पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुमार अन्वेकर यांना ग्रीन वर्ल्ड उद्योगरत्न पुरस्कार

इमेज
  पुणे / शिवार न्यूज नेटवर्क : यशस्वी उद्योजक हे तरूणांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतात. सर्वसामान्य कुटुंबातून येवून शुन्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या उद्योजकांच्या कथा या तरूणांना नेहमी प्रेरणादायी वाटतात. यासाठी असं साहित्य तरूणांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने ग्रीन वर्ल्ड प्रकाशन गेली 20 वर्षे उत्कृष्ट काम करणार्‍या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करत असतं. यावर्षी मोत्यांच्या दागिन्यांचे व्यापारी व दैवज्ञ ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष उद्योजक कुमार अन्वेकर यांना ग्रीन वर्ल्ड उद्योगरत्न पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. मार्शल(नि.) भूषण गोखले, प्रमुख अतिथी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व कृष्णकुमार गोयल तर ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.   कुमार अन्वेकर यांनी कारवार येथून पुण्यात येवून पत्नी कोमल यांच्या साथीने मोत्याचे दागिने बनवण्यास सुरूवात केली. व्यवसाय वाढू लागला. घरातून सुरू केलेला व्यवसाय हळूहळू दुकानात तर काही दिवसातच स्वतःच्या भव्य शोरूममध्ये आला. ‘श्री साई मोतीवाले’ ही पेढी पुण्याचं वैभव वाढविणारी संस्था बनली. व्यवसा...

हौसेला मोल नाही...! हेरवाडमध्ये गायीचे डोहाळे जेवण उत्साहात

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच घरात आनंदीआनंद असतो. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घातले जाते. यात लेक किंवा सुनेचे लाड केले जातात. हे चित्र सर्वत्रच पाहायला मिळतात; पण शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे मात्र लाडक्या खिल्लार गायीचे डोहाळे जेवण उत्साहात घालण्यात आले. यावेळी पंचपक्वान्नाचा बेत केला होता. गेल्या काही वर्षांपूर्वी शिरोळ तालुका परिसरात देशी गाईची संख्या प्रचंड कमी झाली होती. अलीकडच्या काही वर्षांत गाईचे महत्त्व पटू लागल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांकडून देशी गाईचे संगोपन करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे शिरोळ तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये देशी व गीर गाईची संख्या वाढू लागली आहे. हेरवाड येथील संजय माळी हे शेतकरी खिल्लार गाईसह म्हैशींचेही संगोपन करतात. त्यांचा मुलगा ओंकार माळी तसेच खिल्लार प्रेमी युवकांच्या संकल्पनेतून गाईच्या डोहाळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाईचे दूध लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी अत्यंत गुणकारी असते. गाईला शेतकरी मातेचा दर्जा देतात. त्यामुळे गाईचे संगोपन करण्याचा निर्णय घेतल्याचे माळी यांनी स्पष्ट केले. ल...

हेरवाडमध्ये पाच एकर ऊस जळून खाक

इमेज
  संग्रहित हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड- घोसरवाड मार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर हून अधिक क्षेत्र जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये सुमारे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे.  हेरवाड - घोसरवाड मार्गालगत माळी बंधूंची शेती आहे. शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने या परिसरातील सुमारे पाच एकर हून अधिक क्षेत्र जळून खाक झाले. सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज या परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. या आगीची घटना समजताच या परिसरातील शेतकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. यामध्ये सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. दरम्यान, महापुरामुळे अगोदरच नुकसानीच्या खाईत असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस आगीत जळून खाक झाल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी ऊस तातडीने नेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी या परिसरातून होत आहे.

शिरोळ तालुक्याच्या चौफेर विकासासाठी आम्हाला साथ द्या : आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर

इमेज
कोंडिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्‍याच्या चौफेर विकास व्हावा यासाठी सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांनी मंत्री झाल्यापासून वेगाने काम केले आहे, कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे राज्यासमोर आर्थिक संकट असताना सुद्धा अवघ्या दोन वर्षात २२० कोटी रुपयांचा निधी त्यांनी मतदार संघात खेचून आणला आहे, विकास कामे करताना राज्यमंत्री यड्रावकर यांनी कधीच गट- तट, पक्ष ,संघटना, जात- पात न पाहता तालुक्‍यातील सर्वच गावांना योग्य प्रमाणात निधीचे वाटप केले आहे, शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता, वडीलधारी मंडळी, माता भगिनी व युवक यड्रावकर परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे आहेत, त्यामुळे भविष्यात देखील जोमाने काम सुरू राहील, यासाठी सर्वांनी राज्यमंत्री यड्रावकर साहेब यांना साथ द्यावी असे आवाहन आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले, कोंडीग्रे येथे राज्यमंत्री यड्रावकर यांच्या सहकार्यातून मंजूर झालेल्या तीस लाख रुपयांच्या विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते, जनसुविधा योजने मधून दहा लाख रुपये तसेच 25 15 योजनेत मधून 20 लाखाचा निधी अशा एकूण 30...

आई-वडिलांच्या सेवेतच खरा देव : हभप ज्ञानेश्वर माने महाराज यांचे विचार

इमेज
  मिरज ते आदमापूर पायी दिंडीचे हेरवाडमध्ये उत्साहात स्वागत हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : आई वडीलांपेक्षा आयुष्यात मोठे काहीच नाही. आई वडील हेच आपला आदर्श असतात. प्रत्येक जण शाळेत नंतर शिकतो. तर पहिले गुरू आई वडील असतात. ते चालते बोलते विद्यापीठ आहे. म्हणून दररोज आई वडिलांचे दर्शन घ्या. त्यांच्या सेवेतच खरा देव आहे, असे प्रतिपादन तरूण किर्तनकार हभप ज्ञानेश्वर माने यांनी केले हेरवाड येथे आलेल्या मिरज शहर धनगर समाज यांच्या वतीने श्री बिरोबा मंदिर मिरज ते श्री क्षेत्र बाळूमामा मंदिर आदमापूर पायी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.  यावेळी ते पुढे म्हणाले, आयुष्यात कितीही कष्ट होत असले तरी आई वडलांना वृद्धाश्रमात सोडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. मातृदेवोभव । पितृदेवो भव, अशी हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. `आई-वडील व गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे, असे `धर्मग्रंथ सांगतात. पुंडलिकाच्या तपश्चर्येमुळे विठोबा त्याच्यावर प्रसन्न झाला होता. पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपणही आई-वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावाने सेवा-शुश्रुषा...

