पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक कदम यांनी, स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास रणजित कदम यांनी व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील, विनोद शिरसाठ, मेधा पाटकर उपस्थित होत्या. कारखान्याच्या सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले. तसेच याप्रसंगी आमदा...

चुकीच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा उभारणे गरजेचे : राजू शेट्टी

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क :      देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी एकजूट दाखविल्याने केंद्र सरकारला तीन काळे कृषी कायदे रद्द करणे भाग पडले. त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारला किमान हमीभाव कायदा व सध्या अमेरीका देशाकडून ज्यापध्दतीने साम्राज्यवाद निर्माण करून शेती उत्पादनावर आयात- निर्यातीमघ्ये चुकीचे धोरण अवलंबले जात आहे त्याकरिता सर्वांनी एकत्रित येवून लढा ऊभारणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय किसान महासभेच्या बैठकीत केले.           दिल्ली येथील मीनाबाग मधील बिहारचे माकपचे खासदार राजाराम सिंह यांच्या निवासस्थानी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये एम. एस. पी गॅरंटी कायदा , संपुर्ण कर्जमुक्ती , पिकविमा , भुमि अधिग्रहण कायदा या प्रमुख विषयावर संपुर्ण देशात यात्रा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी शेतीपासून परावृत्त होवू लागले आहेत. कृषीप्र...

हेरवाड येथे ४ रोजी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  हेरवाड (ता. शिरोळ) गावातील सुजाण नागरिकांच्या पुढाकाराने याच वर्षी स्थापन झालेल्या उत्कर्ष सोशल फाउंडेशनतर्फे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर भव्य मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अभ्यासू आणि प्रभावी वक्ता प्रा. गणेश शिंदे (सर) या कार्यक्रमात व्याख्यान देणार असून, शिरोळ तालुक्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम ठरणार आहे. हा प्रेरणादायी कार्यक्रम शुक्रवार, ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता ग्रामपंचायत पटांगण, हेरवाड येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात शेतकरी उद्योग समूहाचे प्रमुख सुनील माळी, पायगोंडा आलासे, दत्तात्रय जोंधळे, देवगोंडा आलासे, अर्जुन जाधव, सचिन पाटील, प्रथमेश पाटील, बादल तेरवाडे, संजय नेर्ले, बजरंग माळी, भरत पवार, सागर पाटील, संजय अपराज, प्यारेलाल मकानदार, मारुती थरकर, बाळकृष्ण फल्ले आणि सुकुमार पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित केली जाणार असून, भविष्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी यांसारख...

प्रा. जे. डी. कांबळे सर व भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकांचा ऑल इंडिया पँथर सेना निपाणीच्या वतीने सत्कार

इमेज
साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : ऑल इंडिया पँथर सेना, निपाणी यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा. जे. डी. कांबळे सर यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत समाजशास्त्रातील "समाज जीवन गौरव पुरस्कार" मिळाल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्याचबरोबर, निपाणीतील आंबेडकरी समाजातील तनिष्क तानाजी कांबळे आणि श्रावण रामनाथ बामणे या दोन युवकांची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दलही त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नगरपालिका समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवचंद कॉलेजच्या प्राचार्या इंगळे मॅडम होत्या. या प्रसंगी बोलताना प्राचार्या इंगळे मॅडम म्हणाल्या, "आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी मिळवणे कठीण झाले आहे, परंतु जिद्द आणि चिकाटी असेल, तर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण करता येते. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे हीच खरी परीक्षा असते." सत्कार स्वीकारताना प्रा. जे. डी. कांबळे सर म्हणाल...

समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शासनाने सवलती द्याव्यात

इमेज
  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तसेच अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शासनाने अधिक सवलती द्याव्यात आणि राज्यातील मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी समाजभूषण बाळू शिवाजी गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना इचलकरंजी येथे देण्यात आले. यावेळी समाजभूषण बी.एच. खांडेकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने मागासवर्गीय समाजासाठी सुरू केलेल्या विविध योजना तातडीने आणि प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना अधिक प्रोत्साहन व सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळाने मागासवर्गीय समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अधिक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. राज्य सरकारने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपमुख्य...

प्रसिद्ध केळी व्यापारी ह.भ.प. बबनराव सूर्यवंशी यांचे निधन

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील बुरुड समाजातील प्रसिद्ध केळी व्यापारी ह.भ.प. श्री. बबनराव शंकर सूर्यवंशी (आबा) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दिनांक 28 मार्च 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने इस्लामपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक कार्यामुळे आणि सामाजिक योगदानामुळे मोठी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे आणि मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी – मंगळवार, 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 08:00 वाजता, कापूसखेड इस्लामपूर स्मशानभूमी येथे. उत्तरकार्य विधी – त्याच दिवशी सकाळी 11:00 वाजता, इस्लामपूर एस.टी. स्टँड रोड येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको : प्रा. अशोक कांबळे

