पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ अरविंद माने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्यात पावसामुळे महापुराचे संकट निर्माण होऊन राज्यातील जनतेचे नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीमुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य आणि शिरोळचे माजी नगरसेवक डॉ.अरविंद अशोकराव माने यांचा वाढदिवस सोमवारी साध्या पद्धतीने मात्र विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला झाला. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सोमवारी डॉ अरविंद माने व त्यांचे सुपुत्र चि. समयनय यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. पहाटे श्री दुर्गामाता दौडच्या ध्वजाचे पूजन डॉ. अरविंद माने, व सौ सारिका माने यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बाल शिवाजी नवरात्र उत्सव मंडळ येथे महाआरती करण्यात आली. शिरोळ पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, यांच्यासह महामानवांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. निवासस्थानी डॉ अरविंद माने व समयनय यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने, सौ रेखादेवी माने, डॉ. अभिजीत माने, डॉ.निता माने, ...

दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव हात पाय कॅलिफर कानातील मशीन यांचे मोफत शिबीर

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : तरूण मित्र परिषद दिल्ली व श्री १००८ मुनिसुव्रतनाथ जैन मंदिर मलिकवाड यांच्या सहयोगाने रविवारी दि,५ अक्टोंबर सकाळी ९ वाजता श्री १००८ मुनिसुव्रतनाथ जैन मंदिर मलिकवाड ता चिक्कोडी येथे सर्व धर्मिय दिव्यांगासाठी मोफत शिबीर आयोजित केले आहे, महाराष्ट्र व कर्नाटकातील कोणत्याही जाती धर्माच्या दिव्यांगाना लाभ घेता येणार आहे,या शिबिराचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

फार्मसिस्ट हे समाजाच्या आरोग्याचे खरे मार्गदर्शक : प्रा. जरीन नदाफ

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचालित संजय कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने फार्मसिस्ट डे उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.झरीना नदाफ ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ऐश्वर्या अण्णासाहेब हवले उपस्थित होत्या.  माजी जिल्हा पंचायत सदस्य आण्णासाहेब हवले यांनी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना अल्प दरात वैद्यकीय शिक्षणं मिळावे यासाठी कॉलेज सुरू केले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यां आज याठिकाणी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचले आहेत.    कार्यक्रम दरम्यान प्रा जरीन नदाफ म्हणाल्या, की “फार्मसिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचा दुवा आहे. औषधोपचार योग्य पद्धतीने रुग्णापर्यंत पोहोचविण्यात फार्मसिस्टाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णाला औषधाचे योग्य डोस, वेळ व परिणामकारकते बद्दल योग्य मार्गदर्शन करणे ही फार्मसिस्टाची जबाबदारी आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सेतू म्हणून फार्मसिस्ट सदैव कार्यरत असतो. त्यामुळे फार्मसिस्ट केवळ औषधे देणारा व्यक्ती नसून समाजाच्या आरोग्यरक्षणाचा खरा दुवा आहे असे मत नदाफ यांनी व्यक...

मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी यड्रावकर सोशल फाउंडेशनकडून ३ ट्रक चारा

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अशा संकटाच्या काळात शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फाउंडेशनने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. यड्रावकर फाउंडेशनच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी ३ ट्रक कडबाकुट्टी चारा पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्तीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत यड्रावकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. निसर्गाने जरी वक्रदृष्टी केली तरी आपत्तीच्या काळात एकमेकांना आधार देणे हा मानवतेचा नियम असल्याने पूरग्रस्त भागात जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असताना या मदतीमुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यड्रावकर फाउंडेशनच्या या उपक्रमाचे...

उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता ही गरजेची : नगरसेवक, शरद जंगटे

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :          आपले शरीर चांगले, निरोगी रहावे व सुदृढ व्हावे यासाठी उत्तम आरोग्याचे गरज असते. या उत्तम आरोग्यासाठी आपण स्वच्छतेला अधिक  महत्त्व दिले पाहिजे. आपले घर परिसर गाव स्वच्छ ठेवल्यास कोणतेच रोगराई येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आज त्यांच्यामुळेच संपूर्ण भारत देश स्वच्छतेत आघाडीवर असल्याचे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिनी सेवा पंधरवडा निमित्त बोरगाव शहर आज बोरगाव भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यातआले. आरोग्य, स्वच्छता, संस्कार शिक्षण, संस्कृतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिले आहे आमचे नेते आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सुद्धा संपूर्ण मतदारसंघात आरोग्य स्वच्छता व शिक्षणाला महत्त्व दिल्याने आज मतदार संघातील जनता ही निरोगी आहेत. प्रत्येकाने स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आयुष्य निरोगी बनवावे असे ...

पावसामुळे गौरवाडमध्ये उभा ऊस भुईसपाट

इमेज
  अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या दोन दिवसापासुन सुरु असलेल्या पावसामुळे गौरवाडमधील आप्पासो गडगले या शेतकर्‍यांचा उभा ऊस भुईसपाट झाला आहे,   गौरवाड ता.शिरोळ येथील आप्पासो गडगले यांचे गौरवाड - कवठेगुलंद दरम्यान कमंत फाट्याजवळ एक एकर ऊसाचे क्षेत्र आहे.सद्या या ऊसाला २८ ते ३० कांड्या तयार झाल्या आहेत. सरासरी एकरी ८०-८५ टन ऊस निघाला असता.मात्र पावसामुळे उभा ऊस पडल्यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.कारण उभा ऊस पडल्यानतंर ऊसाला पुन्हा मुळ्या सुटतात.व वजन कमी भरते.परिणामी संबधित शेतकर्‍यांना याचा मोठा अर्थिक फटका बसतो.

