पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अण्णा ब्रिगेडच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सवात साजरी

इमेज
  सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :        जाखले ता.पन्हाळा येथे अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी अण्णा ब्रिगेड संघटनेचे नेते संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल महापुरे सर यांच्या हस्ते फोटो पुजन करण्यात आले.यावेळी बोलताना डॉ.अमोल महापुरे म्हणाले की,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.त्यांनी समाजातील वंचित,उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी अद्वितीय स्वरूपाचे काम केले आहे. त्यावेळी अण्णा ब्रिगेड चे पन्हाळा तालुका कार्याध्यक्ष अमोल धोंगडे व सचिव दिपक डोंबे यांची देखील मनोगते झाली. यावेळी रणजित बोराटे,किशोर शिंदे, संजय बोराटे ,ईश्वर शिंदे, प्रकाश डोंबे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण

इमेज
  संदीप कोल / शिवार न्यूज नेटवर्क :   हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील ग्रामपंचायत च्या वतीने आशा स्वयंमसेवीके मधील उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन हेरले ग्रामपंचायत स्तरीत पुरस्कारासाठी वहिदा सज्जन खतीब आशा , सुजाता सुधीर कचरे सी.आर. पी. बचत गट यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील उर्मिला कुरणे, माजी उपसरपंच बक्तीयार जमादार, हातकणंगले पंचायत समिती सभापती माजी सभापती जयश्री कुरणे व इतर महिला व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर कामधेनु पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन आदगोंडा पाटील यांच्या संचालक व सभासद यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.  

टाकळीवाडीच्या सुपुत्रांची गगनभरारी ; तिघा सैनिकांना एकाचवेळी पदोन्नती

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :  टाकळीवाडी गावातील तिघा सुपुत्रांना एकाचवेळी सैन्य दलात पदोन्नती मिळाल्याची गौरवशाली घटना घडली आहे. विजय श्रीपाल बदामे यांची सुभेदार मेजर, अमोल आप्पासो वनकोरे यांची नायब सुभेदार, तर अजय पारीसा काणे यांची सीआरपीएफ उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. या तिघांच्या यशामुळे टाकळीवाडी गावात आनंदाचे वातावरण आहे. विजय बदामे यांनी भारतीय सैन्यात प्रदीर्घ सेवा करताना शौर्य आणि निष्ठेने कामगिरी बजावली असून, त्यांची सुभेदार मेजर पदावर नियुक्ती ही गावासाठी भूषणाची बाब आहे. अमोल वनकोरे यांची नायब सुभेदार पदावर पदोन्नतीही त्यांच्यातील कौशल्य आणि शिस्तीचे द्योतक ठरते. तर, अजय काणे यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये उपनिरीक्षक पदावर बढती मिळवून देशसेवेसाठी नवा टप्पा गाठला आहे. या तीनही सैनिकांची पदोन्नती एकाचवेळी झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. सैनिक वेल्फेअर असोसिएशन, टाकळीवाडी, तसेच सर्व ग्रामस्थ, आजी-माजी सैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गावामधील तरुणाईसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल असून, त्यांच्या यशामुळे अनेकांना सैन्यात भरती ...

शंकर माने यांचे कार्य प्रेरणादायी : आ. डॉ.अशोकराव माने

इमेज
तारदाळ / शिवार न्यूज नेटवर्क :   शंकर माने यांनी आपल्या जीवनाच्या वाटचालीस कुटुंबाच्या प्रगती बरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी विशेष योगदान दिले आहे. त्यांचे कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी केले. कोंडीग्रेचे सुपुत्र शंकर बाळू माने यांचा 75 वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा गुरूवारी श्री गजानन महाराज सांस्कृतिक हॉल खोतवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. अशोकराव माने हे बोलत होते ‌   आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने बापु यांचे हस्ते शंकर माने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ निता अभिजीत माने, काशिनाथ गायकवाड, बी एस महाजन, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सुत गिरणीचे संचालक जयदीप पाटील, सुनील कामत, किरण भोसले, संतोष माने, अमोल माने, आदेश खाडे व माने परीवार व मित्र मंडळी उपस्थित होते. आण्णासाहेब बिलोरे, शितल कदम दत्तात्रय बामणे, आप्पालाल शेख आदिनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमांचे सुत्रसंचालन डॉ दगडु माने यांनी केले.

जयसिंगपूर शहरात ए.बी. केबल टाकण्याचे काम सुरू

इमेज
  धोकादायक विद्युत वाहिन्यांपासून दिलासा  संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर शहरातील जुन्या आणि धोकादायक विद्युत वाहिन्या हटवून त्यांच्या जागी ए.बी. (एरियल बंच) केबल बसवण्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. महावितरणच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत हे काम राबवण्यात येत असून यामुळे झोपडपट्टी व दाट लोकवस्ती असलेल्या भागातील नागरिकांना दीर्घकाळ त्रासदायक ठरत असलेल्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांपासून कायमचा दिलासा मिळणार आहे. जयसिंगपूरमधील बावन्न झोपडपट्टी, राजीव गांधी नगर, मच्छी मार्केट, तसेच शहरातील अन्य भागांमध्ये वर्षानुवर्षे विद्युत वाहिन्या झुकलेल्या, खांब खराब झालेले आणि तारा खाली आल्यामुळे सतत विद्युत तारेचा धोका निर्माण होत होता. विशेषतः पावसाळ्यात ही स्थिती अधिकच भयावह होत होती. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने आरडीएसएस योजनेतून ए.बी. केबल टाकण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष शिफारस केली होती. ए.बी. केबल्स या संरक्षित केबल्स असून त्...

