पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी यड्रावकर गटात याआधीच प्रवेश केलेला असून यापुढेही यड्रावकरांकरिताच काम करणार- विश्वास बालीघाटे.

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची विकासात्मक दृष्टीकोन पाहून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे लोकप्रिय आमदार मा.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत राहण्याचा मी व माझ्या इतर सहकार्यांनी ठरविलेले असून यापुढेही त्यांच्यासाठीच काम करत राहणार,काल जो प्रकार घडला तो लोकांत गैरसमज पसरवणारा होता,काल जबरदस्तीने माझ्या छातीला बिल्ला लावून लोकांत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला गेला,कृपया याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये मी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर  साहेबांसोबत एकनिष्ठ असून याबाबत मी आमदारसाहेबांशी भेटून माझी भूमिका स्पष्ट केली आहे.यावेळी दिलीप पाटील,विलास चौगुले,रूपचंद शिंदे,शितल दनाने,संजय मालगावे,रावसाहेब यमकमरडे,बाळू तेरदाळे,राजू हसुरे,रावसाहेब शिवमुर्ती,महेश गौराजे उपस्थित होते.

हातकणंगले तालुक्यातील "डी.एम. गँग" कोल्हापूर जिल्हयातून सहा महिन्यांसाठी हद्दपार

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हयात सामाजिक हितास बाधा आणणाऱ्या व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी "डी.एम. गँग" या कुख्यात टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार, दस्तगीर हसन महालिंगपुरे (टोळी प्रमुख), संतोष कृष्णा गोसावी, आणि विलास ज्ञानु मिसाळ यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक आणि समाजाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक, हातकणंगले यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत हद्दपारी प्रस्ताव सादर केला होता, जो चौकशीअंती मान्य करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याचे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपारीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

जयसिंगपुरातील वडार समाजाचा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर शहरातील संपूर्ण वडार समाजाने राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा दिला. समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेतलेल्या आमदार यड्रावकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धारही यावेळी समाजातील बांधवांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष गंगाराम माने म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वडार समाजाच्या सांस्कृतिक हॉल आणि रस्त्यांसाठी जयसिंगपूरच्या इतिहासात नोंद होईल असा तब्बल ७ कोटींचा निधी दिला आहे. समाजातील विद्यार्थी युवक घडले पाहिजेत पारंपारिक व्यवसायात न गुंतता ते सक्षम झाले पाहिजेत यासाठी आमदार यड्रावकर यांनी वेळोवेळी वडर समाजाला साथ दिली आहे. जयसिंगपूरचा पाया असलेल्या संपूर्ण वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमदार यड्रावकर यांनी घेतल्याने संपूर्ण वडार समाज आमदार यड्रावकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, आणि येत्या निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन निवडून आणेल, असा विश्वास यावेळी वडार समाजातील बांधवांनी व्यक्त केला.  यावेळी समाजाचे जेष्ठ नेते...

मी हयात असेपर्यंत अकीवाट, टाकळीवाडी परिसरातील अतिक्रमणित एकाही घराची वीट हलणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : राज्य शासनाच्या माध्यमातून तालुक्याच्या अकिवाट टाकळीवाडी परिसरामध्ये मंजूर झालेल्या शासकीय औद्योगिक वसाहतीच्या गायरान जमिनीवर अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांच्या कोणत्याही घराची वीट मी जिवंत असेपर्यंत हलणार नाही सामान्य माणसांची घरे आहे त्या परिस्थितीत कायम ठेवून या ठिकाणी औद्योगिक वसाहती मधील उद्योगांना जागा दिली जाईल, येणाऱ्या वर्षभराच्या कार्यकाळात अकीवाट टाकळीवाडीसह तालुक्याच्या गायरान क्षेत्रात असलेली सर्व अतिक्रमणे नियमित करून या अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देईन आणि याच परिसरात बेरोजगार तरुणांच्या बरोबरच परिसरातील पाच हजार महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या औद्योगिक वसाहतीच्या जागेत अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांच्या महिला शिष्टमंडळाला दिली. विरोधक सोशल मीडिया वरून जाणून बुजून चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत, मतदानाच्या दिवसापर्यंत असा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जाईल त्यांच्या या खोट्या प्रचाराला आपण थारा देऊ नका मी पहिल्...

नगरपरिषदेतर्फे शहरात मतदान जनजागृती मोहिम

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांचे पालन करीत शिरोळ नगरपरिषदेतर्फे शहरात मतदान जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, नागरिक, नगपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत जागृती फेरी, सायकल रॅली , दिवे प्रज्वलन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.           निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार (SVEEP) गतवेळच्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या शहर व प्रभागामध्ये मतदान जनजागृती करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या . त्या अनुषंगाने पोस्टर्स प्रदर्शन, शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून मतदानास आवाहन करण्यात आले.         येथील श्री पद्माराजे हायस्कुल व जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून शहरातील नवमतदारांमध्ये मतदानाबाबत आवाहन करण्यात आले. बाजारपेठेमध्ये विक्रेते, नागरिक यांचेमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.       दिपावली सणाचे औचित...

