग येईल माझ्या (कांबळ्याच्या सावलीत) भक्तीत जो राहिल त्याला मी तारून नेईन, दंगा - धोपा जास्त होईल सांभाळून राव्हा, आई तुमच्या पाठीशी आहे. नऊ खंडात माझं पुराण पुस्तक आहे, समाज, पुजारी, बाळ गोपाळांना मेंढके व भविक भक्तांना व ग्रामस्थांना माझा आशिर्वाद आहे. ले...

सदलगा शहरातील समुदायभावनासाठी सतीश जर्किव्हळी फाउंडेशन च्या वतीने 50 खुर्च्या व साऊंड सिस्टिम भेट.

इमेज
  अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : बेळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष युवा नेते श्री राहुलअण्णा जारकीहोळी यांनी चिकोडी येथील काँग्रेस भवन येथे तालुक्यातील विविध समुदाय मंडळांना सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने समाज भवन कार्यक्रम उपयोगी साहित्याचे वाटप केले. चिकोडी तालुक्यातील अनेक समुदायांना आपल्या समाज भावनांमध्ये कार्यक्रमाप्रसंगी उपयोगी पडणारे साहित्य म्हणजे खुर्च्या व साऊंड सिस्टिम साहित्य राहुल जारकीहोळी यांनी आपल्या सतीश अण्णा जारकीहोळी फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप केले. यामध्ये सदलगा शहरातील समुदाय भवनासाठी व समुदाय भवनातील कार्यक्रमासाठी उपयोगी पडणारे साहित्य म्हणजे पन्नास खुर्च्या व साऊंड सिस्टिम चे साहित्य कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिकोडी तालुक्याचे अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे व एस सी एस टी प्रवर्ग संचालक श्री जीवन मांजरेकर यांच्या उपस्थितीत संबंधितांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सदलगा शहरातील समस्त बौद्ध समुदायाच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

हेरवाडमध्ये ५ एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील हराळे मळा - लाट शिव येथील सुमारे ५ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. सदरची आग ही शॉर्टसर्किटने लागल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, हेरवाड येथील हराळे मळा - लाट शिव येथे असणार्‍या ऊसाच्या फडास अचानक आग लागली. बघता - बघता आगीने रौद्ररूप धारण केले यावेळी सुमारे ५ एकर ऊस जळून खाक झाला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने उर्वरित क्षेत्र जळण्यापासून वाचले. या आगीमध्ये अशोक पाटील, सुकुमार कुन्नुरे, मारुती हराळे, शिवनू आलासे, काशिनाथ पाटील, आप्पासाहेब धामणे शेतकऱ्यांचे ऊस जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदलगा शहरातील बाल क्रांती मंडळांने साकारली छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ले प्रतिकृती

इमेज
  बालकलाकारांच्या किल्ल्याचे आर के फाउंडेशन च्या वतीने केले कौतुक व प्रोत्साहन पर केले शालेय साहित्याचे वाटप अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील बाल क्रांती मंडळांने यावर्षी दीपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडची प्रतिकृती अत्यंत आकर्षक व सर्व बाबींची सूक्ष्म नोंदी घेऊन जिवंत साकारली होती. या किल्ला सजावटीला सदलगा शहरातील आर के फाउंडेशनने सदिच्छा भेट देऊन, त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, बाल मनामध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी, बाल मनातील छंदातून थोर पुरुषांच्या इतिहासाची ओळख त्यांना व्हावी व त्याचा समाजाला उपयोग व्हावा या उदात्त हेतूने किल्ला सजावटीत सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांना त्यांच्या केलेल्या कर्तुत्वाची पोहच पावती म्हणून आपल्या शैक्षणिक जीवनात उपयोगी पडणारे शालेय साहित्याची भेट आर के फाउंडेशनचे कार्यवाह श्री अण्णासाहेब कदम, शहरातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते श्री मोहनरावजी शितोळे, सदलगा पूर्व भाग पि के पी एस चे संचालक बंडा तपकिरे, शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री कुमार माने, श्री रमेश माने...

