संजय शिंदे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार
मुंबई : मुंबई येथे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची भेट घेऊन त्यांची भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस RPI आठवले गटाचे तालुका सचिव संजय शिंदे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुरुंदवाड येथील विविध सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी कुरुंदवाड येथील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कुरुंदवाड येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पूर्णाकृती पुतळा सुशोभीकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन याबद्दल लवकरच माजी मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना व कुरुंदवाड नगरीचे मुख्याधिकारी चौहान यांना सूचना करून लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबतची ग्वाही रामदासजी आठवले यांनी केली. तसेच शिरोळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष पदाची संजय शिंदे यांच्या नावाचे घोषणा लवकरच करण्यात येईल, याची ग्वाही देखील केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी दिली. यावेळी आरपीआय आठवले गटाचे तालुका सचिव संजय शिंदे, कुरुंदवाड येथील आंबेडकरी चळवळीचे नेते धम्मपा...