पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जयसिंगपूर शरद कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे वाटप

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनात तहसील कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी वितरित करण्यात आले. या आयडीचे वाटप आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या ओळखपत्राच्या वितरणामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकणार आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना अधिकृत ओळख प्राप्त होऊन अनुदान, कर्जसुविधा आणि कृषी योजनेतील लाभ सहज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रसंगी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच त्याचा उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शरद कृषी प्रदर्शनात विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये हवामान आधारित शेती, तंत्रज्ञान वापरून उत्पादनवाढ, बियाणे आणि खतांच्या सुधारित जाती यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमा...

२ फेबुवारीपासून जयसिंगपूरात आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांचा प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव

इमेज
  आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवानिमित्त प.पू. अध्यात्म शिरोमणी आचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने प.पू.आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज, प. पू.१०८ चंद्रप्रभसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ उत्तमसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ कुंथूसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ विशालसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ धवलसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ विदेहसागरजी महाराज,    प. पू. मुनीश्री १०८ उत्कृष्टसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील इंद्रध्वज सभागृह येथे प.पू. मुनिश्री १०८ विशालसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी त्यांनी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. या स्मृती महोत्सवा निमित्त येथील...

गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

इमेज
   दिल्ली येथे सिया या संस्थेकडून सामाजिक कार्याबदल गौरव गुरुदत्त शुगर्स च्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबदल सिया या संस्थेचा आंतरराष्ट्रीय शुगर - इथेनॉल - बायोएनर्जी पुरस्कार बॉलीवुड अभिनेत्री हिना खान यांच्या हस्ते चेअरमन माधवराव घाटगे यांना प्रदान करण्यात आला . यावेळी शेजारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे जपसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  श्री गुरुदत्त शुगर्स लि; टाकळीवाडी चे चेअरमन माधवराव घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्याबदल दिल्ली येथील सिया या संस्थेकडून श्री. घाटगे यांना शुगर- इथेनॉल - बायोएनर्जी या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. बॉलिवुड अभिनेत्री हिना खान यांच्या हस्ते चेअरमन माधवराव घाटगे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात सकाळच्या सत्रामध्ये केद्रीय रस्ते वहातुक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी साखर उद्योग संदर्भात मार्गदर्शन केले. श्री. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमते सोबतच सामाजिक कार्यातून परिसराचा कायापालट केला आहे. कारखान्या माध...

शरद कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
   जयसिंगपूर येथे ८ व्या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी, शेतीतील नवनविन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी होईल, या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन प्रामुख्याने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्याबरोबर सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी त्या दृष्टीने विविध स्टॉलही उभारण्यात आले आहेत, त्यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.  सहकाररत्न स्व. शामरावआण्णा पाटील (यड्रावकर) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमदार मा. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य ८ वे शरद राज्यस्त कृषी व पशु पक्षी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते. प्रारंभी सहकाररत्न स्व. शामरावआण्णा पाटील (यड्रावकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाट...

लाटवाडी येथील श्री महालक्ष्मी विशाळी यात्रा उत्साहात संपन्न

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या लाटवाडी ची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीची यात्रा सालाबाद प्रमाणे उत्साहात संपन्न झाली. शिरोळ तालुक्यातील लाटवाडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी विशाळी यात्रेला बुधवार दिनांक 29 जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली, सकाळी ठीक सात वाजता श्री महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक व लक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सौ सुनीता सदाशिव खोत उपसरपंच व सौ भाग्यश्री मल्लू खोत व मान्यवरांचे हस्ते या देवीच्या ओटी भरणे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी दहा नंतर संजय कोळी व सर्व पंचगंगा फडकरी मंडळ लाटवाडी यांच्या वतीने महाप्रसाद गावकऱ्यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते. तर लाटवाडी व परिसरातील शेतकरी व शर्यतीसौकीन यांच्यासाठी भव्य आणि दिव्य जनरल बैलगाडी शर्यती, जनरल ब गट, आदत दुस्सा , चौसा जनरल अशा विविध प्रकारच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते  संध्याकाळी दुपारी चार वाजता भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांचा उपस्थितीत जंगी कुस्तीचा बहा...