आज पालखी मिरवणूकीने श्री संतुबाई देवीच्या यात्रेला होणार प्रारंभ

इमेज
  जंगी कुस्त्या, किर्तन, व्याख्यानासह होणार विविध कार्यक्रम हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक, भव्य जंगी कुस्त्या, किर्तन, शर्यती यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ही यात्रा १४ ते २० नोव्हेंबर अखेर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे. आज सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणूकीने पालखी मिरवणूकीने श्री संतुबाई देवीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेनिनिमित्त मंगळवार दि. १४ रोजी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी धनगरी लोककला नृत्य व शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येणार आहे. यावेळी खासदारधैर्यशील माने, खासदार धनंजय महाडीक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, आदी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी रात्री १० वाजता भव्य धनगरी ढोलवादन स्पर्धा संपन्न होणार आहेत. बुधवार दि.१५ रोजी सकाळी १० वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता श्वान पळविण्याच्या स्पर्धा संपन्न होणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ४ वाजता गुरुवर्य हभप द...

उद्या शेतकरी विविध कार्यकारी विकास सेवा संस्थेचे उद्घाटन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचा उद्घाटन तसेच धनादेश वितरण समारंभ मंगळवारी सकाळी दहा वाजता आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हस्ते तसेच खासदार संजय मंडलिक, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन सुनील माळी व व्हाईस चेअरमन बापू बरगाले यांनी दिली. शेतकरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था गाव मध्ये नव्याने स्थापन करण्यात आली आहे येथील स्टॅन्ड चौक येथे असणाऱ्या एसएम कॉम्प्लेक्स येथे या संस्थेचा उद्घाटन सोहळा करण्यात येणार असून यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक संभाजी पाटील, दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, सहाय्यक निबंधक अनिल नादरे, माणिकराव पोळ, सरपंच रेखा जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती चेअरमन माळी यांनी दिली.  यावेळी संचालक बिरू देबाजे, मारुती माळी,  देवगोंडा आलासे,  दत्तात्रय जोंधळे, प्रकाश कांब...

सुवर्णा शिंदे यांचे निधन

इमेज
  हेरवाड : हेरवाड येथील सौ. सुवर्णा रावसाहेब शिंदे ( वय : ७०) यांचे अल्पश: आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दत्त कारखान्याचे शेती मदतनीस प्रकाश शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

प्रा.महेश गायकवाड पीएचडी सर्वोच्च पदवीने सन्मानित

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये कार्यरत असलेले संगणक विषयाचे प्राध्यापक महेश कुमार गायकवाड यांना नुकतीच भोपाळ युनिव्हर्सिटी ने पीएचडी या सर्वोच्च पदवीने सन्मानित केले.श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायंन्स भोपाळ या विद्यापीठ कडून शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च अशी कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनियरिंग या शाखेतील पी. एच. डी.(डॉक्टरेट) पदवी त्यांना मिळाली .कुरुंदवाड नगरीतील सुपरिचित माजी मुख्याध्यापक श्री परशराम राऊ गायकवाड यांचे सुपुत्र डॉ. महेश कुमार यांचे याबद्दल कौतुक होत आहे या यशामध्ये त्यांना संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे अध्यक्ष मा .संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले,निबंधक डॉ. विवेक कायंडे तसेच युनिव्हर्सिटीतील सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. राकेश धुमाळे आणि सर्व कुटुंबीय व हितचिंतक यांच्या प्रेरणेतून त्यांना हे यश प्राप्त झाले.या यशाबद्दल त्यांचे सर्व च स्तरातून कौतुक होत आहे.