हेरवाडचे रोहीत परीट यांना गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

इमेज
हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार साजणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसेच हेरवाड येथील रहिवाशी रोहीत परीट यांना देवून गौरव करण्यात आला. तंत्र स्नेही, विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक, उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. साजणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते कार्यरत असून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी परीट यांची मोठी धडपड असते. तसेच विद्यार्थ्यांना बौध्दीक अभ्यासाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ते विविध उपक्रम शाळेमध्ये राबवून जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुठेही कमी पडता कामा नये, अशी त्यांची भावना असल्याने त्यांच्या या उपक्रमाची दखल घेवून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार देवून गौवर करण्यात आला. यावेळी ह.भ.प.मा.श्री शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, रमेश आव्हाड, बबनराव रसाळ, सामाजिक कार्यकर्ते डॉ.शुभदा जोशी यांच्यासह मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थि...

ग्रामसेवकांसह सात जणांना दहा वर्षे सक्तमजुरी

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : शेतजमिनीच्या वादातून कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-२) बी. डी. शेळके यांनी एक महिला, ग्रामसेवकासह एकूण सात जणांना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता ॲड. मंजुषा बी. पाटील यांनी काम पाहिले. ग्रामसेवक सुरेश संजय पाटील (वय-३३), भाऊ सागर पाटील (३६), वडील संजय केरबा पाटील (६१), अजित वसंत पाटील (२९), भाऊ विनायक पाटील (२६), वडील वसंत केरबा पाटील (५१), आई नकुशा उर्फ लक्ष्मी वसंत पाटील (४६ सर्व रा. कोतोली, ता. पन्हाळा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कोतोली येथे शेतजमिनीच्या कारणांवरून वसंत व केरबा पाटील या दोघा भावांचा गावातीलच नीलेश पाटील यांच्या घराण्याशी पूर्ववैमनस्याच्या वादातून हल्लेखोरांनी नीलेशसह सहाजणांना लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी मारहाण केली. हल्ल्यात नीलेश जयसिंग पाटील, सुनीता जयसिंग पाटील, युवराज सर्जेराव पाटील, हौसाबाई सर्जेराव पाटील, बाजीराव श्रीपती पाटील...

शिवनाकवाडी गावसभेत अन्न पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा निषेध

इमेज
  शिवनाकवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :  शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथील वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानांच्या बाजूने अन्न पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी निर्णय देत परवाना कायम ठेवला. यांच्या निषेधार्थ गावसभेत नामदार कदम यांचा निषेधाचा ठराव करीत आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान राज्यातील मंत्र्याचा गावसभेत निषेध करण्याची हि पहिलीच वेळ असल्याची घटना शिवनाकवाडी इथे घडली आहे.  शिवनाकवाडी इथील सरकार मान्य लक्ष्मी स्वस्त धान्य दुकानामध्ये मालकांकडून धान्य वितरीत करण्याबाबत पक्षपातीपणा, अनियमितता, ग्राहकांना अपशब्द बोलणे अदि तक्रारी गामपंचायतीचे आल्या होत्या. याबाबत गामपंचायतीने जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या कडे लेखी तक्रार झाल्या यामध्ये दुकान मालक उमरानी यांच्या विरोधात निकाल देवून परवाना रद्द झाला होता. याला अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्थगिती देत दुकान मालक उमरानी याच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाचे पडसाद शिवनाकवाडी गावसभेत उमटले. या विरोधात पाचशे पेक्षा जास्त गामसथांनी गावसभेत उपस्थित राहून निषेध व्यक्...

शिरोळ : ऊस अंगावर पडून बैल गंभीर जखमी

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ येथील नदीवेस सोंडमळी विभागात क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने बैलगाडीतील ऊस बैलाच्या अंगावर घसरून पडल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे. मुका मार बसून चाचीत पडलेल्या बैलाला ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारखाना शेती विभागाच्या मदतनिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. कामाचा बैल ऐन सिझनमध्ये जखमी, उपचाराचा खर्च आणि काम बंद झाल्यामुळे ऊसतोडणी कामगार कुटुंबावर दुःखाची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे कारखान्याने ऊसतोडणी मजुरास भक्कम मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जादा बैलगाड्या भरल्या जातात. बैलांना ओझे पेलवत नाही, कारखान्यांनी बैलगाड्या बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरची व्यवस्था करावी, या मागणीसाठी अंकुश शेतकरी संघटनेने येथील छत्रपती शिवाजी तख्तमध्ये बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. अशातच गाडीतील ऊस अंगावर पडून बैल जखमी झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दत्तवाड येथील खोकी धारक गाळ्यांच्या प्रतीक्षेत

इमेज
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क : दत्तवाड (तालुका शिरोळ) येथील जुन्या ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये बांधण्यात आलेल्या गाळ्यांच्या प्रतीक्षेत दत्तवाड येथील खोकी धारक असल्याचे दिसून येत आहे. दत्तवाड येथील जुन्या ग्रामपंचायतीसमोर अंदाजे ९ लाख ३० हजार रुपये खर्च करून ही गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यांचा उद्घाटन भवानीसिंह घोरपडे (सरकार), बाळासो शिंदे, बबन चौगुले, दिलीप चव्हाण, बादशाह मुल्ला, राजगोंडा पाटील, माजी सरपंच संगिता झुणके, जरीनाबी मुल्ला, कांचना चौगुले आदी मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटन झाल्यापासून आज अखेर ही गाळे जसेच्या तसे बंद स्थितीतच आहेत. दत्तवाड या ठिकाणी असणारा मुख्य रस्ता रुंदीकरण करण्यासाठी या रस्त्यावर असणारे खोकी धारकांना ग्रामपंचायत प्रशासनाने तुम्हाला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जुन्या ग्रामपंचायत समोर बांधण्यात येणाऱ्या गाळ्यांमध्ये पर्यायी जागा देण्यात येईल असे आश्वासन देऊन याठिकाणी असणाऱ्या खोके धारकांना हटवले. पण गेली दीड वर्षे झाले जुन्या ग्रामपंचायत समोर बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा उद्घाटन होऊन सुद्धा या खोके धारकांना या ठिकाणी गाळे दे...