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून कनवाड गावाला नवी नौका

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील कनवाड गावाला नवी नौका मिळाली असून ग्रामस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीची पूर्तता झाली आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून ही नौका देण्यात आली असून संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता या नौकेचा मोठा उपयोग होणार आहे.  कनवाड हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेले असून पूरपरिस्थितीमुळे गावाचा संपर्क तुटतो आणि नागरिक हालअपेष्टा सहन करतात. त्यामुळे नौका उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची होती. ही गरज लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूरने कनवाड गावासाठी नौका देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत – विशेषतः पूरग्रस्त काळात ही नौका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अन्नधान्य, वैद्यकीय मदत किंवा स्थलांतराच्या दृष्टीनेही याचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे गावामध्ये समाधानाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

पावसाची उघडीप तरीही कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पातळीत वाढ

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा बुधवारी पहाटेपासून पाण्याखाली गेला असून एकूण 6 बंधारे जलमय झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकशी असलेला रस्ता संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सध्या तेरवाड बंधाऱ्याची पाणीपातळी 37 फूट 6 इंच आहे (इशारा : 71 फूट), शिरोळ येथे 32 फूट 7 इंच (इशारा : 74 फूट), नृसिंहवाडी येथे 31 फूट 7 इंच (इशारा : 65 फूट), रुई येथे 44 फूट 4 इंच (इशारा : 67 फूट), तर इचलकरंजी येथे पातळी 39 फूट 6 इंच झाली आहे (इशारा : 68 फूट). पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ बंधारे, कृष्णा नदीवरील म्हैसाळ व राजापूर बंधारे, आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड-मलिकवाड तसेच दत्तवाड-एकसंबा बंधारे जलमय झाले आहेत. यामुळे राजापूर-जुगुळ (कर्नाटक) व कुरुंदवाड-शिरोळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नृसिंहवाडीतील दत्तमंदिर परिसरात पाणी घुसले असून घाटाच्या फक्त चार पायऱ्या शिल्लक आहेत. राजाराम बंधाऱ्यातून 7,297 क्युसेक्स, आयुर्विन पुलाखालू...

दत्तवाड- मलिकवाड बंधारा पाण्याखाली

इमेज
  इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क : कर्नाटक- महाराष्ट्र राज्याला जोडणारा दूधगंगा नदीवरील दत्तवाड- मलिकवाड बंधारा पाण्याखाली गेला असून या बंधार्‍यावरून प्रवाशांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सध्या पाचवा मैल -बोरगाव व दानवाड- एकसंबा या मार्गाने प्रवासी प्रवास करत आहेत. दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याकारणाने दत्तवाड- एकसंबा हा बंधारा सुद्धा पाण्याखाली गेला आहे. सतत पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढलेली आहे. त्यामुळे नदी पात्राबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मे महिन्यातच राधानगरी धरण अर्धे भरले

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मे महिन्यातच नद्या भरभरून वाहू लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर २० फूट ३ इंचांवर पोहोचली असून, पंचगंगा घाट परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. घाट परिसर जलमय झाल्याने नागरिक व भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात एकूण १३ बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. दरम्यान, कोणत्याही धरणातून पाणी सोडण्यात आलेले नसतानाही नद्या भरून वाहू लागल्या आहेत, ही बाब अधिकच लक्षवेधी ठरते. राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून जोरदार पावसाचा अनुभव येत असून, त्यामुळे धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या राधानगरी धरण मे महिन्यातच ५० टक्क्यांपर्यंत भरले आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास जून महिन्याच्या सुरुवातीलाच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण...

संततधार पावसामुळे तेरवाड बंधारा पाण्याखाली

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  सध्या सुरू असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे पंचगंगा नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून, तेरवाड येथील बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत तेरवाड तर्फे नागरिकांना, शेतकऱ्यांना व प्रवाशांना बंधाऱ्यावरून ये-जा न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही धोका पत्करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. सध्याची स्थिती पाहता, बंधाऱ्याजवळ जाणे टाळावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असेही ग्रामपंचायतीने सांगितले आहे.

शिरोळमध्ये पशुगणना झाली पण आकडेवारी गायब ; प्रशासनाकडून स्पष्टता नाही

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यात तब्बल सहा वर्षांनंतर २०२५ मध्ये पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने युद्धपातळीवर पशुगणना करण्यात आली. मात्र, ही गणना झाली तरी खऱ्या अर्थाने तिची खात्रीशीर आकडेवारी अद्याप उपलब्ध नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. २०१९ नंतर प्रथमच ही गणना होत असून, शिरोळ सारख्या कृषीप्रधान भागात पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधार आहे. यामुळेच या गणनेचे विशेष महत्त्व आहे. या मोहिमेसाठी २१ जणांची विशेष टीम कार्यरत राहून, त्यांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, अशा सर्व पशुधनाची माहिती संकलित केली आहे.  २०१९ मधील पशुगणनेनुसार, तालुक्यात गाय – २७,८३२, म्हैस – ४८,१८६, शेळी – १२,२५९, मेंढी – ७,५९९ आणि डुक्कर – ११ इतके पशुधन होते. शिरोळ तालुका दुग्धव्यवसायात अग्रस्थानी असून, शेळी व मेंढीपालनही येथे मोठ्या प्रमाणात होते. पशुगणनेवरून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सरकारकडून अनेक योजना आखल्या जातात. मात्र, यंदाच्या गणनेची आकडेवारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी देशमुख यांच्याकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सदरची आकडेवारी केंद्राला पाठवली असून आमच्याकडे ती उपलब्ध न...