बालाजीच्या स्नेहल व अक्षताला नॅशनल गेम्समध्ये सुवर्ण पदक

इमेज
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : भारत सरकार आयोजित ३७ वी नॅशनल गेम्स ही स्पर्धा गोवा येथील मडगाव येथे दिनांक २८ आक्टोबर २०२३ ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रोलबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी कु. स्नेहल दिपक पाटील व कु. अक्षता अब्दुल शिकलगार यांनी सुवर्ण पटकावून प्रशालेचे नांव राष्ट्रीय पातळीवर चमकवले. या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी कु. स्नेहल पाटील व अक्षता शिकलगार यांना मिळाली. महाराष्ट्राचा संघ निवड करताना संपूर्ण महाराष्ट्रातून २०० खेळाडू निवड चाचणीसाठी आलेले होते. या स्पर्धकांमधून १२ खेळाडू निवडले गेले, यामध्ये स्नेहल व अक्षताची निवड झाली. नॅशनल गेम्स या स्पर्धेची तयारी म्हणून पुणे येथे सराव घेणेत आला होता. नॅशनल गेम्स या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने छत्तीसगड, तामिळनाडू, गुजरात, जम्मू, व अंतीम सामन्यात राजस्थानसारख्या बलाढ्य संघाचा १ गुणाने पराभव करुन महाराष्ट्राला सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले. विजेत्या संघाला रोख रक्कम ७ लाख रुपये शासनाने जाहिर केले आहे. कु.स्नेहल ही इयत...

माळी व श्री ओंकार माळी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

इमेज
  अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : सदलगा शहरातील उद्योजक श्री कृष्णात माळी व श्री ओंकार माळी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी आणि सदलगा शहरातील नगरपालिकेच्या सफाई कामगारांना व पत्रकारांना दिली दिपवाळीची अनोखी अनेक साहित्यांच्या वस्तूंची सदिच्छा भेट. सदलगा शहरातील सुपर बजार व बेडकिहाळ येथील कृष्णा ज्वेलर्स चे मालक श्री माळी बंधू यांनी शहरातील स्वच्छतेच्या कामात नेहमी अग्रेसर असणारे व सुंदर शहर ठेवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सदलगा नगरपालिका सदलगा येथील सर्व सफाई कर्मचारी ,नगरपालिकेतील इतर कर्मचारी आणि समाज मनाचा आरसा असणारे पत्रकार या सर्वांच्या संवेदनशील कार्याची दखल घेऊन या सर्वांची दिवाळी आनंदात जावी या उदात्त हेतूने आणि चांगल्या उद्देशाने यावर्षीच्या दीपावली सणानिमित्त सुपर बाजार सदलगा यांच्यावतीने वरील सर्व समाज सेवकांना सप्रेम भेट वस्तूची अनोखी किट भेट म्हणून देण्यात आले.  सदर भेट वितरण प्रसंगी सदलगा नगरपालिकेत सुपर बाजार चे संस्थापक श्री कृष्णात माळी, श्री ओंकार माळी, सदलगा गाव कामगार पाटील श्री प्रणिल पाटील, सदलगा शहरातील जेष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, निव...

शिरोळ तालुक्यातील शिरोळ, नांदणी, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, कुरुंदवाड व दत्तवाड सर्कलचा दुष्काळ सदृश्य भागांमध्ये समावेश : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : गत हंगामात अत्यल्प झालेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, या सर्व गावांचा समावेश दुष्काळ सदृश्य गावांमध्ये करावा अशी मागणी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाकडे केली होती, या मागणीची दखल घेताना वस्तुस्थितीची पाहणी करत शासनाच्या महसूल विभागाने या सर्व विभागाचा आणि या परिसरात पडलेल्या पावसाचा अहवाल शासनाकडे सादर केला होता त्याची दखल घेताना महाराष्ट्र शासनाने शिरोळ तालुक्यातील शिरोळ, नांदणी, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, कुरुंदवाड आणि दत्तवाड या महसुली क्षेत्रातील सर्कलचा दुष्काळ सदृश्य यादीमध्ये समावेश केला असून याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी पारित केला. दुष्काळ सदृश्य यादीमध्ये या महसुली क्षेत्रातील सर्कलचा समावेश झाल्यामुळे या सर्कल अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ होणार आहे, जमीन महसुलामध्ये सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ % सूट, शालेय विद्यार्थ्यांना ...