हेरवाडमध्ये वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी बॅरिकेड्स बसवा : शिवसेनेची मागणी

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : गावातील महामार्गावर सतत वाढत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी शिवसेना शाखा हेरवाडच्या वतीने ग्रामपंचायतीकडे बॅरिकेड्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शाखाप्रमुख विशाल जाधव यांनी सरपंच रेखा जाधव व ग्रामसेवक यांना लेखी निवेदन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाचवा मैल ते सलगरे हा राज्य महामार्ग मोठा करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून, वाहनचालक बेफाम गतीने वाहने चालवत आहेत. परिणामी, गावात अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः या महामार्गालगत जिल्हा परिषदेचे कन्या विद्या मंदिर असल्याने विद्यार्थिनींना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. रस्ता ओलांडताना त्यांना भीती वाटते, तसेच शाळेच्या परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी होते. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गावातील तीन ठिकाणी बॅरिकेड्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही शिवसेनेने याबाबत ग्रामपंचायतीकडे सूचना दिल्या होत्या. गावाच्या सुरक्षित...

बस्तवडे येथील कबड्डी स्पर्धेमध्ये हेरल्याच्या शाहू सम्राट मंडळाचा चौथा क्रमांक

इमेज
  संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :  बस्तवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे झालेल्या 50 किलो वजनी गट गटातील कबड्डी स्पर्धेमध्ये हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील शाहू सम्राट मंडळांनी चौथा क्रमांक पटकावला या मंडळाला यश प्राप्त झाल्यामुळे संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने मंडळाच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.  

हासिद्धनाथ यात्रेनिमित्त महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : येथील श्री हासिद्धनाथ यात्रेनिमित्त महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी श्री हासिद्धनाथाचे दर्शन घेतले आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेच्या निमित्ताने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी श्री हासिद्धनाथाच्या चरणी नतमस्तक होत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या. महाप्रसाद कार्यक्रमानंतर आमदार यड्रावकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. या कार्यक्रमाला दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, दीपक बंडगर, रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंद्रायणी यादव यांना ‘सामाजिक महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर

इमेज
  जांभळी / शिवार न्यूज नेटवर्क :  सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पैलवान सुभाषदादा पाटील युथ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंद्रायणी नेताजी यादव यांना ‘सामाजिक महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक कार्य, उद्योजकता, कृषी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जातो. यंदा महाराष्ट्रभरातून अर्ज मागविण्यात आले होते, त्यामध्ये यादव यांच्या उल्लेखनीय कार्याची विशेष नोंद घेण्यात आली. लवकरच एका भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, संस्थापक अध्यक्ष पैलवान सुभाषदादा पाटील यांनी त्यांच्या कार्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रश्नासाठी पुढाकार

इमेज
  साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  सीमाभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. डॉ. दिवाकर सर आणि प्रा. नामदेव मधाळे सर यांनी हुक्केरी येथे जाऊन विविध मान्यवरांची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त हुक्केरी येथे भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख राजरत्न आंबेडकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि समाजकल्याण मंत्री एच. सी. महादेवप्पा उपस्थित होते. या संधीचा फायदा घेत दिवाकर सर आणि मधाळे सर यांनी लाईटहाऊस फाउंडेशनचे प्रमुख पुंडलिक कांबळे आणि विकी कांबळे यांच्या सोबत मंत्र्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अवघड प्रक्रिया पार करावी लागते, परिणामी अनेक विद्यार्थी या सुविधेपासून वंचित राहतात. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मंत्र्यांना निवेदन सादर करून तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टाकवडे येथील कै. स्वातंत्र्यसैनिक बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालयाचा वतीने वाचन संकल्प अभियान संपन्न

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : टाकवडे येथील कै. स्वातंत्र्यसैनिक बळवंतराव कुलकर्णी सार्वजनिक ग्रंथालय मध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शि. रा. रंगनाथन व स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सौ. सविता चौगुले यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल सौ .दिपा कुलकर्णी यांनी केले. मनोगता मध्ये संस्थेच्या अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यानी शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या वाचन संकल्प अभियान चे महत्व विसर करून सततच्या पुस्तक वाचनाने मणूसाचा सर्वागींण विकास घडतो असे उदगार काढले. व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी शाळेय मुलानीं अभ्यास कसा करावा .व दाहावी नंतर पुढे काय यांचे अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सौ.सरिता स्वामी. सौ.सुजता पाटील. कृष्णात वडर. देवगोंडा चौगुले. संजय लोहार. अनिल हुपरीकर .शिवाजी कदम. आण्णासो वडर .संजय कागवाडे .अनिल पाटील . राजेंद्र दिंडे निळकंठ पाटील . जमाल फकीर. यांचा सह वाचक, विद्यार्थी, विद्यार्थीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेरवाड-सलगर रस्त्यावर मोठा खड्डा; अपघातांचा धोका वाढला