मी हयात असेपर्यंत अकीवाट टाकळीवाडी परिसरातील अतिक्रमणित एकाही घराची वीट हलणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
  खोट्या प्रचाराला थारा देऊ नका ; वर्षभरात अतिक्रमण धारकांची घरे नियमित करून त्यांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणार जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  राज्य शासनाच्या माध्यमातून तालुक्याच्या अकिवाट टाकळीवाडी परिसरामध्ये मंजूर झालेल्या शासकीय औद्योगिक वसाहतीच्या गायरान जमिनीवर अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांच्या कोणत्याही घराची वीट मी जिवंत असेपर्यंत हलणार नाही सामान्य माणसांची घरे आहे त्या परिस्थितीत कायम ठेवून या ठिकाणी औद्योगिक वसाहती मधील उद्योगांना जागा दिली जाईल, येणाऱ्या वर्षभराच्या कार्यकाळात अकीवाट टाकळीवाडीसह तालुक्याच्या गायरान क्षेत्रात असलेली सर्व अतिक्रमणे नियमित करून या अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देईन आणि याच परिसरात बेरोजगार तरुणांच्या बरोबरच परिसरातील पाच हजार महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या औद्योगिक वसाहतीच्या जागेत अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांच्या महिला शिष्टमंडळाला दिली. विरोधक सोशल मीडिया वरून जाणून बुजून चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत, मतदानाच्या दिवसा...

जिल्ह्यातील 3 हजार प्राथमिक व 2 लाख 51 हजार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनीप पत्र लेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :      महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम सुरु असून या अंतर्गत विविध माध्यमांतून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 85 प्राथमिक व सुमारे 2 लाख 51 हजार 278 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांना मतदानाचे आवाहन करणारे पत्र लिहून घेवून ही पत्रे पोष्टाद्वारे पाठविण्यात आली आहेत.  त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कापड व्यापारी, स्वीट मार्टस्, गीफ्ट आर्टिकल सेंटर्स, मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे दिपावली सणानिमित्त खरेदीसाठी येणा-या लोकांना स्टिकर्सद्वारे मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. स्टिकर्सवर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी क्यू आर कोडद्वारे सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ...

बोरगाव येथे जय गोमटेश विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघास मंजुरी : चेअरमन शरदराव जंगटे यांची माहिती

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :   बोरगाव येथे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री,आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष सहकार्याने शेतकऱ्यांचां विकास व प्रगतीसाठी नव्यानेच बोरगांव मध्ये श्री जय गोमटेश विविध उद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संघास मंजुरी मिळाली असल्याची माहिती संघाचे चेअरमन शरदराव जंगटे यांनी दिली.             भागातील शेतकरी व सातबारा धारकांच्या उद्धारासाठी शिवाय शासनाच्या विविध शासकीय योजनांचा सर्वाधिक लाभ तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या या प्राथमिक विविध उद्देशीय सहकारी संघाचा शुभारंभ लवकरच जोल्ले दाम्पत्यांच्या सह जिल्ह्यातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रशांत गुंडे यांनी सांगितले.      शहरासह पंचक्रोशीतील जे शेतकरी अद्याप अशा शासकीय पीक कर्जा योजनेपासून दूर आहेत.अशा सर्व सातबारा धारक शेतकऱ्यांनी आपल्या संस्...

शिरोळ मतदारसंघात निवडणूक निरीक्षक विश्वमोहन शर्मा यांची भेट

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक विश्वमोहन शर्मा यांनी आज भेट देऊन निवडणूक तयारीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी मीडिया कक्ष, आचारसंहिता कक्ष, मोजणी सेंटर, डिस्पॅच सेन्टर आणि स्ट्राँग रूमची पाहणी केली. त्यांनी निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या सर्व सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत, प्रत्येक विभागाच्या कार्यप्रणालीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निरीक्षक शर्मा यांनी निवडणूक प्रक्रियेत नियोजनाबाबत सूचना दिल्या. विशेषतः स्ट्राँग रूमच्या संरक्षण व्यवस्थेची बारकाईने तपासणी करून सुरक्षा बळकटीवर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी मतदान आणि मोजणीच्या प्रक्रियेतील आवश्यक खबरदारी उपाय व कर्मचारी व्यवस्थापनाबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी नष्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोथळीतून मोठे मताधिक्य देऊन आमदार यड्रावकर यांचे ऋण फेडणार : धनगोंडा पाटील

इमेज
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा कोथळीतून प्रचार शुभारंभ  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जात - पात, गट - तट न पाहता कोथळी गावासाठी तब्बल २१ कोटी ७० लाखाचा भरघोस निधी दिला असल्याने कोथळी गावचा कायापालट झाला आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी संपूर्ण कोथळी गाव मताच्या रुपातून आमदार यड्रावकर यांना पाठबळ देऊन पुन्हा विधानसभेत पाठवू, असा विश्वास ज्येष्ठ नेते पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील यांनी व्यक्त केला. राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोथळीसह परिसरातील गावभेटी घेतल्या. यावेळी ते बोलत होते.  प्रारंभी कोथळी येथील जागृत देवस्थान मंगेश वर मंदिरात प्रचाराचा शुभारंभ पै. शंकर पुजारी, बाहुबली इसराण्णा, विजय खवाटे, आकाराम पुजारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी बोलताना महावीर पतसंस्थेचे संचालक बाहुबली इसराण्णा म्हणाले, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून कोथळी गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. पायाभूत सु...

गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : रावसाहेब भिलवडे यांचे आवाहन

इमेज
  शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार पूर्ण ताकतीने करणार आहे. तसेच उद्या 29 ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांनी केले.      शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ची कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बैठक शिरोळ येथे पार पडली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.        रावसाहेब भिलवडे पुढे म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या महायुतीच्या कारभारावर जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐरणीवर असून महागाई, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांच्या सुखदुःखाशी महायुतीचे काही देणे घेणे नाही. केवळ घोषणा करायच्या आणि श्रेयवाद लाटायचे हीच भूमिका घेऊन काम केले जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. राज्याचा सर्वांगीण विकास साधायचा अस...

शिरोळचे डॉ दगडू माने यांचा ' प्रहार ' संघटनेला रामराम

इमेज
डॉ. दगडू माने यांनी दिला प्रहार संघटनेचा राजीनामा शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू श्रीपती माने ( शिरोळ ) यांनी कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला आहे. आमदार बच्चुभाऊ कडू व स्वीय सहाय्यक गौरवभाऊ जाधव यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र मेलद्वारे पाठवले आहे.        माने यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ३२ वर्षे कार्यरत आहे. प्रहार चे संस्थापक - अध्यक्ष व आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यावर प्रभावित होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष काम करीत आहे. प्रहार पदाधिकारी यांची चांगली साथ मिळाल्याने गोरगरिब, निराधार , कष्टकरी व दिव्यांग यांच्यासाठी लढा देऊन प्रामाणिकपणे सामाजिक कार्य केले . आमदार बच्चुभाऊ यांच्यामुळे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला बळ मिळाले .       काही कारणास्तव आणि घरच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे प्रहार संघटनेच्या कामासाठी वेळ देता येत नाही. प्रहार नेतृत्वाचा...

महाविकास आघाडीतून गणपतराव पाटील उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्याचे ठरवले आहे. छत्रपती शिवाजी चौकातून शिरोळ शहरात शक्ती प्रदर्शन करत, मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात गणपतराव पाटील अर्ज दाखल करणार आहेत. गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांनी शिरोळ तालुक्यातील मतदार आणि समर्थकांसमवेत संवाद साधत गाठीभेटीवर जोर दिला आहे. या शक्ती प्रदर्शनात तालुक्यातील प्रमुख नेते आणि पाटील यांच्या समर्थकांची उपस्थिती राहणार आहे.

शिरोळ तालुक्यात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा : युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर

इमेज
  दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील जनतेसाठी विविध विकासकामांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत, त्यांनी आधुनिक आरोग्य सुविधांची उभारणी केली आहे. त्यांच्या या योगदानामुळे शिरोळ तालुका आज विकासाचे एक आदर्श मॉडेल बनले आहे, असे गौरवोद्गार युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आदित्य पाटील यड्रावकर यांनी दानोळी येथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना आमदार पाटील यांना पुढील काळातही पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आमदार डॉ. पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे तालुक्यातील विविध सोयी-सुविधांमध्ये प्रगती साधली गेली आहे. विशेषतः आरोग्य सुविधा निर्माण करून त्यांनी तालुक्यात आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यापुढे शिरोळ तालुक्यात विकासाची गंगा वाहत ठेवण्यासाठी आणि शिरोळ तालुका एका विकासाच्या उंचीवर पोहोचवण्यासाठी आमदार यड...

वि.मं.खणदाळ शाळेची सलग दुसऱ्या वर्षी विभागीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

इमेज
सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क : नवे पारगाव येथे झालेल्या 14 वर्षांखालील शासकीय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत वि.मं.खणदाळ शाळेने प्रथम क्रमांक मिळवून सलग दुसऱ्या वर्षी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने खेळाडूंची मिरवणूक काढण्यात आली आणि जंगी स्वागत करण्यात आले. संघाचा पहिला उपांत्य सामना शाहूवाडीच्या संघासोबत झाला. वि.मं.खणदाळ शाळेने 4-2 च्या फरकाने हा सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात राजर्षी शाहू विद्यानिकेतन, शिंगणापूरच्या संघासोबत चुरशीचा सामना झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि सामना दोन वेळा ट्रायबेकरवर 2-2 असा बरोबरीत गेला. अखेरीस, सडनडेथवर वि.मं.खणदाळ शाळेने विजय मिळवला आणि विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. खेळात सहभागी झालेले खेळाडू पूर्वा चिरमुरे ,विद्याश्री धनवडे ,सेजल घोडके ,श्रावणी जाधव ,सावित्री मोरे ,श्रृती पाटील ,स्नेहा पाटील ,प्रगती कोणूरी ,प्राजक्ता दळवाई ,प्रतिक्षा मगदूम ,मनुजा घोडके या यशस्वी कामगिरीसाठी प्रशिक्षक रवि यरकदावर, अमित चव्हाण, मारूती कोलूनकर आणि संघ व्यवस्थापक सौ. राजश्री मगदूम यांचे मार्गदर्शन ला...