टाकवडे वॉर्ड नं ४ मध्ये विकास कामे होत नसल्याने नागरिक संतप्त ; गटारीचे सांडपाणी रस्त्यावर

इमेज
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : टाकवडे, ता. शिरोळ येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून चार नंबर वार्डातील नागरिक सुख सोयीस्करपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. येथील नागरिकांनी चार वॉर्डातील गटारी व सांडपाणी समस्या सोडविण्याची वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही कोणतीही विकास कामे होत नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नसल्यामुळे घरातील सांडपाणी व पावसाचे पाणी यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. रस्त्यावर सांडपाणी पसरल्याने दुर्गंधी वास येत आहे. त्यामुळे डेंगू चिकनगुनिया सारखे आजारांना नागरिक बळी पडत आहेत. प्रशासन आमचा उपयोग फक्त मतासाठीच करणार का ? असा प्रश्न लोकप्रतिनिधींना नागरिक विचारत आहेत. वेळोवेळी ग्रामपंचायत तक्रार करूनही लक्ष दिले जात नाही त्यामुळे तहसीलदार शिरोळ यांना लेखी पत्र देत आहोत अशी माहिती आनंदा भीमराव चव्हाण यांनी दिली.

मे महिन्यातच सिद्धनाळ बंधारा पाण्याखाली – निपाणी परिसरात अवकाळी पावसाचा मोठा फटका

इमेज
साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : निपाणी शहर व परिसरात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या या पावसामुळे सिद्धनाळ (ता. निपाणी) येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. परिणामी अकोळ, सिद्धनाळ, हुनरगी, बोळेवाडी या गावांचा एकमेकांशी तसेच निपाणी व कोल्हापूर-कागल मार्गाशी संपर्क तुटला आहे. सिद्धनाळ बंधारा हा मार्ग कोल्हापूर, कागल, गोकुळशिरगाव एमआयडीसी या औद्योगिक भागांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या कामगार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, बंधारा जलमय झाल्याने या नागरिकांना आता पर्यायी मार्गाने – जत्राट व नागनूर मार्गे – मोठा फेरा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढल्याने कामगार वर्गात नाराजी पसरली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. काही ठिकाणी व्यापारही ठप्प झाला असून, व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून प्र...

शासकीय अधिकारी संपावर आणि निसर्ग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

इमेज
  शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  एकीकडे शासकीय अधिकारी संपावर गेले आहेत, तर दुसरीकडे निसर्गाने आपला रौद्रावतार धारण केल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून, सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून, शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पेरणी पूर्णपणे खोळंबली आहे. आधीच उशिरा येणाऱ्या मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा पेरणीची टांगती तलवार भेडसावत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी शेतजमीन तयार केली होती, काहींनी बी-बियाणे खरेदी करून ठेवली होती. मात्र, सततच्या पावसामुळे शेतीत पाणी साचून राहिल्याने हे सर्व नियोजन धुळीस मिळालं आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, मका, ऊस आणि भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या गट नाल्याजवळील शेती पूर्णतः वाहून गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी पं...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४-२०२५ चा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे, विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात इंडस्ट्रीमध्ये सेफ्टीचे महत्त्व अधोरेखित केले आणि सेफ्टी ऑफिसरवर असलेल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे, संचालक डॉ. विराट गिरी, संजय घोडावत विद्यापीठाचे, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, पॉलिटेक्निक प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. सुजित मोहिते, कोर्सेसचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.  इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभाग प्रमुख प्रा. अजय क...

गावाच्या विकासाची चळवळ बळकट करण्यासाठी उद्योगधंद्यांची गरज : माजी आम.आवाडे

इमेज
   कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :        सूत व्यवसाय हा उद्योग नव्हे, तर तो शेतकऱ्यांना आधार देणारा, कापसाला बाजारभाव मिळवून देणारा आणि गावगाड्याला आर्थिक संजीवनी देणारा मूलभूत आधारस्तंभ आहे. या व्यवसायात संधी, विकास आणि भविष्यातील स्थैर्य आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन रामचंद्र डांगे यांनी सूतगिरणी उभी केली आहे. ही केवळ गिरणी नसून गावाला आत्मविश्वास देणारा उपक्रम आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.        येथील साधना मंडळाच्या सभागृहात नियोजित श्रीराम भटक्या विमुक्त जमाती सूत गिरणी मर्या.कुरुंदवाडच्या शेअर्स वितरण कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार आवाडे बोलत होते. माजी मंत्री आम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, अशोकराव कोळेकर, दादासाहेब पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.       आम. डॉ. पाटील-यड्रावकर म्हणाले, श्रीराम सूतगिरणी हा प्रकल्प केवळ एक औद्योगिक यंत्रणा नसून...

शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

इमेज
  नदीकाठावरील कृषीपंप काढण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :  आठवडाभर बरसत असलेल्या दमदार मान्सुनपुर्व पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.यामुळे कृष्णा नदीकाठावर शेतीला पाणी उपसा करणारे कृषीपंप सुरक्षित ठेवण्यासाठी गौरवाडसह परिसरातील शेतकर्‍यांची लगबग दिसुन येत आहे.  विविध धरणातुन कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरु नसतानाही धुवाँधार मान्सुनपुर्व पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.   शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रविवारी एका दिवसात साडेतीन ते चार फुटाने वाढ झाली आहे.पाऊस अजुनही धो..धो..कोसळत आहे.यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णानदीचे पाणी कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडु शकते.सद्या नदीकाठावरील गवतकुरणात पाणी विस्तारत आहे.परिणामी गवत बुडण्या आधी ते कापुन आणण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे.   शिरोळ तालुक्यातील राजापुर धरणावर रविवारी २२.३ फुट पाणी पातळी होती. तर येथुन २०७५० क्युसेक प्रतिसेंकद विसर्ग होता.  रविवारी दिवसभर तुरळक पाऊस होता.मात्र पुन्हा सा...

गणेशवाडीमध्ये मंगळवारपासुन रंगणार किर्तन महोत्सव

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :   गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील कै.ह.भ.प.गुंडाप्पा गुराप्पा बिळशिट्टे यांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीनिमित्त मंगळवार दि.२७ व २८ रोजी दोन दिवसीय हरिपाठ व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.   कै.ह.भ.प.गुंडाप्पा बिळशिट्टे हे अध्यात्मिक सांप्रदायाचे होते.यांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीनिमित्त त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी त्यांचे चिंरजीव चंद्रकांत गुंडाप्पा बिळशेट्टी व राजेंद्र गुंडाप्पा बिळशेट्टी यांनी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे दोन दिवसीय हरिपाठ व किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.   यामध्ये मंगळवार दि.२७ रोजी सांयकाळी ५ वाजता हरिपाठ व सांयकांळी ७ वाजता आळंदी पुण्याचे स्वरभास्कर श्री.ह.भ.प.अनिकेत महाराज बांगर यांचे सुश्राव्य किर्तन होईल.   बुधवार दि.२८ रोजी सकाळी प्रतिमा पुजन,दुपारी १२ वाजता महाप्रसाद,सांयकाळी ५ वाजता हरिपाठ,सांयकाळी ७ वाजता झी टाॅकीज फेम,पुण्याचे युवा किर्तनकार गो सेवक,ह.भ.प.नेहाताई भोसले( साळेकर )यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.  किर्तन महोत्सवासाठी आळंदी देवाची येथील महाराष्ट्रातील नामवंत कला...

गुजरातच्या द खेडूत कारखान्याच्या शिष्टमंडळाची श्री दत्तला सदिच्छा भेट

इमेज
शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :       द खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि. बाबेन, बारडोली, जिल्हा सुरत (गुजरात)च्या संचालक व अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. कारखान्याने शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी जमीन क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचे कौतुक केले.       संचालक सुरेशभाई एस. पटेल, संचालक प्रवीणभाई पटेल, कार्यकारी संचालक हेमप्रकाश सिंग, मुख्य इंजिनिअर राकेशभाई पटेल, मुख्य केमिस्ट अरविंद कटियार यांनी प्रत्यक्षात कारखाना स्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रोडक्शन मॅनेजर विश्वजित शिंदे यांनी तांत्रिक कार्यक्षमता आणि तांत्रिक बाबींची सखोल माहिती दिली.       मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पाची माहिती प्रोजेक्टर द्वारे दिली. सेंद्रिय कर्ब वाढ, सुपर केन नर्सरी, ऊस उत्पादन वाढीसाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली. कारखान्याच्या वतीने सर्वांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन ...

शरद आयटीआयमधील टाटा मोटर्सच्या पुल कॅम्पसमध्ये १५६ विद्यार्थ्यांची निवड

इमेज
यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :  यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे टाटा मोटर्स कंपनीचा पुल कॅम्पस इंटरव्ह्यु झाला. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ८ औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) कॉलेजमधील १६३ विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यामधील १५६ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये शरद आयटीआयच्या ७२ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवडलेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून जॉईनिंग लेटर देण्यात आले.  शरद आयटीआयमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या या कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये इलेक्ट्रीशन, फिटर, मोटर मेकॅनिकल, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर व शिटमेटल ट्रेडमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. कंपनीकडून विद्यार्थ्यांची कंपनीचे एचआर मॅनेंजर अभय निकम, ऋषिकेश गुड यांनी लेखी परिक्षा घेवून विद्यार्थ्यांची निवड केली.  शरद आयटीआयने आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांला नोकरी दिली आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्सहान व सहकार्य केले आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी शरद आयटीआय अग्रेसर राहिले आहे....

परशुराम गुरवान गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमास जीवनावश्यक साहित्य वाटप

इमेज
   हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरढोण गावचे सुपुत्र शिरढोण विविध सेवा सोसायटीचे आधारस्तंभ लक्ष्मी सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन शिक्षण क्षेत्रातील पूर्वीचे प्रख्यात शिक्षक गुरुजी म्हणून प्रामाणिकपणे मुलांना शिक्षणाचे संस्कार दिले त्यांना शिक्षणामुळे मुले विद्यार्थी मोठ्या पदावर आज काम करीत आहेत असे शिक्षण प्रेमी शिक्षक गुरुजी माननीय श्री परशुराम गुरवानगुरुजी यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त व त्यांची मुलगी अमृता विशाल गंध राहणार पनवेल मुंबई यांचाही वाढदिवस आजच असल्यामुळे हा संयुक्त कार्यक्रम गुरुदत्त साखर कारखान्यासमोर सद्गुरु बाळूमामा मंदिराजवळ श्रावण बाळ वर्धा आश्रम येथे भव्य मोठ्या दिमाखात केक कापून साजरा करण्यात आला यानिमित्त आश्रम मधील नागरिकांना कपडे व जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात देण्यात आले या निमित्ताने हा कार्यक्रम आज शनिवार दिनांक 24 5 20 25 रोजी सकाळी साडेदहा वाजता साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी खास पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक संतोष आठवले सर हे उपस्थित होते त्याचबरोबर गुरुजींचे जावई अण्णासो पाटील प्रगतशी...