अक्कोळजवळील अपघातात निपाणीची युवती ठार

इमेज
  निपाणी/ शिवार न्यूज नेटवर्क :  अककोळ (ता. निपाणी) येथील दुचाकी टँकर अपघातात युवती ठार, तर मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता.21 सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. सुप्रिया उमाकांत कांबळे (वय 20 रा. हुडको कॉलनी ,निपाणी) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.          शिक्षक उमाकांत कांबळे सायंकाळी मुलगी सुप्रिया दुचाकीवरून निपाणी (केए-23-इस-0177) हुन ममदपूरकडे जात होते. अककोळ ला संगोळी रायन्ना शाळेजवळील पेट्रोल पंपाजनिक पाठीमागून येणाऱ्या टँकरची (केए-22-इएस-0929)ओव्हर टेक करताना दुचाकीला धडक बसली. त्यात सुप्रिया व उमाकांत मोटारसायकलवरून खाली कोसळले. घटनेत सुप्रियाच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. उमाकांत यांना किरकोळ दुखापत झाली. सुप्रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात हलविला. यावेळी पोलिसांनी टँकरचालक बसनगौडा नायकर याला ताब्यात घेतले आहे.

पुन्हा एकदा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क : बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा (ता. बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती समोरील भगवा ध्वज हटवून मुर्तीचीही विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे होनगासह परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त ग्रामस्थांसह शिवभक्त मोठ्या संख्येने काकती पोलीस ठाण्यासमोर जमा झाले असून महामार्गावर काही ठिकाणी वाहनावर दगडफेच्या घटनाही घडल्या. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. लागलीच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तर हे कृत्य करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर बेळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विटंबना करणार्‍यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवप्रेमींनी संभाजी चौकात धरणे आंदोलन केले होते. तर याचवेळी काही समाजकंटकांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. मात्र, त्याचे खापर आंदोलनकर्त्यांवर फोडण्यात आले. तसेच त्यांच्यावर ...

श्री घोडगिरी बिरदेव मंदिराच्या शिखर जीर्णोद्धारचा 24 रोजी पाया खुदाई 25 ला पायाभरणी कार्यक्रम

इमेज
राहुल डोंगरे/शिवार न्यूज नेटवर्क :     अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री घोडगिरी बिरदेव मंदिराच्या(माळ भाग )शिखर जीर्णोद्धार चा24 डिसेंबर रोजी पाया खुदाई, आणि 25 डिसेंबर सकाळी 11.00 वाजता पायाभरणी या शुभ मुहूर्तावर होणार आहे       अर्जुनवाडचे जागृत देवस्थान म्हणून श्री घोडगिरी बिरदेव देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे. शिखर जीर्णोद्धार साठी 15 ते 16 लाख रुपयाचे बजेट आहे.सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त धनगर समाज यांनी केले आहे.   

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आघाडीत बिघाडी ; शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. सत्तारुढ आघाडीतून अखेर शिवसेना बाहेर पडल्याने आघाडीत ‌बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दुपारी शिवसेनेचे पॅनेल देखील जाहीर केले. शिवसेनेने तीन जागाची मागणी केली होती. मात्र सत्तारुढ आघाडीने शिवसेनेची ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे अखेर या आघाडीत बिघाडी झाली. दरम्यान, निवडणुकी आधीच मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तेरवाड ग्रामपंचायतीसमोर संतप्त महिलांचे ठिय्या आंदोलन

इमेज
  तेरवाड/ शिवार न्यूज नेटवर्क :       तेरवाड ता शिरोळ येथील गंगापूर या उपनगरात सय्यद ट्रंक मार्ट यांच्या ध्वनी प्रदूषणामुळे ग्रामस्थांना त्रास होत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे करूनही ग्रामसेवक दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने व गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा ध्वनी प्रदूषण होत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता.           दरम्यान गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पत्रा बनवण्याचे ध्वनिप्रदूषणाचे काम सुरू असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन गेला असता मोर्चा येत असल्याचे पाहून ग्रामसेवक रेळेकर यांनी मिटिंगचे कारण सांगून पळ काढल्याचा आरोप संतप्त महिलांनी करत ग्रामसेवक दलित समाजावर अन्याय करत असून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी कारखानदार सय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारला व दोन दिवसात पुन्हा उग्र आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले.        तेरवाड गंगापूर येथे मध्यवस्तीच्या ठिकाणी मातंग समाज वस्तीत सय्यद...

आई वृध्दाश्रम संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडून निवारा शेड उभारणीसाठी मदतीचा हात

इमेज
  संस्थेमधील भयभीत झालेल्या वृद्ध मंडळीना आधार देत मनोबल वाढण्याचा प्रयत्न  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      निमशिरगाव (ता शिरोळ) येथे सुरु असलेल्या आई वृद्धाश्रम इमारत बांधकामाला दिरंगाई होत असल्याने तातडीचा शेड निवारासाठी आई वृद्धाश्रम संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि वृद्धाश्रमाचे आश्रयदाते संकटाला धाऊन आले, त्यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून रक्कम व साहित्य रूपाने मदत केली, खंबीरपणे पाठीशी उभे राहून मदतीचा हात देणा-या विश्वस्त मंडळाच्या सहकाऱ्यांच्या मदतीतून आई वृद्धाश्रम संस्थेच्या स्वतःच्या जागेत निवारा शेड उभे राहिले आहे.        जयसिंगपूर येथे सध्या भाड्याच्या इमारतीमधील आई वृद्धाश्रम संस्थेमधील वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने व त्यांच्या मनात भितीदायक वातावरण निर्माण झालेने संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी निमशिरगाव येथील वृद्धाश्रमाच्या स्वतःच्या जागेत शेड मारून राहण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांच्याकडुन प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वृद्धाश्रम शेड निवारा मदतीचे काम सुरू झाले असून य...

विकासकामामुळे बोरगाव येथे नगर विकास पॅनेलचा विजय निश्चित : उत्तम पाटील

इमेज
      बोरगाव नगर विकास पॅनलचा प्रचार प्रारंभ अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :     गेल्या पाच वर्षांत सहकाररत्न रावसाहेब पाटील व युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण बोरगाव शहराचा सर्वागीण विकास केला आहे. शहराच्या विकासासाठी राजकारण , जात, पात न करता सर्व पक्षांकडून निधी आणला आहे. त्यामुळेच बोरगाव शहरही विकास कामात जिल्ह्यात अग्रेसर आहे. आपण यापुढेही शहराचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याबरोबरच मूलभूत सुविधाही पुरवण्यासाठी कटिबद्ध, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे नगर विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. पॅनल प्रमुख म्हणून उत्तम पाटील यांनी यावेळी मतदारांना मार्गदर्शन केले. शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या चरणी बॅलेट पेपर ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर ग्रामदैवत बावाढंगवाली , श्री ज्योतिबा मंदिर, महादेव मंदिर , मातंगी मंदिर,यल्लमा मंदिर, बिरदेव मंदिर ,वाशीखांन मंदिर येथे जाऊन पेपर ठेवून शुभारंभ करण्यात आला. प्रचार शुभारंभप्रसंगी डॉ. शंकर माळी , बी. के. महाजन, मायापा कांबळे...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : शिरोळकरांची मागणी