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड-सलगर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही किरकोळ अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हेरवाड येथील गायकवाड गल्लीजवळील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत असून, अनेक जण जखमी झाले आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर काहीच दिवसांत येथे मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना येथे धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा वाहन चालक हा खड्डा चुकवताना अपघातग्रस्त झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी अद्यापही हा खड्डा बुजवण्याची कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने हा खड्डा बुजवावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

नवे दानवाड येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच चिदानंद कांबळे यांचे निधन

इमेज
  दानवाड :  नवे दानवाड गावचे प्रगतशील शेतकरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच चिदानंद बळवंत कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 29 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांनी गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात मुलगा, भाऊ, मुली, जावई, सून, नातवंडे, पुतणे आणि पुतन्या असा मोठा परिवार आहे. ते माजी सरपंच दिपक कांबळे यांचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे यांचे भाऊ होते. रक्षाविसर्जन दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता दानवाड येथे होणार आहे.

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी प्राधान्याने करा –जिल्हाधिकरी अमोल येडगे

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :      कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा, सुविधा तसेच शासकीय लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी अॅग्रीस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ईसेवा केंद्रावर सुरू असून ॲग्रीस्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्राधान्याने हाती घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी ऑनलाईन झालेल्या बैठकीत दिले. यावेळी तालुकास्तरावरील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकार तसेच कृषी अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी करवीर हरिष धार्मिक, करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे, सहायक निबंधक श्री. धायगुडे उपस्थित होते. केंद्र शा...

भक्तिचा सुगंध सर्वत्र पसरवत 58 व्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता

इमेज
  पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :       ‘‘जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’’ असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनीे महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या तीन दिवसीय संत समागमाची रविवारी रात्री विधिवतपणे यशस्वीरित्या सांगता झाली. या संत समागमामध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो लोकांनी भाग घेतला.  सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या, मानवी जीवन एवढ्याचसाठी श्रेष्ठ मानले गेले आहे, की या जीवनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे. परमात्मा निरकार असून या परमसत्याला जाणणे हेच मनुष्य जन्माचे परम लक्ष्य होय.  शेवटी, सतगुरु माताजींनी संागितले, की जीवन एक वरदान असून ते परमात्म्याशी क्षणोक्षणी संलग्न राहून जगायला हवे. क्षणोक्षणी जीवन योग्य दिशेने व्यतीत केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळू शकते आणि आम्ही अनंताच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो.  तत्पूर्वी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सतगुरु माताजींनी आपल्या प्रवचनामध्ये...

श्री मंगराया सेवा सोसायटी तेरवाडमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इमेज
तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : श्री मंगराया सेवा सोसायटी तेरवाड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. ध्वजवंदनाचा मान यंदा 10वी बोर्ड परीक्षेत तेरवाडमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या कु. अमृता प्रशांत अंदरघिसके हिला देण्यात आला. तिच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाला पार्वती सुत गिरणीचे व्हा. चेअरमन शाबगोंडा पाटील, संस्थेचे चेअरमन दत्तगोंडा पाटील, व्हा. चेअरमन रमजान जमादार, संचालक अरुण गायकवाड, सिद्धराम मठपती, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू मगदूम, सचिन गायकवाड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज कांबळे व सदस्य प्रशांत गायकवाड, प्रदीप कांबळे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज पाटील यांनी केले तर स्वागत अमोल खोत सर यांनी केले. संस्थेचे सचिव श्रीशैल्य मठपती यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या मोठ्या सहभागाने आणि उत्साहाने पार पडला.

माजी विध्यार्थी रोहिणी व राणी यांनी केले शाळेत वह्या वाटप

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : बोरगाव येथे 76 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वतंत्र सैनिक कै गुंडू सातपुते यांच्या नाती व प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब सातपुते यांच्या मुली, मराठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी रोहिणी सातपुते ( लायकर) व राणी सातपुते (खोत ) यांनी शाळा विषयी असलेले प्रेम व कृतज्ञता म्हणून तीनशेहून आधिक शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटून बोरगाव पी एम श्री सरकारी मराठी शाळेवर असलेले प्रेम त्यांनी दिलेल्या देणगीतून व्यक्त केले.      बोरगांव येथे पी एम श्री सरकारी प्राथमिक मराठी शाळेत सालाबाद प्रमाणे प्रजासत्ताक दिन मोठ्या उस्थाहात साजरा करण्यात आला. यावर्षी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमातून एक वेगळा संदेश समांजा समोर आला आहे .    कार्यक्रमाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. वही व पेन रोहिणी व राणी याच्या हस्ते विध्यर्त्याना यावेळी वितरण कऱण्यात आले.       रोहिणी व राणी यांचे याच प्राथमिक शाळेत शिक्षण झाले आहे. ,शाळेतील आठवणी ,शिक्षकांव...

रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी जयसिंगपूरतर्फे सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, टाकळी येथील गरीब आणि होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या. उद्योजक अविनाश मगदूम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या सहा सायकलींचे वाटप प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्लबचे अध्यक्ष राकेश पारेख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे सदस्य शिवराज पाटील, सुनील परिट, आशिष गायकवाड, इर्शाद शेख आणि आसिफ देसाई उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी विविध सामुदायिक सेवा प्रकल्पांमध्ये सक्रिय असून, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यावरणीय उपक्रमांवर त्यांचा भर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी हा सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, उद्योजक अविनाश मगदूम, शिवसेना तालुका संघटक संभाजी गोते, बबन काटकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्...

थोर स्वातंत्र्यसेनानी धोंडिबा बरगाले यांच्या निवासस्थानी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : थोर स्वातंत्र्यसेनानी धोंडिबा बरगाले यांच्या निवासस्थानी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण बी.एम. देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी ग्रामपंचायत सदस्य सीमा बरगाले, सदानंद आलासे, जमीर मुल्ला, युनुस जमादार, सदाशिव झुणके, कऱ्याप्पा बरगाले, स्वप्निल अपराज, अतवीर पाटील, विशाल बुडकर, सागर उगारे, राजू गोंधळी, अमोल कुंभार, महेश अकिवाटे, दत्ता अकिवाटे, मयूर कुंभार, मोहन बरगाले, श्रीवर्धन बरगाले, तुळशीदास माने आणि विठ्ठल पुजारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंगणवाडीच्या सेविका, लहान बालके, आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय भावना आणि देशभक्तीचे दर्शन घडवले. या प्रसंगी विविध सामाजिक आणि देशहित विषयांवर विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करताना उपस्थितांनी एकतेचा संदेश देत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

संविधानाच्या माध्यमातून जो जीवन जगत असतो तो देवाच्या अगदी जवळ असतो : पूज्य आचार्यश्री विशुद्धसागर महाराज

इमेज
  जयसिंगपूर येथे सर्वधर्मीय देशभक्तीपर प्रवचन संपन्न जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : भारतीय संविधानात प्रभू श्रीराम, भगवान महावीर यांच्या प्रतिमांचे तत्व आहे. त्यामुळे हे पवित्र संविधान आपण जपले पाहिजे. संविधानाशिवाय आपण जगू शकत नाही. संविधानाच्या माध्यमातून जो जीवन जगत असतो तो देवाच्या अगदी जवळ असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान असे तयार केले आहे की, जे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. लाखो अपराधी वाचले तरी चालतील पण एकाही निरप्राधाला शिक्षा झाली नाही पाहिजे, हे जगातील कोणत्याही संविधानात लिहिले नाही, ते आपल्या संविधानात आहे. त्यामुळे भारताचे संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधानाच्या वाटेवर आपण चालणे गरजेचे आहे. असा उपदेश पूज्य आचार्यश्री विशुद्धसागर महाराज यांनी दिला. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वधर्मीय देशभक्तीपर मंगल प्रवचन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.  प्रारंभी स्वागत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांनी पूज्य आचार्य श्री विशुद्धसागर महाराज यांच्या कार्याचा...

जयसिंगपूरात राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाची तयारी अंतीम टप्यात

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  जयसिंगपूर येथे ३१ जानेवारी पासून सहकाररत्न स्व. शामरावआण्णा पाटील (यड्रावकर) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमदार मा. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व स्कायस्टार इव्हेंट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य ८ वे शरद राज्यस्त कृषी व पशु पक्षी प्रदर्शन होत आहे. या कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू असून प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील सिध्देश्वर मंदिरा नजीकच्या गल्ली नं.४, येथील भव्य अशा खुल्या जागेत ८ व्या शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन दि.३१ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करणेत आले आहे. प्रदर्शन सकाळी १०.०० वाजले पासून रात्री ९.०० वाजेपर्यत खुले राहणार आहे. दि.३१ जानेवारी रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनासाठी सर्वाना विनामुल्य प्रवेश राहील. या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी औजारे, बि-बियाणे, खते व जंतूनाशके, जलसिंचनाच्या पध्दती, ठिबकसिंचन, टिश्युकल्चर, कृषी व्यवस्थापक, शेती अर्थपुरवठा, बँकी...