राज्यात दहावी परीक्षेत पाचवा क्रमांक आलेल्या बोरगांवची कन्या रीया कमते हीचा शांती सागर संस्थेच्या वतीने सत्कार

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :         कर्नाटक राज्यात मार्च एप्रिल मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती, परीक्षेचा निकाल नुकताच मे महिन्यात लागलेला असून यामध्ये बोरगाव येथील एम के मार्ट चे भागीदारी मालक श्री विद्याधर कमते यांची मुलगी कुमारी रीया कमते हिने 600 पैकी 621 मार्कस मिळवून राज्यात पाचव्या क्रमांकाने पास होण्याचा मान मिळवला आहे.त्यानिमित्त येथील आचार्य श्री 108 शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटी यांच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ,नगरसेवक, शरद जंगठे व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे कृषी अधिकारी नामदेव बन्ने यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यीनीचा शाल ,श्रीफळ, हार व आर्थिक सहकार्य देऊन रीया कमते, व शिवानी नाईक हीचा सत्कार करण्यात आला. . बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांती सागर को आप सोसायटी यांच्यावतीने नुकताच बोरगाव परीक्षा केंद्रातील सर्व हायस्कूलच्या एक दोन तीन अशा टॉपर. 20 विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व त्यांना सन्मानपूर्वक आर्थिक मदत व सत्कार करण्यात आला होता. रीया विद्याधर कमते ही बोरगांव ची रहीवाशी असून ती शेतकरी कुटुंबातील आह...

हरवलेली तीन वर्षांची मुलगी नृसिंहवाडीत सापडली; पालकांच्या ताब्यात सुखरूप

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  देवदर्शनासाठी नृसिंहवाडी येथे आलेल्या कल्याण येथील मनोज मांजरेकर यांची तीन वर्षांची मुलगी नुविका प्रकाश मांजरेकर ही हरवल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. काही वेळाच्या शोधाशोधीनंतर ही मुलगी नृसिंहवाडी परिसरात सापडून तिला पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. प्रकाश मनोहर मांजरेकर (वय ४५, व्यवसाय शिक्षक) आणि सौ. राजेश्वरी प्रकाश मांजरेकर (वय ३९) हे कुटुंबिय आपल्या मुलीसह नृसिंहवाडीत देवदर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर ते पुढे सिद्रापूर येथील गणपती मंदिरात गेले असता, मुलगी नुविका हरवली, त्यांनी तात्काळ परिसरात शोधाशोध सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. बाबा पटेल, पो. हे. कॉ. हक्के, पो. कॉ. खराडे व पोलीस मित्र शरद दिलीप सुतार यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. त्याचबरोबर देवस्थानचे कर्मचारी अभिजित शिंदे यांनीही मदत केली. सामूहिक प्रयत्नांमुळे काही वेळातच हरवलेली मुलगी सापडली. मुलगी नुविका ही पूर्णपणे सुरक्षित असून, तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या ...

टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला क्रीडांगण विकासासाठी ७ लाखांचा निधी मंजूर

इमेज
  सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलसाठी सन २०२४-२५ या वर्षातील क्रीडांगण विकास अनुदान योजना (विशेष घटक योजना) अंतर्गत कंपाउंड वॉल बांधकामासाठी सात लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी भवानीसिंह घोरपडे यांनी विशेष प्रयत्न केले. संबंधित पत्र भवानीसिंह घोरपडे आणि शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी वैभव पाटील, बाळासाहेब गोते यांची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या क्रीडा धोरण २०१२ अन्वये आणि त्यास अनुसरून करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी ही योजना राबवली जाते. पात्र संस्थांना क्रीडांगणाच्या विकासासाठी अनुदान देण्यात येते. शाळेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार मिळालेल्या या निधीमुळे शाळेच्या क्रीडांगणाचा विकास साधता येणार आहे. या कामी शाळेचे क्रीडाशिक्षक उदय पाटील, तालुका समन्वयक धनाजी गावडे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव राजेश पाटील व संचालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मकरंद गोंधळी यांच्या बालकविता संग्रहास पुरस्कार जाहीर

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : येथील कलाविश्व रंगभूमी संस्थेचे मार्गदर्शक, ज्येष्ठ रंगक्रर्मी , साहित्यिक व निवृत्त शिक्षण सहसंचालक मकरंद तथा एम के गोंधळी यांच्या ' टन टना टन ' या बाल कविता संग्रहास अमरेंद्र भास्कर बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३१ मे रोजी पुणे येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. पुणे येथील अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे सन २०२४ मधील प्रकाशित झालेल्या बाल साहित्याला पुरस्कार जाहीर झाले आहेत.         पुणे येथे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व बाल साहित्यकार डॉ न म जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.          कोल्हापूरचे निवृत्त शिक्षण सहसंचालक एम के गोंधळी यांनी कथा , कविता, लेखन साहित्य क्षेत्रात विशेष कार्य केले असून विविध साहित्य संमेलनामध्ये त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. नाट्य अभिनय, बाहुली नाट्य व एकपात्री कलाकार म्हणून त्यांचा ...