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : कर्नाटक राज्यातील बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केलेच्या घटनेचा निषेध करून कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोमई यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील अमरसिंह कांबळे युवा सोशल फाउंडेशन व शिवभक्त यांच्यावतीने करण्यात आली आहे.  दरम्यान, शिरोळ येथील तालुका पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सोमवारी दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले, विटंबना घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारचा धिक्कार करीत पुरोगामी कार्यकर्ते व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,,,,,जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषानी परिसर दणाणून सोडला. तहसीलदार सौ अपर्णा मोरे- धुमाळ व शिरोळ पोलीस ठाण्यास शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले, यावेळी फाउंडेशनचे प्रमुख अमरसिंह कांबळे, पुरोगामी कार्यकर्ते राजेंद्र प्रधान, खंडेराव हेरवाडे ,दगडू माने, विश्वास कांबळे, फिरोज मुजावर, मजीद आतार, उदय शिरोळकर ,प्रदीप पाटील, चिदानंद कांबळे ,अविनाश कांबळे ,मिराजी व्हनकटे, विक्रम कांबळे ,विजय भोसले ,राजेंद्र कांबळे, शिवगोंडा पा...

अकिवाट वीर सेवा दलाच्या संघनायक पदी आदिनाथ पाटील यांची नियुक्ती

इमेज
  अमोल सुंके / शिवार न्यूज नेटवर्क : अकिवाट येथे वीर सेवा दलाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात आदिनाथ राजगोंडा पाटील याची संघनायकपदी तर शुभम रावसो पाटील याची उपसंघनायकपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीप्रसंगी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. वीर सेवा दल मध्यवर्ती समिती असो किंवा दक्षिण भारत जैन सभा असो अकिवाटचं योगदान नहमीच उल्लेखनीय राहिले आहे. आचार्य श्री 108 विद्यासागर महाराजांचे पावन समाधीस्थळ असलेल्या अकिवाट गावाने धार्मिक कार्यांतुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पदाधिकारी नियुक्तीवेळी दत्तवाडचे शाखाधिकारी कुमार चौगुले, तसेच अकिवाट गावातील वीरसेवा दलाचे मध्यवर्ती समिती सदस्य तात्यासो पासोबा, कल्लगोंडा किनिंगे,अशोक म्हैशाळे,शांतीनाथ रायनाडे, बाहुबली मग्गेनावर, सागर घोसरवाडे, जुने दानवाडचे संघनायक सुजित तिप्पनावर, जुने दानवाडचे उपसंघनायक अनुराग पाटील व त्याच बरोबर अकिवाट गावातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.  शाखेच्या इतर पदांमध्ये संचालक म्हणून उद्देश पाटील, महावीर शिरगुप्पे, संयम पाटील, इंद्रजित पाटील यांची तर विभाग प्रमुख म्ह...

बंगळुरू घटनेच्या निषेधार्थ उदगांव बंद ...!

इमेज
  राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :  बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी उदगावतील शिवप्रेमीनी व्यक्त केली. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी उदगाव (ता. शिरोळ) येथे समस्त ग्रामस्थांकडून गाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला गावातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू घाटगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे.कन्नडिंगाना आलेली मस्ती शिवप्रेमी नक्कीच उतरवतील.हे प्रकरण अत्यंत घृणास्पद असून आरोपींवर अत्यंत कडक कारवाई करावी. संतप्त शिवप्रेमींनी कर्नाटकचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला. 'जय भवानी जय शिवाजी' या जयघोषात गावातून रॅली काढण्यात आली.  यावेळी अशोक वरेकर, दिलीप माने, मंगेश घाटगे, शरद लुगडे, शिवाजी गायकवाड,विनायक पाटोळे, मयप्पा लांडगे, प्रतीक पाटील, पिंटू हेरवाडे, विक्रम घाटगे उपस्थित होते.

दत्तवाड येथे शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

इमेज
  इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क : दत्तवाड (तालुका शिरोळ) येथे महावितरण विद्युत कंपनी कडून वीज ग्राहकांचा वीज बिल दुरुस्ती व इतर तक्रारीसाठी मेळावा घेण्यात आला होता. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. दत्तवाड येथील रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलामध्ये असलेल्या चुकी व इतर समस्याचे निराकरण करण्यासाठी शेतकरी वीज ग्राहकांचा मेळावा बोलावण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने वीज ग्राहक जमले होते.      यावेळी गुरुदत्त शुगर चे संचालक बबन चौगुले म्हणाले, सन २०१६-१७ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे वीज बिले वेळेत व व्यवस्थित भरली. पण नंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आले की सर्व वीजबिले खोटी, अन्यायकारक, अवाढव्य, अवास्तव आहेत. तिप्पट चौपट स्वरूपात बिले आकारले जात आहेत. यामध्ये दंड, व्याज, दंडव्याज व इतर अनेक छुपे कर आकारले गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत. म्हणून थकबाकी पडली आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. वस्तुनिष्ठ व योग्य बिले द्या आम्ही स्वतः भरू व इतर गावातील शेतकऱ्यांनाही भरायल...

गुरुदत्त शुगर्स परिसरात कन्नड वेदिकेच्या झेंड्याची होळी

इमेज
  अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :  बेंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ अकिवाट (ता.शिरोळ) येथे गुरुदत्त शुगर्स परिसरामध्ये कर्नाटकातून आलेल्या ट्रॅक्टरला असलेल्या कन्नड वेदिकेचा झेंडा येथील शिवसैनिकांनी काढून पेटवला. येथुन पुढे कानडी झेंडा महाराष्ट्रात फडकवू देणार नाही, असा इशारा युवासेना तालुका समन्वयक निलेश तवंदकर यांनी दिला आहे. बंगळूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी कर्नाटक शासनाचा निषेध व्यक्त होत आहे. त्याचाच भाग म्हणून अकिवाट येथील श्री गुरुदत्त शुगर्सकडे कर्नाटकातून येणाऱ्या ट्रॅक्टरला असणारे कन्नड वेदिकेचे झेंडे शिवसैनिकांनी काढून त्याची होळी केली. शिवसैनिकांनी घटनेचा निषेध व्यक्त करून यापुढे महाराष्ट्रात कर्नाटक वेदिकेचा झेंडा फडकवू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी शिवसेना विभागप्रमुख उत्तमसिंग रजपूत, पांडूसिंग रजपूत, निग्गाप्पा कट्टेकरी, युवासेना शहर अधिकारी पृथ्वी रजपूत, सौरभ शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्या सचिवपदी येथील कवी प्रा.दिलीप सुतार यांची निवड