इमेज
  संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :     हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणारे विद्यापीठाचे डिग्री होल्डर आहेत काय? हे त्यांनी प्रथम पाहावे. शिवाजी विद्यापीठाचे जे आज डिग्री होल्डर आहेत त्यांची अस्मिता या नावाची जोडली आहे. जर नाम विस्तार केलाच तर शिवाजी विद्यापीठाचे जे डिग्री होल्डर आहेत त्यांच्या अस्मितेला तडा जाणार आहे.  शिवाजी विद्यापीठ नाव देण्यामागे त्यावेळीचे जे विचारवंत होते त्यांनी गांभीर्याने विचार करून शिवाजी विद्यापीठ या नावाला मान्यता दिली आहे. विधानसभेत यावेळी साधक बाधक चर्चा करून शिवाजी विद्यापीठ या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. यात महाराष्ट्राचे तत्कालीन नेते विचारवंत कैलासवासी यशवंतराव चव्हाण हे होते. याचा नाम विस्तार करण्याची मागणी करणाऱ्यांनी विचार करावा.अशी मागणी दलित पँथर च्या पदाधिकारी बैठकीत मा. प्रा अशोक कांबळे सर, राज्य सरचटणीस दलित पँथर यांनी केली.  शिवार न्यूज साठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले

जिल्ह्यात मिलेट बोर्ड स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  आहारात तृणधान्यांचे अत्यंत महत्त्व आहे. तृणधान्यांचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू बोर्ड प्रमाणेच "मिलेट बोर्ड" स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.     राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे मिलेट महोत्सव पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कागल राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी (करवीर) अरुण भिंगारदेवे, नाचणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश बन, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाडी आदी उपस्थित होते. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच मिलेट रॅलीमध्ये पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पाककला स्पर्धेत मिलेट प...

प्रगतशील शेतकरी प्रवीण बोरगावे यांना कृषिभूषण पुरस्कार जाहिर

इमेज
गणेशवाडी / शिवार न्यूज नेटवर्क : मलिकवाड (कर्नाटक) येथील शनिग्रह अरिष्ट निवारक मूलनायक श्री 1008 भगवान मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरच्यां वतीने देण्यात येणारा यंदाचा कृषिभूषण पुरस्कार शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील प्रगतशील युवा शेतकरी प्रवीण प्रकाश बोरगावे याना जाहीर झाला आहे. आज पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशी माहिती पुरस्कार वितरण कमिटीने दिली आहे.       दरम्यान येथील जैन समाजाच्यावतीने प्रतीवर्षी महाराष्ट्र कर्नाटक सिमाभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. त्यानुसार गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील युवा शेतकरी प्रवीण बोरगावे यांनी विविध प्रकारच्या फळभाज्यांचे भरघोस उत्पादन घेतात. परदेशी बाजारात त्यांनी पीकविण्यात आलेले रंगीबेरंगी ढबू मिरची विक्रीस जाते. तर शेतात नवनवीन प्रयोग करणारे एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख प्रवीण बोरगावे यांनी निर्माण केले आहे त्यामुळे मलिकवाड जैन मंदिरच्यावतीने पू .स्वस्तिश्री सौरभसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी तिजारा (दिल्ली) यांच्या दिव्य सानिध्यात तसेच प्रमुख अति...

टाकवडे येथील सृष्टी कांबळे इंडियन आर्मी पोलीस दला मध्ये निवड

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : टाकवडे ता. शिरोळ येथील ए. एस.सी कॉलेज मध्ये लास्ट वर्षा मध्ये शिकत असलेल्या सृष्टी बाळासो कांबळे हिने जिद्द आणि ध्येय चिकाटीने अखेर इंडियन आर्मी पोलिस दल मध्ये निवड झाली त्यामुळे तिचे स्वप्नपुर्ती पूर्ण झाली असून सृष्टीने १० वी पासूनच मी पोलिस होणार या ध्येयाने रजीग सराव सुरेश चेयर यांचे मार्गदर्शन तर अजय पोवार कोच यांचे मार्गदर्शन लाभले असून आई-वडील यांचे कष्टाचे फळ मला मिळाले असल्याचे सांगितले  सृष्टी १०वी पासूनच N.C.C करीत होती पोलिस भरतीमध्ये अनेक वेळा परिश्रम घेतले होते परंतु अखेर इंडियन आर्मी पोलिस दलामध्ये १०० जनाची भरती प्रक्रिया होती त्या मध्ये कोल्हापूर विभागातून सांगली ,सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ मुलीची निवड करण्यात आली त्या मध्ये टा कवडे येथील एए.स.सी कॉलेज मध्ये शिकत असलेल्या सृष्टीची निवड झाली समाज्यात आई- वडील यांचे आनंद मुक्त झाले गावातून तिचे अभिनंदन कौतुक होत आहे