शारदा वृद्धसेवाश्रम संकुलाला जीवन ज्योत ट्रस्ट मुंबई आणि साकार डेव्हलपर्सचा मदतीचा हात

इमेज
  साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित शारदा वृद्धसेवाश्रम संकुलासाठी जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष मा. हरखचंद सावला यांनी रुग्णवाहिका भेट दिली. तसेच साकार डेव्हलपर्स, मिरजचे आर्किटेक्ट इंजिनियर विवेक पाटील यांनी बोरपाडळे फाटा (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील नियोजित शारदा वृद्धसेवाश्रम इमारतीचे डिझाईन, वास्तुनिर्मिती, सल्ला आणि देखरेख मोफत करण्याची घोषणा केली. पर्यावरणप्रेमी शिक्षक मा. नामदेवराव चौगुले यांनी 100 वृक्षरोपांचे योगदान देऊन कार्यक्रमाला पर्यावरणपूरक रंग दिला. दीपगंगा भागीरथी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले. त्यांनी पुरस्कारार्थी आणि लोंढे परिवाराला शुभेच्छा दिल्या. समाजकल्याण पुणेचे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे यांनी शारदा वृद्धसेवाश्रमासाठी वैयक्तिक आणि शासकीय पातळीवर मदत करण्याची ग्वाही दिली. दीपगंगा संस्थेचे संस्थापक अध्यक्...

गुरुदत्त शुगर्स शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा- चेअरमन माधवराव घाटगे

इमेज
कारखान्यातर्फे वैद्यकिय कामी शेतकऱ्यांना धनादेश प्रदान गुरुदत्त शुगर्स च्या किसान कार्ड योजनेतून शेतकऱ्यांना वैद्यकीयकामी कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. शेजारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट राहुल घाटगे व सर्व संचालक मंडळ  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : श्री गुरुदत्त शुगर्स लि; टाकळीवाडी ने नेहमीच शेतकरी हिताचा कारभार केला आहे. त्यांच्या प्रत्येक सुख - दुःखात कारखाना त्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यामुळे कारखाना व शेतकरी यांच्यातील ऋणानुबंध आणखीन घट्ट झाले असून त्यांच्या पाठबळावर गुरूदत्त शुगर्स ने साखर उद्योगात गरुडभरारी घेतली असल्याचे मत श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कारखाने कार्यस्थळावरती कारखान्याच्या 'गुरुदत्त किसान कार्ड ' योजने अंतर्गत विविध शेतकऱ्यांना वैदयकिय कामी २ लाख रुपयांचे धनादेश वाटप कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते . पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले, कारखान्याने ' किसान कार्ड 'योजनेतून शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना विविध आजारपण व श...

माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दिली देणगी ; ऑफिससाठी खुर्च्या केल्या प्रदान

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :  हृदयस्पर्शी हावभावात श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील 1988 सालातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा गट त्यांच्या शाळेप्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी गेट टुगेदर च्या माध्यमातून एकत्र आला होता . यावेळी त्यांनी शाळेला लाकडी खुर्च्यांचा संच भेट देण्याचे आश्वासन दिले होते . त्यांच्या काळात त्यांना शाळेकडून मिळालेल्या शिक्षण आणि मूल्यांबद्दल ऋण व्यक्त करावयाचे होते . "यावेळी बोलताना माजी विद्यार्थी आर एम पाटील म्हणाले. "ही देणगी म्हणजे आमच्याकडून शाळेच्या आदराचे प्रतीक आहे आणि आम्हाला आशा आहे की त्याचा सध्याच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल." देणगी मिळाल्याने शाळा प्रशासन आणि कर्मचारी कृतज्ञतेने भारावून गेले. "आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेचा भौतिक विकास अल्पावधीतच झाला आहे ," असे शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले. "त्यांच्या योगदानाचा आमच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल आणि आम्हाला असे समर्पित आणि काळजी घेणारे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो." हा हावभाव शा...