इमेज
  कुरूंदवाड/ शिवार न्यूज नेटवर्क : अब्दुललाट ता. शिरोळ येथील ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्या सचिवपदी  येथील कवी प्रा.दिलीप सुतार यांची  निवड करण्यात आली आहे. देश व महाराष्ट्र  पातळीवर मानवीहक्कांचे रक्षण संवर्धन व जात पात, धर्म, पंथ विरहित समस्त मानव जातीचे कल्याण या उदात्त हेतूने प्रेरित भारताचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यानी  या फाऊंडेशनची सुरूवात केली आहे. या फाऊंडेशनचे प्रमुख केंद्र असलेल्या ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनच्यावतीने देशभर युवक, युवती व देशवाशीयांच्या मनांत सकारात्मकता रूजविण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक,  शैक्षणिक,साहित्यिक  विधायक उपक्रमांचे आयोजन करणेत येते. ज्ञानेश्वर मुळे फौ़डेशनच्या कार्याविषयी माहिती देताना नूतन सचिव, प्रा. दिलीप सुतार म्हणाले की, फौंडेशनच्या वतीने महापूर, भूकंप व कोरोना काळात आपत्ती ग्रस्ताना  व दूर्गम भागातील आदिवासी नागरिकांना विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे तर युवकासाठी विविधप्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, दिल्ली व परिसरातील काही विद्यापीठात सकारात्मकता  अभ्यासक्रम सुरू ...

अर्जुनवाड येथे विजेचा विद्युत पोल धोकादायक स्थितीत

इमेज
राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :     अर्जुनवाड ता.शिरोळ येथील खोत गल्लीतील सिद्धेवर मंदिरा समोर असणारा विजेचा विद्युत पोल धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे कधी ही नागरी वस्ती वर कोसळून जीवित हानी होऊ शकते    अखेरची घटका मोजणारा हा पोल कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हा पोल गावातील भरवस्तीत आहे. त्यामुळे जवळच्याच घरावर पडल्यास घरांचे नुकसानीसोबत जिवीतहानी होऊ शकते. पोल बदलण्याच्या मागणीसाठी अर्जुनवाड मधील नागरिक करीत आहेत .

निपाणी नगरपालिकेचे कर्मचारी राजु मातीवर अपघातात ठार

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :          मिरज येथील नातेवाईकांना भेटून येत असता चिंचणी जवळ झालेल्या अपघातात निपाणी नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी राजू दगडू मातीवड्डर अपघातात ठार तर त्यांचे मित्र महेश मातीवड्डर जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ओव्हरटेक करताना दुचाकीची मोटारीला धडक बसली. त्यात निपाणी पालिकेचा पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी ठार तर पाठीमागे बसलेला एकजण जखमी झाला. राजू दगडू मातीवड्डर (वय ४८, रा. शिवाजीनगर दुसरी गल्ली, निपाणी) असे मृत आणि महेश रामू मातीवड्डर (वय २०) असे जखमीचे नाव आहे. चिक्कोडी-चिंचणी मार्गावर शुक्रवारी (ता. १७) रोजी दुपारी चारच्या सुमारास अपघात झाला. चिक्कोडी रहदारी पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. राजू व महेश मातीवड्डर हे दोघे मिरज येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. ते भेटून परत येत असताना चिक्कोडी-चिंचणी मार्गावर निपाणीकडे येत असताना हा अपघात झाला. सदर अपघातानंतर जखमींना निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र राजू मातीवड्डर गंभीर जखमी असल्...

दानोळी खूनप्रकरण : तिघा संशयीताना पोलीस कोठडी

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  पैश्यांच्या देवाण घेवणीवरून दानोळी (ता. शिरोळ) येथील प्रशांत संजय भिसे या तरुणाच्या खून प्रकरणी संशयित प्रताप उर्फ गुंड्या संजय माने, अमोल ऊर्फ दाद्या दत्ता हराळे व सागर अजित होगले (सर्व रा.दानोळी) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी विशेष सरकारी वकील सुर्यकांत मिरजे त्यांनी युक्तिवाद केला. बुधवारी मृत प्रशांत भिसेसह, प्रताप माने, सागर होगले, अमोल हराळे तिघे संशयीत जेवण्यासाठी गेले होते. यावेळी संशयीतांनी संगणमत करून पैसे देण्याच्या कारणावरून धारधार शस्त्राने खुन केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कोथळी येथील गायराण जमीवर असलेल्या कचरा डेपोमध्ये टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह अर्धवट जळलेला राहिला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली होती. याप्रकरणी तिघा संशयिताना अटक केली असून त्यांना आज येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोरगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात

इमेज
  42 जणांची माघार ...निवडणूक होणार तिरंगी अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 27 डिसेंबरला होणाऱ्या बोरगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अखेर 92 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता .आज उमेदवारी माघार शेवटच्या दिवशी 42 जणांनी माघार घेतल्याने एकूण 17 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात उभे असल्याचे माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 17 प्रभांगासाठी उत्तम पाटील गटाच्या नगर विकास पॅनल मधून 17 उमेदवार , तर माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले गटाच्या परिवर्तन पॅनेल मधून 17 उमेदवार तसेच भाजप गटातून 16 उमेदवार रिंगणात उभे आहेत. शनिवारी अर्ज माघारी चा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी रात्री काही घडामोडी होतील व निवडणुकीत दुरंगी होईल असा अंदाज होता. मात्र तिन्ही गटाकडून निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने निवडणूक तिरंगी होणार आहे .यासाठी तिन्हीही गटाकडून प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे होणारी निवडणूक ही सर्वांनाच प्रतिष्ठेची बनली आहे. आज सर्वच गटाच्या उमेदवारी निश्चित असल्याने अधिकारीही प्रत्येक उमेदवार चिन्ह वाटप केले .यामध्ये भाजपला कमळ, नगर विकास पॅनल ला शिट्टी व परिवर्तन पॅनेलला क...

