पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था सभासदहित पाहणारी -दिलीप शिरढोणे

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था जयसिंगपूर ही संस्था साने गुरुजींच्या विचारावर कार्यरत असून सभासद हिताला प्राधान्य देणारी आहे. असे प्रतिपादन दिलीप शिरढोणे यांनी केले.         गुणवंत शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कुरुंदवाड शहर व परिसर पत्रकार संघामार्फत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाले बद्दल सत्कार करण्यात आला. सागर जंबू चौगुले यांची राज्य फेडरेशन महाराष्ट्र राज्य तज्ज्ञ संचालकपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेबद्दल उर्दू विद्या मंदिर खिद्रापूर,विद्या मंदिर कोंडीग्रे तसेच कुमार विद्या मंदिर नं. ३ कुरुंदवाड यांची जिल्हास्तरीय लहान गट कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेतील उज्ज्वल यशाबद्दल मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांचा सत्कार करणेत आला.  कुमार विद्या मंदिर नं. ३ कुरुंदवाडचे शंकर महादेव दिवटे व सुमित्रा धोंडीराम शंकरदास यांना श्रावस्ती बहुउद्ये शियसंस्थेचा राज्यस्तरीयआदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल सत्कार करण्यात आला. रजन...

१ मार्च रोजी उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वा लाखाच्या विना लाठी-काठी बैल, घोडा-गाडी शर्यती

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : निपाणी मतक्षेत्रचे युवा नेते, बोरगाव येथील  प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष उत्तम रावसाहेब  पाटील यांच्या 45 व्या वाढदिवसा निमित्त बुधवारी (ता.1 मार्च) रोजी  सव्वा लाख रुपयाच्या विना लाठी- काठी बैलगाडी आणि घोडा गाडी शर्यती आयोजित करण्यात आले आहेत. बोरगाव माळ पट्ट्यावर आयोजित या शर्यती सकाळी ८.३० वाजता होणार आहेत. युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन होणार आहे. जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ३१ हजार रुपये,२१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहेत. जनरल घोडा गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १५ हजार,१० हजार आणि ५ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहे. घोडा- बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहे. एक हलका 'ड'गट   बिनदाती घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये आणि ३ हजार रुपये व ढाल बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती  युडी साईज व वाढदिवस कमिटीने कळविली आहे.

कुरुंदवाडमध्ये ठाकरे गट आक्रमक : महाजन यांच्या पोस्टरचे दहन

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :    मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर बेताल वक्तव्य करून टिका केल्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने येथील थिएटर चौकात महाजन यांचा निषेध व्यक्त करुन त्यांच्या पोसटरला जोडे मारुन दहन करण्यात आला. आंदोलनानंतर मोर्चाने पोलिस ठाण्यात जावून सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांना निवेदन दिले व महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी केले.    आंदोलनात उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, राजू आवळे, दयानंद मालवेकर, आयुब पट्टेकरी, सुहास पासोबा, मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, तेरवाड सरपंच शशिकला वाडीकर आदी सहभागी झाले होते.

तुर्की येथील इंटरनॅशनल युथ काॅन्फरन्समध्ये कनवाडच्या अमन पटेल यांनी मांडली भारताची भूमिका

इमेज
कनवाड/ शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यातील मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे अमन फयाज पटेल हे मुळ कनवाड चे रहिवाशी आहेत. तुर्की या देशात नुकताच पार पडलेल्या युनायटेड नेशन अंडर बेस्ट डिप्लोमॅट्स इंटरनॅशनल युथ काॅन्फरन्स मध्ये ते सहभागी झाले होते. या काॅन्फरन्स मध्ये 50 देशातुन 200 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. या काॅन्फरन्स चा विषय होता जागतिक  व्यापार आणि शस्त्र,  अमन पटेल यांनी अगदी मुद्देसुद माहिती देऊन भारताची भुमिका मांडली. ज्या वेळी पटेल यांची निवड झाली होती त्यावेळी शाहु शिक्षण संस्थेच्या संचालिका ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे मॅडम करुंदवाड येथील एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या कि अमन पटेल म्हणजेच कोल्हापूर ची मुलुखमैदान तोफ कोल्हापूर चा आवाज आता दिल्ली मुंबई मध्ये नाही तर तुर्की या देशात घुमणार ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे या म्हणाल्या तशा कोल्हापूर चा आवाज शेवटी तुर्की या देशात घुमला या काॅन्फरन्स मध्ये भारतातुन फक्त 6 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते . या 6 विद्यार्थ्यांन मधुन महाराष्ट्रातुन अमन पटेल होते.  ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आ...

संजय घोडावत यांचा 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवस; अभिनेता प्रसाद ओक यांची उपस्थिती

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर:घोडावत विद्यापीठात 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता उद्योजक संजय घोडावत यांचा 58 वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी अभिनेता प्रसाद ओक उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.           यावेळी विद्यापीठाचे वार्षिक स्नेहसंमेलन 'उमंग' चे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये संगीत, नृत्य, फॅशन शो,गायन याद्वारे विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. त्याचबरोबर कला, क्रीडा,संस्कृती,साहित्य, उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला 'एसजीयु आयकॉन 2023' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.            विद्यापीठ स्तरावर या वार्षिक स्नेहसंमेलनाची आणि वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

