पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घोडावत विद्यापीठाच्या 'कलानुभव' प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : डिझाईन क्षेत्रात शिक्षण घेताना व करिअर करताना विद्यार्थ्यांना सामाजिक जाण असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल घाडगे यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाईन च्या वतीने आयोजित कलानुभव 2025 प्रदर्शनाचे उद्घाटन शाहू स्मारक, कोल्हापूर येथे २६ एप्रिल रोजी येडगे यांच्या हस्ते झाले.     याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, की विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेली कामे केवळ कलात्मक नाहीत तर सामाजिक जाण, नावीन्यपूर्ण विचार आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोगी केल्याचे दिसून येते. यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले श्रम आणि सर्जनशीलता कौतुकास्पद आहे.  या प्रदर्शनात इंटेरियर डिझाईन, ग्राफिक डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन आणि फॅशन डिझाईन शाखेतील विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट प्रदर्शनात मांडण्यात आले.   घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. उद्धव भोसले यांनी कलानुभव प्रदर्शनासाठी कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि संचालक डॉ.विवेक कुलकर्णी, समन्वयक स्वप्नाली कुलकर्णी यांचे कौतुक केले. कलानुभव हे फक्त एक प्रदर्शन नसून विद्यार्थ्यां...

कुरुंदवाडच्या साखळी उपोषणस्थळी आम. डॉ पाटील-यड्रावकर यांची भेट

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :          कुरुंदवाड शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पुढील दोन महिन्यांत प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगीतले.           कृती समितीचे नेते राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे, जितेंद्र साळुंखे म्हणाले 2014 मध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी सहा कोटी रुपये निधी मिळाला होता. मात्र योजना अपूर्ण राहिल्याने तो निधी वापरात न आणता बँकेत ठेवण्यात आला, जो आता व्याजासह 11 कोटी 24 लाख 4 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय नागरिकांनी भरलेली पाणीपट्टी व लोकसहभागातून जमा झालेला सुमारे तीन कोटींचा निधीही पालिकेकडे उपलब्ध आहे. त्यामुळे एकूण 14 ते 15 कोटी रुपयांचा निधी तयार आहे.          या निधीचा उपयोग नव्य...

शिरोळ तालुक्यातील श्रेयांश पाटील याची आयआयएम बेंगळुरूसाठी निवड

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड येथील श्रेयांश अजित पाटील याने कॉमन ॲडमिशन टेस्ट (CAT) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवत आयआयएम बेंगळुरूमध्ये प्रवेश मिळवला आहे. शिरोळ तालुक्यातून आयआयएम बेंगळुरूमध्ये निवड होणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे.       श्रेयांशचे प्राथमिक शिक्षण संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, कुरुंदवाड येथे झाले. पुढे त्याने सैनिक स्कूल सातारा आणि नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून येथे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने आयआयटीसाठीही प्रयत्न केला.      त्याच्या यशामागे शैक्षणिक मेहनतीबरोबरच घरातील वैचारिक वातावरणाचा मोठा वाटा आहे. त्याचे आजोबा रावसाहेब (दा. आ.) पाटील हे कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आहेत, घरातील वाचनसंस्कृती, समाजभान आणि पर्यावरणाविषयीची जाण यामुळे त्याच्यात व्यापक दृष्टीकोन विकसित झाला. त्याने अनेक शाळांमध्ये पर्यावरण विषयक व्याख्याने दिली आहेत.      व्यवस्थापन क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने त्याने कॅट परीक्षा दिली. अपार मेहनत, चिकाटी, कुटु...

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :       येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या यशस्वी व उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना "विशेष पोलीस महासंचालक पदक" जाहीर झाले आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस हे गेल्या काही वर्षांपासून पोलिस दलात आपल्या कर्तव्यनिष्ठतेने आणि प्रामाणिक सेवेमुळे ओळखले जात आहेत. त्यांनी गुन्हेगारी घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवणे, सामाजिक सलोखा राखणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे या बाबतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.       कुरुंदवाड परिसरात शांतता व सुरक्षितता राखण्यात फडणीस यांची भूमिका मोलाची राहिली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे, अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करणे आणि तरुणांना गुन्हेगारी पासून दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे या क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठ्या कारवाया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.       या सर्व उल्लेखनीय सेवेमुळेच महाराष्ट्र राज्यातील पोलिस खात्याने त्यांच्या कार्...

चिंचवाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहणार - चेअरमन माधवराव घाटगे

इमेज
  चिंचवाड : वाघजाई यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या करण्यात आले. शेजारी संभाजी भिडे, पै. अमृत भोसले . जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्या कडून जास्तीत-जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली. चिंचवाड येथे वाघजाई यात्रेनिमित्य आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटणप्रंसगी श्री. घाटगे बोलत होते. यावेळी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिव प्रतिष्ठान चे प्रमुख संभाजी भिडे(गुरुजी) , पै. अमृतमामा भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी मैदानात ५० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीची आवड निर्माण होण्यासाठी व कुस्तीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्या उद्देशानेच चिंचवाडमध्ये वाघजाई यात्रेनिमित्य कुस्ती स्पर्धेचे आयो...