राजेश तांबवे राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

इमेज
    राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :      यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख उद्योगपती राजेशजी तांबवे साहेब यांनी गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात भरघोस काम केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार मिळाला आहे.      तांबवे सर्विसेस च्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार देण्याचे काम साहेबांनी केले आहे.त्याचबरोबर तांबवे इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आर्थिक दुर्बल ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशांना आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन देऊन त्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम तांबवे साहेबांनी केले आहे.    तसेच 31मे 2021 अहिल्यादेवी होळकर जयंती दिवशी साहेबांनी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये 15 महिलांना फॅशन डिझायनिंग कोर्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स आयटीआय कोर्स मोफत देण्याची घोषणा केली आणि तात्काळ त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये साहेबांनी केले आहे.      वेळोवेळी अनेक आर्थिक दुर्बल समाजातील लोकांना आर्थिक ही मदत केली आहे तस...

सर्वसामान्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सर्रास वीज कनेक्शन तोडणीमुळे नागरीकांत संताप

इमेज
  अमोल सुंके/ शिवार न्यूज नेटवर्क : अकिवाट व परिसरातील वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरणाकडून युद्धपातळीवर चालू आहे. शेती व घरगुती वीज बिले थकीत असणाऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. दोन वर्षे कोरोना आणि त्यानंतर महापूर, यातून आता कुठेतरी सर्वसामान्य जनता सावरत होती, मात्र वीज बिल वसुलीमुळे 'पोटाला खायचे की शेती पिकवण्यासाठी की विज बिल भरायचे ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत.  'विज बिल आत्ताच्या आत्ता भरा नाही तर वीज कनेक्शन बंद करतो' असे म्हणून घराचे व शेतीपंपाचे वीज कनेक्शन महावितरणचे कर्मचारी बंद करून जात आहेत. एकीकडे सर्वसामान्य लोकांचे हजार-दोन हजारांची बिले थकली असली तर लगेच वीज पुरवठा खंडित केला जातो. तर दुसरीकडे बड्या लोकांचे कितीही वीजबिले थकली असली तरी त्यांचे वीज खंडित केले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. तसेच याचा जाब जर कोणी विचारले तर त्यांना 'तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्या' अशी सूचना वीज कर्मचाऱ्यांकडून केली जाते. यामुळे सर्वसामान्यांचा कोणी वा...

गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क :  राधानगरी येथून एक किलोमीटर अंतरावर सोन्याची शिरोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला गव्याने धडक दिली. अलका लहू चौगले (वय ४५) असे या महिलेचे नाव असून त्यांच्या कमरेला मार बसल्याने उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  चौगले या शेरी नावाच्या शेतात काम करत असताना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. गव्याने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले. मात्र कमरेला मार बसल्याने चौगुले यांना पुढील उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. बी. बिराजदार सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कोल्हापूर येथे झालेल्या हल्ल्यामुळे या परिसरात लोकांनी गव्यांची दहशत घेतली आहे. आसपासच्या सर्व गावच्या शिवारांमध्ये गव्यांचा कळपाने वावर असतो. लोकांनी सावध राहुन काम करण्याचे अवाहन वन विभागाने केले आहे. 

दत्तवाडचे फिल्टर हाऊस बनले तळीरामांचा अड्डा

इमेज
  इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :  दत्तवाड (तालुका शिरोळ) येथे गेल्या दहा ते बारा वर्षाच्या मागे सुमारे ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पेयजल योजनेचा फिल्टर हाऊस तळीरामांचा अड्डा बनलेला असून याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असून या परिसरात मद्यपींचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून याठिकाणी पेयजल बांधले. या पेयजल योजनेच्या माध्यमातून दत्तवाड वासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार होते. परंतु या पेयजल योजना पूर्ण झाल्यानंतर फक्त काही दिवसच गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तसेच अकार्यक्षम कारभाऱ्यांच्यामुळे ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही पेयजल योजना दहा ते बारा वर्षा पासून बंद स्थितीत आहे. याचा फायदा येथील तळीरामांनी घेतला आहे. या पेयजल योजनेच्या फिल्टर हाऊस च्या वरच्या मजल्यावर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, सिगारेट पाकीट खाद्यपदार्थाच्या पिशव्या इत्यादी अनेक मोठ्या प्रमाणात साचलेला असून दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. तरी या तळीरामांचा ...

पोलिस बळाचा वापर केला तरीही आंदोलन सुरुच राहिल : धनाजी चुडमूंगे

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : ऊस वाहतूक रोखल्या प्रकरणी पोलिसांनी बळाच्या वापर करत आंदोलन अंकुशचा कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन मोडून काढले यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी साखर कारखानाचा निषेध व्यक्त करत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.             आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने शेतातील ऊस बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी पाच हजार खर्च येत आहे.त्यामुळे गेली दोन वर्षे महापूराने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसाई भरपाई देखील तोडकी मिळाली आहे तेंव्हा साखर कारखान्याने ऊस बाहेर काढण्यासाठी व्यवस्था करावी या मागणीसाठी मागील आठवड्यात कारखाना व्यवस्थापनास निवेदन देण्यात आले होते मात्र त्यांचा मागणी दुर्लक्ष केल्याने गुरुवार दि.१६ रोजी सकाळी शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दत्त साखर कारखानाची ऊस वाहतुक रोखली यावेळी साखर कारखाना समर्थक व आंदोलक यांच्यात शाब्दिक वादावादी सुरू असताना पोलिसांनी आंदोलन अंकुशचा धनाजी चुडमुंगे,कृष्णा गावडे,भूषण गंगावने,पोपट संकपाळ, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल...

दानोळीमध्ये शर्यत परवानगीचे स्वागत

इमेज
  दानोळी/ शिवार न्यूज नेटवर्क :  दानोळी (ता.शिरोळ) येथे शासनाने दिलेल्या बैलगाडी शर्यतीच्या परवानगीचे स्वागत करत. शर्यत प्रेमींनी फटाक्यांच्या आतेषबाजिसह बैलजोड्याची वाजवत मिरवणूक काढून आनंदत्सव साजरा केला. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.यावेळी गावातील शर्यत प्रेमींनी बैलजोड्यांची वाजत मिरवणूक काढण्यात आली.नागरीकांना साखर वाटप करुन आनंदत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्जेराव शिंदे यांनी राज्या शासनाचे व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन आभार मानले. पुढे शिंदे म्हणाले शर्यतीसाठी शासनाने घातलेल्या अटींची शिथिलता मिळावी.आपल्या कडे एक हजार मिटर शर्यत होतं नासल्यामुळे ही अट शिथिल व्हावी. खिलार जातीचा पळाव बैल तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या कष्टाला उभारी मिळाली आहे. यावेळी राजदीप थोरात,निलेश खोत,बंडु खिलारे,अशोक दळवी,अल्लु मुजावर,धना भिसे, अमोल काटकर,राजाराम माने,सोमा माने, सुनिल घुलांडे यांच्या सह युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेरवाडमध्ये वनविभागाच्या वतीने गव्याची शोधमोहिम