श्रमदान’ आणि ‘अपनापन’ उपक्रम – ग्रामीण विणकर व कैद्यांसाठी आशेचा किरण

इमेज
सांगलीत रविवारी 'श्रमदान अपनापन स्टोअर'चा शुभारंभ जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : समाजसेवा आणि आत्मनिर्भरतेचा उत्तम संगम म्हणजे ‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ हे उपक्रम. या ब्रँड्सच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विणकर आणि शेकडो कैद्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात असून, उच्च गुणवत्तेचे, अहिंसक आणि शुद्ध कापसाचे वस्त्र उत्पादन हा याचा मुख्य उद्देश आहे. आचार्य श्री विद्यासागर आणि आचार्य श्री समयसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालवला जाणारा हा अनोखा प्रकल्प ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवून तेथील नागरिकांना संस्कारित, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचे कार्य करतो. आधुनिक युगात अनेक पारंपरिक कौशल्ये लोप पावत आहेत, अशा वेळी ‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ या ब्रँड्सच्या माध्यमातून पारंपरिक हातमाग आणि हस्तकलेला नवसंजीवनी मिळाली आहे. हा उपक्रम मुख्यतः मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये सक्रिय आहे. मध्यप्रदेशातील सागर, जबलपूर, डिंडोरी, मंडला, टीकमगड, अशोकनगर आणि दमोह जिल्ह्यांमध्ये या उपक...

गणेशवाडी आणि खिद्रापूरला २ नव्या नौका : आमदार यड्रावकर

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  गणेशवाडी आणि खिद्रापूर येथील नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून, जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येकी १ अशा दोन नौका दिल्या आहेत. गणेशवाडी व खिद्रापूर या गावांना नौका मिळावी अशी मागणी ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासून होती, यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती, त्यानुसार या दोन गावांना नौका मिळाली असून लवकरच या नौकांचे पूजन करण्यात येणार आहे.  गणेशवाडी आणि खिद्रापूर ही गावे कृष्णा नदीच्या किनारी वसलेली आहेत. या गावांतील नागरिकांना नेहमीच नदी पार करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असे. विशेषत शेतकरी आणि रोजंदारी करणाऱ्या कामगारांना नदी पार करून दुसऱ्या गावांमध्ये जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. या ठिकाणी कायमस्वरूपी पूल नसल्यामुळे नौका हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आता नव्याने उपलब्ध झालेल्या चार नौकांमुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. शिरोळ तालुक्यात महापुराचा मोठा फटका बसतो. कृष्णा नदीला पूर आल्यावर अनेक गावांचा संपर्क तुटतो आणि नागरिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थि...

शिरोळ येथील बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाचे  वाटप करण्यात येणार आहे. येथील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिन येत्या 31 मार्च रोजी असून त्यानिमित्त जेष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या सोमेश्वर निवास या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींच्या प्रतिमेचे पूजन, नामस्मरण, आरती, पुष्पवृष्टी झाल्यानंतर दुपारी बारा वाजता श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते, आमदार डॉक्टर दलित मित्र अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.  या कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पाटील, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक  शिवाजीराव गायकवाड, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, दत्तचे संचालक दरगू गावडे , प...

शिरोळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी ; उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत होता. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसाठी तो मोठ्या संकटासारखा ठरला आहे. गेल्या महिनाभरापासून तापमान सतत वाढत होते, त्यामुळे शेतकरी आणि नागरिक हैराण झाले होते. पण अवकाळी पावसाच्या झडांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला, ज्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेले गहू, हरभरा, भात आणि भाजीपाला यावर पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला. विशेषतः काढणीला आलेले पीक भिजल्याने त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी गहू आणि हरभऱ्याची शेंग गळून पडल्याची माहिती मिळत आहे. भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे.  वातावरणात झालेल्या या अचानक बदलामुळे पुढील काही दिवस हवामान कसे राहील, याकडे नागरिक आणि शेतकरी वर्गाचे लक्ष लाग...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिरोळच्या सौ संगीता माने यांना आदर्श वहिनीसाहेब पुरस्कार प्रदान

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे तुमच्यातीलच एक आहेत. आई-वडिलांनी जन्म दिला आहे. आम्ही आभाळातून पडलो नाही. काही लोकांना आमच्याविषयी तिरस्कार वाटतो. आमचा देव चालतो. भंडारा चालतो ,पण आम्ही चालत नाही. आशीर्वाद देऊन आता आमचे हात थकले आहेत.  समाजाने दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. असे मत सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पुणेकर यांनी व्यक्त केले.          जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे अखिल भारतीय मूकनायक चित्रपट संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन व संघटनेचा ४ था वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या व विशेष कार्यकारी अधिकारी संगीता दगडू माने यांना 'आदर्श वहिनीसाहेब ' पुरस्काराने सन्मान करण्यात आला . त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अन्य आदर्शवत, कर्तुत्वान व्यक्तींनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.       प्रारंभी युवा लोकशाहीर अमोल बुचडे यांनी लोकप्रबोधनपर गाणी सादर करून सामाजिक एकतेचा संदेश दिला. डॉ. मिनाक्षी गणेश वाईकर...