प्रोफेसर उद्धव भोसले घोडावत विद्यापीठाचे नवे कुलगुरू

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांची संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड करण्यात आली.त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले,कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी त्यांचे स्वागत केले.      प्रोफेसर भोसले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बी.ई तसेच एम.इ केले असून आयआयटी मुंबई येथून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या विषयात पीएचडी मिळवली आहे.         या अगोदर भोसले यांनी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नवी मुंबई येथे प्राचार्य पदी काम केले आहे.तसेच एमजीएम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मुंबई येथे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे.त्यांना अध्यापन,संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

अभिवृद्धी संघ सदलगा संचालित दुग्ध व्यवसायिक संघ संस्थेकडून उच्चांकी फरक वाटप

इमेज
  अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर व आजूबाजूच्या खेड्यातील दूध उत्पादकांना आदर्श ग्रामीण अभिरुद्धी संघ सदलगा संचलित दुग्ध व्यवसाय संस्थेकडून दूध उत्पादकांना सर्वाधिक दूध फरक फरकाचे आणि चालू वर्षात आकस्मिक गाय व म्हैस मृत्युमुखी पडलेल्या दूध उत्पादकांना अर्थसाह्याचे वाटप आज करण्यात आले. या आदर्श संस्थेने आतापर्यंत सर्वात जास्त दूध फरक बिलाचे वाटप अनेक वर्षे करून, आपली "आदर्श" परंपरा यावर्षीही परंपरेप्रमाणे जोपासली आहे.  यावर्षी आपल्या 130 सभासदांना आर्थिक मदत व दूध फरक बिलापोटी सात लाख रुपयाचे वाटप आज करण्यात आले. म्हैस दूध दर फरक प्रति लिटर दोन रुपये पन्नास पैसे तसेच गाय दूध दर फरक प्रति लिटर एक रुपये पन्नास पैसे याप्रमाणे संस्थेचे प्रेरणास्थान श्री राजू अण्णा कलाजे, संस्थेचे संस्थापक श्री बाहुबली कलाजे ,संस्थेचे अध्यक्ष रामू कलाजे यांच्या हस्ते दूध उत्पादकांना वितरित करण्यात आले. संस्थेला सर्वाधिक म्हैस दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक- शरद इंगळे, सौ अक्काताई कुंभार, गंगाराम मगदूम, संतोष जाधव, शिवू बत्ते ,शंकर डांगे. त्याचप्रमाणे सर्वाधिक गाय...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. सचिन कांबळे यांना पीएचडी प्रदान

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे रसायनशास्त्र विषयाचे प्रा. सचिन कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाची "सिंथेसिस अँड कॅराक्टरायझेशन ऑफ ट्रान्झिशन मेटल नॅनोपार्टीकल्स फॉर इट्स बायोलॉजीकल ऍप्लिकेशन्स" रसायनशास्त्र विषयामधे मानाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांना पीएचडीचे प्रमुख गाईड म्हणून डॉ. जे. एम. पाटील, को-गाईड डॉ. पी. डी. कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. डी. सोनवणे, प्रा. डॉ. के. एम. गरडकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. पी. व्ही. अनभुले, डॉ. एस. एन. तायडे, नॅनोसायन्स विभागातील डॉ. के. डी. पवार, डॉ. डोंगळे यांचे साह्य लाभले. ओपन डिफेन्स व्हायवाचे चेअरमन डॉ. एस. एस. चव्हाण आणि रेफ्रि डॉ. भास्कर साठे यांनी संशोधन अहवालाचे परीक्षण केले. संशोधन कामकाजासाठी वेळोवेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. या संशोधनाबद्दल बोलताना प्रा. सचिन कांबळे म्हणाले ‘वनस्पतींच्या पानांचा अर्क वापरून व नॅनोटेक्नॉलॉजी चा वापर करून सि...