इमेज
  हेरवाड/ शिवार न्यूज नेटवर्क : छाया : संग्रहित हेरवाड येथील इथेनॉल कारखाना परिसर, गलगले मळा तसेच घोसरवाड हद्दीत असणाऱ्या शेतात रात्रीच्या सुमारास काही शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झालेहोते. कोल्हापूर नंतर आता हेरवाड मध्ये गव्याचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे होते, याच्या पार्श्वभूमिवर वनविभागाचे अधिकारी संज्योत शिरोळकर यांनी हेरवाडला भेट देवून गवा आलेल्या ठिकाणाची पाहणी करून परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. कोल्हापूरसह पेठवडगांव परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून गव्याचे दर्शन झाले होते. दरम्यान कोल्हापूर येथील परिसरात गव्याच्या हल्यात एकजण मृत्यूमुखी तर दोघे जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच हेरवाड येथील श्री संतुबाई मंदिर परिसरात असणार्‍या इथेनॉल कारखान्या लगत काही शेतकर्‍यांना गव्याचे दर्शन झाले होते. तसेच पाचवा मैल मार्गालगत असलेल्या गलगले मळ्यानजीकही काही शेतकऱ्यांना गवा दिसून आले होते. त्यामुळे हेरवाड मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच्या पार्श्वभूमिवर वनविभागाचे अधिकारी संज्योत शिरोळकर यांनी हेरवाडला भेट देवून गवा आ...

बोरगाव नगर पंचायतीसाठी १०६ पैकी ९२ अर्ज वैध

इमेज
  नगर पंचायतीची निवडणूक तिरंगी होणार : राजकीय घडामोडींना वेग अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क : बोरगाव नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १५) शेवटच्या दिवशी तिन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शनाने एकूण १०५ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले होते. गुरूवारी (ता. 16) झालेल्या छाननीत १०६ पैकी १४ अर्ज अवैध तर ९२ अर्ज वैध ठरले. येथील निवडणूक तिरंगी होणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता शनिवार (ता. १८) अखेर अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बोरगाव नगर पंचायतीत निवडणूक अधिकारी म्हणून निरंजन हिरेमठ, टी. टी. नाडकर्णी, जी. डी. मंकाळे, लक्ष्मण ए., एन. आर. रायकर, रूपाली कांबळे काम पहात आहेत. बुधवार (ता. ८) पासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू होती. तिन्ही गटांकडून अखेरच्या दिवशी या निवडणुकीसाठी भाजप, अपक्ष मिळून एकूण १०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.यामध्ये युवा नेते उत्तम पाटील गटाने अपक्ष ३७, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले गटाकडून अपक्ष ३८ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले. तर भा. ज. प. कडून एकूण ...

भीमा नदीच्या मोजमापास केंद्रीय जल आयोगाच्या वतीने सुरुवात

इमेज
      राहुल डोंगरे/शिवार न्यूज नेटवर्क:     केंद्रीय जल आयोगाच्या पुणे विभागामार्फत भीमा नदीच्या मोजमापस सुरवात करण्यासाठी पुण्याहुन तज्ञ अधिकारी व कर्मचारी यांचे पथक रवाना उप मंडल अभियंता सौ.एम. सत्या यांच्या नेतृत्वाखाली मोजण्यास सुरुवात .        गेली पंधरा वर्ष केंद्रीय जल आयोगाने कृष्णा नदीचे मोजमाप केले आहे प्रथमचं भीमा नदीचे मोजमाप करण्यास सुरवात केली आहे.सदर मोजमाप करण्याच्या पथकाथ कुरुंदवाड केंद्राचे कनिष्ठ अभियंता रुपेश कुमार यादव, कराड केंद्राचे कनिष्ठ अभियंता अजित माने, अर्जुनवाड केंद्राचे कुशल सहायक उद्धव मगदूम, सदलगा केंद्राचे कार्य सहायक प्रकाश कुंभार, कुरुंदवाड केंद्राचे कार्य सहायक एम. बी. कांबळे, समडोळी केंद्राचे कार्य सहाय्यक विलास पवार, पुण्याचे राहुल पाटील, अनिल मोरे, पवन वाघमारे आदी चा समावेश आहे.यावेळी कार्यकारी अभियंता अभिषेक गौरव मिरज विभागाचे उप मंडल अभियंता काकासाहेब मिस्त्री, प्रशांत कांबळे, आदी. उपस्थित होते.सदर मोजमापाने प्रति वर्षी भीमा नदीची खोली व रुंदी वर किती परिणाम होऊ शकतो याचा अहवाल कळू शकतो   ...

बोरगाव नगरपंचायतीसाठी शक्ती प्रदर्शनाने तिन्ही गटाकडून १०५ उमेदवारी अर्ज दाखल

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :           बोरगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या दिवशी तिन्ही गटाकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाने एकूण 105 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे कडे सुपूर्त करण्यात आले आहेत.           गेल्या 08 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू असताना देखील आज तिन्ही ही गटाकडून बुधवार 15 रोजी अखेरच्या दिवशी या निवडणुकीसाठी भाजप अपक्ष मिळून एकूण 105 उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.      यामध्ये युवा नेते उत्तम पाटील गटाने अपक्ष म्हणत 37 उमेदवारी अर्ज,माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले गट यांच्याकडून अपक्ष म्हणून 38 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे.तर आमदार खासदार प्रेमी गटाकडून एकूण 30 कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.        युवा नेते उत्तम पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शनाने नगरपंचायत कार्यालयासमोर येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब ...

कोल्हापूर नंतर आता हेरवाडमध्ये गव्याचे दर्शन ?

इमेज
छाया : संग्रहित   हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  हेरवाड येथील इथेनॉल कारखाना परिसर, गलगले मळा तसेच घोसरवाड हद्दीत असणाऱ्या शेतात मंगळवारी रात्रीच्या सुमारास काही शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झाले. कोल्हापूर नंतर आता हेरवाड मध्ये गव्याचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या जंगली प्राण्याला वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी होत आहे. कोल्हापूरसह पेठवडगांव परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून गव्याचे दर्शन झाले आहे. दरम्यान कोल्हापूर येथील परिसरात गव्याच्या हल्यात एकजण मृत्यूमुखी तर दोघे जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच हेरवाड येथील श्री संतुबाई मंदिर परिसरात असणार्‍या इथेनॉल कारखान्यालगत काही शेतकर्‍यांना गव्याचे दर्शन झाले आहे. इतकेच नव्हे तर पाचवा मैल मार्गालगत असलेल्या गलगले मळ्यानजीकही काही शेतकऱ्यांना गवा दिसून आल्याचे समजते. तसेच घोसरवाड हद्दीतील शेतकर्‍यांना गवा दिसल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सुरु होती. त्यामुळे हेरवाडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  सावधानता बाळगावी  मा . सभापती व   पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार यांनी वन विभाग व ...