इचलकरंजी बुध्दिबळ स्पर्धत २०० खेळाडूंचा सहभाग

इमेज
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यतेने, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व केन चेस अकॅडमी यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्हा मर्यादित महाशिवरात्री निमित्त दि. १८ रोजी घेण्यात आलेल्या १० व १६ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धत ५० शाळांचा सहभाग होता. त्यात २०० शालेय विद्यार्थी सहभागी होते, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त १३ खेळाडूंचा सहभाग होता. इचलकरंजीत घेण्यान आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेन एकूण ८ फेऱ्या घेण्यात आल्या या स्पर्धा लायन्स ब्लड बैंक हॉल, दाते मळा, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. 6 वर्षा खालील प्रथम क्रमांक - दिव्या पाटील, द्वितीय क्रमांक रियार्थ पोदार, तृतीय क्रमांक- शौर्य बगडिया चतुर्थ - शंतनू पाटील , पाचवा क्रमांक- व्यंकटेश खाडे - पाटील, १० वर्षाखालील प्रथम क्रमांक - प्रेम निचल, द्वितीय क्रमांक- अर्णव पाटील, तृतीय क्रमांक- वेदान बांगड , चतुर्थ क्रमांक. सिद्धी कर्व, पाचवा क्र.- आदित्य घाटे, उत्तेजनार्थ ७ वर्ष खालील मुले : जुनेद जमादार, द्रिश हेडा, दिव्यांश भराडिया, मुली : अन्वेशा सोनी, रिद्धी भुतडा, क्रिशा बाहेती, ९ वर्षांखालील मुले : अंलकार तेली, द्विज कातृत , र...

दुधारी लेखणीच्या नादाला लागू नका : दगडू माने

इमेज
  कणेरीमठ येथे पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोळमध्ये पत्रकार एकवटले शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :       कणेरीमठ येथे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या कोल्हापूर येथील एका चैनल प्रतिनिधीला धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित दोषीवर कारवाई करावी.या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनाच्या वतीने शिरोळ तहसील व शिरोळ पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांना शनिवारी दुपारी 12 वाजता  निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविण्यात येणार आहे, शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र जमावे असे आवाहन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ पत्रकार दगडू माने (शिरोळ) यांनी केले आहे.        कणेरीमठ येथे सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव सुरु आहे. सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी कार्यक्रमाचे कव्हरेज चांगल्या पद्धतीने देत आहेत. प्रसार माध्यमांमु...

शेतकर्‍यांच्या बांधावरून माल खरेदी करून फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांविरूद्ध कठोर भूमिका - सचिन पाटील

इमेज
पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :  कृषि उत्पन्न बाजार समितीतून शेती माल खरेदी न करता थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून माल खरेदी करण्याचं प्रमाण मोठया प्रमाणात वाढलं आहे. शेतकरीही अशा प्रकारच्या विक्रीला प्राधान्य देतात. परंतू काही व्यापारी याचा गैरफायदा घेवून लाखो रूपयांचा माल खरेदी करून पसार होतात. अशा वेळेस शेतकर्‍यांना वसुलीसाठी मोठी अडचण निर्माण होते.  नाशिक जिल्हयाचे पोलीस अधिक्षक म्हणून काम करताना जिल्हयातील फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना मोठया प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं काम सचिन पाटील यांनी केलं आहे. त्यांनी राबवलेला पॅटर्न संपुर्ण राज्यभर राबविला तर शेतकर्‍यांची करोडो रूपयांची येणी वसुल होतील. त्यासाठी ग्रीन वर्ल्ड परीवार पुढाकार घेणार आहे असे मत ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलं.   सचिन पाटील सध्या औरंगाबाद जिल्हयात गुन्हे अन्वेशन विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ग्रीन वर्ल्ड कार्यालयात दिलेल्या भेटीच्या वेळी उद्योजक अभिजीत पारखी, वझे, कुलकर्णी, निशिकांत कडबाने, पियुष कोतवाल उपस्थित होते.

सहकारी पतसंस्थांच्यामुळे ग्रामीण भागातील अर्थ पुरवठा सुरळीत : अदित्य पाटील यड्रावकर

इमेज
हेरवाड मध्ये कृषिरत्न पतसंस्थेचा उद्‌घाटन सोहळा उत्साहात हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : पतसंस्थेचं निर्माण हे सर्वच नागरीकांना आर्थिक सक्षम करणं आहे. सहकारी पतसंस्थांच्यामुळे ग्रामीण भागातील अर्थ पुरवठा सुरळीत झाला आहे. लवकरच आरबीआयच्या नविन निकषानुसार पतसंस्था या बँकाच्या स्वरूपात काम करणार आहेत. कृषिरत्न ग्रामीण पतसंस्थेने सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करून सहकार क्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन शरद साखर कारखान्याचे चेअरमन अदित्य पाटील यड्रावकर यांनी केले. हेरवाड येथील कृषिरत्न ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना दत्तचे संचालक अनिलराव यादव म्हणाले, सर्वसामान्य जनतेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात पतसंस्थांचे मोठे योगदान आहे. क्रेडिट नसणार्‍या माणसांना आर्थिक मदत पतसंस्थांच्या माध्यमातून केले जात आहे. महाराष्ट्रात अनेक पतसंस्था बुडाल्या आहेत. त्यामुळे सध्या अनेक पतसंस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या अडचणींतून कृषिरत्न पत संस्था खरोखरच उत्कृष्ट कार्य करेल. यावेळी सरपंच रेखा जाधव...