केंद्रीय जल आयोगचे रवींद्र पिसाळ यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

इमेज
  अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या केंद्रीय जल आयोग दिल्ली अंतर्गत या कार्यालयातील कर्मचारी श्रीयुत रवींद्र वसंतराव पिसाळ हे नुकतेच आपल्या कार्यालयीन कामकाजातून नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम काल त्यांच्या सर्व मित्रांनी व चाहत्यांनी व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. आपल्या सेवेमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांना पूरग्रस्त भागातील पावसाळ्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी, नदीतील पाण्याची उंची ,संबंधित धरण क्षेत्रातील पाण्याचा साठा , पाण्याचा विसर्ग,याविषयी सविस्तर माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमांना तत्परतेने देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली व प्रसारमाध्यमाशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते. या जनप्रिय कर्मचाऱ्यांच्या सत्कारा प्रसंगी प्रारंभी सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन चे कार्यवाह श्रीयुत अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे परम स्नेही इंजीनियरिंग कॉलेजचे प्राध्यापक श्रीयुत प्रकाश शंकर देसाई सर य...

शिरोळ नगरपालिकेच्या सभेत विविध विकास कामाबरोबरच सर्व विषयाना मंजुरी

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ शहरातील भुयारी गटार योजनेकरिता पंपिंग स्टेशन कामी अंदाजे 67 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यासाठी खाजगी मालकीची जागा खरेदी करणे, महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम 2001 च्या शासन सुधारित निर्णयानुसार ३१ डिसेंबर अखेर मुदतवाढ घेणे यासह सर्व विषयांना नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली .         दरम्यान,या सभेत विविध कामांच्या मंजुरीनंतर ५ वर्षे यशस्वी कार्यकाल केलेबद्दल नगरपालिकेच्या विद्यमान लोकप्रतिनिधीना नगरपालिका प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला .            येथील दिनबंधु दिनकररावजी यादव सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते . नगरपालीका कार्यालयीन निरिक्षक संदिप चुडमुंगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले . यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी प्रशासनास चांगले सहकार्य केलेबद्दल नगराध्यक्ष पाटील यांच्यासह नगरसेवक ,नगरसेविका यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. नगरपालिकेची पंचवार्षिक कार्यकाळातील अखेरची सभा खेळी...

स्वाभिमानी शेतकरी संघटना २२ वी ऊस परिषद ठराव

इमेज
शिवार न्यूज नेटवर्क १) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याची केलेली कायद्यातील बेकायदेशीर दुरूस्ती मा. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय झालेला असतानाही सरकारने अद्याप शासन निर्णय केला नाही. तो शासन निर्णय तातडीने करण्यात यावा. २) शेतीपंपाचे होणारे भारनियमन त्वरीत रद्द करून शेतीपंपाला विनाकपात दिवसा १२ तास वीज देण्यात यावे, तसेच प्रलंबित कनेक्शन ताबडतोब देणेत यावे. सदरची वीज हॉर्स पॉवरची सक्ती न करता मीटर रिटींग प्रमाणे घ्यावे. राज्य सरकारच्या जलसंपदा प्राधिकरणाने कृषि सिंचनाच्या पाणीपट्टीचे दसपट वाढवलेला कर तातडीने मागे घेऊन पुर्ववत करावेत. ३) यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. राज्य सरकारने केवळ ४० तालुक्याला दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाचे निकष बदलून सर्कलनिहाय ज्या ज्या सर्कलमध्ये खरीपाचे पीक वाया गेलेले आहे. तो भाग दुष्काळग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर करावा. ४) गतवर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी पूर्णपणे देऊन अधिक ४०० रूपये तातडीने देण्यात यावेत ५) साखर आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे काटे त...