शिरोळ तालुक्यात युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : युवा सेनेचे कार्याध्यक्ष  पुर्वेशभाई सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा समन्वयक दिग्विजय चव्हाण, तालुका प्रमुख आकाश शिंगाडे, विधानसभा प्रमुख सचिन पाटील, उपतालुकाप्रमुख रोहित भिसे, प्रवीण दळवी, रविंद्र कोकणे, सुनिल वग्गे, विभाग प्रमुख सुजित कोळी, कुरुंदवाड शहर प्रमुख वैभव तोडकर, शिवाजी नंदिवाले यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यात युवासेनेच्या भविष्यातील कार्याची दिशा ठरवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. युवकांना संघटित करून सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

गावा-गावत भांडणे लावू नका : बबन यादव

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  चिपरी हद्दीत असलेल्या महापारेषण ११० के. व्ही. उपकेंद्रचां मागील पंधरा वर्षापासून ६१ लाख ५० हजार रुपये कर थकीत आहे. सोमवारी ग्रामपंचायतने सिल केल्याने मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळें चिपरी ग्रामपंचायतने सील केल्यामुळे लाईट सुरू करू शकत नाही असे सांगून गावागावांमध्ये भांडणे लावत आहेत. ही बाब अतिशय निंदनीय आहे. मुख्य अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा व जनतेला वेठीस धरू नये असा इशारा माजी सरपंच बबन यादव यांनी दिला. याबाबत माजी सरपंच बबन यादव म्हणाले, ग्रामपंचायत सातत्याने त्यांच्याशी याबाबत संवाद साधत असताना देखील महापारेषने थकीत करा बद्दल कधीच गांभीर्याने घेतले नाही. याउलट मागील आठवड्यात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे साडेचार लाखाचे थकीत बिलापोटी त्यांनी कोथळी येथून होणाऱ्या गावच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित केली. चार लाख रुपयाचा चेक घेतल्यानंतर चार दिवस बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत झाला महापारेषण ही भूमिका दुटप्पी आहे.       त्यांचे बिल थकीत झाले की लगेच विद्युत पुरवठा बंद करायचा आणि ग्रामपंचायतिचा कर पंधरा वर्षे भरायचा नाह...

इफ्तार पार्टी सामाजिक बांधिलकी दर्शवणारा उपक्रम : सपोनि फडणीस

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :      रमजान हा संयम, शिस्त आणि दानधर्माचा महिना आहे. या महिन्यात उपवासाद्वारे शरीर आणि मन शुद्ध होते. गरजूंना मदत करणे हा या महिन्याचा खरा संदेश आहे.इफ्तार पार्टी हा केवळ उपवास सोडण्याचा कार्यक्रम नसून, तो सामाजिक बांधिलकी दर्शवणारा प्रसंग आहे.विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन आपली एकता दाखवतात,कुरुंदवाड शहराने हा सामाजिक सौहार्द जपला आहे.हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केले.         कुरुंदवाड येथे झारी मशिदीत पवित्र रमजान महिन्यानिमित्त भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.       सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी रमजान महिन्याचे आणखीन महत्त्व विशद केले,या सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला मुस्लिम समाजबांधवांसह विविध समाजाच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मशीद कमिटीच्या सदस्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्व...

कृषि विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य महोत्सव व मिलेट बाईक रॅली

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :       पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कृषि विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत २२ मार्च रोजी मौजे कुर ता. भुदरगड येथे मिलेट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले .              प्रारंभी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला . या मिलेट रॅलीचे कुर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी - कुर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले . यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,पॉवर टिलर,रोटावेटर चे वाटप केले.       या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ योगेश बन (नाचणी पैदासकार) यांनी बदलत्या...

हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर शाळेत चिमुकल्यांचा रंगतदार बाजार

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला. व्यवहारज्ञान आणि उद्योजकतेचे महत्त्व समजावे यासाठी १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी शालेय आवारात छोटासा बाजार भरवला. या बाजारात विद्यार्थ्यांनी भाज्या, फळे, गृहपयोगी वस्तू, तसेच पाककलेचे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार, खरेदी-विक्री, ग्राहकांशी संवाद, नफ्या-तोट्याचे गणित आणि स्वावलंबनाचे मूल्यमापन करता आले. चिमुकल्यांनी ग्राहकांच्या भूमिकेत शिक्षक, पालक आणि मित्रांना सहभागी करून घेतले. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूलभूत व्यवहार, दर ठरवण्याची पद्धत, सुट्टी देण्याचे तंत्र आणि वस्तूंची गुणवत्ता जपण्याचे महत्त्व शिकवले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, निर्णयक्षमता आणि उद्योजकतेची आवड निर्माण झाली. बाजाराच्या आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कल्पकता पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. या ब...

ग्राहकांच्या शोषणमुक्तीसाठीच २०१९ चा ग्राहक संरक्षण कायदा : डॉ. कुमार पाटील

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : ग्राहक हा केंद्रबिंदू मानून ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना केली व त्याद्वारे ग्राहकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी 1986 चा ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करून घेतला पण कालमानानुसार त्यामध्ये बदल होऊन ग्राहकांचे ऑनलाईन व इतर मार्गाने शोषण होऊ लागले. त्यामुळे सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019 अमलात आणला. या कायद्यान्वये ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, वस्तू निवडण्याचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क व आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क हे अधिकार बहाल केले असून ग्राहकाने त्याचा योग्य वापर करून शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी सजग राहावे असे विचार अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुक्याचे मार्गदर्शक व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी व्यक्त केले. ते 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालय शिरोळ व पुरवठा विभाग यांच्य...