कडाडणारी हलगी अबोल झाली ; हलगीपट्टू सुनिल गायकवाड यांचे निधन

इमेज
  संतोष तारळे / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड गावाच्या सांस्कृतिक इतिहासाला हलगीच्या ठेक्याने जागतिक ओळख देणारे प्रसिद्ध हलगी वादक सुनील गायकवाड यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीय नव्हे, तर संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. कोणत्याही गावातील उत्सवाला, मंगलकार्यासाठी त्यांच्या हलगीचा आवाज हवाच असे. त्यांचा ठेका वाजला की उपस्थित मंडळीही उत्साहाने थरारून जात. त्यांच्या वादनामुळे प्रत्येक कार्यक्रमाचा जीव ओतला जात असे. हलगीचा हा कडाडता आवाज आज शांत झाला असला, तरी त्यांचा ठेका गावकऱ्यांच्या हृदयात कायम वाजत राहील. सुनील गायकवाड यांनी आपल्या आयुष्यभर हलगी वादनाच्या माध्यमातून गावाची ओळख दुरवर पोहोचवली. त्यांच्या हातून कडाडणारी हलगी फक्त एक वाद्य नव्हे, तर गावकऱ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज होता. विशेष म्हणजे, त्यांनी पैशाचा लोभ कधीही बाळगला नाही. कार्यक्रमात जे मिळेल, त्या समाधानात ते कायम आनंदी राहिले. अशा मितभाषी, प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्वाची एक्झिट गावासाठी मनाला चटका लावणारी ठरली आहे. हलगी वादन हे गायकवाड कुटुंबाचे पिढीजात काम. सुनील गायक...

हेरवाड येथील जायदा गलगले यांचे निधन

इमेज
हेरवाड :        श्रीमती जायदा दस्तगीर गलगले(वय.60)यांचे आकस्मित निधन झाले.त्या मुस्लिम कमिटीचे उपाध्यक्ष अस्लम गलगले यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते.त्यांच्या पश्चात 1मुलगा,1 मुलगी,सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे. जीयारत विधी सोमवारी सकाळी दहा वाजता आहे.  

जयसिंगपूर येथे घरफोडी; ३ लाखाचा ऐवज लंपास

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :   येथील गल्ली क्रमांक 18 विजयमाला नगर लक्ष्मी पार्क मधील अजित राजू माळी वय 25 यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने तीन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.     याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, अजित माळी हे गुरुवार 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर 24 जानेवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यानच्या मुदतीत अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील 25 ग्रॅम वजनाचे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण, 10 ग्रॅम वजनाचे सात हजार रुपयेचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमचे 30 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप, 10 हजार 500 रुपयांचे देवाचे चांदीचे मुकुट, 14 हजार किमतीचे दोन चांदीचे पैंजण, 10 हजार 500 रुपयाची चांदीची महादेवाची पिंड, साडेतीन हजार रुपयाची चांदीचे पानसुपारी, आणि रोख रक्कम 10 हजार असा एकूण 2 लाख 88 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबा...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना राष्ट्रपती पदक

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (शनिवार) विशिष्ट सेवेसाठी पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह महाराष्ट्रातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची प्रदीर्घ सेवा, उत्कृष्ट कामगिरी आणि लोकहितासाठी केलेले कार्य यांची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणखी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी या यादीत समाविष्ट आहेत. हा पुरस्कार पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्कृष्ठ कामगिरीचा सन्मान करत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो. समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेमुळे या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सुनील फुलारी यांना मिळालेल्या या पदकामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. स्थानिक नागरिक, सहकारी अधिकारी आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. पोलीस दलातील...

राजारामबापू पाटील कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास मार्गदर्शन करणार : गणपतराव पाटील

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      शेती क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज आहे. यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन सुसूत्रता ठेवून काम केले पाहिजे. श्री दत्त कारखान्याने क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. राजारामबापू पाटील कारखान्यानेही त्यांच्या कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवल्यास, सर्व ती मदत व मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.       राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. राजारामनगर, इस्लामपूरचे चेअरमन प्रतिक पाटील यांच्यासह सर्व संचालक व कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांनी आज श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा पाहणी दौरा केला. यामध्ये त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजना, माती परीक्षण विभाग आणि शेडशाळ येथील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी गणपतराव पाटील बोलत होते.     प्रारंभी श्री दत्त कारखाना कार्यस्थळी गणपतराव पाटी...