शिरोळ तालुक्यात २४ तासात ८० मिलिमीटर पावसाची नोंद

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा दमदार आगमन केले आहे. दुपारपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी सायंकाळपर्यंत जोरदार पडत होता. शुक्रवारी रात्री ते शनिवार सकाळपर्यंत २४ तासात तालुक्यात 80 मिलिमीटर पाऊस पडला आहे. दरम्यान, एक सारखा मुसळधार पाऊस सुरू असल्याने सखल भागात पाणी साचले असून नुकताच लावण केलेले ऊस व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, भुईमूग पीक काढण्यासाठी आले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. एकटाच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागले. नुकत्याच लावण करण्यात आलेल्या उसाला या पावसामुळे फटका बसणार आहे. काही ठिकाणी उसाची रोपे पाण्याखाली गेली आहेत. तर भाजीपाला पिके सततच्या पावसाने खराब झाले आहेत. तीव्र उन्हाचा तडाका व मुसळधार पाऊस असा गेला महिनाभर खेळ सुरू असल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम चा शेवटचा टप्पा असून सोयाबीन, भुईमूग, उडीद ही पिके प्रामुख्याने शिरोळ...

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त हेरले येथे वृक्षारोपण कार्यक्रम

इमेज
  संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :  हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त हेरले परिसर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शिदोबा डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात फार्मासिस्ट शपथ घेऊन करण्यात आली. त्यानंतर तब्बल ५१ झाडांची वृक्षारोपण करण्यात आली. या प्रसंगी शिरोली ते हातकणंगले केमिस्ट असोसिएशनचे सचिव अभिषेक मोहिते, हातकणंगले तालुका केमिस्ट असोसिएशनचे संचालक अविनाश चौगुले, हेरले केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप हणमंत, उपाध्यक्ष संग्राम सावंत, सचिव जुबेर हजारी तसेच प्रवीण पाटील, विशाल परमाज, सर्जेराव सावंत, स्वप्नील राऊत, रामचंद्र चौगुले आदी सदस्य उपस्थित होते. सदरील उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच समाजात औषध व्यवसायाशी निगडित जबाबदारीची जाणीव अधोरेखित करण्यात आली.

जयसिंगपूर येथे क्रिकेट सट्टा घेणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क दुबई येथे आशिया टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू असून भारत-बांगलादेश या सामन्याचा सट्टा घेत असताना जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी राजीव गांधी नगर येथील बजरंग शशिकांत बिडकर वय ३४ यांना यांचे राहते घरी रंगेहात ताब्यात घेतले आहे यावेळी १ लाख ४२ हजार २५० रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप हनुमंत बांडे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. बुधवार 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर येथे बजरंग शशिकांत बिडकर हा राहते घरी दुबई येथे सध्या सुरू असलेल्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे भारत व बांगलादेश क्रिकेट सामन्याचे लाईव्ह सामन्याचे सट्टा घेत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूर उपविभागीय पोलिस कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ बिडकर यांना ताब्यात घेतले आहे या दरम्यान मोबाईल तसेच रोख रक्कम असे एकूण एक लाख 42 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कामी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल...

१६ ऑक्टोबर रोजी स्वाभिमानीची २४ वी ऊस परिषद : राजू शेट्टी

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :      स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऐतिहासिक २४ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर गुरूवार दिनांक १६ ॲाक्टोंबर रोजी होणार असल्याची माहिती मा. खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.             यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि गेल्या पाच वर्षापासून ऊसदराच्या एफ. आर. पी मध्ये वाढ झाली मात्र शेतक-यांना वाढीव एफ. आर. पी चा कोणताच फायदा झाला नाही. खते , बि -बियाणे , किटकनाशके , मजूरी , मशागत व तोडणी- वाहतूक यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे.केंद्र सरकार व राज्य सरकार साखर उद्योगात दुर्लक्ष करू लागल्याने साखरेसह उपपदार्थाबाबत चुकीचे निर्णय होवू लागले आहेत.       साखर कारखान्यांना अंतराची अट घालून नवीन परवाने देणे बंद केले आहेत मात्र दुसरीकडे याच कारखान्याचे गाळप परवाने तिप्पट व चौपटीने वाढवू लागले आहेत. देशातील व राज्यातील साखर कारखानदार एकत्रित येवून उस उत्पादक शेतक-यांना संकटात आणण्यासाठी एफ. आर. पी. मध्ये मो...

पोर्ले गावात पोलीस पाटील पद रिक्त; अण्णा ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे या गावातील पोलीस पाटील पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील पोलीस पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे.या पदाच्या अभावामुळे सरकारी कामे, दाखले मिळवणे तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यात अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी आणि नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी तीन किलोमीटर दूर आसुर्ले येथे जावे लागते. सध्या पोर्ले गावाचा पदभार आसुर्ले येथील पोलीस पाटील श्री. पंडित वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे आधीच दोन गावांचा पदभार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था अण्णा ब्रिगेडने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पोर्ले गावातील पोलीस पाटील पद तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, निलेश महापुरे, ...

कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रात १५३ रुग्णांची तपासणी

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : कवठेगुलंद (ता.शिरोळ ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात "स्वस्थ नारी,सशक्त परिवार" अभियान अतर्गंत १५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.  महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या या अभियान अंतर्गंत चौधरी हाॅस्पिटल यांच्या वतीने आयोजीत शिबिरात ही तपासणी करण्यात आली.  यामध्ये सर्व वयोगटातील १२२ महिला व किशोरवयीन मुलींची स्त्री रोग तज्ञामार्फत तर १८ बालकांची बालरोग तज्ञातर्फे आरोग्य तपासणी करुन मोफत औषधे देण्यात आली.तसेच १३ रुग्णांची ईसीजी करण्यात आली.   सदर शिबीराचे उद्दघाटन ,दिपप्रज्वलन,प्रतिमा पुजन कवठेगुलंदचे सरपंच,माजी सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमास नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.सौ.पाटील,कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.राम,डाॅ.जयपाल,आरोग्य सहाय्यक,सहाय्यिका,चौधरी हाॅस्पिटलच्या डाॅ.सौ.डिग्रजे,सर्व कर्मचारी,नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रामधील सर्व सीएचओ,एमपीडब्लु,एएनएम, आशा ताई,अंगणवाडी सेवि...