अलमट्टीबाबत लवकरच चार राज्यातील जलसंपदा मंत्र्यांची बैठक : केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील

इमेज
  खासदार धैर्यशील माने यांनी मांडली भूमिका फोटो ओळी : दिल्ली : येथे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्यासोबत अलमट्टी धरणाबाबत विशेष बैठकीत चर्चा करून निवेदन देताना खासदार धैर्यशील माने. कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  अलमट्टी धरणा संदर्भात लवकरच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्याच्या जलसंपदामंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज येथे दिली.  दिल्ली येथे आयोजित बैठकीत बोलत होते.खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. अलमट्टी धरणाच्याबाबत केंद्रीय जल आयोगाने विहित केलेल्या हंगामी पाणी पातळी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन  करून पावसाळ्यात पाण्याची पातळी कमाल मर्यादा ५१५ मीटर निश्चित करावी.तसेच दोन्ही राज्यांमध्ये वैज्ञानिक समन्वयासाठी संयुक्त पूर नियंत्रण प्राधिकरण स्थापन करून कृष्णा नदीच्या खोऱ्यात रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टम आणि पूर्वसूचना प्रणाली स्थापित करावी.या धरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा आणि सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीररित्या जबाबदार धरा, अशी ...

हेरवाड येथे श्री गुरुचरीत्र व परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड (ता. शिरोळ) येथे परमात्मराज महाराज (श्री क्षेत्र आडी) यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्री गुरुचरीत्र व परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. श्री हनुमान मंदिर, हेरवाड येथे १५ ते २१ मे दरम्यान दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पारायण वाचन करण्यात आले. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेतला. या वर्षीच्या पारायण सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून, वर्षानुवर्षे या सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद अधिकच वाढत चालला आहे. पहिल्या दिवसापासूनच गावातील तसेच परिसरातील भक्तगण मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. पारायणाच्या समाप्तीनंतर २१ मे रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शेकडो भाविकांनी सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ह.भ.प. श्री. महादेव वाळके (अकिवाट), ह.भ.प. श्री. विलास शिरढोणे (हेरवाड), प्रसिद्ध कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर माने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जय हनुमान कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, हेरवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावातील युवकांन...

पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : मान्सून कालावधीत इचलकरंजी, हातकणंगले भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.      वारणा व पंचगंगा नदी काठावरील निलेवाडी, जुने पारगाव, किणी, घुणकी, भादुले, वाठार, खोची, चावरे, पट्टणकोडोली, रुई, इंगळी, चंदूर, रांगोळी, इचलकरंजी आदी संभाव्य पूरबाधित भागांबाबत तालुका प्रशासनाने व इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली. तत्पूर्वी हातकणंगले तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव येथील ठिकाणांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच वारणा उद्योग समूह येथील पूरबाधित नागरिकांसाठीच्या संभाव्य निवारा केंद्राची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरकुमार साळवे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, अपर तहसीलदार सुनील शेरखाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार...

मानसूनपूर्व पावसाने शिरोळ तालुक्यात हाहाकार ; नद्या तुडुंब, जनजीवन विस्कळीत

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  गेल्या दोन दिवसांपासून शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा व कृष्णा या चारही नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः शिरोळ तालुक्याचा शेवटचा बंधारा असलेला राजापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नदी पात्रातील जलपर्णीही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने काही काळ का होईना नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र आहे. या अचानक सुरु असलेल्या पावसामुळे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात पेरणीपूर्व मशागतीचे काम सुरू असताना पावसाने खंड न घेता बरसल्यामुळे शेतातील कामे को खोळंबली आहेत. काही भागात आधीच पेरणी झालेली असून त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे उगवण होण्याआधीच पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून पुढील टप्प्यातील पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घरामध्ये घुसल्याने घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांचे कपडे, अन...

घोसरवाड हायस्कूल दहावीचा निकाल ९८ . १८ टक्के

इमेज
  बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क : श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ घोसरवाड, संचलित. घोसरवाड हायस्कूल घोसरवाड या शाळेचा दहावीचा निकाल ९८. १८ टक्के गुणाने उज्ज्वल यश प्राप्त करून शाळेने उत्कृष्ट अशा निकालाची परंपरा जोपासली. यामध्ये कु. सई विनोद मोडके हिने ९३. ४० टक्के इतके गुण मिळवून दत्तवाड केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविली. व तसेच कु. शितल आप्पासो चिगरे ८८. २० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविल्या तर अभय शिवाजी नाईकवाडे यांने ८५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आणि याच बरोबर कु. श्रेया रमेश कदम हिने ८२. ६० टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ तर कु. कार्तिकी कृष्णात पाटीलने ८१.६० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांकाने यश प्राप्त केली. या परीक्षेस एकूण ५५ विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी ५४ विद्यार्थी उतीर्ण होवून यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांने आभ्यासात जिद्द, चिकाटी, आणि मेहनतीच्या जोरावर गुण प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, सचिव विजीतसिंह अजीतसिंह शिंदे ( सरकार ) तर शाळेचे मुख्याध्यापक ...