कुरुंदवाड आठवडी बाजारात पुन्हा गोंधळाचे वातावरण

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :        कुरुंदवाड येथील आठवडी बाजारात चौ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्यावर ठाण मांडून बाजार भरवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नियमांचे पालन करण्यास सांगितले असता व्यापाऱ्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.     याची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अधीक्षक श्रद्धा वळवडे-मगदूम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बाजार सुरळीत करण्यासाठी व्यापाऱ्यांना पाच मिनिटांचा अल्टीमेटम दिला. नागरिकांना कुठलाही अडथळा होईल असे कृत्य त्वरित थांबवावे,अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या कडक भूमिकेमुळे व्यापाऱ्यांनी जागेवरच बाजार हलवून पालिकेने दिलेल्या जागेत व्यवसाय सुरू केला. त्यामुळे बाजार सुरळीत सुरू झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.       पालिकेच्या अधीक्षकांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, पुढील आठवड्याच्या बाजारात जर पुन्हा अशा प्रकारचा गोंधळ झ...

बोरगांव-आयको डांबरीकरण रस्ता कामाचा शुभारंभ

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :    गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी एक असणाऱ्या बोरगाव-आयको रस्त्यास माजी मंत्री व आम.शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामाचा शुभारंभ नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.       दरम्यान शेसू ऐदमाळे व शंकर गुरव यांनी विधिवत पूजन करून केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे श्रीफळ वाढविण्यात आला.      यावेळी बोलताना नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की,बोरगाव हे व्यापार पेठेचा दर्जा प्राप्त मोठे शहर आहे.त्याचबरोबर कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील शहर म्हणूनहि याकडे पाहिले जाते.त्यामुळे बोरगाव-आयको रस्ता दुरुस्ती करणे काळाची गरज असताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आम.शशिकला जोल्ले दाम्पत्यांच्या निदर्शनास आल्याने तातडीने या रस्ता कामासाठी जवळपास 02 कोटी 30 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची सांगितले.   ...

हेरवाड येथे मराठा समाजाच्या स्मशानभूमीसाठी पाच गुंठे जागा मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यातील मराठा समाज विकासापासून वंचित राहू नये, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. समाजासाठी सभागृह, स्मशानभूमी यांसह मुलांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासिकेची इमारतही बांधण्यात आली आहे. भविष्यातही मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. हेरवाड येथील मराठा समाजाच्या स्मशानभूमीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून पाच गुंठे जमीन मंजूर करण्यात आली. याबद्दल समस्त मराठा समाजाच्या वतीने आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, हेरवाड येथील मराठा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, ही त्यांची अनेक वर्षांची मागणी होती. अखेर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पाच गुंठे जमीन मंजूर करण्यात आली आहे. भविष्यातही मराठा समाजाच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते मंजूर आदेशाची प्रत मराठा समाज बांधवांना देण्...

जुने दानवाडला क्रीडांगणासाठी ४८ गुंठे जागा मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या युवकांना योग्य सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. याच अनुषंगाने जुने दानवाड येथील क्रीडाप्रेमी तरुणांसाठी ४८ गुंठे जागा क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. जयसिंगपूर येथे दानवाड ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडांगण मंजुरी आदेशाची प्रत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांनी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये यश मिळवत तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्वल केले आहे. या तरुणांना हक्काचे क्रीडांगण मिळावे म्हणून प्रयत्न करून ४८ गुंठे जमीन क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात येथ...

अनिल बागणे यांना मातृशोक

इमेज
  जयसिंगपूर :  जयसिंगपूर येथील श्रीमती कमल आप्पासाहेब बागणे (वय ८२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर व दक्षिण भारत जैन सभेचे कोल्हापूर विभागाचे ट्रस्टी अनिल बागणे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार (ता. २१) रोजी सकाळी ८.०० वाजता जयसिंगपूर (उदगाव) येथे आहे.

बस मध्ये चोरीचा प्रयत्न करतांना महिला चोरट्यांना अटक

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :        सीमाभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बोरगाव बसस्थानकात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयित महिला चोरट्यांना सदलगा पोलिसांनी अटक केली. सदर प्रकार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली  असून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.यामध्ये  आरती रवींद्र लोंढे (वय ३५ रा. निपाणी), नगीना सागर चौगुले (वय ४० रा. हातकनगले जि. कोल्हापूर) व सावित्री यश लोंढे (वय-४५ रा. कागवड अशी अटक करण्यात आलेली महिलांची नावे आहेत.            घटनास्थळावरून व पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी  साडेचारचे  सुमारास नेहमीप्रमाणे बसस्थानक आवारात गर्दी होती. प्रवाशी, विद्यार्थी, शिक्षिका यांची संख्या अधिक असते. याचाच फायदा घेत सदर संशयित महिलांनी बसमध्ये चढत असताना प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेचे मोबाईल चोरले व दुसऱ्या महिलेचे पर्स चोरले, मोबाईल व पर्स चोरी गेल्याचे लक्षात येताच शिक्षिका व इतर महिलांनी आरडाओरडा केली. यावेळी संशयित महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवा उ...

