मिरजेत अखेर पुष्पा झुकला ; अडीच कोटींचे रक्तचंदन पोलिसांनी केली जप्त
मिरज / शिवार न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील मिरज येथे अडीच कोटी रुपये किंमतींचे लाल रक्तचंदन गांधी चौकी पोलिसांनी जप्त करत एकाला अटक केली आहे. मिरज - कोल्हापूर रस्त्यावर सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून रक्तचंदनाच्या तस्करीवर आधारीत 'पुष्पा' चित्रपटाची चर्चा असताना रक्तचंदनाच्या तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पुष्पा चित्रपटाची क्रेझ सध्या सुरु असून मिरजेत मात्र ओरिजनल पुष्पा पोलिसांनी जेरबंद केल्याने अखेर पोलिसांसमोर या पुष्पाला झुकावे लागल्याची चर्चा मात्र सुरु आहे. रक्तचंदनाची बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्याला चांगली किंमत आहे. सांगली जिल्ह्यात सोमवारी पहाटे रक्तचंदनाची होणारी तस्करी गांधी चौकी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडली. 2 कोटी 45 लाख 85 हजार रूपयांचे रक्तचंदन आणि 10 लाख रूपयांचा कर्नाटकातील टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण 2 कोटी 45 लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी टेम्पो चालक यासीन इनायतउल्ला खान (रा. अदिग्रहकलहळी, ता.अनीकल जि. बेंगलोर, कर्नाटक) याला अटक केली आहे. आरोपीने ही चंदनाची लाकडे ...