श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेजमध्ये 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रशालेचे ज्येष्ठ सेवक श्री अशोक नाटकुळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संदीप जाधव संचालिका सौ.सुंदरा जोशी मॅडम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एम एस रावळ मॅडम व मुख्याध्यापक श्री डी वाय नारायणकर सर यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.एम. एस. रावाळ मॅडम यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या थोर विभूतींच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख विद्यार्थ्यांना सांगून आपण आपले कर्तृत्वाचे वेरूळ घडवावे तसेच कामगार हा देशाचा विकास करणारा एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्याशी सदैव आत्मीयतेने वर्तन करावे. राष्ट्राबद्दल व देशाबद्दलच्या विकासासाठी सतत जागृत रहावे. विद्यार्थी जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. समस्यांचा वेध घेता आला पाहिजे. प्रगती करण्याचा ध्यास घ्या. विज्ञाननिष्ठ बना व ...