बोरगांव सरकारी शाळेतील तेजस माळी यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : बोरगांव येथील पी.एम्. श्री. सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरगाव या शाळेतील इयत्ता 7 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. तेजस- सागर माळी याने म्युन्सियल हायस्कूल निपाणी येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडास्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.     या विद्यार्थ्याने प्राथमिक शालेय गटात थाळीफेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला तसेच गोळाफेक स्पर्धेत निपाणी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून या दोन्ही क्रीडाप्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याला शाळेचे क्रीडाशिक्षक श्री.डी. टी. हेगडे, मुख्याध्यापक श्री. आर. एम. पकाले सर्व शिक्षकवर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मराठी शाळेचे एस डी.एम.सी समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजी भोरे आणि सर्व सदस्यांच्या पाठिंब्यामुळे त्याने हे धवल यश प्राप्त केले आहे. तेजस माळी यांचे बोरगांव सह परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.                             

बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा सभासदांना १६ टक्के लाभांश - चेअरमन अण्णासाहेब हवले

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :              बोरगाव येथे श्री सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी मार्फत चालू आर्थिक वर्षात सभासदांना 16 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केल्याने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आण्णासाहेब हवले यांनी दिली.      सन 1999 साली शेतकऱ्यांचा उद्धार आणि पंचक्रोशीचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने सहकार नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी श्रीन सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना केली.सभासद हा संस्थेचा सहकार क्षेत्रातील मूलभूत कणा समजून संस्थेबरोबर सभासदांचे हि हित जोपासले पाहिजे या उद्देशाने अण्णासाहेब हवले यांनी सहकारी संचालकांच्या मदतीने संस्था स्थापनेपासून आजतागायत सर्वाधिक 16 टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.त्यामुळे श्री सिद्धेश्वर पतसंस्था म्हणजे केवळ बोरगाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सहकार क्षेत्रात सभासदांचे हित जोपासणारी एकमेव संस्था असल्याचेही अनुभवास येत आहे.अशा य...

सन्मति विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे दिला मतदानाचा संदेश

इमेज
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :  तारदाळ येथील सन्मति विद्यालयात पोस्ट कार्डातील पत्राद्वारे विद्यार्थ्यांनी जनतेला मतदानाचा संदेश दिला.  तहसील कार्यालय हातकणंगले अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम या अंतर्गत उपक्रम राबवण्यात आले मुख्याध्यापक श्री सी.जी तेरदाळे यांनी मतदान जनजागृतीपर आधारित पत्राद्वारे जनजागृती उपक्रमाचे कौतुक करून मतदानाचा अधिकार व लोकशाही यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.       यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांना, समाजाला मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आई-वडील, पालक यांना सजग करावे व आपल्या मतदानाच्या अधिकारातून विधान सभा प्रतिनिधी निवडावा. भारतीय संविधानाने नागरिकाला मतदानाचा सर्वश्रेष्ठ हक्क प्रदान केला आहे या हक्काचा सर्वांनी उपयोग करावा असे सांगितले. मोहन बाळकृष्ण नर्मदे पोस्टमन स्वतः शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यां कडून पत्रे स्वीकारले या उपक्रमासाठी श्री जितेंद्र अनुजे ,सौ ए. ए. हिंगलजे. श्री पी एन मगदूम श्री विकास बरगाले सौ वंदना कुंभोजकर यांनी परिश्रम घेतले विद्यालयाचे या कार्याचे पर्यवेक्षक श्री.प...

स्वाभिमानी शेतकरी संघटना २३ वी ऊस परिषदेतील ठराव

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : १) यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे परतीच्या पावसामुळे मात, भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे देखील झालेले नाहीत. राज्य सरकारने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. २) गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपुर्वी तातडीने २०० रूपये दुसरा हप्ता देण्यात यावा. ३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी मागणी करून देखील साखर आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व सारवर कारखान्यांचे काटे ऑनलाईन झालेले नाहीत. राज्य सरकारने तातडीने सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करून एकाच सिस्टिममधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत. ४) राज्यातील ऊस तोडणी मुकादमांनी ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातलेला आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. ज्या मुकादमांनी फसवले आहे, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून ऊस वाहतूकदारांचे पैसे वसूल करून द्यावेत. अथवा मुकादमांनी पैसे बुडविलेल्या वाहनधारकांचे कर्ज माफ करावे. ५) साखर...

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उसळला जनसागर

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या पाच वर्षात सर्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न माझ्या हातून झाले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तालुक्यात वैद्यकीय सेवा निर्माण केली आहे. या सर्व विकासकामांच्या माध्यमातून आजपर्यंत २ हजार कोटींची विकास कामे करण्यात मला यश आले. आणि त्याला आपल्या सर्वांची साथ मिळाली. यापुढेही शिरोळ तालुक्यातील जाती - पातीच्या राजकारणाला मूठमाती देण्यासाठी मला संधी द्यावी, असे प्रतिपादन राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.  जयसिंगपूर येथील यड्रावकर लॉन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला, यावेळी आमदार बोलत होते.  यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, शिरोळ तालुक्यातील सर्वांगीण विकास साधत असताना सर्व समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपली जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी शेतकरी कर्जाच्या खाईत जात होता, हे लक्षात घेऊन शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून घेतला आणि २० टक्के शेत...

