भारतातील टॉप १०० इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शरद इन्स्टिट्युटचा समावेश
यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा सिलिकॉन इंडिया या देशपातलीवरील अग्रेसर नियतकालिकेकडून टॉप १०० इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंडिया मध्ये समावेश झाला आहे. अल्पावधीत स्वायतता, एनबीए, नॅक या मानांकनासह ‘शरद पॅटर्न’चे प्रभावी अंबलबजावणी, अद्यावत बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी शाखा, अद्यावत टिचिंग-लर्निंग शिक्षण प्रणाली, विद्यार्थ्यांना अंतिम वर्षी प्रत्यक्ष कंपनीत इंटर्नशीप, कॅम्पस मधून विद्यार्थ्यांची निवड, प्रोजेक्ट बेसड लर्निंग, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, इनोव्हेशन अॅण्ड लर्निंग सेंटर्स, युजी फेलोशिप, देशातील अत्यंत बारकाईने राबवित असलेली मेंटॉर सिस्टिम अशा अनेक बाबींचे परिक्षण करुन हि यादी बनविण्यात आली आहे. सिलिन इंडिया हे नियतकालिक हे अभियांत्रिकी महाविद्यालयांची संपूर्ण व्याप्ती समजून घेऊन, ‘भारतातील टॉप १०० अभियांत्रिकी महाविद्यालये - २०२४’ ची तपशीलवार यादी तयार केली आहे. भारतातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील अग्रदूतांची ही यादी सिलिकॉनइंडिया संपादकीय मंडळ, अभियांत्रिकी तज्ञ, एचआर व्यवस्थापक, अलीकडील ...