श्री दत्तच्या वार्षिक सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजुरी

इमेज
  मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देणार मदतीचा हात : गणपतराव पाटील शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.  महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातले आहे. ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे. या काळात पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दोन दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठावाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे. सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते जपण्याचे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केले.  गेल्या सात वर्षात साखर उद्योगात उसाच्या एफआरपीमध्ये रुपये २७५० वरून ३५६० रुपयापर्यंत प्रतिटन वाढ झाली. मात्र साखरेची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी २०१९ पासून प्रतिक्विंटल ३१०० रुपये इतकीच...

एम. के. मार्ट कारदगा शाखेचे थाटात उद्घाटन

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जिन मुनींच्या पवित्र आशीर्वादाने स्थापित झालेल्या बोरगाव या नगरीत सागर मिरजे व शीतल कमते यांच्या सहकार्यातून एम के मार्च ची स्थापना करण्यात आली आहे. व्यवहारातील पारदर्शकता व प्रामाणिकपणा यामुळे बोरगाव सह परिसरात ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे काम सुपर बाजार च्या माध्यमातून एम. के मार्ट ने केली आहे. याच उद्देशाने निपाणी तालुक्यातील ज्ञान नगरी म्हणून नावारूपास आलेल्या कारदगा येथे परमपूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी श्री संस्थान मठ नांदणी, अभिनव मंजुनाथ महास्वामीजी हुक्केरी व करदगा बंगाली बाबांचे मौलाना यांच्या दिव्य सानिध्यात फीत कापून या बोरगावच्या एम के मार्च शाखेचे शुभारंभ करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात महामुनींच्या पवित्र चरण पूजनाने करण्यात आली ,यावेळी नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी व हुकरीचे परमपूज श्री अभिनव मंजुनाथ महास्वामीजी व कारदगा बंगाली चे प्रमुख मौलाना यांनी आशीर्वाचन केले .          यावेळी बोलताना एम के मार्च संस्थापक अध्यक्ष...

अखिल भारतीय किसान सभेची निदर्शने, तहसीलदारांना निवेदन

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्याबाबत शिरोळ तालुक्यातील देवस्थान जमीनधारक व शेतकरी यांनी बुधवारी (दि. २४) तहसील कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देऊन मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने सोमवार दि. १५ सप्टेंबर पासून २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीन धारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होत आहेत. सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ...

हेरवाडमध्ये शुक्रवारी श्री संतुबाई देवीची सामुदायिक कुंकुमार्चन पूजा

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड गावाचे ग्रामदैवत, जागृत श्रद्धास्थान आणि असंख्य भक्तांच्या कुलस्वामिनी असलेल्या श्री संतुबाई देवीची सामुदायिक कुंकुमार्चन पूजा शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री संतुबाई मंदिरात पार पडणार आहे. या निमित्ताने गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संतुबाई नवरात्रोत्सव मंडळ, हेरवाड तसेच समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. कुंकुमार्चन विधीची सुरुवात देवीच्या नामजपाने होणार असून, भक्त महिला देवीच्या चरणांपासून डोक्यापर्यंत चिमूटभर कुंकू वाहतील. या वेळी देवीचे स्तोत्र पठण, सहस्त्रनाम स्मरण तसेच श्रीयंत्र किंवा मूर्तीवर कुंकू अर्पण करण्याचा पारंपरिक विधी पार पडेल. देवीला कुंकूने ‘स्रान’ घालून पूजा संपन्न होईल. कुंकुमार्चनाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे मानले जाते. लाल रंग शक्तीचे प्रतीक असून, कुंकुमार्चनामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. कार्यसिद्धी, गृहशांती आणि इच्छापूर्तीसाठी नवरात्रोत्सव काळात विशेषतः अष्टमी व नवमीला हा विधी मोठ्या भक्तिभावाने केला जातो. पूज...

हेरले गावात अतिक्रमणमुक्त पानंद रस्त्यासाठी शिवार फेरी

इमेज
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क : हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती या कालावधीत महसूल पंधरवडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमात गावातील सर्व पानंद रस्ते, शिवरस्ते, ग्रामीण मार्ग, पायवाट व वाहिवाटीचे रस्ते यांची शिवार फेरीद्वारे पाहणी होऊन निश्चिती करण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमण झालेल्या पानंद रस्त्यांची मोकळीक करण्यात येणार आहे. या फेरीस प्रसंगी हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, ग्राम महसूल अधिकारी सचिन चांदणे, पोलीस पाटील श्रीमती नयन पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, कृषीमित्र सयाजी गायकवाड, आनंदराव गवळी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी अनन्या चव्हाणची महाराष्ट्र अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे या ठिकाणी इयत्ता दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनन्या राहुल चव्हाण हिची महाराष्ट्र महिला अंडर-१९ संघात निवड झाली. बीसीसीआय अंतर्गत असणाऱ्या आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन अंडर-१९ महिला टी-२० आमंत्रित स्पर्धा २०२५-२६ मध्ये अनन्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्रातील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू म्हणून तिची सगळीकडे ख्याती झाली आहे.  यापूर्वी अनन्या महिला महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये रायगड रॉयल्स या संघाकडून खेळली आहे. या स्पर्धेत ती सर्वात तरुण खेळाडू होती. महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ख्याती आहे.  सदर स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आंध्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आल्या असून सर्व सामने एसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, मंगलगिरी (विजयवाडा) येथे होणार आहेत. तिच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील युवा महिला क्रिकेट क्षेत्राला मोठी चालना मिळाली असल्याचे मानले जात आहे. तिच्या या निवडीबद्दल संस्थापक श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका सस...

