जमिनी क्षारमुक्त करण्याचे काम उत्कृष्ट तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे प्रतिपादन
250 एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क जमिनी क्षारपड बनल्यामुळे शेतकऱ्यांची आजची परिस्थिती बिकट बनली आहे. क्षारपड जमिनीमुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे कसदार जमिनीचे महत्त्व शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून जमिनी क्षारमुक्त करण्याचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. गणपतराव पाटील यांनी क्षारपडमुक्तीचा हा पॅटर्न तालुक्यात राबवावा आणि शेतकऱ्यांनीही या कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले. कवठेगुलंद येथील 250 एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ तहसीलदार अनिलकुमार हेळकर, श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शेतकरी सहकारी क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित जाधव मळा, कवठे गुलंदच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, 40- 50 वर्षापासून ज्या जमिनी क्षारपड होत्या अशा जमिनीमध्ये क्षारपड मुक्तीचे काम झाल्याने शे...