प्रतीक्षा बेडगे हिचा राज्यस्तरीय शालेय जुदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क ; नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड ची विद्यार्थिनी प्रतीक्षा राजेंद्र बेडगे हिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जुदो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. कुमारी प्रतीक्षा बेडगे ही दत्त कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी कला शाखेची विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीची तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये अत्यंत दमदार कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सतत सराव व योग्य मार्गदर्शन या जोरावर या स्पर्धेत अत्यंत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला असे यावेळी कुमारी प्रतीक्षा हिने म्हटले.     या खेळाडूस संस्थेचे संचालक मा .श्री. गौतम पाटील ,कार्याध्यक्ष मा. श्री .गणपत दादा पाटील, उपसंचालक श्री .बी .आर थोरात, उपसंचालक श्री.डी. एस माने ,शाखेचे कार्याध्यक्ष श्री. माने गावडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .रावसाहेब पाटील, सदस्य श्री.दामोदर सुतार , सदस्या श्रीमती विनया घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री आर जे पाटील, क्रीडाशिक्षक श्री .एस. एस गडदे ,महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मा...

शिवसेना ठाकरे गटाच्या 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा- कोणाला कुठून संधी

इमेज
मुंबई :  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यात 65 जणांचा समावेश आहे. वाचा संपूर्ण यादी...कोणाला कुठून मिळाली उमेदवारी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू होता. परंतु आता हा वाद निवळला असून शिवसेना ठाकरेंच्या वतीने आज पहिली यादी जाहीर करण्यात आली.

स्वाभिमानीचे आंदोलन सम्राट विश्वास बालिघाटेंसह शिरढोण येथील पदाधिकाऱ्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

इमेज
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेला रामराम ठोकून यड्रावकर गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. स्वाभिमानीचे आंदोलन सम्राट विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी संघटनेचा सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रमुखपणे विश्वास बालिघाटे, दादासो चौगुले, रूपचंद शिंदे, विलास चौगुले, संजय मालगावे, तानाजी पुजारी, रावसो चौगुले (शिवमूर्ती), महावीर गौराजे, रावसो यमगर, बाबासो मालगावे, राजू पाटील (हसुरे), भीमराव बेबडे, प्रकाश जाधव, आनंदा घोरपडे, स्वप्निल सिदनाळे, जगन्नाथ बीरोजे, दादासो न्हावी, दिगंबर शिंदे, मनोहर मुजगोंडा, शितल दनाने यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला.

टाकवडे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील तनवीर शकील शेख (वय 25) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ रोजी सकाळी घडली आहे.  मयत तनवीर याने आपल्या घरातील लाकडाच्या तुळीला ओढणीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची वर्दी वजीर दस्तगीर शेख (वय ४९) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. वजीर दस्तगीर शेख यांनी दिलेल्या वर्दीनुसार, त्यांनी मयताला त्याच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळले. लगेच त्यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात जाऊन घटना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. मयताचा आत्महत्येचा कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरूस २५ नोव्हेंबर पासून

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस हा कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवार पासून म्हणजेच सोमवार दि. १८ नोव्हेंबर २०२४ पासून ते गुरुवार दि. २१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत होणार होता, पण या कालावधीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने हा उत्सव व उरूस सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ अखेर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिरोळ पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव आणी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे  श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरूस साजरा करणे दिनांक १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत अपेक्षित आहे. तथापी सदर कालावधीमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता कार्यरत असणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. यामुळे सदरचा उत्सव / उरूस एक आठवडा पुढे ढकलणे आवश्यक झालेले आहे. तरी सदरचा उत...

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा २४ रोजी जयसिंगपूर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाला उधाण येत आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबर रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सांगली - कोल्हापुर रोड लगत असलेल्या आंबा भडंग जवळील यड्रावकर लॉन येथे सकाळी ९ वाजता कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. आमदार यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय नेते म्हणून ओळख निर्माण केली आहे. आमदार यड्रावकर यांनी विकास कामात सर्वच समाजाला सामावून घेतल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली आहे. शिरोळ मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात समर्थक, स्थानिक नेते आणि गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय क्षेत्रातील अनेकांचे लक्ष ला...

बोरगाव येथील रवीवार आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य, पूर्ववत जागेवरच बाजार भरवा : नगरसेवक शरदराव जंगटे

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :  बोरगाव येथील रवीवार आठवडी बाजार हा पूर्ववत जागेवरून शहराच्या बाहेरील बाजूस नव्याने भरविला जात आहे.सदर बाजार ठिकाणाच्या मार्गावर दोन्ही बाजूने घाणीचे साम्राज्य विखुरले आहे.शिवाय या बाजाराचे ठिकाण हे गावभागापासून दूर अंतरावर असल्याने विशेषतः महिला वर्गांला याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे सदर बाजाराचे ठिकाण बदलून पुन्हा शहराच्या मध्यभागी पूर्ववत जागेवरच भरावा अशी मागणी नगरसेवक शरद जंगटे यांनी केली आहे.         बोरगाव येथे आठवड्यात रविवार,बुधवार असे दोन बाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरले जातात.शहराबरोबर परिसरातील गावाच्या लोकांचा वावर या बाजारपेठेत अधिक प्रमाणात असल्याने परिणामी या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे पहावयास मिळते. येथील रविवारी आठवडी बाजार हा शहराच्या मध्यभागी प्रमुख रस्त्यावर एपीएमसी मार्केट समोर असलेल्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून भरवला जात असायचा. पण काही दिवसांपासून हा आठवडी बाजार कोणतेही कारण नसताना या-ना - त्या कारणावरून शहराच्या बाहेरील बाजूस येणाऱ्या व स्मशानभूमी पासून जवळच असलेल्या जागेवर भरवला जात आ...

