सासर-माहेरच्या दोन गटात हाणामारी; 38 जणांवर गुन्हा दाखल
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : दत्तवाड ता.शिरोळ येथे मुलीला पळवून नेऊन विवाह केल्याच्या कारणातून सासर-माहेरच्या दोन गटात झालेल्या वादातून सोमवारी रात्री झालेल्या हाणामारी प्रकरणी एका गटातील 24 तर दुसर्या गटातील 14 अशा 38 जणांवर येथील पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दत्तवाड येथील लता अजितकुमार मटाले(वय47) यांची मुलगी ऐश्वर्या अजितकुमार मटाले हिला जगन्नाथ चव्हाण याने पळवून नेऊन विवाह केला आहे.सोमवारी रात्री 9 वाजता लता मटाले,अजितकुमार मटाले व प्रकाश मटाले हे तिघे चव्हाण यांच्या घरासमोर जावून आमची मुलगी ऐश्वर्या कुठे आहे. ते सांगा त्याचा मोबाईल नंबर तर सांगा असे विचारले असता. संशयित आरोपी एकनाथ दत्तात्राय चव्हाण, सुशिला दत्तात्रय चव्हाण, दिनकर राऊ चव्हाण, सचिन दिनकर चव्हाण, पांडूरंग गोविंद चव्हाण,गणेश चव्हाण, केसरकर, रघुनाथ दत्तात्राय चव्हाण,योगेश चव्हाणसह अनोळखी 16 (सर्व रा. दत्तवाड ता. शिरोळ) यांनी संगनमताने जमाव करुन धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली. व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रकाश मटाले यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म...