माणगाव बुलेट व कवठेपिरान पंखा या बैलजोडीने मारले हेरवाडचे मैदान

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड येथे हजरत ख्वाजा शमनामिरा दर्ग्याच्या उरसानिमित्त आयोजित चित्तथरारक शर्यतीत माणगाव बुलेट व कवठेपिरान पंखा या बैल जोडीचे गाडीवान सचिन खोत यांनी पहिला क्रमांक पटकावून मैदान गाजवले. या शर्यतीत शर्यतीप्रेमींची मोठी गर्दी, हलगीच्या कडकडाटात एकापेक्षा एक जातिवंत बैल, घोडे, आणि आत्मविश्वासाने भरलेले गाडीवान या मैदानात पाहायला मिळाले. हेरवाड - बोरगाव मार्गावरील मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. सचिन खोत यांच्या बैलजोडीने वाऱ्याच्या वेगाने धाव घेत पहिला क्रमांक पटकावला. करण अतिग्रे यांच्या बैलजोडीने दुसरा क्रमांक, रेंदाळ येथील राजीव मोरे यांच्या बैलजोडीने तिसरा तर मजरेवाडी येथील मनोज बंडगर यांच्या बैलजोडीने चौथा क्रमांक मिळवला. याशिवाय जनरल घोडा-बैलगाडी स्पर्धेतही मोठी रंगत पाहायला मिळाली. या स्पर्धेत आकडे येथील भूतोबा प्रसन्न यांच्या गाडीने पहिला क्रमांक, बोरगाव येथील वसवाडे यांच्या गाडीने दुसरा तर शिरोळ येथील अमर महात्मे यांच्या गाडीने तिसरा क्रमांक मिळवला. जनरल घोडागाडी स्पर्धेतही उत्कंठा शिगेला पोहोचली. सुरज अपराज यांच्या घोडागाडीने पहिला क्रमांक पटकावला...

सैन्यदलातील माजी जवानाने धैर्य आणि शौर्याची प्रेरणादायी कथा केली शेअर

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमात एका विशेष मुलाखतीत माजी सैनिक ऑननरी कॅप्टन अनिल पाटील यांनी त्यांचा देशसेवेचा उल्लेखनीय प्रवास आणि त्या मार्गात त्यांनी शिकलेले धडे विद्यार्थ्यांना शेअर केले. अनिल पाटील यांनी भारतीय सैन्यात 32 वर्षे घालवली आहेत, उल्लेखनीय मोहिमांमध्ये त्यांनी सलग अठरा तास काम करून रस्त्यावर पडलेला बर्फ हटवून रस्ता क्लिअर करण्याचे काम केले यासाठी त्यांना विशेष प्रशंसा पत्र प्रदान करण्यात आले होते. आपल्या अनुभवांबद्दल बोलताना, अनिल पाटील म्हणाले, "लष्करातील माझ्या वेळेने मला शिस्त, कठोर परिश्रम आणि सांघिक कार्याचे महत्त्व शिकवले. देशाची सेवा करणे हा एक सन्मान होता आणि आम्ही संरक्षणासाठी केलेल्या बलिदानाचा मला अभिमान आहे. आपला देश. त्यांच्या सेवेदरम्यान त्यांना आलेल्या आव्हानांबद्दल विचारले असता, अनिल पाटील म्हणाले, "सर्वात मोठे आव्हान कुटुंब आणि मित्रांपासून लांब राहणे हे होते. तथापि, सहकारी सैनिकांमधील सौहार्द निर्माण झाला. आम्ही एका कुटुंबासारखे झालो, एकमेकांना आधार द...

महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षा 2024 निकाल जाहीर

इमेज
  हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षा (इलिमेंटरी आणि इंटरमिजिएट) 2024 चा निकाल 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे रमजान शेठ बाणदार विद्यालय, शिरढोण याचा निकाल 100% लागला असून, विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. इलिमेंटरी परीक्षेत विद्यालयातील 49 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 2 विद्यार्थ्यांनी A ग्रेड, 8 विद्यार्थ्यांनी B ग्रेड आणि 39 विद्यार्थ्यांनी C ग्रेड मिळवली. A ग्रेड प्राप्त विद्यार्थी: 1. कुमारी मनस्वी संदीप सैसाले व 2. कुमारी सेजल बाळासो तेरदाळे तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 39 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 8 विद्यार्थ्यांनी B ग्रेड तर 31 विद्यार्थ्यांनी C ग्रेड मिळवली. या यशासाठी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक कलाशिक्षक श्री. डी. आर. पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. एस. पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्...

जिल्ह्यात 6 फेब्रुवारीपर्यंत बंदी आदेश लागू

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :      जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 24 वा. पर्यंत बंदी आदेश जारी केला आहे.      हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा ज...

शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत: आमदार यड्रावकर

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना शेवटच्या शेतकरी घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, योजनांची परिपूर्ण माहिती त्यांना मिळावी त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्वतंत्र स्टॉल उभे करावेत व त्या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. जयसिंगपूर येथे या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. आमदार यड्रावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. प्रदर्शनाद्वारे शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रदर्शनामध्ये कृषी विभागाचे दालन व प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले...

जयसिंगपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पूज्य आचार्यश्री विशुध्दसागरजी महाराज यांचे सर्वधर्मिय देशभक्तिपर मंगल प्रवचन

इमेज
  आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.35 वाजता विक्रमसिंह क्रीडांगण, जयसिंगपूर येथे अध्यात्मयोगी पूज्य आचार्यश्री विशुध्दसागरजी महाराज यांचे सर्वधर्मीय देशभक्तिपर मंगल प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी पूज्य आचार्यश्रींच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे. या सर्वधर्मीय देशभक्ती प्रवचनाला प.पू. 108 आचार्य श्री चंद्रप्रभसागरजी महाराज, प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे मंगल सानिध्य लाभणार आहे. नुकत्याच नांदणी येथे पार पडलेल्या भव्य पंचकल्याण पूजामहोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळ्यास आपल्या मंगल सान्निध्याने आणि मार्गदर्शनाने गौरव प्राप्त करून देणारे पूज्य आचार्यश्री भारतातील श्रेष्ठ दिगंबर जैन मुनि आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 550 हून अधिक मुनी अध्यात्माच्या वाटेवर अग्रणी आहेत. आचार्यश्रींचे साहित्यिक योगदानही उल्लेखनीय असून, त्यांन...

श्री गुरुदत्त शुगर्स ला तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

इमेज
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे कारखान्याचा सन्मान  वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांनी स्विकारला. जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतिने गळीत हंगाम सन २०२३ - २४ मध्ये दक्षिण विभागामध्ये श्री गुरुदत्त शुगर्स लि; टाकळीवाडी ने तांत्रिक विभागामध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण कार्याबदल द्वितीय पारितोषक पटकावत तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हीएसआय च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देशाचे माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार , राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व व्हीएसआय चे उपअध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे व त्यांच्या टीमने हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी साखर कारखान्यामध्ये नव - नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत तांत्रिक कार्यक्षमेवर भर देत साखर उद्योगात 'गुरुदत्त शुगर्...

सहकारभूषण एस.के. पाटील कॉलेज, कुरुंदवाड येथे इयत्ता बारावीचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथे इयत्ता बारावीचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे दानवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. गुणात्मकतेसोबतच संस्कार व बौद्धिक ज्ञानालाही महत्त्व दिले पाहिजे. महाविद्यालयाने दिलेली ज्ञानशिदोरी जीवनात यश प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणा." कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पाटील ए.के. यांनी केले. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉफी मुक्ततेची शपथ देण्यात आली, ज्याचे वाचन शेख एस.आय. यांनी केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थिनी तातियाना माने यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवांचे मार्गदर्शन केले. प्रथम वृक्षाला जलअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा आणि मराठी भाषा संवर्धन परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. आर.एस. कदम, प्र...

कथाकथन स्पर्धेत कु.शर्वरी राजगोंडा पाटील प्रथम

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :        कुरुंदवाड येथील शतकोत्तरी वर्षाच्या नगरवाचनालय कुरुंदवाडच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेततील कथाकथन स्पर्धेत येथील कुमार विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कु. शर्वरी राजगोंडा पाटील हिने प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले. कुरुंदवाड शहरातील बालगट, कुमार गट, विद्यालय आणि महाविद्यालय अशा विविध गटातून विविध विषयाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कुमार विद्यामंदिर नंबर तीनच्या इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी कुमारी शर्वरी राजगोंडा पाटील हिने कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले.         कुरुंदवाड येथील नगर वाचनालयाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक आणि विद्यालयीन गटातून वक्तृत्व, निबंध आणि कथाकथन अशा विषयातून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माध्यमिक गट इयत्ता आठवी ते दहावी मध्ये कु. ईश्वरी दत्तात्रय चौगुले न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स प्रथम क्रमांक, स्नेहल सचिन कांबळे सीताबाई पटवर्धन हायस्कूल ही द्वितीय क्रमांक, रिया खंडू कोठावळे पटवर्धन हायस्कूल तृतीय क्रमांक तर पाचवी ते सातवीच्या ग...