श्रीशैल मल्लिकार्जुन सेवा संस्थेच्या वतीने शिरढोण ते श्रीशैलम पदयात्रेस प्रारंभ

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :  'आध्यात्मातून संस्काराकडे व संस्कारातून समृद्धीकडे' हे ब्रीद घेऊन शिरढोण व परिसरातील अध्यात्मिक, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या श्री श्रीशैल मल्लिकार्जुन सेवा संस्था शिरढोण यांच्या वतीने शिरढोण ते श्रीशैलम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेचा प्रारंभ दिनांक 10 मार्च 2025 रोजी झाला असून शिरढोण व परिसरातील अनेक भाविक भक्त यामध्ये सहभागी झाले आहेत. संस्थेच्या वतीने गेली 22 वर्षे शिरढोण ते श्रीशैलम या पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. पदयात्रा शिरढोण, कागवाड, खेमलापुर, शेगुनशी, मुधोळ, बागलकोट, हुनगुंद, मुदगल, मस्की, मानवी, कोसगी, नंदावरम, रेमटा, व्यंकापल्ले ,जोड बंगला, आतंकुर, कडेबागील, गंगनफळी, भिमनकोळ ,कैलास द्वार, आडकेश्वर, साक्षी गणपती मार्गे श्री श्रीशैलम येथे जाते. वीस दिवस चालणाऱ्या या पदयात्रेत लाखो भाविक भक्त सहभागी होत असतात. गुढीपाडव्या अर्थात उगादी दिवशी श्रीशैलम श्री मल्लिकार्जुन देवाची मोठी कावड यात्रा भरते. यासाठी कावड घेऊन अनेक भाविक भक्त देशभरातून येथे येतात. श्रीशैल मल्लिकार्जुन स...

शरद इन्स्टिट्युटच्या शोधप्रकल्प संकल्पनेला ‘इशरे’कडून निधी

इमेज
यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :       यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या शोध प्रकल्प संकल्पनेची देशपातळीवर निवड झाली असून पुढील कामासाठी निधीही मिळाला आहे. इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडीशनिंग इंजिनिइअर्स (इशरे) यांच्याकडून देशातील विविध शोधप्रकल्पाच्या संकल्पनांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शरदमधील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांच्या दोन संकल्पनेची निवड झाली आहे. सलग पाच वर्षापासून शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेचा देशपातळीवर निवड होत आली आहे. यासाठी ९० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ‘इशरे’ या देश पातळीवरील रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडीशनिंग क्षेत्रात काम करणा-या नामांकीत सोसायटीने देशभरातील इन्स्टिट्युटकडून प्रकल्पाच्या संकल्पना मागविले होते. त्यामध्ये आय.आय.टी.सह नामांकित इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशभरातून १०० पेक्षा अधिक प्रकल्प संकल्पनांचा सहभाग होता. त्यामध्ये १३ संकल्पांची अंतीम निवड करण्यात आली आहे.  यामध्ये मेकॅनिकल विभागातील सुमित मानगावे,...

राजू दडिकर (राजा हुली) यांचे अल्पशा आजाराने निधन

इमेज
  दानवाड :  कल्लोळ गावचे रहिवासी आणि दानवाड परिसरात परिचित असलेले राजू दडिकर उर्फ राजा हुली यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. प्रामाणिक व कष्टाळू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने दानवाड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

'मराठा जोडो अभियान' तथा जिजाऊ रथयात्रेचे शिरोळ तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत होणार

इमेज
  शिरोळ तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक संपन्न कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : मराठा समाजाच्या संघटनासाठी आणि सामाजिक एकजुटीसाठी मराठा सेवा संघ, महाराष्ट्र संचलित ‘मराठा जोडो अभियान तथा जिजाऊ रथयात्रा 2025’ च्या कोल्हापूर जिल्ह्यातील दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 21 मार्च 2025 रोजी रथयात्रेचे जिल्ह्यात आगमन होणार असून, 22 मार्च रोजी सकाळी 9 वाजता कोल्हापूर शहरातून यात्रा प्रारंभ होईल, अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी नियोजन बैठकीत दिली. रथयात्रेच्या प्रभावी आयोजनासाठी रविवारी सकाळी 10:30 वाजता कुरुंदवाड-तेरवाड रस्त्यालगतच्या मराठा मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील विविध गावांतील मराठा चळवळीतील नेते, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी बाबर यांनी जिजाऊ रथयात्रेचा नियोजित मार्ग जाहीर केला. रथयात्रा गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, अब्दुललाट, शिरडवाड, हेरवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, ...