गौरवाडसह सात गावातील घराघरात, मंडळात,मंदिरात घटस्थापना

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह,औरवाड,आलास, बुबनाळ,कवठेगूलंद, शेडशाळ,गणेशवाडी या सात गावातील घराघरात,विविध नवरात्रोत्सव मंडळात तसेच अनेक मंदिरात सोमवारी मुहुर्ताची वेळ साधून विधीवत घटस्थापना करण्यात आली.  नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रुपांच्या सन्मानार्थ केला जातो.स्त्री शक्तीला हा उत्सव समर्पित केला गेला आहे.वाईटावर चांगल्याचा विजयाचे आणि दैवी शक्तीचा हा सण प्रतिक आहे.   सोमवारपासुन नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने घरात, गावातील मंडळात,मंदिरात देवी दुर्गाच्या विविध रुपांची पुजा होणार आहे.   सोमवारी गौरवाडसह सात गावातील घराघरात मुहुर्ताची वेळ साधुन देवी दुर्गाची विधीवत पुजा करुन घटस्थापना करण्यात आली.तसेच खाऊच्या पानाची पहिली माळ बांधण्यात आली.  गौरवाडसह सात गावात एकुण २२ नवरात्र मंडळाकडुन दुर्गामातेच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.यासाठी अनेक मंडळानी माता दुर्गेची मूर्ती वाजत गाजत आणली.विविध मंडळानी मुहुर्ताची वेळ साधुन दुर्गा माता मुर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली. तर काही मंडळानी कोल्हापुर,तुळजापुर,मंगसुळी आदी...

गिरीजा गायकवाड हिची रोप मल्लखांब स्पर्धेत विभागीय स्पर्धेसाठी निवड

इमेज
   सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क : दत्ताजीराव कदम कामगार कल्याण ट्रस्ट दत्तनगर शिरोळ या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय रोप मलखांब स्पर्धेमध्ये सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी गिरीजा महादेव गायकवाड हिचा 14 वर्षे वयोगटाखाली रोप मल्लखांब या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे क्रीडा शिक्षक उदय पाटील , प्रशिक्षक केतन चिंचणे मुख्याध्यापक ,सर्व स्टाफ, तिचे पालक व संस्थेचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेसाठी क्रीडा ऑफिस कार्यालय कोल्हापूरचे रवी कुमठेकर सर उपस्थित होते.स्पर्धेचे नियोजन तालुका क्रीडा प्रमुख धनाजी गावडे यांनी केले होते .या स्पर्धेसाठी डॉक्टर रेवती हिरेमठ संजय देभाजे निशा मोळके यांनी पंच म्हणून काम पाहिले.

कष्टकरी , शेतमजूर समाज ग्रामीण भागाचा महत्वाचा कणा : चेअरमन माधवराव घाटगे

इमेज
  महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा मेळावा संपन्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून निराधार यांच्या पेन्शन वाढीसाठी विशेष प्रयत्न केली बद्दल महाराष्ट्र राज्य शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांचा सत्कार सुरेश सासणे यांच्या हस्ते करण्यात आला. तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतमजूर समाज प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतात. या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरेश सासणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे . कष्टकरी शेतमजूर हाच ग्रामीण भागाचा महत्त्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. तेरवाड येथे महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. घाटगे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर भाजपा चे जिल्हाअध्यक्ष राजवर्धन नाईक - निंबाळकर होते. पुढे बोलत...

जयसिंगपूर पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम : मतिमंद युवक सुरक्षित नातेवाईकांकडे

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 2.30 वाजण्याच्या सुमारास उदगाव बायपास रोडवर गैबान कन्स्ट्रक्शनकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. या दरम्यान रस्त्याने भटकत आलेल्या एका मतिमंद युवकाला कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता त्या युवकाला ताब्यात घेतले आणि जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आणून पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर पाटील यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने आपले नाव आदेश जितेंद्र भोसले (वय 18 वर्षे अंदाजे) असे सांगितले. मात्र गावाचे नाव किंवा पत्ता सांगण्यास तो असमर्थ ठरला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश भोसले यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. युवकाचा फोटो उदगाव, उमळवाड, कोथळी परिसरातील पोलीस पाटील यांना तसेच पोलिस ठाण्यांच्या व्हॉट्सअॅप गटावर पाठविण्यात आला. यासोबतच विश्रामबाग पोलिस ठाणे, सांगली यांच्याशी संपर्क साधून माहिती पुरविण्यात आली. काही तासांच्या प्रयत्...

