यड्राव बॅकेकडून शेतकरी, युवा उद्योजकांना आर्थिक पाठबळ : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
यड्राव बँकेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : सहकारमहर्षी स्व. शामरावआण्णा पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनातून स्थापन झालेल्या यड्राव बँकेने गेल्या आर्थिक वर्षात व्यवसायवृद्धी, शाखा विस्तार आणि डिजिटल बँकिंग सेवेत लक्षणीय प्रगती साधली आहे. शेतकरी, युवा उद्योजक आणि व्यावसायिकांना बँकेच्या विविध कर्ज योजनांद्वारे भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात सातत्य राखले, असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. ते जयसिंगपूर येथील द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात आयोजित यड्राव बँकेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेच्या प्रारंभी स्व. शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. बँकेचे व्हा. चेअरमन दिलीप मगदूम यांनी स्वागत केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. बँकेचे चेअरमन अजय पाटील-यड्रावकर यांनी प्रगतीचा आढावा घेताना लवकरच शाखा विस्ताराद्वारे अधिकाधिक नागरिकांना सेवा पुरवली जाणार असल्याचे सांगितले. ठेवीदारांना चांगला व्याज परतावा व कर्जदारां...