सैनिक टाकळीमध्ये मुसळधार पाऊस; झाडे उन्मळून पडली, पिकांचे नुकसान

इमेज
  सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क : सैनिक टाकळी परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जोरदार स्वरूप धारण केले. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. परिसरातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. काही रस्त्यांवर ही झाडे अडथळा ठरत असून, वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. या पावसामुळे आडसाली ऊस पिकासाठी चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, टोमॅटो, भाजीपाला व इतर नाजूक पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये पिकं सडू लागल्याचीही माहिती आहे. सध्या वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना मागील काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेपासून थोडा आराम मिळालेला आहे. तरीही, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे यावर्षीचा मे महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडतो का, हे पाहणे महत...

कोंडीग्रेच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संतोष कांबळे यांची बिनविरोध निवड

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  कोंडीग्रे (ता. शिरोळ) या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी संतोष कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उज्वला पाटील ह्या होत्या. तंटामुक्त अध्यक्ष यांच्या निवडीचे कामकाज ग्रामसेवक इलियास मुल्ला व कोंडिग्रे गावचे पोलीस पाटील डॉ. सतीश कांबळे यांनी पाहिले. संतोष कांबळे यांची तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी मावळते तंटामुक्त अध्यक्ष जिवाजी कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. तंटामुक्त अध्यक्ष निवडीच्या वेळी कोंडीग्रे गावचे माजी सरपंच नानासो कांबळे. सोसायटीचे चेअरमन सुनील कामत,कुमार कांबळे, जयदीप पाटील, केतन कांबळे, रोहित कांबळे आधी मान्यवर व गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

ठेवीच्या पावतीवर बनावट कर्ज दाखवून फसवणूक : संगीता मेथे यांचा आरोप

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :         अब्दुललाट ता.शिरोळ येथील सन्मती सहकारी बँकेत ठेव केलेल्या रकमेवर बनावट पद्धतीने कर्ज दाखवून फसवणूक केल्याचा आरोप संगीता सचिन मेथे (रा. अब्दुललाट) यांनी केला आहे. या प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी यांच्यासह 24 जणांविरोधात कुरुंदवाड पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे.         दरम्यान मेथे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात तळंदगे शाखेत हा प्रकार घडल्याचे नमूद केले असल्याने सदरचा तक्रारी अर्ज आणि बँकेने दिलेली कागदपत्रके तपासकमी हुपरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सहाय्याक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले.        मेथे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,2020 साली पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत त्यांनी यंत्रमाग उद्योगासाठी 24 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर 21.50 लाखांची रक्कम ठेव स्वरूपात बँकेत जमा केली होती. मात्र, व्यवसायात अडचणी आल्याने त्यांनी 2022 सालात ठेवी मोडून कर्जात समाविष्ट करण्याची विनंती केली. परंतु शाखाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ झाली, असे त्यांन...

श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या महाविद्यालयातील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व विषय शिक्षकांचा सत्कार श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी दत्त उद्योगाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सन 2025 मध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षा मध्ये श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत बोर्डामध्ये प्रथम क्रमांक, महाविद्यालयामध्ये प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांक मिळवलेल्या सर्व कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.  यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय हे गुणवंत विद्यार्थी घडविणारे संकुल असून क्रीडाक्षेत्राबरोबरच इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांचीही अथक प्रयत्न आहेत. असेच यापुढे गुणवंत विद्यार्थी या महाविद्यालयातील शिक्षक घडवतील अशी अशा व्यक...

अंकली टोल नाक्यावर ॲटोमॅटिक नंबरप्लेट रेकगनायझिंग प्रकल्प

इमेज
गुन्हेगारीवर नियंत्रण; 'गुरुदत्त शुगर्स'चे माधवराव घाटगे यांचे योगदान  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख आठ मार्गावर ॲटोमॅटिक नंबरप्लेट रेकगनायझिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विचाराधीन आहे. लोकसहभागातून होणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात सर्वप्रथम अंकली टोलनाक्याच्यावरून होत आहे. 'श्री गुरुदत्त शुगर्स'चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या आर्थिक सहभागातून पोलिसांसाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प आठवड्याभरात साकारणार आहे.      गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची अद्ययावत नोंद गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मुख्य आठ मार्गांचे सर्वेक्षण करून हे मार्ग निश्चित करण्यात आले. यापैकीच एक असणारा कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा अंकली टोलनाका. या टोल नाक्यावरून दोन्ही जिल्ह्यात वाहतूक सुरू असते. बऱ्याचदा सांगली, मिरज भागातील गुन्हेगारांना गुन्हे करून अगदी आरामात पसार होण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे.    ...

शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम : आमदार यड्रावकर

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली, तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे. कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो, शिरोळ तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. नागरिकांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असणे आवश्यक असून, त्या दृष्टीने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले बांधकाम, उदगाव येथील साकारण्यात येणारे उपजिल्हा रुग्णालय, तसेच मंजूर झालेले मनोरुग्णालय याच्या माध्यमातून आरोग्य विभाग सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. शिरोळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जयसिंगपूर येथील स्व. शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार यड्रावकर बोलत होते. या कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार यड्रावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी बोलताना आमदार यड्रावकर...

अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात उद्या कुरुंदवाड बंद

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीत सर्वाधिक फटका बसणाऱ्या कुरुंदवाड शहराने अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून कुरुंदवाड शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, हॉटेल्स व इतर व्यवहार दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन कुरुंदवाड व्यापारी महासंघ व सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीने केले आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पुराचे प्रमाण अधिक भयावह होईल आणि दरवर्षी शहरासह परिसरातील गावांना मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागेल, अशी भीती व्यापारी व नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपला विरोध स्पष्ट करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी देखील सहभाग घ्यावा, असे आवाहनही कृती समितीने केले असून शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्याच्या आंदोलनामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत होण्याची शक्यता असली तरी, जनतेच्या सुरक्षेसाठी आणि भ...