हेरवाड हायस्कूलचा तालुका कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : पद्माराजे विद्यालय शिरोळ येथे शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या शासकीय तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात हेरवाड हायस्कूल हेरवाड संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर हेरवाड संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत हेरवाड संघाने दमदार खेळ सादर केला. उपांत्य फेरीत कुरुंदवाड येथील माध्यमिक विद्यालय (सैनिकी शाळा) संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात हेरवाड संघाने साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड यांना चार गुणांनी मागे टाकत विजेतेपद पटकावले. विजयी खेळाडूंना साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाडचे अध्यक्ष मा. रावसाहेब उर्फ दा. पाटील, सचिव अजित पाटील, सर्व संचालक, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश मोहिते सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले. तर क्रीडा शिक्षक अजित दिवटे व राजमुद्रा क्रीडा मंडळ हेरवाड यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हेरवाड परिसरात विजयी संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषदांना ३ कोटींचा निधी : आमदार यड्रावकर

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नगरपरिषदांना नमो उद्यान योजना अंतर्गत मोठा विकासनिधी देण्यात आला आहे. याअंतर्गत जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषदांना प्रत्येकी एक कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शहरांच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.   याआधीही जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड पालिकांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या निधीतून शहरातील भुयारी गटार योजना, रस्ते, गटार बांधकाम, तसेच विविध समाजांसाठी सांस्कृतिक हॉल उभारणी यासह विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. त्यामुळे तीनही शहरांचा चेहरा-मोहरा बदलत आहेत. आता पुन्हा प्रत्येकी एक कोटींचा निधी मिळाल्यामुळे या तीन नगरपरिषदांच्या विकास कामांना आणखी चालना मिळणार आहे. या निधीतून जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड या तिन्ही शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात साधला जाणार आहे. राज्य सरकारकडून सातत्य...

दसरा सणानिमित्त घरोघरी युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम

इमेज
  नदीघाटावर अंथरुण धूण्यासाठी गृहिणींची गर्दी.   अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :   येत्या सोमवारी दि.२२ रोजी घटस्थापना आहे.या दिवसापासुन शारदीय नवरात्ररंभाला प्रारंभ होत आहे.हिंदु धर्मात या सणाला फार महत्व आहे.हा सण पावित्र्याचा,मांगल्याचा,आनदांचा,ऐश्वर्याचा मानला जातो.दसरा हा साडेतीन मूहुर्तातील हा एक सण आहे.  यानिमित्त हिंदु धर्मीय लोक पंरपंरेप्रमाणे आपल्या घराची स्वच्छता करतात.यानुसार घटस्थापनेपुर्वी गावोगावी घरांची युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम सुरु असल्याचे चित्र दिसुन येत आहे.  गृहिणीवर्ग आपल्या घरातील पसारा,स्वयंपाकाची भांडी,इतर साहित्य स्वच्छ करण्यात व्यस्त असल्याचे दिसुन येत आहे.तर पुरुषवर्ग घरातील पसारा बाहेर ,बाजुला ठेवून संपुर्ण घराची झाडा-झडती करुन पाण्याने घर धुवुन काढण्यात व्यस्त आहेत.  घराची स्वच्छता करताना गृहिणीना सर्वात जास्त काम करावे लागते.स्वंयपाक घरातील सर्व भांडी,अडगळीतील भांडी काढुन स्वच्छ धुवुन,पुसुन,वाळवुन पुन्हा आवश्यक भांड्याची मांडणी करावी लागते. आज बहुतांशी ९० टक्के घरे ही आरसीसीची आहेत.अशा घरांना स्वच्छ करण्यासाठी फार वेळ ला...

आलास ए.बी.हायस्कुलमध्ये सुलेखन कार्यशाळा

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : आलास (ता.शिरोळ) येथील कलाश्री डाॅ.बा.ग.पवार आलास - बुबनाळ विद्यालयामध्ये सुलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.   या कार्यशाळेतुन सुंदर अक्षर हाच खरा दागिना या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधरावेत व चांगले वळणदार अक्षर यावेत यासाठी वर्षभर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  यावेळी शेडशाळ केंद्रप्रमुख संदीप कांबळे यानी भेट देऊन सुलेखन कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   कार्यक्रमावेळी जिमखाना विभाग प्रमुख ए.बी.येवारे,इंग्रजी विषय विभाग प्रमुख व्ही.एन.पाटील,गणित विभाग प्रमुख आर.बी.मखमल्ला,विज्ञान विभाग प्रमुख एस.एस.पाटील,शिष्यवृत्ती विभाग व पोषण आहार विभाग प्रमुख पी.एस.चाटे,कु.क्षितिजा जोशी,एस.एस.गावडे,सुलेखन अक्षरमित्र एस.डी.केंगाळे यांच्या उपस्थितीत २६ विद्यार्थ्यांना सुलेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच ३ होतकरु विद्यार्थ्यांना सुलेखनाचे मोफत साहित्य दिले.    कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस.कोळेकर यांनी केले.आभार...

एमपीएससी मध्ये हेरवाडची कन्या उत्कर्षा सुतार ओबीसी मुलींमध्ये राज्यात दुसरी

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुका, हेरवाड येथील कु. उत्कर्षा उषा उत्तम सुतार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट - ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 मध्ये मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान तिने पटकावला असून, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात 14 व्या क्रमांकावर आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक (STI) या पदासाठी झाली आहे. उत्कर्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्या मंदिर हेरवाड व नृसिंहवाडी येथे झाले. त्यानंतर ८वी ते १०वीपर्यंत तिने एस.पी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे ११वी-१२वी संजय घोडावत विद्यापीठात घेत इंजिनियरिंगऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडले. जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकॉलॉजी विषय घेत तिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. यानंतर पुण्यात तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. दिल्लीमध्ये मिळालेल्या या संधीचा तिने उत्तम उपयोग करून स्पर्धा परीक्ष...

मनोजकुमार देसाई कुरुंदवाड पालिकेचे नवे मुख्याधिकारी

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :      कुरुंदवाड पालिकेत तब्बल एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर कुरुंदवाड नगरपालिकेला नवीन मुख्याधिकारी मिळाले आहेत. आष्टा नगरपालिकेत उत्तम कामगिरी बजावलेले मनोजकुमार देसाई यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.        यापूर्वी मुख्याधिकारी नसल्याने पालिकेची अनेक प्रशासकीय कामे रखडली होती. आता मुख्याधिकारी देसाई यांच्या रुजू होण्यामुळे ही सर्व कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ शहरातील प्रमुख समस्यांचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रलंबित विकासकामांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.         मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई हे सांगली जिल्ह्यातील कवठेपिराचे सुपुत्र आहेत,देसाई यांचा यापूर्वीचा कामाचा अनुभव पाहता, ते कुरुंदवाड शहरासाठी एक कार्यक्षम अधिकारी सिद्ध होतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल अ...

