कुरुंदवाड श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोवर्धन माने, उपाध्यक्षपदी सुरेश कांबळे
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक जनप्रवासचे गोवर्धन माने, कार्याध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे रविंद्र केसरकर,उपाध्यक्षपदी दैनिक नवराष्ट्रचे सुरेश कांबळे,सचिवपदी दैनिक अप्रतिमचे दिगंबर कदम तर खजिनदारपदी दैनिक राष्ट्रगीतचे उत्तम भोई यांची एकमताने निवड झाली. कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे होते. अध्यक्षपदासाठी माने यांचे नाव, उपाध्यक्ष पदासाठी कांबळे यांचे नाव तर सचिव पदासाठी कदम यांचे नाव मान्यवर पत्रकारांनी सुचवले सर्वानुमते अनुमोदन देत बिनविरोध निवडी घोषित करण्यात आल्या. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष माने म्हणाले पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून तिच्या माध्यमातून लोकांच्या समस्या मांडणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे हेच माझे ध्येय असेल. संघटनेच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आम्ही पत्रकारांच्या हितासाठी ठोस पावले उचलू. संघटनात्मक ...