अहिंसेचाच खरा बुद्धाचा धम्म – प्रा. एन. डी. जत्राटकर

इमेज
  साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  अहिंसेचा मार्ग हाच तथागत गौतम बुद्धांचा खरा धम्म आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. एन. डी. जत्राटकर यांनी केले. तथागत गौतम बुद्धांच्या २५६९व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रोहिणी नगर, निपाणी येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रा. जत्राटकर पुढे म्हणाले, “मानवतेला सुखी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अहिंसा. युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते अधिक गुंतागुंतीचे होतात.” कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सर्व उपासक-उपासीकांनी त्रिशरण आणि पंचशील घेतले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत अॅड. अविनाश कट्टी, भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका संघटक पुंडलिक कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक आयु. महेश धमरक्षित, जिल्हा मुख्य संघटक प्रा. अनिल मसाळे, जिल्हा सल्लागार समिती सदस्य पंडित का...

अलमट्टी धरण उंचीवाढीविरोधात केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्याबरोबर २२ रोजी विशेष बैठक : खासदार धैर्यशील माने

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर, सांगली आणि परिसराला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो. याला कारणीभूत आसलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आणि पाण्याचा विसर्ग या मुद्द्यावर खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत तसेच मंत्रालयाकडे सातत्याने आवाज उठवला होता. खासदार माने यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कारण त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांच्या जिविताला आणि शेतीला धोका निर्माण होतो, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या मागणीची जलशक्ती मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली असून, या विषयावर एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक २२ मे २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता, संसद भवनातील 'डी' समिती कक्षात होणार आहे. या बैठकीसाठी जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खासदार धैर्यशील माने यांना अधिकृतरित्या आमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीत अलमट्टी धरणाचा संभाव्य परिणाम, राज्यांमधील समन्वय, आणि पूरनियंत्रणावर चर्चा होणार आहे. खासदार माने यांची भूमिका ही फक्त कोल्हापूरच्या नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या हितासाठी महत्त्वाची ठरत आ...

शिरोळ नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : राज्यातील नगर भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन करत असून, याचा परिणाम थेट नागरिकांवर होत आहे. शिरोळ तालुक्यातील नगर भूमि अभिलेख कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध कामांमध्ये खोळंबा निर्माण झाला आहे. शासनाकडून नियमित वेतनवाढ, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरून कामाचा ताण कमी करणे, सेवांतर्गत सवलती लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील नगर भूमापन कार्यालयात दररोज होणारे जमीन मोजणी, सातबारा उतारे, सीमा निशाण, नोंदणी व इतर सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. नगर भूमापन कर्मचारी संघटनेने सरकारच्या उदासीन धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारने वेळेवर निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या विविध योजना अडकून पडल्या आहेत. नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे, दाखले मिळण्यात विलंब होतो आहे, परिण...

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  नुकत्याच पाटणा, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये कोल्हापूरची टेनिसस्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिने उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे. ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या डबल्स इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावताना, सिंगल्समध्ये रौप्य पदक जिंकून आपली कौशल्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली. सिंगल्स स्पर्धेतील प्रवास खालीलप्रमाणे: पहिल्या फेरीत ऐश्वर्याने हंसिका सिंह (बिहार) हिला 6-2, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभूत करत विजयी सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत तिने काशवी सुनील (कर्नाटक) हिचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने लक्ष्मीश्री दांडू (तेलंगणा) हिला एका चुरशीच्या लढतीत 3-6, 6-4, 6-2 असे हरवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत, रिशिता बासिरेड्डी (तेलंगणा) विरुद्ध सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. ऐश्वर्याने पहिला सेट 1-6 ने गमावला, दुसरा 6-2 असा जिंकून बरोबरी साधली, परंतु तिसऱ्या सेटमध्ये 3-6 ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ऐश्वर्याने सिंगल्समध्ये रौप्य पदक पटकावले. डबल्स स्पर्धेतील सुवर्ण झळाळी:...

संजीवनी इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल

इमेज
  तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क  :  तेरवाड (ता. शिरोळ) येथील संजीवनी इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये अनुक्रमे रिझा जमादार ९८, दिव्य व्होरा ९७.६०, भूूमी चौग्ुले ९७.२०, मोक्षा मरजे ९७, संदेश मेदार ९६.८०, आयुष पाटील ९६.८० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सचिव दादासो पाटील यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका एस.एस.शिंदे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शाळेने शंभर टक्के यशाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. संजीवनी स्कूलने अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थी उच्चस्थ पदावर कार्यरत असून याचा अभिमान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

शिरोळ मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कार्यमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयातील दालनात शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसंबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेता, अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शरद इंजिनिअरिंगच्या प्रा. दिपा करवा यांना पीएच.डी. प्रदान

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बेसिक सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटीक्सच्या प्रा. दिपा करवा यांना नुकतीच संगम विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून गणित विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. 'स्टडी ऑफ जीओमॅट्रीक फक्शन थेअरी अॅण्ड स्पेशल फक्शन्स असोसिएटेड विथ फ्रॅकक्शनल कॅल्क्युलस ऑपरेटर्स अॅण्ड देअर अॅप्लिकेशन्स' या विषयावर त्यांनी आपला प्रबंध सादर केला. यासाठी डॉ. सीमा काबरा यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.