प्रलंबित असलेल्या नवे दानवाड ते जुने दानवाड रस्त्याचे काम सुरू

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या अनेक वर्षांपासून नवे दानवाड ते जुने दानवाड रस्त्याचे काम प्रलंबित होते. त्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती, याची दखल घेऊन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.  नवे व जुने दानवाड ही दोन्ही गांवे कर्नाटक राज्याच्या सिमेवर असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतून सुरु असते, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे याचा नाहक त्रास वाहन धारकांना सोसावा लागत होता, याची दखल घेऊन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

बेडकिहाळ येथील होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या सौ विनंती घोडके

इमेज
  हळदी - कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : बेडकिहाळ- येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या  बि एस संयुक्त पदविपूर्व कॉलज च्या भव्य पटांगणावर बुधवार (ता २३) रोजी उत्तम आण्णा पाटील युवा शक्ती व 'अरिहंत  परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने   हळदी कुंकू व होम  मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.       यावेळी निपाणीचे माजी आमदार सुभाष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी निपाणी भागाचे युवा नेते उत्तमआण्णा पाटील, मीनाक्षी रावसाहेब पाटील,निपाणी च्या माजी नगराध्यक्षा  शुभांगी जोशी,धनश्री उतम पाटील, विनयश्री अभिनंदन  पाटील, जनगौडा धड्ड पाटील,सुदर्शन खोत, बाबासाहेब खोत,संजय पाटील, सचिन पाटील, अब्दूलकादिर पटेल,निरंजन पाटील, यांच्या प्रमुख उपस्तीत झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी स्वागत व प्रास्थाविक दत्त साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  इंद्रजित  पाटील यांनी केले. तर बोरगांव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या संचालीका मीनाक्षी पाटील, शुभांगी जोशी, उत्तम पाटील व...

उद्यापासून तेरवाड मंगरायासिध्द देवाची यात्रा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :        तेरवाड ( ता. शिरोळ ) येथील मंगरायासिध्द देवाची यात्रा शुक्रवार ते सोमवार अखेर होत आहे. या यात्रेनिमित्त विविध स्पर्धा, जंगी कुस्त्यांचे मैदान, शर्यती, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष उमेश माळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.    माहीती देताना म्हणाले, शुक्रवारी पहाटे पाच वाजता मंगरायासिध्द देवाची पालखी मिरवणूक व पंचगंगा नदीवर भाकणूक होणार आहे.   शनिवारी सकाळी मरेथाॅन, रांगोळी स्पर्धा होणार आहेत. तर साडेदहा वाजता श्वान स्पर्धा होणार आहेत. स्वर संगीत मैफिलीचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.   रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी विना लाठी काठी घोडागाडी शर्यत होणार आहे. सायंकाळी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार असून कुस्त्यांचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त साखर कारखाना चेअरमन गणपतराव पाटील व गुरुदत्त साखर कारखाना चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दलितमित्र अशोकराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील यांची प...

नवे दानवाड गावा मध्ये मारूती मंदिरात अंदाजे दोन हजार भाकरी जमा

इमेज
प्रल्हाद सांळुखे / शिवार न्यूज नेटवर्क : सिध्दगिरी मठ महासंस्थानच्या वतीने आयोजित सुमंगलम पंचमहाभुत लोकोत्सव यशस्वी होण्यासाठी केलेल्या विविध आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून गावागावांतून शिधा जमा करण्याची लगबग सुरू झाली आहे. नवे दानवाड गावा तुन सुध्दा याच पार्श्वभूमीवर दानवाड ग्रामपंचायतने आवाहन केले प्रमाने गावातील ग्रामस्थांनी 23 रोजी सकाळी 8वाजता मारूती मंदिरात भाकरी जमा करून सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाचा भाग बनावे असे आवाहन करण्यात आले होते त्याना प्रतिसाद म्हणुन नवे दानवाड ग्रामस्थांनी 2 हजार भाकरी जमा करून या यज्ञामध्ये अन्न दान करून सहभागी झाले आहेत.

पंचमहाभूत लोकोत्सवासाठी हेरवाडकरांनी २३ रोजी भाकरी जमा करण्याचे आवाहन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : सिद्धगिरी मठ महासंस्थानच्या वतीने आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी केलेल्या विविध आवाहनांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावागावांतून शिधा जमा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उत्सव काळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे नियोजन झाले आहे. याच पार्श्वभूमिवर आवाहन केल्याप्रमाणे हेरवाड गावातील ग्रामस्थांनी २३ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात भाकरी जमा करून सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचा भाग बनावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या महोत्सवात या उत्सवासाठी पंचवीस राज्यांतून सुमारे पाच लाख भक्तगण येणार असून या भक्तगणांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे.  आलेल्या लोकांना रोज काय जेवण द्यायचे, त्यामध्ये आपण कोणता पदार्थ द्यायचा याचा निर्णय गावागावांनी घेतला आहे. याशिवाय प्रत्येक घरातून सात दिवस चार ते पाच लाख भाकरी येणार असून या महोत्सवाला हेरवाड मधील नागरीकांनी ग्रामपंचायत कार्यालयात भाकरी जमा करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आयुक्त देविदास टेकाळे यांची ग्रीन वर्ल्ड कार्यालयाला भेट