छावा चित्रपट प्रत्येक शाळेत दाखवला जावा : मनोहर भोसले

इमेज
  सैनिक टाकळी येथील विद्यार्थ्यांसाठी झाला छावाचा स्पेशल शो सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :  नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास आणि छत्रपतींचा पराक्रम समजावून सांगताना भविष्यात काही पुरावे दाखवावे लागणार आहेत यासाठी किल्ले आहेतच पण अफजलखान आणि औरंगजेबाची कबर सुद्धा साक्षीला असावी. त्या नष्ट करू नयेत. जेवढी कबर आहे तेवढी चादर असेल तर समस्या निर्माण होणार नाही असं मत लेखक मनोहर भोसले यांनी व्यक्त केले आहे. ते सैनिक टाकळी येथील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवताना बोलत होते. सैनिक टाकळी येथील माजी सैनिक कल्याण मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कुमार विद्यामंदिर,कन्या विद्या मंदिर व संभाजीनगर येथील जि.प. शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना भोसले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज अथवा छत्रपती संभाजी महाराज हे मुसलमानांचे शत्रू नव्हते. त्यांनी आठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभा केलं होतं. स्वराज्यावर चाल करून आलेला अफजलखान,औरंगजेब अक्रांता होता. त्यांनी केलेले अत्याचार निश्चितच क्रूर होते. पण त्यांचा शेवट महाराष्ट्रातच झाला. नव्या पिढीला स्वराज्य...

बोरगांव - आयको रस्ता डांबरीकरण कामासाठी 2 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर : नगरसेवक शरद जंगटे

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  निपाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार, माजी मंत्री शशिकला जोल्ले यांनी बोरगाव शहरासाठी विक्रमी निधी देत आहेत. गेल्या दोन महिन्यात बोरगाव शहर सुशोभीकरण साठी गेल्या 12 वर्षात एकंदर 110 कोटीची कामे केली आहेत,सध्या बोरगाव सर्कल ते आयको रस्त्यासाठी 2 कोटी 30 लाखांचा अनुदान मंजूर केले आहेत .या निधीतून बोरगाव आयको रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याची माहिती विद्यमान नगरसेवक व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक शरद जंगटे यांनी दिली.  आज बोरगाव ते आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले, बोरगाव हे सीमा भागातील महत्त्वाचे गाव. बोरगाव सर्कल व्यापारी ,शेतकरी, प्रवासी ,विद्यार्थ्यांना प्रमुख केंद्र. जवळच्या महाराष्ट्र राज्याला जोडणारे प्रमुख सर्कल असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक वर्दळ संख्या लक्षात घेऊन आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मंजूर केले आहेत.  बोरगाव शहरातील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अमृत 2 योजनेतून 18 कोटींचा निधी...

स्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे

इमेज
इसाक नदाफ /  शिवार न्यूज नेटवर्क :  महिला व बालविकास विभागाकडील सर्व बालगृहे, निरीक्षणगृहे, महिला आधारगृहे यातून आवश्यक सेवा व सुविधा देवून तेथील मुला-मुलींना स्वयंपूर्ण होण्यासाठी चांगले शिक्षण मिळेल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्वसन समिती, जिल्हा बाल कल्याण व जिल्हा बाल संरक्षण समितीची त्रैमासिक बैठक शाहूजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, विविध पुनर्वसन केंद्रात दाखल प्रत्येक गरजूंना पुनर्वसन केंद्राच्या उद्देशाप्रमाणे आवश्यक सेवा देवून त्यांना त्या त्या वयोगटात शिक्षण द्या. तरूण मुला मुलींना जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत सुरू असलेल्या प्रशिक्षणांचा लाभ देवून स्वयंपुर्ण होण्यासाठी मदत करा. या बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, समिती सदस्य ॲड.शिल्पा सुतार, पद्मजा गारे, अश्विनी खाडे, संबंधित विभागाचे प्रतिनिधी व सर्व निरीक्षणगृहे, महिला आधारगृहे, बालगृहांचे अधिक्षक उपस्थित होते.  यावेळी प्रत्येक संस्थेचा तालुकानिहाय आढावा जिल्हाधिकारी यांनी घेवून त्यांच्या अ...

थकित पाणीपट्टी प्रकरणी आता पाटबंधारे विभाग ॲक्शन मोडवर..!

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :   पाटबंधारे प्रकल्पाद्वारे सिंचन व बिगर सिंचन वापरा करीता पाणी पुरविण्यात येते. या पाणी वापराकरीता शुल्क आकारण्यात येते. सिंचन व बिगर सिंचन या वापराकरीता वेगवेगळी पाणीपट्टी आकारणी करण्यात येते. कागल पाटबंधारे विभागाकडील खाजगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व परवाना संमतीधारक यांनी २० मार्च पर्यंत पाणीपट्टी नाही भरली तर मोटर सील करणे तसेच विद्युत परवाने रद्द करण्याची कारवाईला संबंधितांना तोंड द्यावे लागणार आहे.  कागल पाटबंधारे विभागाकडे दूधगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, दानवाड, टाकळीवाडी या गावाचे कार्यक्षेत्र आहे. पाटबंधारे प्रकल्पाद्वारे सिंचन व बिगर सिंचन वापरा करीता पाणी पुरविण्यात येते. यामध्ये खाजगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व संमतीधारक यांचा समावेश आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार यंदाही जुन्या दरानेच म्हणजे हेक्टरी ११२२ रुपये प्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येत आहे.पाटबंधारे विभागामार्फत दूधगंगा धरणातून ...