हेरवाडच्या श्री संतुबाई यात्रेची तयारी सुरू, पावती बुकाचा शुभारंभ

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड गावातील प्रसिद्ध ग्रामदेवता ब वर्ग तीर्थक्षेत्र श्री संतुबाई यांच्या वार्षिक यात्रेच्या निमित्ताने यात्रेच्या पावती बुकाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. हेरवाड गावात दरवर्षी दीपावली पाडव्यापासून या यात्रेचे आयोजन करण्यात येते. मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने केले जाते. यंदाही यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यात्रेचे मुख्य आकर्षण धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, जंगी कुस्त्यांचे मैदान, तसेच धनगरी ढोल वादन स्पर्धा असतात. यात गावातील आणि बाहेरून आलेले कलाकार सहभागी होतात, ज्यामुळे यात्रेचा रंग अधिकच वाढतो. या सोहळ्यात गावकऱ्यांसोबतच धनगर समाजाचेही विशेष योगदान असते. ग्रामपंचायत पदाधिकारी, धनगर समाज आणि स्थानिक ग्रामस्थांनी या यात्रेची तयारी मोठ्या उत्साहात सुरू केली आहे.

आजपासून शिरोळ तालुक्यात भरारी पथकाची टेहाळणी : रात्री १० नंतर हॉटेल, बार सुरू राहिल्यास होणार कारवाई

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे कठोर पालन करण्यासाठी १२ जणांच्या माध्यमातून ६ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी आजपासून तालुक्यात गस्त घालणे सुरू केले असून, रात्री १० नंतर हॉटेल्स, बार किंवा अन्य व्यवसाय सुरू राहिल्यास त्वरित कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून हे पथक सतर्क राहणार असून कोणत्याही बेकायदेशीर घडामोडींवर कठोर पावले उचलणार आहे. शिरोळ तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करण्यासाठी या पथकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. एकूण सहा पथके तैनात करण्यात आली आहेत, ज्यापैकी तीन पथके दिवसभर कारवाईवर लक्ष ठेवतील, तर उर्वरित तीन पथके रात्रीच्या वेळी गस्त घालतील.  रात्री १० नंतर हॉटेल्स, बार आणि अन्य व्यवसाय सुरू ठेवणे आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाणार आहे. त्यामुळे या पथकाने अशा ठिकाणांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पथकाच्या कामगिरीची नियमितपणे नोंद घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांना अहवाल सादर केला जाणार आहे. आचारसंहितेचे उ...

बोरगांव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून विक्रमी बोनस वाटप

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :                                            दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. बोरगांव येथील दूध संघाच्या वतीने सभागृहात सभासदांना वितरण करण्यात आले.           पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले की संघाकडून यावर्षी म्हैस विभागातून २ लाख, ३३ हजार, ६१५५ लिटर दूध तर, गाय विभागातून ८० हजार, ६०३ लिटर दूध उत्पादकांनी दूध पुरवठा करत एकूण सालात ३ लाख १४ हजार २१८ लिटर दूध संकलन करण्यात आले आहे. तसेच दूध उत्पादका बरोबरच ग्राहकांनाही संघाकडून भेटवस्तू देण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी दूध उत्पादकांना आपण उच्चकी बोनस देत असतो. यावर्षी म्हैस दूध उत्पादकांना ४ टक्के व गाय दूध उत्पादकांना ३ टक्के बिना कपात बोनस दिले आहे. एकूण सभासदांना सुमारे ५ लाख ६२ हजार ३०१ रुपये विक्रमी ब...

कॅन्सर मुक्तीसाठी सेंद्रिय शेती व देशी गाय संगोपन गरजेचे : माधवराव घाटगे

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  गुजरातमध्ये गोमुत्रामुळे कॅन्सर रोग बरा झाला तसा शिरोळ तालुका कॅन्सर मुक्त करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी देशी गाय पाहिजे. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्यास मदत होईल असे प्रतिपादन, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले      कुरुंदवाड येथे रामेश्वर कृषी विकास विज्ञान मंडळाच्यावतीने गायीचे पूजन व गोरक्षकांचा सत्कार मान्यवरांचा सत्कार केंद्र व राज्य सरकार गाईसाठी पन्नास रुपये अनुदान दिल्याबद्दल जाहीर आभार कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना ते बोलत होते. गायींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री घाटगे म्हणाले, वीस वर्षांपूर्वी ज्वारी सोयाबीन हरभरा ऊस इत्यादी पिके जोमाने येत होती. ऊस ७०-८० टन उत्पादन निघत होते. जमिनीची सुपीकता व ताकद होते. रासायनिक खते आली. कीटकनाशके, औषधे यामुळे जमिनीचा कस बिघडत चालला आहे. ८० टन उत्पादन घेण्यासाठी गोमूत्र सेंद्रिय शेती ताकद यांच्या हिरव्या खताचा वापर करून शेती करावे.      जमिनीत कस वाढतो उत्पादनही वाढते. रासायनिक खतामुळे शेतीला विहिरीला प...