इमेज
पुणे / शिवार न्यूज नेटवर्क : धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांनी ग्रीन वर्ल्डच्या पुणे कार्यालयाला भेट दिली. ‘माझी वसुंधरा’ या राज्यशासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानावर लेखक गौतम कोतवाल यांनी ‘माझी वसुंधरा’ पुस्तकाचं लिखाण केलं आहे. पृथ्वी, वायु, आकाश, जल व अग्नि या पंचमहाभूतांवर काम करून त्यांचं संवर्धनाचं काम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या अभियानाअंतर्गत करत आहेत. या अभियानात ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कामाचा तपशील शासनाच्या साईटवर टाकला जातो. वेगवेगळया प्रकारच्या कामाला मार्क सिस्टीम निश्‍चित करण्यात आली असून वर्षाच्या शेवटी मुल्यांकन करून उत्कृष्ठ काम करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार व आर्थिक रक्कम भेट देवून हे अभियान राबविलं जातं. ग्लोबल वॉर्मिंग हा जागतिक स्तरावरील प्रश्‍न आहे. महाराष्ट्र शासनाने या अभियानात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कसा कमी करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं आहे.  धुळे महानगरपालिकेने या अभियानात उत्कृष्ट काम करून अमृत गटात विभाग स्तरावरील नाशिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल ग्रीन वर्ल्ड कार्यालयात त्यां...

अवघे कुरुंदवाड शहर झाले शिवमय

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  “जय भवानी- जय शिवाजी” , “ छत्रपती शिवाजी महाराज कि जय ”  चा जयघोष आसमंतात भिरभिरणारे भगवे झेंडे, विद्यार्थ्यांनी घातलेल्या भगव्या टोप्या, लेझीम , झांज व ढोल पथक तसेच  हलगी,  कैताळ या पारंपारिक वाद्याचा गजर आणि त्यांच्या जोडीला मुलांनी सादर केलेल्या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, घोड्यावर आरुढ झालेले शिवाजी महाराज, माता जिजाऊ  व मावळे केलेले विद्यार्थी आणि उत्साही वातावरण रविवारी शहरात पाहायला मिळाले ! निमित्त होतं शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळेसह संस्थेच्या विविध शाळांच्या वतीने शिवजयंती निमित्त काढलेल्या भव्य शोभायात्रा सोहळ्याचे !! कुरुंदवाड शहरात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.       शिवजयंती निमित्त येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा , सीताबाई पटवर्धन हायस्कूल, सौ. विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळा, कै. डॉ. रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. जानकीबाई रामचंद्र  फडणीस प्राथमिक विद्या मंदिर , इंग्लिश मेडियम स्कूल यांच्यास...

पुलाची शिरोलीत दोन सिरॅमिक दुकानांना आग लाखों रुपयांचे नुकसान

इमेज
  सलिम खतिब / शिवार न्यूज नेटवर्क : पुलाची शिरोलीतील सांगली फाटा येथे दोन सिरॅमिक दुकानांना आग लागून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.हि घटना कोल्हापूर सांगली राज्य महामार्गालगत सांगली फाटा येथे शनिवारी पहाटे पाच वाजता घडली. कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गा लगत मार्बल लाईन आहे. येथील टोल शेडच्या लगत असणाऱ्या इंगळे सिरॅमिकला पहाटे पाचच्या दरम्यान अचानक आग लागली. दुकानांमध्ये प्लायवूड, रबरी मॅट असल्याने आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. अग्निशमन बंब येईपर्यंत इंगळे सिरॅमिक सेंटर जळून खाक झाले होते. तर या दुकानालगत चंदवानी सिरॅमिक दुकान आहे. इंगळे सिरॅमिक सेंटरला लागलेल्या आगीने चंदवानी सिरॅमिक सेंटरच्या बाजूला लावलेल्या वातानुकूलित मशीनला आग लागून त्याची वायर जळत चंदवानी सिरॅमिक मध्ये घुसली. अग्निशमन दलाचा बंब एकच असल्याने सुरुवातीला आग आटोक्यात आणणे कठीण होते. त्यानंतर अन्य अग्निशमन दलाच्या बंबानाही पाचारण करण्यात आले. तोपर्यंत चंदवानी सिरॅमिकच्या दुसऱ्या मजल्यावर असलेले अति महागडे परदेशी बनावटीचे सा...

दत्तवाड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

इमेज
इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त (दत्तवाड ता. शिरोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीमार्फत देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृहामध्ये मगदूम एण्डो- सर्जरी इन्स्टिट्यूट कोल्हापूर तर्फे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोफत मूत्ररोग निदान आणि उपचार त्याचबरोबर किडनीस्टोन, प्रोस्टेट, लघवी नकळत जाणे, लघवीतून रक्त जाणे, थंडी वाजून ताप येणे, किडनी खराब होणे, अंगावर सूज येणे, लघवीचा मार्ग लहान होणे इत्यादी त्रास असणाऱ्या रुग्णांना शिबिरात मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये तज्ञांकडून  रुग्णतपासणी, रक्त- लघवी तपासणी, युरोफ्लोमेट्री इ. चाचण्या आणि औषध उपचार पूर्णत: मोफत करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जाणार आहेत. तरी या शिबिराचा दत्तवाड परिसरातील गरजू रुग्णांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे...

खरेदी - विक्री संघाचे नूतन संचालक सज्जनसिंग रजपुत यांचा सत्कार

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : नवे दानवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते सज्जनसिंग रजपुत यांची शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी बाबासाहेब पाटील, माजी सरपंच संजय धनगर, मनोहर मोकाशी, अँड. राहुलराज कांबळे , भगतसिंग रजपुत, शिवाजी साळुंखे,रामा बेरड व इतर मान्यवर उपस्थित होते.