हरोली विकास सेवा संस्थेवर यड्रावकर गटाची सत्ता

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : हरोली येथील हरोली विविध विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील श्री राजर्षी शाहू संस्था बचाव बहुजन शेतकरी विकास पॅनलने दमदार विजय मिळवला. रविवारी (दि. २७) शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीत १३ जागांसाठी मतदान झाले, त्यात बहुजन शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर बाजी मारली, तर विरोधी गटाला केवळ ३ जागा मिळाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी पी. जे. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. याआधी संस्थेवर सत्ताधारी विकास पॅनलची सत्ता होती. मात्र, यंदा सभासद व शेतकरी बांधवांनी श्री राजर्षी शाहू संस्था बचाव बहुजन शेतकरी विकास पॅनलवर आपला विश्वास ठेवल्याने सत्तांतर घडले. निवडणूक निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष साजरा केला. नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नूतन संचालक तानाजी माने, संभाजी कदम, लक्ष्मण माने, नागेंद्र माने, बबन जाधव, मारुती माने, जगदीश जाधव, शहाजी माळी, साधना मा...

जिल्ह्यातील सहकार चळवळीला समृद्ध करण्यासाठी ‘सहकार दरबार’ मधून पाठबळ – पालकमंत्री, प्रकाश आबिटकर

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :      जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर यांनी केले. त्यांच्या संकल्पनेतून शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सहकार दरबारमध्ये सहकार अनुषंगिक एकुण 173 तक्रार अर्ज, यात ऑनलाईन 110 तर प्रत्यक्ष 63 तक्रार अर्ज दाखल झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ते बोलत होते. यावेळी विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, प्रादेशिक सहसंचालक सहकारी संस्था कोल्हापूर गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासह सर्व जिल्हा तसेच तालुका सहकार कार्यालयाचे अधिकारी, अर्जदार उपस्थित होते. यावेळी सहपाल...

उदगावच्या हनुमान पाणीपुरवठा संस्थेवर यड्रावकर गटाची सत्ता

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : उदगाव येथील हनुमान पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक रविवारी (दि. २७) शांततेत पार पडली. या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाच्या 'संस्थापक चेअरमन बाबुराव कोरे शेतकरी विकास पॅनल'ने जोरदार विजयी कामगिरी केली. एकूण १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संस्थापक चेअरमन बाबुराव कोरे शेतकरी विकास पॅनलचे १० उमेदवार विजयी झाले, तर विरोधी गटाचे ३ उमेदवार निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. याआधी संस्थेवर हनुमान विकास पॅनलची सत्ता होती. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सभासद व शेतकरी बांधवांनी संस्थापक चेअरमन बाबुराव कोरे यांच्या शेतकरी विकास पॅनलवर विश्वास दाखवला होता. अखेर निकालात शेतकरी विकास पॅनलने सत्ता मिळवली. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. दरम्यान, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. यावेळी नूतन संचालक सर्जेराव बापू कदम, राजकुमार देवाप्पा कोरे, बाळासो कल्लाप्पा चौगुले, सचिन सुरगोंडा पाटील, ओंकार प्रकाश फडतारे, स...

धैर्यशील खाडे यांचे निधन

इमेज
  कोथळी : कोथळी (ता. शिरोळ) येथील रहिवासी, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच कुरुंदवाड एस.टी. डेपोचे निवृत्त चालक व एस.टी. कामगार संघटनेचे माजी पदाधिकारी श्री. धैयर्शिल लक्ष्मण खाडे यांचे सोमवार, दि. २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. धैयर्शिल खाडे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. परिसरात त्यांना राजू व अप्पा या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने कोथळी व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंतिम धार्मिक विधी अंतर्गत जलदान विधी (रक्षाविषर्जन) मंगळवार, दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता कोथळी येथे होणार आहे.

चिंचवाडच्या मैदानात श्रीमंत भोसले विजयी

इमेज
    चिंचवाड / शिवार न्यूज नेटवर्क :   चिंचवाड (ता. शिरोळ) येथे श्री वाघजाई देवी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात इचलकरंजीच्या श्रीमंत भोसले विरुद्ध सचिन ठोंबरे यांच्यात जोरदार लढत झाली. उशिरापर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये गुणांवर श्रीमंत भोसले यांनी अत्यंत रोमांचक आणि चुरशीने पैलवान सचिन ठोंबरे यांचा पराभव केला. चिंचवाड येथे आयोजित भव्य निकाली कुस्ती मैदानाचे उद्घाटन गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गणपतराव पाटील व अमृतामामा भोसले, गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन नंबरची कुस्ती रोहन रंडे विरुद्ध प्रदीप ठाकूर यांच्यात झाले यामध्ये रोहन याने एकचाक डाव वरती विजयी मिळवला. तीन नंबरची कुस्ती रणजित राजमाने विरुद्ध अतुल डावरे यांच्यात झाले. यामध्ये डावरे जखमी झालामुळे रणजित राजमाने विजयी झाले. चार नंबरची कुस्ती विनायक वासकर विरुद्ध रोहित चव्हाण यांच्यात झाली. यामध्ये वासकर यांनी दुहेरी पटवरती रोहित चव्हाणला चितपट केले. तसेच छोटे-मोठे पन्नासहून अधिक कुस्त्या यावेळी झाल्या. एक नंबरची कुस्ती श्रीमंत भो...

हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या तेरवाड शाखेचा शुभारंभ बुधवार, ३० एप्रिल रोजी

इमेज
  तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., हेरवाड (शाखा - तेरवाड) च्या नव्या शाखेचा शुभारंभ बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, प्रा. करमरकर यांच्या नवीन इमारतीतील गाळा नं. १, तेरवाड येथे संपन्न होणार आहे. या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्यानपंडित गणपतराव पाटील असतील. प्रमुख पाहुणे म्हणून के.डी.सी.सी. बँक संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लीकर, गोकुळ दूध संघ संचालक अजित नरके, दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, ग्रामपंचायत तेरवाडच्या सरपंच पोर्णिमा गोंधळी, केंद्रीय महामंडळाचे संचालक संजयदादा पाटील, गोकुळ दूध संघ संचालक संभाजी पाटील, राज कन्सल्टन्सीचे माणिकराव पोळ व ग्रामपंचायत हेरवाडच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेखा जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ व सेवक वर्ग यांच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सलग पाचव्या दिवशी आंदोलन

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :       कुरुंदवाड शहरासाठी नूतन नळ पाणीपुरवठा योजनेच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्वपक्षीय कृती समितीने साखळी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधले. या कामासाठी राज्य सरकारने तात्काळ आत्मीयता दाखवून ४९ कोटी रुपये पालिकेच्या खात्यावर वर्ग करून प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.       पाचव्या दिवशी सुरू असलेल्या या साखळी उपोषणात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये एन. डी. पाटील, गौतम पाटील, बाबासाहेब सावगवे, कुमार कोरवी, तानाजी आलासे, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र बेले, अनिकेत बेले, हर्षद बागवान, चंद्रकांत गावडे, जितेंद्र साळुंखे आदींचा समावेश होता. सर्व आंदोलकांनी एकजुटीने मागणी करत शासनाचे लक्ष वेधले.      यावेळी बोलताना सावगावे म्हणाले शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या पाणीटंचाई गंभीर बनली आहे. नागरिकांना सातत्याने पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याचा सामना करावा लागत असून, नव्या योजनेची अंमलबजावणी अत्यावश्यक झाली आहे. तरी देखील निधी मंजुरीचा आणि प्रशासकीय मान्यतेचा प्र...

अपघात प्रवण मार्ग होणार सुरक्षित आणि निसर्ग संपन्न

इमेज
वृक्षारोपण, उपाययोजना; उद्योगपती विनोद घोडावत यांचा पुढाकार  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :      कोल्हापूर-सांगली महामार्गावरील चिपरी फाटा ते मनीषा ऑटोमोबाईल दरम्यानच्या अपघात प्रवण मार्गावर आता सुरक्षित वाहतुकीसह वनराई फुलणार आहे. उद्योगपती विनोद घोडावत यांच्या पुढाकाराने या चार किलोमीटर महामार्गावर अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना, दोन्ही बाजूला गुलमोहर, विविध प्रकारची फुल झाडे आणि शोची जवळपास एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. उद्योगपती विनोद घोडावत यांच्यामुळे अपघात प्रवण क्षेत्राची ओळख पुसली जाणार असून लवकरच निसर्गरम्य वातावरणातून वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.      कोल्हापूर-सांगली महामार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून देखील मार्गाचे वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जात नव्हती. मार्गाच्या दोन्ही बाजूला असणारी काठाळी अपघाताचे प्रमुख कारण बनले होते. हा चार किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खूपच धोकादायक बनला होता. सातत्याने लहान-मोठे अपघात होत होते. यात काहींचा बळी गेला असून अनेक जण जायबंद झाले आहेत तर वाहनांच...

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

इमेज
        कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :       महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.          ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या शुभांरभ सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, ग्रामीण रुग्णालय सोळांकूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती कोले, औषध निर्माण अधिकारी विद्यानंद कोरे, सोळांकूरचे सरपंच राजाराम कांबळे आधी मान्यवर उपस्थित होते.  पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागामार्फत रुग्णांना चांगल्या व दर्जेदार सुविद्या द्या. आरोग्य सेवा देताना आरोग्य विभागाने खासगी दवाखान्यात देत असलेल्या सेवांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची सेवा द्यावी, रुग्णालयामार्फत रुग्णांना सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात यावी, याबाबत कुठलीही तडजोड होता क...

चिंचवाड येथे श्री वाघजाई देवीची यात्रा उत्साहात

इमेज
   चिंचवाड / शिवार न्यूज नेटवर्क : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त श्री वाघजाई देवी व श्री बिरदेव देवाचा पालखी मिरवणूक काढण्यात आले. मिरवणूक गावात आल्यानंतर शोभेच्या दारूची आतिषबाजी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  चिंचवाड येथील श्री वाघजाई देवीच्या यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी यात्रेचा प्रमुख दिवशी सकाळी अभिषेक, नैवेद्य व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी श्री बिरदेव व श्री वाघजाई देवीच्या पालखीची मिरवणूक लक्ष्मी मंदिर येथे नेण्यात आले. त्यातून पुन्हा गावाकडे पालखीचे आगमन झाल्यानंतर शोभेच्या दारूचे आतिषबाजी झाली. शिवाजी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री ऑर्केस्ट्रा रोहित रोहन पार पडले. शनिवारी सकाळी अभिषेक, सायंकाळी आरती व विविध स्पर्धा पार पडल्या.

खणदाळच्या सरपंचपदी अश्विनी पाटील यांची बहुमताने निवड

इमेज
   सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क : खणदाळ (ता. गडहिंग्लज): खणदाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. मंडल अधिकारी प्रवीण कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. गावात सरपंच निवडीची प्रक्रिया अत्यंत शांततेत व सुरळीत पार पडावी म्हणून निवडीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावाचे पोलीस पाटील श्री. जोतीबा परीट, तलाठी कांबळे, ग्रामसेवक कुंभार, शासकीय कर्मचारी व शिवार वार्ताचे पत्रकार सुनिल दावणे हे उपस्थित होते. माजी सरपंच रवींद्र यरकदावर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. रिक्त पदासाठी अश्विनी पाटील आणि राजेंद्र जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रिया ‘हात उंचावून’ पद्धतीने पार पडली. यामध्ये अश्विनी पाटील यांना ६ मते मिळाली, तर राजेंद्र जाधव यांना ४ मते मिळाली. महादेवी कळसाणावर या एकमेव सदस्या अनुपस्थित असल्यामुळे ११ पैकी १० सदस्यांच्या उपस्थितीत निवड पूर्ण झाली. बहुमताने विजयी होत अश्विनी पाटील यांची सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली.  ग्रामस्थांनी गुलाल...