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करू : विक्रमसिंह जगदाळे

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील व माजी कार्यसम्राट आमदार उल्हास पाटील, स्नेहा देसाई यांची नांवे चर्चेत असून दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संपूर्ण ताकदीनिशी त्या उमेदवाराचा प्रचार करेल व त्यांना निवडून आणेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  आमचे नेते शरदचंद्र पवार यांनी दिलेल्या आदेशान्वये महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार जो उमेदवार शिरोळ तालुक्यात उभा राहील त्याच्या पाठीशी उभे राहून त्या उमेदवाराचा प्रचार युद्ध पातळीवर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले आहे. सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसून उद्यानपंडित गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील व स्नेहा देसाई यांची नांवे चर्चेत आहेत. यापैकी कोणालाही तिकीट मिळो, शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी जिवाचं रान करून...

हेरवाड येथे संतुबाई देवीच्या यात्रेच्या पूर्व तयारीला प्रारंभ

इमेज
  देवीचा मानाचा भंडारा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड ग्रामदैवत संतुबाई देवीच्या यात्रेला लवकरच प्रारंभ होणार आहे. आज भूमिपूजनाच्या निमित्ताने धनगर समाज बांधवांनी देवीचा मानाचा भंडारा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला. यामुळे यात्रेच्या पूर्व तयारीला आजपासून सुरुवात झाली आहे.  ग्रामपंचायत, धनगर समाज आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा साजरी करण्यात येते. यात्रेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे विविध प्रकार, तसेच खेळणे आणि आकर्षक पाळणे उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, धनगर समाजाचे बंडू बरगाले, कऱ्याप्पा ईटाज, कृष्णा पुजारी, दगडू कोरुचे यांच्यासह धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिवर्तन महाशक्ती आघाडीचा शिरोळ तालुक्यातील कोण उमेदवार ?

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुका विधानसभा निवडणुकीसाठी "परिवर्तन महाशक्ती" आघाडीने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. या आघाडीत प्रामुख्याने बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती यांसारख्या नेत्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देण्याच्या उद्देशाने ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये दिग्गज अनेक नेते एकत्र आले आहेत. दरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या आघाडीला साथ दिली तर आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शिरोळ तालुक्यात शेट्टी स्वतः निवडणूक लढवणार की कार्यकर्त्यांना संधी देणार, यावर अनेकांच्या नजरा आहेत. मात्र, शिरोळ तालुका हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असल्याने दानोळीतील स्वाभिमानीचे शिलेदार राम शिंदे, हेरवाडचे बंडू पाटील आणि शिरोळचे सचिन शिंदे यांच्या नावाची चर्चा असून लवकरच परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परिवर्तन महाशक्तीने राज्यातील जनतेला नवीन पर्याय देण्याचा निश्चय केला आहे. या आघाडीत सहभागी झालेल्या पक्षांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचा...

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत 'एज्युकेशन वर्ल्ड' संस्थेमार्फत महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील डे कम बोर्डिंग विभागातील नंबर वन स्कूलचा किताब मिळवला आहे. दिल्ली-गुडगाव येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती यांच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, "प्राचार्या मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळेच शाळेला हा गौरव मिळाला आहे." या प्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च श...

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाकडून २३५६ आरोपींवर होणार प्रतिबंधक कारवाई

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : विधानसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत, निर्भीड वातावरणात आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. याअंतर्गत, यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांतील तसेच शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील एकूण २३५६ आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस दलाकडून प्रसिद्धी पत्रकार देण्यात आली आहे. या कारवाईत २२१७ आरोपींवर BNSS कलम १२६ नुसार कारवाई होणार आहे, तर ७१ आरोपींवर BNSS कलम १२९ प्रमाणे, १७ आरोपींवर BNSS कलम १६३ (२) नुसार, ३ आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत, १० आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ नुसार, एका आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५७ नुसार आणि ३७ आरोपींवर मुंबई दारुबंदी कायदा कलम ९३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. कोल्हापूर पोलीस दलाने या कारवाईत आरोपींवर कठोर पावले उचलण्याचे निश्चित केले असून, निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून वि...

बेकायदेशीर हत्यारे विक्री करणाऱ्या आरोपीस अटक; १ लाख ५१ हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेनंतर अवैध हत्यारे बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कृष्णा सुरेश कलकुटकी (38) या इसमाला बेकायदेशीर हत्यारे विक्री करताना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1 गावठी पिस्टल, 3 जीवंत राऊंड आणि अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 1,51,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूरचे मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे, विक्री करणारे तसेच तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करून अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कृष्णा सुरेश कलकुटकी, रा. खुपीरे, ता. कर...

सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचे पात्र महत्त्वाचे - चेअरमन अण्णासाहेब हवले

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :       विद्यासागर शिक्षण संस्थेच्या अंतर्गत विविध कला व कौशल्यांच्या माध्यमातून आत्मसात केलेले शिक्षण भविष्यात उत्तम पद्धतीने इतरांना अध्यापन देण्यासाठी वापरल्यास सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन व कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय अण्णासाहेब हवले यांनी केले. शिक्षकांचे योगदान देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 2023-2024 सालाच्या बीएड प्रशिक्षणार्थींच्या निरोप समारंभात ते मार्गदर्शन करत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक व संस्था संचालक मलगोंडा म्हैसाळे होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. बीएड प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन निरोप दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्रशिक्षणार्थी अध्यापकांनी सत्कार केला. विविध कलागुणांचे प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्...

