युवा संकल्प मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा : राजू शेट्टी यांचे आवाहन
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : चळवळ आणि स्वाभिमानीचे नाते दृढ आहे. चळवळीच्या माध्यमातून युवा वर्गाला सोबत घेवून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्याला सर्वच युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. हा युवा संकल्प मेळावा १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता अब्दुललाट येथे संपन्न होणार आहे. शिरोळ तालुका स्वाभिमानी युवा . आघाडीच्या वतीने आजोजित केलेल्या या संकल्प मेळव्यात राजू शेट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या मेळाव्याचे उद्घाटन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद म्हणून सावकर मादनाईक भूषविणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, विठ्ठल मोरे, राम शिंदे, जनार्दन कांबळे, सागर शंभुशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, अजित पवार, बंडू पाटील, शैलेश चौगुले, शितल कुरणे, विशाल चौगुले यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून युवा संकल्प मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका संपन्न झाल्या या बैठका...