शुक्रवारी सायंकाळपर्यंत वारणा नदीपात्रात पाणी पोहचेल : आमदार यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : बत्तीस शिराळा तालुक्यातील मांगले येथील बंधाऱ्याचे तीन बर्गे वाहून गेल्याने पाटबंधारे विभागाने या ठिकाणी बरगे बसविण्याचे काम हाती घेतले होते, त्यामुळे याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील वारणा काठच्या दानोळी, कोथळी आणि इतर गावांवर झाला असून, तेथील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करून बर्गे पुन्हा बसवले आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचेल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. मांगले येथील वारणा नदीवरील बंधाऱ्याचे तीन बर्गे वाहून गेले होते. पाटबंधारे विभागाने तातडीने बर्गे बसवण्याचे काम किती घेतले होते त्यामुळे शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी कमी झाली होती. सध्या बर्गे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे तसेच धरण क्षेत्रातून १,५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोथळी आणि दानोळी परिसरातील वारणा नदीपात्रात पाणी पोहोचणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. मागील काही दिवसां...