पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील पोलिस महासंचालक व विशेष सेवा पदकाने सन्मानित
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी गडचिरोली येथे बजावलेल्या कर्तव्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक तसेच विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. गडचिरोली येथे नक्षली भागात पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी विविध उपक्रम राबवून उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच नक्षलवादी कारवाईत एक नक्षलीला पकडण्यात त्यांना यश आले होते. याचबरोबर नक्षली भागात जनजागृती करून आपले कर्तव्य निष्ठेने निभावल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक व विशेष सेवा पदक जाहीर झाले होते. आज कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.