दत्त महाविद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अभिषेक निपाणे यांचा सत्कार

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड ता. शिरोळ नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अभिषेक निपाणे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे. पाटील, वडील सुरेश निपाणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिषेक निपाणे म्हणाले, महाविद्यालयाने मला शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच खेळाचे मार्गदर्शन केल्यानेच मी ही यशाची उंची गाठू शकलो .कायम मी महाविद्यालयाचा ऋणी राहीन. सहा. शिक्षक श्री आर आर टाकमारे यांनी अभिषेकच्या घोडदौडीचे थोडक्यात विश्लेषण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील यांनी अभिषेकच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन यथोचित सत्कार केला. तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे असे यावेळी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

दत्तवाड परिसराला गारपिटसह पावसाने झोडपले

इमेज
इसाक नदाफ /  शिवार न्यूज नेटवर्क : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह बुधवारी सायंकाळी दत्तवाडसह काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. दत्तवाड गावात गारपीट झाली असून आसपासच्या काही गावात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने आंब्याच्या बागांनाही फटका बसला आहे. तर काही ठिकाणी झाडे उडमूळून पडण्याची शक्यता सुद्धा दिसून येत होती. दत्तवाड येथे बुधवारी दुपारी उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. आज संध्याकाळ नंतर वारे सुरू झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त होते. संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त नागरिकांना पावसाने दिलासा दिला असला, तरी काही भागांत शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी व गुरुवारी सायंकाळी मेघगर्जनेसह मोठ्या पावसाचा अंदाज आहे.   काही ठिकाणी कडबा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु होती.  गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने रात्रीचा उकाडाही वाढला आहे. बुधवार दत्तवाडचा आठवडी...

जमीन क्षारपड मुक्तीबाबत शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय आवश्यक : हरियाणाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. बुंदेला

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :       श्री दत्त साखर कारखान्याने राबवलेला जमीन क्षारपडमुक्तीचा प्रकल्प हा देशाला मार्गदर्शक ठरत आहे. असा प्रकल्प देश पातळीवर झाला तर शेतकऱ्यांचे हितच होणार आहे. या दृष्टीने जमीन क्षारपडमुक्त करण्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, प्रकल्पाचा खर्च, बँक कर्ज, विविध योजना, त्यातील त्रुटी, अडचणी, टेंडर प्रक्रिया, प्रकल्पाचे निकष आणि शासन धोरण अशा विविध बाबींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. जमीन क्षारपड असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता देशपातळीवर एकच निर्णय झाला तर शेतकऱ्यांची प्रगती होईल. संपूर्ण देश आणि जगभरात क्षारपड मुक्तीचा प्रश्न वाढत असून याबाबत शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक असून शासनास प्रबंध सादर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन सेंट्रल सॉईल सेलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल हरियाणाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. एस.बुंदेला यांनी केले.       क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पा संदर्भातील यश, अपयश, त्यातील येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेऊन शासन दरबारी एक निश्चित धोरण बनवण्याच्या दृष्टीने कर...

खणदाळच्या नामदेव चिरमुरे यांची दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी निवड

इमेज
सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क : गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ गावच्या एका सामान्य कुटुंबातील तरुणानं आपल्या जिद्दी आणि चिकाटीच्या बळावर असामान्य यश मिळवलं आहे. नामदेव मारुती चिरमुरे या दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणानं सेवा सोसायटीमध्ये शिपाई म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आता थेट श्री लक्ष्मी दूध संस्थेच्या चेअरमनपदापर्यंत मजल मारली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नामदेव यांनी सुरुवातीचे दहा वर्ष सेवा सोसायटीमध्ये शिपाई म्हणून काम केले. अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पण भावनेमुळे ते सर्वांचेच आवडते बनले. त्यानंतर, 2023 मध्ये झालेल्या श्री लक्ष्मी दूध संस्थेच्या निवडणुकीत नामदेव यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्यावर गावकऱ्यांनी आणि संस्थेच्या सदस्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, आता 2025 मध्ये त्यांची संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली.  श्री लक्ष्मी दूध संस्था कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनात एक अग्रे...

शिवार न्यूजचे पत्रकार संदीप कोले निर्भीड पत्रकार पुरस्काराने गौरव

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  शिवार न्यूजचे पत्रकार संदीप कोले यांना त्यांच्या निर्भीड आणि समाजप्रवृत्त पत्रकारितेच्या योगदानाबद्दल "निर्भीड पत्रकार" पुरस्काराने गौरवण्यात आले. पुणे येथील अग्रगण्य वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्हच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे पार पडला. हा सोहळा दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक व कोकण विभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पत्रकार संदीप कोल्हे यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, सामाजिक अन्याय आणि स्थानिक मुद्दे धाडसाने मांडत लोकशाहीला सक्षम करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या पत्रकारितेच्या धाडसपूर्ण प्रवासाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुण्याचे माजी नगरसेवक व मुस्लिम बँकेचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. अय्युब शेख यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीत मराठी चित्रपट अभिनेत्री पद्मजा खटावकर, शांताई संस्थेचे...

