हेरवाड मधील दानशूरांनी फेडले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे कर्ज
शिवार न्यूजच्या वृत्तानंतर मिळाला मदतीचा ओघ हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : सैनिक लढला तर देशाच्या सीमांचे रक्षण होते आणि शेतकरी राबला तर देशाचे पोट भरते. राजकारणी शेतकऱ्यांचा केवळ उदो-उदो करतात. मात्र त्यांच्यासाठी काही करायची वेळ आली की, मागे हटतात. कर्जाचा भर असह्य झाल्याने हेरवाड गावातील शेतकरी काडगोंडा खडके (वय३०) या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला बरोबर आठ महिने पूर्ण झाले. मात्र अद्याप त्याच्या कुटुंबाला सरकारकडून फुटकी कवडीही मिळालेली नाही. याबाबत शिवार न्यूजने खडके कुटुंबाची व्यथा बातमीच्या माध्यमातून समाजासमोर मांडली होती. याची दखल घेऊन हेरवाड येथील 'हेरवाड विकास' या व्हॉटसॲप ग्रुपवरील दानशूर व्यक्तींनी एकत्र येवून सदर कर्जबाजारी शेतकऱ्याचं पीक कर्ज फेडून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शासनाचे दुर्लक्ष, राजकीय पुढाऱ्यांचे आश्वासनामुळे हेरवाड येथील कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा संसार वाऱ्यावर पडला आहे. काडगोंडा खडके हा शेतकरी कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेवून गेल्या आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. घरातील...