प्रभाग 2 मधून सातेंद्र खुरपे तर 5 मधून भोला शिंदे यांचा अर्ज दाखल
हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क हेरवाड ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून विविध प्रभागातून सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरु आहे. येथील प्रभाग क्रमांक 2 मधून सत्ताधारी गटाकडून सातेंद्र खुरपे, तर प्रभाग 5 मधून भोला शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हेरवाड ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दुरंगी लढत होणार असल्याने दोन्ही गटाकडून मोठी मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. सातेंद्र खुरपे हे प्रगतशिल शेतकरी आहेत. त्यांचा जनमाणसात मोठा आदर आहे. तसेच गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते अग्रभागी असतात. तर भोला शिंदे हे ही प्रगतशील शेतकरी असून सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच तरुण वर्गाच्या अगदी जवळ ते असल्याने त्यांचे लोकमत मोठे आहे.