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत श्रध्दा ऑलंपियाडच्या सोहनची ब्राँझ पदकाची झेप

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :           मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत श्रध्दा ऑलंपियाड, इचलकरंजी या शाळेच्या इयत्ता 6 वीतील विद्यार्थी सोहन संजीव सुर्यवंशी याने आपल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि कठोर परिश्रमाच्या बळावर ब्राँझ पदक पटकावले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाने केवळ शाळेचेच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्याचे नावही उज्ज्वल केले आहे.         सोहनच्या या नेत्रदीपक कामगिरीमध्ये शाळेच्या प्राचार्या आदरणीय प्रियांका मॅडम, त्यांचे मार्गदर्शक सहकारी शिक्षक आणि संस्थेचे प्रमुख प्रा. ए.आर. तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणादायी पाठिंब्यामुळेच सोहनला या कठीण स्पर्धेत यश संपादन करणे शक्य झाले.          या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या तयारीसाठी सोहनची आई डॉ. दिप्ती सुर्यवंशी आणि वडील संजीव सुर्यवंशी यांनी त्याला सतत प्रोत्साहन दिले.तसेच, शाळेतील शिक्षिका सौ. सुषमा केणी यांनीही त्याला अभ्यासात महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या तिघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सोहनला आत्मवि...

शिरोळ तालुक्यात वळीव पावसाची हजेरी; उष्णतेने हैराण झालेले नागरिक सुखावले

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : मार्च महिना संपून एप्रिलही अखेरीस आला तरी शिरोळ तालुक्यात कुठेही वळीव पावसाची चिन्हे नव्हती. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते, तर शेती पाण्याअभावी कोमेजू लागल्याने शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत होता. पिकांची वाढ खुंटल्याने यावर्षी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आज मंगळवारी रात्री शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात वळीव पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पडलेल्या या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पाऊस कमी वेळासाठी असला तरी त्याचा शेतीला आणि जमिनीच्या तापलेल्या हवामानावर सकारात्मक परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नैसर्गिक आधार ठरला असून, पिकांची वाढ सुरळीत होण्यास मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. काही भागांत जोरदार वाऱ्यामुळे किरकोळ नुकसान झाले असले तरी पावसाच्या आगमनाने समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी दिवसांतही अशाच प्रकारच्या वळीव पावसाची शक्यता ह...

महेश देवताळे यांची शिरोळ तालुका भाजप अध्यक्षपदी निवड

इमेज
   शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  गणेशवाडी गावचे सुपुत्र महेश सदाशिव देवताळे यांची भारतीय जनता पार्टीच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व भाजप नेते माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडीसाठी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, माजी तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, महावीर तकडे,अबिद्दून मुजावर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवडणूक प्रभारी सतिश पंडित यांच्या हस्ते देवताळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. महेश देवताळे यांचा राजकीय प्रवास शालेय जीवनापासूनच भाजपशी निष्ठावान राहिल्याचा साक्ष देतो. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात गणेशवाडी गाव अध्यक्ष पदापासून केली आणि त्यानंतर भाजप युवा मोर्चा शिरोळ तालुका चिटणीस, दोन वेळा तालुका सरचिटणीसपद भूषवले. तसेच हातकणंगले लोकसभा व शिरोळ विधानसभा विस्तारक म्हणून आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत अल्पकालीन विस्तारक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यतत्परतेची आणि...

घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीचे जेईई मेन्समध्ये उत्तुंग यश

इमेज
अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क :  उज्वल यशाची परंपरा कायम राखणाऱ्या संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमी ने जेईई मेन्स मध्ये यशाची गरुडझेप घेतली आहे.         संस्थेच्या सार्थक खोत याने (९९. ९७)पर्सेन्टाइल गुण प्राप्त केले आहेत, तसेच शेठ हेत सचिन (९९. ९५) पर्सेन्टाइल, हर्ष गांधी (९९. ९२) पर्सन्टाइल, आर्यन पुजारी (९९. ८९) पर्सेन्टाइल गुण मिळवले आहेत. संस्थेच्या ३७ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेन्टाइल वरती गुण प्राप्त केले . सार्थक खोत, हर्ष गांधी, आर्यन पुजारी या विद्यार्थ्यांनी फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेन्टाइल गुण मिळवले.सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमीचे डायरेक्टर श्री. वासू सर यांनी अभिनंदन केले व ते म्हणाले , “संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमी नेहमी असेच यशस्वी विद्यार्थी घडवेल व SGIMA चे नाव संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये पहिल्या क्रमांकावर राहील असा आमचा प्रयत्न असेल”. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे, चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले.

बागायती पट्ट्याला उध्वस्त करण्याचे कर्नाटक चे धोरण : धनाजी चुडमुंगे

इमेज
घालवाड / शिवार न्यूज नेटवर्क :   एका तालुक्यात 4 बारमाही वाहणाऱ्या नद्या जगाच्या पाठीवर कुठेही नसतील असा हा बागायती शिरोळ तालुका उध्वस्त करण्याचा डाव कर्नाटक सरकार चा आहे आणि त्यामुळेच त्यांनी आलमट्टी धरनाची उंची वाढवण्याचे धोरण आखले आहे कर्नाटक सरकार चा हा डाव हाणून पाडण्यासाठी आलमट्टी च्या उंचीला आमचा विरोध आहे म्हणून मोठया संख्येने हरकती दाखल कराव्यात असे आवाहन घालवाड येथे झालेल्या सभेत आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले. ते काल रात्री राम मंदिर चौकातील सभेत बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रमोद थोरात होते. या सभेत बोलताना धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की राज्य शासन आलमट्टी धरणाच्या संभावित उंचीला कायदेशीर विरोध करायला कमी पडत असले तरी नुकसान ग्रस्त नागरिक म्हणून आपण या उंची वाढीला विरोध करायला पाहिजे कारण जर या धरनाची उंची वाढली तर दरवर्षी पूर गंभीरता निर्माण होण्याचा धोका आहे आणि भविष्यात उद्भवणारा हा धोका टाळण्यासाठी म्हणून हजारो हरकती केंद्र सरकार कडे पाठवाव्यात असेही शेवटी त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी आंदोलन अंकुश चे राकेश जगदाळे महेश जाधव भूषण गंग...