नवे दानवाड आश्रमशाळेत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : नवे दानवाड प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम होते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले कलाम यांनी आपल्या बालपणात अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांनी घरखर्चासाठी वर्तमानपत्र विकणे व इतर छोटे-मोठे कामे करून कुटुंबाला आधार दिला. कलाम यांनी रामानाथपुरम येथे शालेय शिक्षण घेतले आणि पुढे ते भारताचे शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. भारतीय अंतराळ संशोधन आणि मिसाईल विकासात त्यांचे मोठे योगदान होते. भारतरत्न सन्मानित डॉ. कलाम यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे योगदान विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले. या जयंती कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या...

चिंचवाड येथे आज श्रवणबेळगोळचे भट्टारक महास्वामीजी यांचा मंगल प्रवेश

इमेज
  उदगाव / शिवार न्यूज नेटवर्क :     चिंचवाड (ता. शिरोळ) येथे कर्नाटक येथील श्रवणबेळगोळचे स्वस्तिश्री अभिनव चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी यांचा मंगल प्रवेश होणार आहे. शुक्रवारी (दि. १८ ) सकाळी दहा वाजता त्यांचे चिंचवाड गावात आगमन होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. कर्नाटक येथील श्रवणबेळगोळ हे जैन समाजाचे मोठे तीर्थस्थान आहे. श्री 1008 बाहुबली भगवानांची 57 फूट उंचीची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. या ठिकाणी स्वस्तीश्री अभिनव चारूकीर्ती महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली मठाद्वारे येथील काम चालते. या मठाचे अधिपती स्वस्तिश्री अभिनव चारूकीर्ती भट्टारक महास्वामीजी हे शुक्रवारी चिंचवाड येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. तरी सर्व श्रावक - श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय हातोडा फेक स्पर्धेत सानिका केरीपाळे प्रथम

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड ची विद्यार्थिनी सानिका केरीपाळे हिने वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हातोडा फेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हातोडा खेळ प्रकारात श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला शाखेची विद्यार्थिनी सानिका केरीपाळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. शालेय समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.      या विद्यार्थीनीस संस्थेचे संचालक मा .श्री. गौतम पाटील ,कार्याध्यक्ष मा. श्री .गणपत दादा पाटील, उपसंचालक श्री .बी .आर थोरात, उपसंचालक श्री.डी. एस माने ,शाखेचे कार्याध्यक्ष श्री. माने गावडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .रावसाहेब पाटील, सदस्य श्री.दामोदर सुतार , सदस्या श्रीमती विनया घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री आर जे पाटील, क्रीडाशिक्षक श्री .एस. एस गडदे ,महा...

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे पालन करा : निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे पालनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. प्रारंभी राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी  निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जावी, आचारसंहितेच्या नियमांमध्ये कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी शासकीय साधनसंपत्तीचा वापर होऊ नये, जनतेसाठी असलेल्या योजनांची घोषणा टाळावी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा दबाव आणणे टाळावे, यासारख्या बाबींचा समावेश आहे. या नियमांचे पालन न केल्यास निवडणूक आयोगाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला.  यानंतर शासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीचे नियोजन सांगण्यात आले. तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार यांच्या झालेल्या बैठकीत निवडणूक काळात कोणत्याही उमेदवाराची बातमी अथवा जाहिरात करताना जिल्हातील निवडणूक मीडिया कमिटीकडून कशाप्रकारे बातम्या जाहिरात प्रसिद्ध करावी याची माहिती घ्यावी खोटी,जात...

ऊसासाठी आंदोलनाचा भडका उडणार : उदगांवच्या यात्रेत भाकणूक

इमेज
  उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क : कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढणार, राज्यातील राजकारणात गोंधळ उडणार, परदेशात सुरू असलेल्या युध्दाचे सावट भारतावर उमटणार, जीवनावश्यक वस्तूंचा दर गगनाला भिडणार असल्याने गोर गरीबांचं जिणं मुश्किल होणार, कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यासाठी वाद होणार, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळणार, येणारी पिके चांगली पिकून डौलणार, धन धान्याच्या राशी मोठ्या होणार मात्र शेतकर्‍याला दाम मिळणार नाही, ऊसासाठी आंदोलनाचा भडका उडणार अशी भाकणूक देवर्षी आण्णाप्पा पुजारी महाराज यांनी केली. उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री उदयसिध्द बिरदेव देवाची यात्रा बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पहाटे अभिषेक, धार्मिक विधी करण्यात आले. दिवसभरात परिसरातील भाविकांबरोबर कर्नाटकातील भाविकांनी आपले नवस पुर्ण केले. उदयसिध्दांच्या नावानं चांगभलं... बिरोबाच्या नावानं चांगभलं...च्या गजरात भंडारा व खोबर्र्‍याची उधळण वालुगाच्या निनादात करण्यात आली. उदगांव येथील पुरातन असलेल्या श्री उदयसिध्द बिरदेवाची यात्रा करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून समस्त धनगर समाजाच्यावतीने नियोजन करण्यात आले हो...