श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर व विर सेवा दल मलिकवाड यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : निरागस बालपण जपत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी एक छोटासा प्रयत्न व बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सोबतच पालकांसाठी सुंदर मार्गदर्शन आगमन व आश्रिवचन प पु जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींचे आशिर्वाचन होणार आहे,व संस्कार क्षम पिढी घडविण्याकरिता आई वडिलांची भूमिका व कर्तव्य व जागृतीचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. १९ नोव्हेंबर सकाळी दहा वाजता लहान बाळांच्या रांगन्याच्या स्पर्धा,१०० मिटर धावण्याच्या स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा,व स्मरणशक्ती स्पर्धा होणार असुन पहिला, दुसरा व तिसर्या क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके व बक्षीस देण्यात येणार आहे. रांगण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बाळ एक वर्षाच्या आत आसावे,१०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी वय ५ वर्षाच्या आतिल मुले मुली सहभागी होऊ शकतात, बुध्दीबळ स्पर्धेसाठी वय १० वर्षाच्या आतिल मुले मुली सहभागी होऊ शकतात,व स्मरणशक्ती स्पर्धेत इयत्ता ५ वी च्या मुला-मुलींना सहभागी होता येईल,या साठी वेळेचे बंधन नाही,या स्पर्धेसाठी जन्म तारखेचा दाखला द्यावा लागेल, अधिक माहितीसाठी संपर्क श्री विजय ...

‘आनंदाचा शिधा’ जिल्हयातील ५.७६ लक्ष पात्र कुटुंबांना मिळणार

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७६ हजार ६४४ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना जिल्हास्तरावर ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या.         राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री यांनी पुरवठा विभागाला दिल्या. ते पुढे म्हणाले, आनंदाचा शिधा व इतर धान्य योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जे शिधापत्रिका धारक ऑनलाइ...

प्रशासनाने स्थानिक पातळीवरच लोकांचे प्रश्न सोडवावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवत 910 नागकिरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून 337 हून अधिक अर्ज दाखल केले. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ, वृद्ध यांनी आपल्या अडचणीबाबतच्या भावना पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी लोकांच्या समस्या वाढत असून याबाबत शासकीय विभागांनी तातडीने महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नागरिकांना पून्हा पुन्हा तक्रारी घेवून मुख्यालयात येण्याची वेळ पडू नये. तसेच जे अर्ज निकाली निघणार नाहीत त्याबाबत अर्जदारांना लेखी स्वरूपात नियम, धोरण याबाबत मुद्दे लिहून उत्तरे कळवावीत असे सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरीक्त महानगरपालिका आयुक्त ...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे जिल्ह्यात यशस्वी आयोजन

इमेज
    कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : भ्रष्टाचार जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडप, दुर्गा चौक, बिंदू चौक ते दसरा चौक अशी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. जनतेमध्ये भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने, भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार कुठे घ्यायची व तक्रार करण्याची प्रक्रिया याबाबत रॅलीचे आयोजन करणेत आलेले होते. रॅलीकरीता प्रमुख पाहुणे म्हणून कुस्तीपटू राष्ट्रीय विजेता, उपमहाराष्ट्र केसरी सिंकदर शेख होते. यावेळी पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे, तसेच विनोद चौगुले, हिंदकेसरी, विष्णु जोशिलकर, महाराष्ट्र केसरी, मच्छींद्र निऊगरे, नॅशनल चॅम्पियन (आर्मी), रेश्मा माने वर्ल्ड चॅम्पियन, शिवछत्रपती पुरस्कार विजते, विक्रम कु-हाडे वर्ल्ड चॅम्पियन, शिवछत्रपती पुरस्कार विजते यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले आणि रॅलीत सहभागही घेतला.   लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे यशस्वी आयोजन झाले. रॅलीमध्ये विद्यापीठ हायस्कुल, भवानी मंडप, ...