जुन्या पेन्शन संदर्भात अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
रत्नागिरी / शिवार न्यूज नेटवर्क : येथील चंपक मैदानात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक बंधू भगिनींच्या उच्चांकी गर्दीत सुरुवात झाली.         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांचे प्रतिमापूजनाने झाली.           शिक्षक नेते संभाजीराव थोरात तात्या यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, स्वागताध्यक्ष तथा उद्योगमंत्री,पालकमंत्री रत्नागिरी उदय सामंत,ना. गिरीश महाजन,आ.अनिल भाऊ बाबर, आ.योगेश जाधव,सांगोल्याचे माजी आमदार दिपक आबा साळुंखे, भैय्यासाहेब सामंत,पुरुषोत्तम जाधव,उदयसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी  किर्ती कुमार पुजार यांच्यासह राज्य कार्यकारणी,शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क...

घोडावत विद्यापीठात विमान दुरुस्ती विषयक राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : संजय घोडावत विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाने एरोस्पेस विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन स्टार एअर चे अभियंता फते बहादुर सिंग आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी केले.     हि कार्यशाळा 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याची माहिती एरोस्पेस अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.बालाजी यांनी दिली. या प्रशिक्षणाचा विषय 'रिसेंट ट्रेंड्स अँड डेव्हलपमेंट्स इन एव्हिएशन मेंटेनन्स' हा आहे. देशभरातून 200 विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना स्टार एअर बेंगलुरु येथील विमान देखभाल दुरुस्ती करणारे अभियंता प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीत प्रत्यक्ष विमान, हेलिकॉप्टर दुरुस्ती करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान कोल्हापूर विमानतळाला भेट देऊन धावपट्टी आणि उड्डाण पूर्व विमान तपासणी कशा पद्धतीने केली जाते,याबाबत माहिती दिली जाणार आहे. विमान देखभाल दुरुस्ती संदर्भात सर्वतोपरी प्रशिक्षण देण्याचा उद्देश या कार्यशाळेचा आहे...

खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

इमेज
  सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली दरम्यान श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दत्त कारखाना कार्यस्थळावर संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रेमकुमार राठोड यांनी संघाच्या निवडणुकीचे काम पाहिले  माजी आमदार स्वर्गीय डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संघाची दैदिप्यमान प्रगती झाली आहे या संघावर डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील गटाचे वर्चस्व अबाधित आहे डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या निधनानंतर त्याचे सुपुत्र दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी यांनी सर्व सहकारी संस्थांचे नेतृत्व करत असताना या संस्थांच्या निवडी ब...

डी वाय कृषी व तंत्र विद्यापीठ संघाचा सलग दुसरा विजय

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : डी वाय पाटील ग्रुपच्या वतीने विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी भव्य क्रिकेट मॅच स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने सलग दुसरा विजय मिळविला तर संघाचे उपकर्णधार किशोर मोरे हे दोन्हीही मॅच चे मॅन ऑफ द मॅच ठरले. एटीयु संघाचा पहिला सामना मेडिकल कॉलेज संघ कोल्हापूर यांच्याशी झाला. एटीयु संघाने १०९ धावांचे तगडे आव्हान दिले होते पण मेडिकल कॉलेज संघ अवघ्या ५५ धावातच गारद झाला. दुसरा सामना नर्सिंग कॉलेज कदमवाडी संघाबरोबर झाला त्यांच्यापुढे ही एटीयु संघाने ७६ धावांचे आव्हान दिले पण त्यांचा ही संघ ५३ धावात आटोपला. किशोर मोरे यांनी पहिल्या मॅच मध्ये २६ चेंडूत ७३ धावा तर दुसऱ्या मॅच मध्ये २७ धावा व महत्वपूर्ण २ विकेट घेतल्या त्यामुळेच आज ते अव्वालस्थानी आहेत. पहिल्या सामन्यात डॉ गुरुनाथ मोटे व किशोर मोरे यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. राजवर्धन तोडकर व सौरभ पाटील यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करीत संघाच्या अवांतर धावा वाचविल्या. डॉ दीपक शिंदे, डॉ. गुरु...

स्वतःमधील जिद्द आणि चिकाटी आयुष्य यशस्वी बनवेल : विशाल लोंढे

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : समाज, देश पुढे जायचा असेल तर महिला सक्षम आणि स्वावलंबी असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने समाजात प्रयत्न व्हायला हवेत. मुलींनी स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. जे करिअर करणार आहे, त्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी नक्कीच तुमचे आयुष्य यशस्वी बनवेल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. तिटवे ता. राधानगरी येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांतील विविध संधी या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.      ते पुढे बोलताना म्हणाले, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करा, त्यातून आयुष्याबद्दलचे चांगले निर्णय घ्या. स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी जगा. कारण जेंव्हा तुम्ही स्वतःसोबत समाजाची प्रगती कराल तेंव्हा आपल्या देशाची प्रगती अधिक झपाट्याने होईल. आपल्याला मिळालेल्या भौतिक साधनांचा योग्य वापर करून आपण यश मिळवू शकतो. तसेच परिस्थितीवर मात करून एका सामान्य व्यक्ती प...