मुख्याधिकारी प्रचंडरावांना बडतर्फ करा, पाणी योजनेचा ठेका व कन्सल्टंट रद्द करा : पृथ्वीराजसिंह यादव

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ नगरपरिषदेत अनागोंदी व मनमानी कारभार सुरू आहे. पाणी योजनेच्या कामकाजात अनेक त्रुटी आहेत. मुदत संपूनही पाणी योजना पूर्ण झाली नाही. प्रशासकांनी चुकीच्या आधारे पाणी योजनेला मुदतवाढ दिली आहे. पाणी योजनेचे काम करून घेणाऱ्या कन्सल्टंटनेही या कामात दुर्लक्ष केले आहे. यामुळे शिरोळकर नागरिक पाण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना बडतर्फ करून पाणी योजनेचे ठेकेदार व कन्सल्टंट यांना रद्द करून पाणी योजनेसाठी नवीन ठेकेदार नेमण्याची मागणी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी कोल्हापूर येथील बैठकीत केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.  कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात सोमवारी सायंकाळी नगरपरिषद प्रशासन सहायुक्त नागेंद्र मुतकेकर, शिरोळ पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे, पाणीपुरवठा अभियंता अमन मोमीन, पाणी योजना ठेकेदारांचे कर्मचारी व कन्सल्टंट अधिकारी यांच्यासमवेत युवानेते पृथ्...

म्हैशाळ ब्यारेज भविष्यात वादाचे कारण ठरणार : धनाजी चुडमुंगे

इमेज
कनवाड / शिवार न्यूज नेटवर्क :   कनवाड म्हैशाळ दरम्यान दीड टी एम सी चे ब्यारेज उभारण्याचे काम सुरु आहे. हे ब्यारेज भविष्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी वाद निर्माण करण्याचे कारण ठरणार असून या ब्यारेज ला कनवाड मधील शेतकऱ्यांनी विरोध करावा असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी काल कनवाड येथील पूरग्रस्तांच्या बैठकीत केले. आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध म्हणून नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्यासाठी काल आंदोलन अंकुश चे कार्यकर्ते कनवाड मध्ये आले होते. दर्गा चौकात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य राजू बुरान होते. या बैठकीत बोलताना धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की कनवाड म्हैशाळ दरम्यान जो सध्याचा बंधारा आहे त्याचे मजबुतीकरण करून म्हैशाळ योजना वर्षभर चालते पण टक्केवारी साठी आणि आपले दुष्काळी भागातील कारखाने चालावेत म्हणून माजी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी हे महापुराचा आणखी धोका वाढवणारे ब्यारेज बांधण्याचे काम मंजूर केले आहे या ब्यारेज मुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी या ब्यारेज च्या पुढील भागात असणाऱ्या लोकांना आंदोलनाची वेळ येणार आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती आ...

"हरकतींचा पाऊस पाडाल तरच पुरमुक्ती मिळेल" — धनाजी चुडमुंगे

इमेज
शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :   आलमट्टी धरणाच्या उंची वाढीला महाराष्ट्र सरकार रोखू शकत नसल्याने या निर्णयाचा फटका स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दरवर्षी पूर परिस्थितीच्या रूपाने बसतो आहे. त्यामुळे आलमट्टी धरणाच्या उंचीला कायदेशीररित्या विरोध केला नाही, तर भविष्यातील पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला. शिरटी व हसूर गावांमध्ये ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने नागरिकांकडून केंद्र सरकारकडे हरकती दाखल करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत काल शिरटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कोपरा सभा झाली. या सभेत बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले, “आलमट्टी धरणाच्या उंचीला आपला विरोध आहे, हे स्पष्टपणे मांडण्यासाठी नागरिकांनी कायदेशीर हरकती दाखल करणं गरजेचं आहे. हीच एकमेव शाश्वत वाट आहे जी आपल्याला दरवर्षीच्या पुरांपासून वाचवू शकते.” ते पुढे म्हणाले, “जर आपण आत्ताच एकत्र येऊन या अन्यायकारक निर्णयाला विरोध केला नाही, तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य अंधारात जाईल. आंदोलन अंकुशने या गंभीर विषयाची जबाबदारी घेतली असून, नागरिक...

शिरोळ तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना आमदार यड्रावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यातील नव्याने निवड झालेल्या अंगणवाडी मदतनीसांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरोळ-१ मनीषा पालेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरोळ-२ सुप्रिया पवार, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) अनिल घोडेस्वार, तसेच पर्यवेक्षिका माया पुजारी, संगीता चावरे, संगीता सामंत, शाहिन पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमात आमदार यड्रावकर यांनी नव्या अंगणवाडी मदतनीसांचे अभिनंदन केले. अंगणवाडी केंद्रांद्वारे लहान बालकांचे पोषण, शिक्षण व आरोग्य सेवा पुरवली जाते. त्यामुळे या सेवेत कार्यरत असलेल्या महिलांची भूमिका फार महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या कर्तव्यांची माहिती दिली व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे नव्या मदतनीसांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी आपल्या कामातून सामाजिक विकासात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

श्री दत्त साखर कारखान्याला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा 'नॅशनल को जनरेशन अवॉर्ड'

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :     को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तांत्रिक कार्यक्षमता या विभागामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देश पातळी वरील प्रथम क्रमांकाचे 'नॅशनल को जनरेशन अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कारखान्याचे को जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना 'बेस्ट को जन मॅनेजर' म्हणून गौरविण्यात आले.     नॅशनल को जनरेशन पुरस्कार 2024 सोहळ्याचे आयोजन पुणे येथील आर्किड हॉटेलमध्ये करण्यात आले होते. माजी कृषिमंत्री, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला.     को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशांतील सहकारी व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये असलेल्या को जनरेशन प्लँट बद्दल माहिती घेऊन विविध विभागामध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश यास विविध राज्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. खाजगी व सहकारी क्षेत्रातील कारखान्याच्या को जनरेशन प्लँट साठी श्री दत्...

