शिरोळ शहरात पहिल्या टप्प्यात १०० झाडे लावण्याचा संकल्प
पालिकेतील सार्वजनिक तरुण मंडळांच्या बैठकीत निर्णय शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून शहरात एक मंडळ एक झाड हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात पालिकेत सार्वजनिक तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत प्राथमिक पहिल्या टप्प्यात शिरोळ शहरात 100 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते शक्तीजीत गुरव यांनी सोशल मीडियाद्वारे एक मंडळ एक झाड हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अध्यक्षतेखाली तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी शहरातील जुना कुरुंदवाड रस्ता मौजे आगर रस्ता क्रांतिसिंह चौक विजयसिंह पाटील नगर घालवाड रस्ता अजिंक्यतारा मंडळ जय भवानी चौक बुवाफन महाराज मंदिर परिसर यासह अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून नगरपालिका आणि सार्वजनिक तरुण मंडळाच्या वतीने सुमारे 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स...