संजय घोडावत यांच्या वाढदिवसाच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा अनिश गांधी अजिंक्य
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने संजय घोडावत पॉलिटेक्निक ने संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिश गांधीने आठपैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले त्याला अजिंक्यपदाचे बक्षीस म्हणून रोख सात हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.अहमदनगरच्या अखिलेश नागरेने सात गुणांसह व सरस टायब्रेक गुण आधारे विजेतेपद मिळविले त्याला बक्षीस म्हणून रोख पाच हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.सात गुण करणाऱ्या मिरजेच्या अभिषेक पाटीलला कमी टाय ब्रेक गुणामुळे तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले त्याला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले. अनिकेत बापट (सातारा) व तुषार शर्मा (कोल्हापूर) त्यांचा अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक आला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पॉलिटेक्निकचे प्राचार्य व्ही.व्ही.गिरी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रा.वंदना शहा, स्पर्धा समन्वयक व राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा.संदीप पाटील व प्रशिक्ष...