जिल्हा परिषद शाळेची 36 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे सातबारा उताऱ्यावरून कमी

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :       घोसरवाड ता.शिरोळ येथील कुमार विद्यामंदिर या जिल्हा परिषद शाळेची 36 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराला मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य जबाबदार असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यासागर आण्णा बारवाडे यांनी करत या प्रकरणाची खातीनिहाय चौकशी होऊन कृषीवर कारवाई करावी व पत्रकी पुन्हा शाळेच्या नावाची नोंद करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.       निवेदनात पुढे म्हटले आहे सण 1958 सालीं सिद्रामराव परशराम शिंदे सरकार यांनी गट क्र.1030, सर्व्हे क्र.160 मधील 40 गुंठे जमीन विद्यार्थ्यांना शेती कामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कुमार विद्यामंदिर शाळेला शेती प्रशिक्षणासाठी दिली होती.तशी सातबारा पत्रकी नोंद देखील होती.सण 1974-75 ते 2004-05 या काळात सातबारा पत्रकावर ‘निलगिरी झाडे’ असा उल्लेख करत ४० गुंठे ऐवजी ३६ गुंठे क्षेत्राची चुकीची नोंद केली. पुन्हा 2022 सालात सातबारा पत्रकावरून शाळ...

भविष्यात धरणग्रस्त व्हायचे नसेल तर हरकती दाखल करा : धनाजी चुडमुंगे

इमेज
खिद्रापूर / शिवार न्यूज नेटवर्क : कर्नाटक सरकार ने आलमट्टी धरनाची उंची वाढवण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु केले आहेत.उंची वाढवण्यास त्यांना परवानगी मिळाली तर शिरोळ तालुक्यात दरवर्षी महापुराचे संकट येणार आहे.तसं झाले तर शिरोळ तालुका भविष्यात धरणग्रस्त म्हणून जाहीर करून दरवर्षी पावसाळ्याच्या काळात आपल्याला गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जागा शोधावी लागेल हे लक्षात घेऊन या धरणाच्या उंचीला सर्वांनी वेळीच जागे होऊन हरकत घ्यायला पाहिजे असे आवाहन धनाची चुडमुंगे यांनी खिद्रापूर येथे केले. आंदोलन अंकुश ने आलमट्टी च्या उंचीला विरोध म्हणून केंद्र सरकार कडे हरकती दाखल करण्यासाठी अभियान चालवले आहे त्या अनुषंगाने ते काल सायंकाळी खिद्रापूर येथे आले होते त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाकडे कर्नाटक सरकार ने आलमट्टी ची उंची 524 मीटर करण्यास परवानगीचे नोटिफिकेशन काढण्याची मागणी केली आहे आणि या महिना अखेर त्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी बैठक बोलावली आहे. त्या बैठकी पूर्वी या उंचीला आमचा विरोध आहे म्हणून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून मोठया प्रमाणात...

स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी शिरोळच्या जनतेची दिशाभूल : अर्जुन काळे, प्रवीण माने

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :    नगरपरिषदेमध्ये ५ वर्ष सत्तेचा फायदा करून घेण्याच्या नादात आपण विरोधात निवडून आल्याचा विसर या गटाला पडला पण निवडणुकीला लोकांना काय सांगायचं मताचा जोगवा कशाच्या आधारे मागायचा हे लक्षात आल्यावर मग त्यांना ५ वर्ष नगरपरिषदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. विकास आराखड्यात राजकारण करण्याचा यांचा डाव फसल्यावर मग यांना लोकांना पाणी मिळत नाही हे आठवले. असा आरोप माजी सरपंच अर्जुन काळे व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण माने यांनी केला आहे. यावेळी बोलताना अर्जुन काळे व प्रवीण माने म्हणाले की मुळात गेल्या ४० वर्षात गावात ३० वर्ष आंदोलन करणाऱ्यांची सत्ता असताना त्यांनी कधीही गावाची काळजी केली नाही. तर आपलं घर कसं भरेल हेच पाहिलं. त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम म्हणजे दोन नद्या असताना गावाला पुरेसं पाणी सुद्धा देता आलं नाही. आणि आता निवडणूक समोर आल्यावर हे गावाला पाणी का मिळत नाही म्हणत आहेत २००६ ला यांनीच राजकारण करून पाणी योजनेची वाट लावली त्यामुळेच गेल्या १५ वर्षात लोकांना पाणी पाणी करायची वेळ आली. हे त्यांनी विसरलं असलं तरी जनता विसरलेली नाह...

एक एकरात ११७ टन विक्रमी ऊस उत्पादन ; सातेंद्र खुरपे यांचा शिरोळ तालुक्यात द्वितीय क्रमांक

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  ऊस पिक स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सातेंद्र खुरपे यांनी एक एकर क्षेत्रात तब्बल ११७ टन विक्रमी ऊस उत्पादन घेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि महाधन ॲग्रोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गळीत हंगाम 2024-25 ऊस पिक स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सातेंद्र खुरपे यांचे हे उत्पादन आधुनिक शेतीतंत्रज्ञान, नियोजनबद्ध मशागत, योग्य बियाण्यांची निवड, पाणी व्यवस्थापन आणि खतांचा संतुलित वापर या घटकांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले. बक्षीस वितरण समारंभप्रसंगी व्ही.एस.आय.चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यान पंडित गणपतराव पाटील, हवामान अभ्यासक पंजाबराव डख, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. जयवंत जगताप, मृदशास्त्र तज्ञ डॉ. संतोष करंजे, महाधन ॲग्रोटेकचे बिपिन चोरगे, माजी आमदार उल्हासदादा पाटील आणि कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. खुरपे यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा मिळाली...

शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरेल : व्ही.एस.आय.चे शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांचे प्रतिपादन

इमेज
शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :     पारंपरिक पद्धतीने शेती करून जमीन आणखी नापीक आणि क्षारपड बनत आहे. उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय कर्ब वाढ, जमिनीची सुपीकता, निरोगी बियाणे, हवामान बदलांचा अभ्यास, रोगांचे नियंत्रण, पाणी आणि खतांचा योग्य वापर करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण या सर्व गोष्टी सुलभतेने व नेमकेपणाने करू शकतो. कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. शेतीला जपण्याबरोबरच अभ्यास वृत्तीने, आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी शेती करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन व्ही.एस.आय.चे प्रमुख शास्त्रज्ञ आणि पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. कडलग यांनी केले.      श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व महाधन ॲग्रोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर शेजारी आयोजित शेतकरी मेळावा व गळीत हंगाम 2024- 25 ऊस पिक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात 'पूर्व मशागतीचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. श...

शिरोळ तालुक्याला वळीव पावसाची प्रतीक्षा, शेतकरी चिंतेत

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  मार्च महिना उलटून एप्रिलही संपत आला तरी शिरोळ तालुक्यात अद्याप एकाही ठिकाणी वळीव पाऊस झालेला नाही. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असतानाच पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. वळीव पावसाच्या अनुपस्थितीमुळे शेतीला आवश्यक असणारा नैसर्गिक आधार मिळत नसल्याने शेतीच्या उत्पादनावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या उसाची लागवड व खोडवा पीक उभे असून त्यासाठी वळीव पावसाची नितांत गरज आहे. उन्हाळ्यात उष्णतेने जमीन तापलेली असते, अशा वेळी वळीव पाऊस जमीन थंड करत पिकांच्या मुळांना पोषण मिळवून देतो. त्याचप्रमाणे भुईमूग, सोयाबीन यांसारख्या पिकांनाही वळीव पावसाचा मोठा फायदा होतो. परंतु यावर्षी हवामानाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात अनेक शेतकरी पाण्याच्या टंचाईशी झुंज देत आहेत. काही भागात विहिरी व ट्यूबवेल आटू लागल्याने पाण्याचा साठा मर्यादित आहे. यामुळे पिकांना आवश्यक पाणी वेळेवर देता येत नसल्याने त्यांची वाढ थांबलेली आहे. वळीव पाऊस झाल्यास जमिनीत आर्द्रता वाढेल आणि पिकांची वाढ पुन्हा सुरू होईल. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्या...

शरद कृषीच्या प्रगती कर्नाळे हिची विद्यापीठ खो-खो संघात निवड

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीची विद्यापीठ खो-खो संघात निवड कु. प्रगती संतोष कर्नाळे हिची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या खो-खो संघात निवड झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देश पातळीवर होणाऱ्या बाविसाव्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अॅग्री स्पोर्ट्स २०२४-२५ ह्या स्पर्धा होणार आहेत. आचार्य नरेंन्द्र कृषी एवं प्रौद्योगीक विश्वविद्यालय कुमार गंज अयोध्या( उत्तर प्रदेश) येथे स्पर्धा होणार असून त्या स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात कु. कर्नाळे हिची निवड झाली आहे. तसेच ५७ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ह्या जगन्नाथ पुरी (ओरिसा) येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यामध्ये कु. प्रगती कर्नाळे ही सहभागी होती. तिची संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, क्रीडाशिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन ला...

हेरले येथील दोन शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

इमेज
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा हातकणंगले मार्फत दिला जाणारा गुरूवर्य ना.भा. शिंपी गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार हेरले येथील शाळा क्र. २ चे अध्यापक आर. बी. पाटील व केंद्रशाळा हेरलेच्या अध्यापिका निगार कराडे यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले तालुक्यातील घोडावत कॉलेज, अतिग्रे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष मा. अर्जुन पाटील, तालुका अध्यक्ष मा. सचिन कोल्हापूरे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार हेरले केंद्राचे केंद्रप्रमुख शहाजी पाटील, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवणाऱ्या निशिगंधाचे हेरवाडमध्ये जल्लोषी स्वागत

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : मणिपूर येथे झालेल्या नॅशनल स्कूल गेम्स चॅम्पियनशीप २०२४-२५ अंतर्गत वेटलिफ्टिंग (१७ वर्षांखालील मुलींचा गट) स्पर्धेत हेरवाड (ता. शिरोळ) येथील कु. निशिगंधा सुरेश कडोले हिने देशात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राचे आणि गावाचे नाव संपूर्ण देशभरात उज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांच्या वतीने तिचा जल्लोषात सत्कार करण्यात आला.  निशिगंधाने आपल्या अत्यंत परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण सरावाने हे यश संपादन केले आहे. तिच्या कामगिरीने हेरवाड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरवोद्गार प्रदिप पाटील यांनी सत्कार समारंभात बोलताना काढले. या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन हेरवाड गावच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी वेटलिफ्टिंग खेळाडू तेजस जोंधळे, भूमिका मोहिते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. गावात तिच्या गौरवासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली. निशिगंधाची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. शाळकरी विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   या यशामध्ये तिच्...