शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पातळीत सात फुटाने वाढ
अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : विविध धरणातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत दिवसभरात तब्बल सात फुटाने वाढ झाली आहे. कृष्णा- पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडल्याने तालुक्यातील नदीकाठावरील शेकडो एकर गवत कुरणे पाण्याखाली गेली आहेत. गेले दोन दिवस कोयना व वारणा धरणपाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु होती.यामुळे रविवारी सांयकाळनतंर दोन्ही धरणातील विसर्ग वाढविण्यात आला होता.परिणामी शिरोळ तालुक्यात काहीअंशी पावसाची उघडीप असली तरी दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत सतत वाढ होत राहीली आहे. कृष्णेच्या पातळीत सोमवारी तब्बल सात फुटाने वाढ झाल्याने नृसिंहवाडी दत्त मंदिराला पाण्याचा पुर्ण वेढा पडला आहे. सद्या धरणपाणलोटक्षेत्रात पाऊस प्रमाण कमी झाले आहे.यामुळे सोमवारी सांयकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेसहा फुटावरुन चार फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत.यामुळे सोमवारी सकाळी सुरु असलेला एकुण ३१७४६ क्युसेक विसर्ग कमी होऊन सांयकाळी पाचनतंर तो २१८२४ क्युसेक करण्यात आला आहे.तसेच वारणा धरणातुन सुरु असलेला एकुण १४८८० विसर्ग थ...