बंडू पाटील यांच्या पुढाकारामुळे दर्ग्याकडे जाणारा मार्ग झाला पूर्ववत

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  हेरवाड येथील जागृत देवस्थान असणार्‍या हजरत शमनामिराबाबा वली यांचा ऊरुस काही दिवसावर येवून ठेपला आहे, मात्र, या दर्ग्याकडे जाणारा रस्ता संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर मुरमाचे ढिग टाकल्याने दर्ग्याकडे जाणार्‍या भाविकांना याचा त्रास होणार असल्याने सदर दर्ग्याकडे जाणारा रस्त्यावर डांबरीकरण किंवा खडीकरण करावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांतून होत होती, याची दखल घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी पुढाकार घेवून सदरचा मार्ग पूर्ववत केला आहे. सध्या सलगरे ते हेरवाड रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असताना संंबंधित ठेकेदाराकडून येथील तेरवाड रोडलगत असलेल्या हजरत शमनामिरा बाबांच्या दर्ग्याकडे जाणार्‍या रस्त्यावर मुरमाचा ढिग टाकला आहे. सध्या दर्ग्याचा उरुस काही दिवसावर येवून ठेपला आहे, मात्र, दर्ग्याकडे जाणार्‍यासाठी रस्ता नसल्याने भाविकांची मोठी अडचण होणार होती, मात्र, बंडू पाटील यांच्या पुढाकारामुळे हा मार्ग पूर्ववत झाला आहे. 

घोसरवाडच्या प्राथमिक शिक्षकांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी

इमेज
  घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : गुरुदत शुगर टाकळीवाडीचे एकझ्युकेटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात कुमार घोसरवाड येथील शिक्षक दत्तात्रय कचरे यांनी ३५ व्या वेळी, स्वतःअपंग असूनही अनिल मंगावे यांनी १४ व्यावेळी, नंदकुमार पोवार यांनी १४ व्या वेळी, दशरथ खोत यांनी ६ व्या वेळी तर विनायक कांबळे यांनी चौथ्यांदा रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.            नेहमी शैक्षणिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असणारी कुमार विद्या मंदिर घोसरवाड शाळा रक्तदान करणाऱ्या शिक्षकांची शाळा म्हणून ओळखली जावू लागली आहे. केंद्रीय प्रमुख रमेश शंकर कोळी,मुख्याध्यापक संजय निकम,शामराव कांबळे यावेळी उपस्थित होते.

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिक शेती करावी : उद्यानपंडित गणपतराव पाटील

इमेज
सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :   दत्तवाड येथे 700 ते 800 एकर जमीन क्षारपड बनली आहे. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती केली पाहिजे. सामुदायिक विचाराने शेती करण्याच्या पद्धतीला दिशा देणे आवश्यक आहे. एकत्र येऊन एकाच निर्णयाने शेती ही फायद्याची बनेल. या कामात जात, पात, धर्म, राजकारण करण्याची भूमिका नाही. शेतकऱ्यांनी दिलखुलासपणे क्षारपड मुक्तीच्या या योजनेत सहभाग घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले. दत्तवाड येथील 150 एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुख्य पाईपलाईन सर्व्हे कामाचे उद्घाटन श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणपतराव पाटील बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या क्षारपड मुक्त जमीन सुधारणा प्रकल्पात सहभाग घेतला आहे. आज या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली.      सरपंच चंद्रकांत कांबळे म्हणाले, एवढ...

संजय घोडावत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

इमेज
    रोटरी आंतरराष्ट्रीय डिस्ट्रिक्ट ३१७० तर्फे अष्टबंधन' परिषदेत सन्मान जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  बेळगावी येथे रविवारी 12 फेब्रुवारी रोजी 64 वी जिल्हास्तरीय रोटरी अष्टबंधन' परिषद पार पडली. यात संजय घोडावत यांना रोटरी आंतररष्ट्रीयचे प्रतिनिधी पीडीजी रोटे वासू यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.        यावेळी जिल्हा गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे, सेक्रेटरी रोटे डॉ कमलाकर आचरेकर, परिषदेचे चेअरमन रोटे अशोक नाईक, मार्गदर्शक अविनाश पोतदार उपस्थित होते.कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.      शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन संजय घोडावत यांचा सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन कमलाकर आचरेकर यांनी केले. संजय घोडावत ग्रुप,फाउंडेशन, इंटरनॅशनल स्कूल, युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून घोडावत यांच्या यशाचा आलेख चढता असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला.   संजय घोडावत फाउंडेशन च्या वतीने कोरोना काळामध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम अशा आरोग्य सुविधा पुर...

बेडकिहाळ येथे 18 फेब्रुवारी रोजी सर्वधर्मीय वधू वर व पालक मेळाव्याचे आयोजन

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :       बेडकिहाळ   येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या पद स्पर्शाने पावन  झालेल्या बेडकिहाळ  नगरीत सर्व धर्मीय वधु वर सुचक केंद्र बेडकिहाळ,  आधार सामाजिक सेवाभावी संस्था बेळगाव जिल्हा व माननीय श्री एल आर कोळी प्रांताध्यक्ष अखिल भारतीय समाज केंद्रीय कार्यालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने बेडकिहाळ  येथे सर्व धर्म वधू वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  बेडकिहाळ  तालुका निपाणी येथील आधार सामाजिक सेवा संस्था बेळगाव जिल्हा यांच्या सहकार्याने  सर्व समाजातील वधू वर यांना एकत्रित अनण्या पाठीमागचे कारण म्हणजे आज प्रत्येक  समाजातील युवा युवतींना  विवाह संबंधित अनेक समस्या निर्माण होताना दिसुन येत आहेत.या समस्यांचे एकाच व्यासपीठावर  विचार विनिमय व्हावे यासाठी सर्व  धरमिय वधु वर सुचक व मार्गदर्शकांच्या सहयोगाने बेडकिहाळ  येथील बी.एस कंपोझिट जुनिअर कॉलेज बेडकिहाळ येथे शनिवार दिनांक  18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी  पाच दरम्यान सर्व...