बाल शिवाजी मंडळ (राजवाडा) ठरलं गणराया ॲवार्ड- २०२५ चा मानकरी

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सव काळत चांगल्या देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या मंडळांना गणराया ॲवार्ड देऊन सन्मानित करण्यात येते. शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत शहरी विभागामध्ये शिरोळच्या बाल शिवाजी मंडळ,राजवाडा -प्रथम क्रमांक, नृसिंह मित्र मंडळ नृसिंह चौक द्वितीय क्रमांक, श्रीराम मंडळ नदीवेश -तृतीय क्रमांक तर बाल गजराज मंडळ, काळे गल्ली यांना उत्तेजनार्थ गणराया ॲवार्ड देऊन गौरविण्यात आले. यापूर्वीही बाल शिवाजी मंडळाने १० वेळा प्रथम क्रमांकाचे गणराया ॲवार्ड मिळवले आहेत.    शिरोळ शहरात दरवर्षी विविध मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, कौटुंबिक,धार्मिक तसेच ऐतिहासिक देखावे सादर केले जातात. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यातून समाज प्रबोधन केले जाते. यावर्षी बाल शिवाजी मंडळ राजवाडा येथे काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशाने पाकिस्तानातील दहशतवादी स्थळालावर हल्ला करून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले होते. या ऑपरेशन सिंदूर आधारित सजीव देखावा सादर करून राष्ट्र अभिमान आणि देश प्रेम जागृत करण्याचा ...

शिरोळमध्ये पावसाचा नैवेद्य मोठ्या उत्साहाने संपन्न

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :       सालाबाद प्रमाणे परंपरेने चालत आलेल्या पावसाचा नैवेद्य आंबील मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने आज संपन्न झाला.         आज अखेर जो काही पडलेला पाऊस आहे तो स्वीकारून त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि उर्वरित पाऊस चांगला व्हावा म्हणून उत्तरा नक्षत्र च्या सुरुवातीस म्हणजेच पहिल्या सोमवारी हा पावसाचा नैवेद्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो.        शिरोळ गावातील ग्रामस्थ, प्रत्येक समाजातील आणि गल्लीतील शेतकरी आपापल्या परीने भात आणि आंबील घेऊन श्री कल्लेश्वर मंदिर येथे येत असतात. सकाळी हेच शेतकरी मोठ्या भक्ती भावाने नदीतून घागरीने पाणी आणून श्री कल्लेश्वराची विधिवेत अभिषेक आणि दहिभाताचे लिंपण केले गेले. संध्याकाळी धनगर समाजाच्या भाकणुकीने सांगता होऊन. सर्वांनी भात अंबिलीचा प्रसाद घेऊन पुढील वर्षी समाधानकारक पाऊस व्हावा ही प्रार्थना करण्यात आली.

कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा दसरा महोत्सव व्हावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  कोल्हापूर हे दर्यादिल शहर म्हणून ओळखले जाते. भारतात म्हैसूरचा दसरा प्रसिद्ध आहे. या दसरा महोत्सवापेक्षाही कोल्हापूरचा दसरा महोत्सव अधिक भव्य दिव्य स्वरूपाचा व्हावा, याची दखल जागतिक स्तरावर घेतली जावी. हा दसरा महोत्सव अधिक यशस्वी होण्यासाठी येथील विविध संस्था व संघटनांनी आपले भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली.       येथील शाहूजी सभागृहात दसरा महोत्सव - 2025 आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले, येथील नागरिक कलासक्त आहे. शहरातील दसरा हा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो आहे. मात्र यंदा शासनाने येथील दसरा महोत्सवास, राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याने आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव हा भव्य दिव्य आयोजनामुळे ओळखला जावा. यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या त्रृटी नकोत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, किरण कांबळे, अशोक शिंदे, आ. ए. नाईक, बी.टी. जाधव, आदित्य बेडेकर, प्रमोद मा...

सभासदाच्या विश्वासावर दत्त नागरी पत संस्थेचा १०० कोटी रुपयांचा ठप्पा पूर्ण - माधवराव घाटगे

इमेज
  श्री दत्त नागरी सहकारी पत संस्थेच्या ५०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे . शेजारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे व संचालक मंडळ.   जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : सभासदांची विश्वाहर्ता हीच दत्त नागरी पत संस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी १०० कोटीच्यावर गेल्या असल्याने दत्त नागरी पत संस्थेला परत सोन्याचे दिवस येथिल असा विश्वास श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला. श्री दत्त नागरी सहकारी पत संस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली. त्याप्रंसगी श्री . घाटगे बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख यांनी केले. जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरेत सर्व विषय एकमतांने मंजूर केले. यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे. सन २०२४-२५ या आर...

