योग्य संस्कार हेच समाजनिर्मितीचे भांडवल : नितिन बानुगडे पाटील
हेरवाड येथे नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड (ता. शिरोळ) येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी ग्रामस्थ आणि युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, त्यागमूल्यांचे व आदर्श कार्याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी वाणीमधून इतिहासातील प्रेरणादायी विचार, समाजघडविण्याचे संदेश व पालकांनी आपल्या पाल्यांना कसे घडवावे याची उदाहरणे देत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे तरुण पिढीला शिवचरित्रातून जीवनमूल्ये स्वीकारून सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या वकृत्वशैलीमुळे हे व्याख्यान गावाच्या सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करणारे व युवकांना योग्य दिशा देणारे ठरले. या व्याख्यानासाठी रविवारी रात्री मोठ्या संख्येने ग्रामस्थ, मान्यवर व तरुण उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत समाजनिर्मितीचे धडे पटवून दिले. त...