कुटवाड येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरू श्री तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :       कुटवाड ता.शिरोळ येथे भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा अद्भुत संगम घडवत अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरू श्री तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 375 व्या बीज उत्सवानिमित्त 16 मार्च ते 22 मार्चपर्यंत सोहळा संपन्न होणार असून, संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे.      वारकरी संप्रदायाची परंपरा, संत वाङ्मयाचा प्रचार व प्रसार, तसेच भाविकांना अध्यात्मिक भक्तिरसाचा आनंद देण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन केले आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या अभंग वाणीचा गोडवा, अखंड नामस्मरण, भजन-कीर्तन, गाथा पारायण, प्रवचने आणि विविध धार्मिक विधींचा समावेश आहे.       या सोहळ्यात ह.भ.प. रविंद्र साबळे महाराज (आळंदी), ह.भ.प. विजय पाटील महाराज (कुटवड), ह.भ.प. परशराम पाटील महाराज (कुटवाड) यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकाराम गाथा पारायण होणार आहे.       या सोहळ्याला दररोज पहाटेच्या काकड आरतीपासून प्रारंभ होणार आहे. हरिपाठ आणि पारंपरिक भजन-कीर्तन,संत तु...

गेल्या 4 वर्षापासून मातृ वंदना योजने अंतर्गत आशांचे मानधन रखडले ; जिल्हा प्रशासनास निवेदन

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षापासून मातृ वंदना योजने अंतर्गत आशां कर्मचाऱ्याचे मानधन रखडले असून मानधन रक्कम मिळावी यासह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कोल्हापूर येथील जिल्हा प्रशासन अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देवून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.        दरम्यान संघटनेच्या राज्य समन्वयक नेत्रदिपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सुजाता पाटील, स्वाती पाटील, मंदाकिनी कोडक , माया पाटील, पद्मा दुर्गुळे, छाया तिरुके, शबाना पाटणकर, काजल पटेल, स्नेहा तोरस्कर राणी खोत,अनिता रावण आदिनी चर्चेत सहभाग घेतला.सकारात्मक चर्चेतून प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.          जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पिंपळे यांनी आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी थकीत मानधन त्वरित अदा करण्यात यावे. याबाबत राज्य सरकारचे ३ महिन्याचे १० हजार प्रमाणे डिसेंबर ज...

शरद इंजिनिअरिंगमध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

इमेज
  यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :       यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उत्कृष्ट काम करणा-या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. एम्पासिस कंपनीचे इडिया कॅम्पस हेड जोशॉ डेव्हिड, संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.  महाविद्यालयातील प्रा. शितल उदगावे (मेकॅनिकल), प्रा. धनश्री बिरादार (इलेक्ट्रॉनिक्स), प्रा. डॉ. सुयोग पाटील (मेकॅनिकल), प्रा.डॉ. उपमा दास (आर्टीफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्स) यांचा उत्कृष्ट शिक्षक तर विशाल हावले, माणिक खोत, विवेक मगदूम यांचा उत्कृष्ट सेवक म्हणून सन्मान करण्यात आला.  यावेळी सर्व आदर्श शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. संजय खोत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रा. एस.आर. घोरपडे, प्रा. य़ु.एस. पाटील, डिन प्रा. बाहुबली संगमे, प्रा. सुजित कुंभार, प्रा. के.ए. कुपाडे, प्रा. प्रिया घाटे, प्रा.डॉ. सुकांता देबनाथ, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या नेहा सोनी यां...

बसवराज गुंडकल्ले यांचा नगराध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार

इमेज
  बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :  सदलगा (ता. चिकोडी) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले बसवराज अण्णासाहेब गुंडकल्ले यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना बसवराज गुंडकल्ले म्हणाले, "मी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची ही खरी पोचपावती आहे. यापुढेही सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहील." या कार्यक्रमाला दत्तवाडचे युवा नेते दादामोहन आदिशा चौगुले, युवा अध्यक्ष अनिल शिवगोंडा पाटील, मलिकवाडचे विजय देसाई, संजू इंगळे, दिलीप साळुंखे यांसह गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनील भीमराव माने यांची अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशपदी नियुक्ती

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरटी गावाचे भाचा तसेच तेरवाड (ता. शिरोळ) येथील सुपुत्र मा. सुनील भीमराव माने यांची अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल समस्त चर्मकार समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला तसेच शिरटी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित चर्मकार समाजबांधवांनी त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी रावसाहेब निर्मळे, अर्जुन धुमाळे, नागेश शेजाळे, रामदास भंडारे, नारायण आगवाने आदी मान्यवरांची होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भंडारे, अरुण भंडारे, पांडुरंग भंडारे, पुंडलिक भंडारे, श्रीकांत भंडारे, सागर भंडारे, नाईक भंडारे यांनी केले. या प्रसंगी शिरटी ग्रामस्थ व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.