उसाचा दुसरा हप्ता देऊन कारखाने लवकर सुरु करा ; कारखान्यांना निवेदन देणार : धनाजी चुडमुंगे

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : साखर कारखाने हे प्रक्रिया उद्योग आहेत या कारखान्यात शेतकऱ्यांचा कच्चा माल असलेल्या उसाचे पक्या मालात रूपांतर करून तो पक्का माल बाजारात विकायचा आणि उत्पादन खर्च भागवून उर्वरित सर्व पैसे कच्या मालाच्या उत्पादकाला द्यायचे असतात.गत वर्षात उसा पासून मिळालेल्या साखर बग्यास आणि मळीला इतिहासातील उच्य दर मिळालेले आहेत आणि त्यातून मोठा फायदा कारखान्यांना झालेला आहे. या फायद्यातून आलेल्या पैशातून शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेर पर्यंत दुसरा हप्ता देऊन ऊस हंगाम 1 ऑक्टोबर पासून सुरु करा या मागणी साठी आंदोलन अंकुश कडून सोमवारी मोटर सायकल रॅलीचे आयोजन केल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले आहे. ते आज माध्यमाशी बोलत असताना पुढे म्हणाले की साखर कारखान्यांना हंगामाच्या तोंडावर आंदोलन नको असेल तर त्यांनी उसाच्या दुसऱ्या हप्त्या बाबत जाहीर पणे भूमिका मांडावी, कारखान्यांच्या वार्षिक सर्व साधारण सभेपूर्वी सभासदांना दुसरा हप्ता किती व केव्हा देणार हे सांगावे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनाशी चर्चा करून तोडगा काढून आंदोलन होणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी आम्ही निवेदन घेऊन...

मानसिक व शारीरिक छळप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ पोलिसांनी सौ. स्वाती संतोष कुमठेकर (वय 38, रा. प्लॉट नं. 122, आंबेडकर हौसिंग सोसायटी, शिरोळ) यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीविरुद्ध मानसिक व शारीरिक छळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती व आरोपी संतोष शिवराम कुमठेकर (मूळ रा. शिरसंगी, ता. आजरा, सध्या रा. मुंबई) हे नात्याने पती-पत्नी आहेत. दिनांक 26 जून 2011 पासून 10 जुलै 2025 या काळात फलटण, पुणे, मुंबई येथे वास्तव्यास असताना आरोपीने वारंवार फिर्यादीवर मानसिक व शारीरिक छळ केला. आरोपीने तू माहेरून काही आणले नाहीस, तुला मुल होत नाही, मी तुला नांदवणार नाही, दुसरे लग्न करणार अशा शब्दांत अपमानित केले. तसेच घटस्फोट देण्यास भाग पाडले, माहेरच्यांचा अपमान केला, शिवाय मारहाण करून घराबाहेर काढले, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी फिर्यादीने महिला समुपदेशन केंद्र, कुरुंदवाड येथे तक्रार दिली होती. मात्र तेथेही आरोपीने नांदवणार नाही, मुल होत नाही, पोटगी देणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर स्वाती कुमठेकर यांनी थेट पोलिसांत धाव घेवून तक्रार दिली आहे.

जयसिंगपूरातून तरुणी बेपत्ता

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नं. 80/2025 अन्वये रेशम अब्दुल्हमीद सन्नकि (वय 21, रा. बेघर वसाहत, उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ही तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, रेशम हिने दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सात वाजण्यापूर्वी कोणास काही न सांगता घरातून बाहेर पडून गेले. त्यानंतर ती परत आलेली नसल्याने तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. बेपत्ता रेशम हिचे वर्णन असे – अंगाने मध्यम, उंची पाच फुट, गोरा रंग, गोल चेहरा, रुंद कपाळ, सरळ लांब नाक. अंगात निळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढऱ्या रंगाची फुलांची डिझाईन, निळ्या रंगाची विजार, पायात चप्पल. ती हिंदी व मराठी भाषा बोलते.

शेडशाळ जवळ कृष्णा नदी पात्रात मगरीचा वावर

इमेज
  अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : शेडशाळ ( ता शिरोळ)  येथील कृष्णा नदी पात्रामध्ये मगरीचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. सदर मगर काही वेळा नदी काठावर दिसून आली आहे .त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठावर बहुतांशी शेतकरीवर्गाचे कृषीपंप चालु-बंद करण्याचे मुख्य स्विचपेटी आहेत.यामुळे शेतीसाठी पाणी उपसा पंप चालू बंद करण्यासाठी शेतकर्‍यांना येथे रात्री- अपरात्री ये -जा करावी लागते. तसेच गावातील बहुतांशी महिलावर्ग कृष्णानदीकाठावर कपडे- धुणे धुण्यासाठी, व नागरिक अंघोळीसाठी जातात. मच्छीमार मासेमारीसाठी या नदीपात्राचा वापर करतात. सध्या येथील नदीपात्रात मगरीचा वावर दिसल्याने नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करुन वन्यप्राण्यासाठी सुरक्षित असलेल्या योग्य त्या ठिकाणी सोडण्यात यावे. अशी मागणी शेडशाळ मधील ग्रामपंचायत व ग्रामस्थांमधून होत आहे.   शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीहुन शेडशाळ,कवठेगुलंद,गौरवाड, औरवाड,नृसिंहवाडीपर्यंत कृष्णा नदी पुर्वेकडुन पश्चिशमेकडे वाहते.तर नृसिंहवाडीह...

प्रोत्साहन पर अनुदान द्या अन्यथा टाळे ठोका आंदोलन : विश्वास बालिघाटे

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शासनाने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केले होते. मात्र, गेल्या 6 वर्षापासून आम्हाला अनुदान मिळाले नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील अनुदान न मिळाल्यामुळे तात्काळ आमच्या हक्काचे अनुदान द्या, अन्यथा शिरोळ येथील निबंधक कार्यालयाला आंदोलन असा इशारा निवेदनाद्वारे शेतकर्‍यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र शासनाने 2019 साली नियमीत कर्ज भरणार्‍या पात्र शेतकर्‍यांना 50 हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते. मात्र, शिरढोण (ता.शिरोळ) येथील विश्वास बालीघाटे, अमोल चौधरी, श्रीकांत पुजारी, नानासो मगदूम, विजय बिरोजे, रोहित चौगुले या शेतकर्‍यांना गेल्या सहा वर्षापासून प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही. गेल्या 5 ते 6 वर्षापासून सतत पाठपुरावा करीत असून शिरोळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालय, कोल्हापूर येथील डीडीआर कार्यालय यांच्याकडे निवेदन देऊन आंदोलन केले. तरीही आमचे अनुदान मिळाले नाही. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत आमच्या हक्काचे प्रोत्साहनपर अनुदान रक्कम न मिळाल्यास गुरुवार (दि.18) रोजी शिरोळ येथ...

सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाजाला मिळणार हक्काचे व्यासपीठ : संजय पाटील यड्रावकर

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  गेल्या अनेक वर्षांपासून कुरुंदवाड शहरात वास्तव्यास असलेला शिकलगार समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मागे पडलेला होता. समाजाला स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ नसल्याने सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाला जागेची उपलब्धता करून देऊन ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने सांस्कृतिक हॉलची उभारणी सुरू झाली आहे. या हॉलच्या माध्यमातून समाजाला आपली कला, संस्कृती, विचार आणि परंपरा जोपासण्यासाठी एक भक्कम मंच उपलब्ध होणार आहे. निश्चितच या सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाज विकासात्मक दिशेने मोठे पाऊल टाकेल आणि समाजाची प्रगती गतीने होईल, असे प्रतिपादन जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले. कुरुंदवाड शहरातील शिकलगार वसाहतीत सांस्कृतिक हॉल स्लॅबच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, शिकलगार समाजाने आजवर अनेक अडचणींवर मात करू...

अध्यात्मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून आयबीआर अचीव्हर पुरस्कार प्रदान

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :     येथील प्रमोद गुंडू सदलगे यांचा केवळ एक वर्ष नऊ महिने (पावणेदोन वर्षे) वयाच्या  "चि. अध्यात्म"  या मुलग्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स् या संस्थेकडून आय बी आर अचीव्हर या विशेष उल्लेखनीय प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले. अवघ्या पावणेदोन वर्षाच्या बालकाच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. अध्यात्मने अवघ्या पावणेदोन वर्षाच्या वयात १८ प्राण्यांची नांवे, ६ समुद्री प्राण्यांची नांवे, १० नेत्यांची नांवे, १० वाहनांची नांवे, ६ भाज्या, ६ फळे, १० संसारोपयोगी वस्तू, ८ पक्षी, ६ ऐतिहासिक स्थळे,  ८ मानवी शरीराचे अवयव, ८ चांगल्या सवयी , ६ कीटक, ५ राष्ट्रीय प्रतीके (सिंबॉल) यांची नांवे आणि कन्नड आणि इंग्लिश मुळाक्षरांचे पाठांतर अशा सर्व चाचण्यात लीलया उत्तरे देऊन यश संपादन केले. यामागे अध्यात्मच्या आईची सौ.श्रुतीची प्रमुख भूमिका असते हे जाणवले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था भारत सरकारच्या आर एन आय(RNI) शी संलग्न आहे. तसेच हो ची मिन्ह या व्हिएतनाममधील शहरात नॅशनल रेकॉर्ड बुक्स च्या एशीयन प्रोटोकॉल ऑफ रेकॉर्ड्स चे...

जयसिंगपूरमध्ये तरुणीची आत्महत्या

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर शहरातील अवचितनगर येथे एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे नाव सारिका रमेश कुन्नुरकर (वय 35, रा. अवचितनगर, समडोळे मळा, जयसिंगपूर) असे असून तिने 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरातील तुळईस दोरीने गळफास लावून जीवन संपवले. या घटनेची माहिती वर्दिदार संजय तुकाराम कलगुटगी (वय 49, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, जयसिंगपूर) यांनी पोलिसांना दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

जयसिंगपूर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत सोन्याचे गंठण लंपास

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर येथील एस.टी. बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेला गंडवून जवळील सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता मल्लाप्पा पुजारी (वय 45, रा. कोथळी, ता. शिरोळ) या महिला 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान जयसिंगपूर एस.टी. स्थानकात बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले. या गंठणामध्ये सुमारे 5 ग्रॅम सोन्याचे 75 मणी व 5 ग्रॅम वजनाचे पेंडल होते. 2018 मध्ये तयार केलेले हे दागिने जुने वापरते असून त्याची किंमत अंदाजे 49 हजार रुपये एवढी आहे.

व्ही-बीएसएल कंपनीचा मुख्य सूत्रधार विजय जगदाळे कर्नाटकातून अटक

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल 62 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्ही-बीएसएल इंडिया प्रा. लि. कंपनीचा मुख्य सूत्रधार व मॅनेजिंग डायरेक्टर विजय नाथा जगदाळे (वय 40, रा. जयसिंगपूर) याला कर्नाटकातील जमखंडी येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. फिर्यादी उत्तम दत्तात्रय निकम (रा. पाचगाव, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे विविध कलम तसेच एमपीआयडी कायदा 2008 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. 17 मे 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत जयसिंगपूरमधील आदिसागर अपार्टमेंट येथील कंपनीच्या कार्यालयातून तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारली गेली. कंपनीचे प्रमुख विजय जगदाळे, संचालक नंदा जगदाळे व एजंट सचिन उदगावे, सलीम आळतेकर, संकेत सुर्यवंशी यांनी आयुर्वेदिक औषधे, पेये व दैनंदिन वापरातील वस्तू विक्रीसाठी फ्रँचायसी देण्याचे आश्वासन दिले. त्याबरोबर दुकानभाडे, कामगारांचा पगार व 30% नफा परतावा मिळेल असे सांगून गुंतवणूकदारांना भुलवले. मात्र प्रत्यक्षात कराराप्रमाणे कोणताही परतावा न देता मूळ रक्कमही न परतवल्...