चला माणुसकीवर प्रेम करुया... रक्तदानातून जीवदान देवूया..

इमेज
दुसर्‍या दिवशीअखेर 1117 जणांचे रक्तदान जयसिंगपूर/ शिवार न्यूज नेटवर्क कायम सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे राहूलदादा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या शिबिरात 117 एकुण जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. चला माणुसकीवर प्रेम करुया... रक्तदानातून जीवदान देवूया.. या टँगलाईनखाली राहूल घाटगे यांनी सन 2020 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन आपल्या वाढदिवसानिमित्त करतात, याला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही तालुक्यातील विविध गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 12 रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात खिद्रापूर येथे 104, अकिवाट येथे 251, सैनिक टाकळी येथे 227, मजरेवाडी येथे 179 असे एकुण 761 रक्तदान केले होते, दुसर्‍या दिवशी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये राजापूर 178, टाकळीवाडी 87, नवे दानवाड 39, जुने दानवाड 52 असे एकुण 356 जणांनी रक्तदान केले असून पहिल्या व दुसर्‍या दिवशी एकुण 1117 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

जिल्हास्तरिय विविध स्पर्धांत उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचा मुस्लीम सुन्नत जमात व ग्रामपंचायत खिद्रापूर कडून होणार गुणगौरव

इमेज
      खिद्रापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  खिद्रापूर येथील उर्दू विद्या मंदिर शाळेने जिल्हास्तरीय सांस्कृतिक, प्रश्नमंजुषा व विज्ञान प्रदर्शन अशा विविध क्षेत्रात मिळविलेल्या अभूतपूर्व व उल्लेखनीय यशाची दखल घेवून विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव समारंभ सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे. ग्रामपंचायत खिद्रापूर व मुस्लीम सुन्नत जमात खिद्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे. गट शिक्षण अधिकारी दिपक कामत, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत माहिती पर्यटन केंद्र ( म्युझियम ) खिद्रापूर येथे संपन्न होत आहे.

खिद्रापूर, सैनिक टाकळी, अकिवाट आणि मजरेवाडीत 761 जणांचे रक्तदान

इमेज
  राहूलजी घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : कायम सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे राहूलदादा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज झालेल्या शिबिरात 761 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. चला माणुसकीवर प्रेम करुया... रक्तदानातून जीवदान देवूया.. या टँगलाईनखाली राहूल घाटगे यांनी सन 2020 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन आपल्या वाढदिवसानिमित्त करतात, याला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही तालुक्यातील विविध गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 12 रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात खिद्रापूर येथे 104, अकिवाट येथे 251, सैनिक टाकळी येथे 227, मजरेवाडी येथे 179 असे एकुण 761 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

संवाद उपक्रमांतर्गत विशाल लोंढे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :       सामाजिक न्याय विभागाने आयोजित केलेल्या संवाद उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतिगृह हातकणंगले येथे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोंढे यांनी एक दिवस विध्यार्थ्यांबरोबर वसतिगृहात राहून प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यांच्याशी विविध विषयांवर हितगुज करून त्यांना पुरविण्यात येत असलेल्या सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. स्वतः लोंढे यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी वसतिगृहातील सोयी-सुविधांबाबत समाधानी असल्याच्या भावना विद्यार्थी- विद्यार्थिनींनी लोंढे यांच्यासमोर व्यक्त केल्या.         समाज कल्याण विभागाची जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुलांच्या आणि मुलींचे शासकीय वसतिगृहे आहेत. तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी स्वतः सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी वसतीगृहात भेट दिली. यावेळी यामध्ये झालेल्या संवादात व...

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.   कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा ...

राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

इमेज
  पु रग्रस्तांचा आसरा असो, शेतकऱ्यांचा दुवा असो किंवा समाजातील सर्वसामान्य नागरीकांपासून शिरोळ तालुक्यातील जनतेचा आधार असो गुरुदत्त कारखाना नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रभागी असतो, हेच समाजकार्य राहूल घाटगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरु ठेवले आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरीकांचा प्राण वाचवून रक्ताची नाती जोडण्याचे काम राहूल घाटगे यांच्या माध्यमातून होत असून त्यांच्या या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे शिरोळ तालुक्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे. सन २०२० साला पासून त्यांनी या सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली. २०२० साली १०४० जणांनी रक्तदान केले. सन २०२१ रोजी २०२१ जणांनी, २०२२ साली ३०२० जणांनी रक्तदान करुन या उपक्रमाला मोठी साथ दिली. यावर्षी ४०१० रक्तबाटल्यांचे संकल्प असून याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चला माणूसकीवर प्रेम करुया.... रक्तदानातून जीवदान देवूया.  या टॅगलाईनखाली राहूल घाटगे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यात रक्तदान शिबिरचा संकल्प रुजविला आणि बघता बघता या शि...

राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

इमेज
  पु रग्रस्तांचा आसरा असो, शेतकऱ्यांचा दुवा असो किंवा समाजातील सर्वसामान्य नागरीकांपासून शिरोळ तालुक्यातील जनतेचा आधार असो गुरुदत्त कारखाना नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रभागी असतो, हेच समाजकार्य राहूल घाटगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरु ठेवले आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरीकांचा प्राण वाचवून रक्ताची नाती जोडण्याचे काम राहूल घाटगे यांच्या माध्यमातून होत असून त्यांच्या या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे शिरोळ तालुक्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे. सन २०२० साला पासून त्यांनी या सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली. २०२० साली १०४० जणांनी रक्तदान केले. सन २०२१ रोजी २०२१ जणांनी, २०२२ साली ३०२० जणांनी रक्तदान करुन या उपक्रमाला मोठी साथ दिली. यावर्षी ४०१० रक्तबाटल्यांचे संकल्प असून याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चला माणूसकीवर प्रेम करुया.... रक्तदानातून जीवदान देवूया. या टॅगलाईनखाली राहूल घाटगे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यात रक्तदान शिबिरचा संकल्प रुजविला आणि बघता बघता या शिबिराल...

हेरवाड : दर्ग्याकडे जाणारा मार्ग पूर्ववत करा ः ग्रामस्थांची मागणी

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड येथील जागृत देवस्थान असणार्‍या हजरत शमनामिराबाबा वली यांचा ऊरुस काही दिवसावर येवून ठेपला आहे, मात्र, या दर्ग्याकडे जाणारा रस्ता संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर मुरमाचे ढिग टाकल्याने दर्ग्याकडे जाणार्‍या भाविकांना याचा त्रास होणार असल्याने सदर दर्ग्याकडे जाणारा रस्त्यावर डांबरीकरण किंवा खडीकरण करावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांतून होत आहे. सध्या सलगरे ते हेरवाड रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असताना संंबंधित ठेकेदाराकडून येथील तेरवाड रोडलगत असलेल्या हजरत शमनामिरा बाबांच्या दर्ग्याकडे जाणार्‍या रस्त्यावर मुरमाचा ढिग टाकला आहे, गेल्या अनेक दिवसापासून तो ढिग तसाच असल्याने या दर्ग्याकडे जाणार्‍या भाविकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या दर्ग्याचा उरुस काही दिवसावर येवून ठेपला आहे, मात्र, दर्ग्याकडे जाणार्‍यासाठी रस्ता नसल्याने भाविकांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी तातडीने डांबरीकरण किंवा मुरमीकरण करुन हा रस्ता करुन द्यावा, अशी मागणी हेरवाड मधील ग्रामस्थांतून होत आहे. 

घोडावत विद्यापीठातील 402 विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  2022-23 या शैक्षणिक वर्षात स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व लिबरल आर्ट्स या विभागातील अंतिम वर्षाच्या 402 विद्यार्थ्यांची निवड देशभरातील विविध नामवंत कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी झाली. या इंटर्नशिपचा उद्देश औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या आवश्यकतेनुसार इंडस्ट्री रेडी ग्रॅज्युएट्स व बिझनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे व औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अभ्यासक्रम तयार करणे हा आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) मुंबई, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) बंगलुरु, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)दिल्ली व नाशिक, टाटा सोलर पॉवर मुंबई, टाटा बोईंग एरोस्पेस लि. हैदराबाद, टाटा मोटर्स कार प्लांट पुणे, गरुडा एरोस्पेस प्रा.लि.चेन्नई, स्टार एअर बंगलुरु, एअरटेल एक्स लॅब, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि.कोल्हापूर, इमरटेक इनोवेशन्स मुंबई, रॉस इक्विपमेंट प्रा. लि. पुणे, विलो माथेर अँड प्लांट पुणे, मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लि. पुणे, नांदेड सिटी कन्स्ट्रक्शन अँड कंपनी प्रा.लि. पुणे,टीव्ही 9 मराठी मुंबई,एब...

क्रांतिकारक हेरवाड गावाला सर्वतोपरी सहकार्य ः निलमताई गोर्‍हे

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : विधवा प्रथा बंद करुन हेरवाड गावाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे, त्यामुळे या क्रांतिकारी गावाला नेहमीच सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन विधासभा उपसभापती निलमताई गोर्‍हे यांनी केले. हेरवाड येथील नुतन सरपंच रेखा जाधव व सर्व सदस्यांनी निलमताई गोर्‍हे यांनी जाहिर केलेले 11 लाख रुपये निधी हेरवाड गावाला दिल्याबद्दल पुणे येथे त्यांची भेट घेवून आभार मानले, यावेळी निलमताई गोर्‍हे बोलत होत्या. यावेळी निलमताई गोरे पुढे म्हणाल्या, हेरवाड गावाने विधवा प्रथा बंदीचा कायदा करुन विधवा महिलांना सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे यापुढेही हेरवाड गांवच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करुन गांवचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी सरपंच रेखा जाधव, ग्रामपंचायत सदस्य विद्या माने, विजयमाला पाटील, भरत पवार, अखतर मकानदार, शितल कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान विधवा प्रथा बंदीनंतर अनेक नेत्यांनी गावासाठी निधी जाहिर केला होता, त्याचा पाठपुरावा करुन हा निधी खेचून आणणार असल्याचे सांगितले.