सैनिक टाकळी येथील चोरी प्रकरणी राज्य गृहमंत्र्यांचे स्वतंत्र तपासणी आदेश

इमेज
  सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या आठवड्यामध्ये सैनिक टाकळी येथील दोन म्हशी चोरीला गेल्याने चोऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता .वारंवार घडणाऱ्या या घटनेने सैनिक टाकळी व परीसरातील शेतकऱ्यांच्या जीव मेटाकुटीला आल्याने येथील ग्रामपंचायती द्वारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले होते . याची दखल घेत मंत्री पाटील यांनी डी एस पी ऑफीस ला स्वतंत्र तपासणीचे आदेश दिले होते. या पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे काम केले असल्याचे समजते. लवकरच चोरी प्रकरणाचा छडा लागेल अशी आशा येथील नागरिकांतून व्यक्त होत आहे. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून केबल चोरी व जनावरे चोरीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.अगोदरच दोन वर्षे पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. यातून सावरत असताना अवकाळी पावसाने देखील नुकसानीत भर पाडली आहे. कोरोना सारख्या महामारीत शेती व्यवसाय टिकून ठेवणे आव्हान होते. या सर्वांना तोंड देत आपला संसार गाडा पुढे ढकलत असताना या चोरी सारख्या घटनांनी शेतकरीवर्ग पुरा हतबल झाला आहे.

एल. आय. सी.विमाग्राम पुरस्कार 2020 साठी अर्जुनवाडची निवड

इमेज
राहुल डोंगरे/ शिवार न्यूज नेटवर्क :  LIC मार्फत विमाग्राम पुरस्कार 2020 विजेते म्हणून आज अर्जूनवाड गावाची निवड करण्यात आली व1 लाख रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले अर्जुनवाड चे दत्त क्लास शिक्षक आणि एल. आय. सी एजंट श्री अरविंद मोरे सर यांनी केलेल्या पाठपुराव्या ला यश आले L I C विमाग्राम पुरस्कार 2020 गावातील विद्या मंदिर मराठी शाळेला देण्यात आला.     या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकास अधिकारी श्री राजेश जाधव साहेब,शाखाधिकारी शशिकांत कुलकर्णी साहेब होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ योगिता डोंगरे या होत्या तसेच अर्जुनवाड गावच्या सरपंच सौ स्वाती ताई कोळी ,ग्रामपंचायत सदस्य सौ नंदाताई खोत, सौ शोभाताई कोळी, संतोष दुधाळे ,रमेश बसर्गी,संतोष देसाई ,LIC एजंट सौ. रंजना अरविंद मोरे, अरविंद मोरे सर ,मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बेळगाव विधान परिषद निवडणुकीत काॅग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी, अपक्ष लखन जारकीहोळी विजयी

इमेज
   अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क : बेळगाव विधान परिषद निवडणुकीत काॅग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी हे पहिल्या फेरीतच विजयी झाले. त्यांच्यापाठोपाठ अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचा विजय झाला. भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा rपराभव झाला असून या निकालामुळे भाजपला बेळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. बेळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी शुक्रवारी (ता. १०) चुरशीने मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यावर आपलाच उमेदवार निवडून येणार, याबाबत अनेक राजकीय जाणकारांनी आकडेमोडीला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळी (ता. १४) चिक्कोडीतील आर. डी. हायस्कूल येथे मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.  विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६ उमेदवार होते. त्यातील भाजपचे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी व अपक्ष लखन जारकीहोळी यांच्यातच थेट लढत झाली. आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नेते, कार्यकर्ते व समर्थकांनी कंबर कसली होती. त्यात बाजी कोण मारणार, याचा फैसला आज निवडणूक निकालातून कसा लागेल, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला होती. पहिल्या फेरीतच काॅंग्र...

कोल्हापूरात १० वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची लागण ?

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची (Omicron Virus) लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित मुलाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. ओमायक्रॉनची धास्ती पाहता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोल्हापूर मनपा प्रशासनाने तातडीने संबंधित मुलाचे नमुने पुण्याला तपासण्यासाठी पाठवले आहेत. मात्र, या प्रकाराने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगा आपल्या कुटुंबियांसमवेत ऑस्ट्रेलियाला गेला होता. हे संबंधित कुटुंब रमणमळा परिसरातील असून, काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीय कोल्हापुरात परतले. तत्पूर्वी, विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात संबंधित कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला. परदेशातून कोल्हापुरात आल्याने ११ डिसेंबरला त्या कुटुंबाची RT-PCR तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत त्या कुटुंबातील दहा वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. ओमायक्रॉनची (Omicron) रुग्णसंख्या वाढत असलेल्या जोखीमग्रस्त देशांपैकी सहा देशांतील ३० नागरिक आतापर्यंत कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या सर्वांची कोरोना...

शाईफेकीच्या निषेधार्थ कोल्हापुरात निदर्शने

इमेज
  महाराष्ट्रात कर्नाटकची एकही बस येऊ न देण्याचा इशारा कोल्हापूर/ शिवार न्यूज नेटवर्क : सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महामेळाव्याचे आयोजन केले होते. याचवेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या अज्ञात व्यक्तीने मेळाव्याच्या ठिकाणी येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासण्याचे कृत्य केले. या घटनेच्या निषेधार्थ सर्वचस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्षांवर झालेल्या शाईफेकीच्या संतापजनक घटनेनंतर कोल्हापुरात सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. येथील ऐतिहासिक दसरा चौकात विविध पक्ष संघटनांच्या उपस्थितीत कन्नड रक्षक वेदिकेचा निदर्शने करून निषेध व्यक्त केला. अशाच पद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय होत असेल यापुढे एकही कानडी हॉटेल अथवा बस महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महामेळाव्याचे आयोजन केले होते. याचवेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या अज्ञात व्यक्तीने...

बोरगाव नगरपंचायतीसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल

इमेज
   अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :                  बोरगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाचव्या दिवशी तिन्ही गटाकडून एकूण 12 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. गेल्या 8 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू असताना देखील तिन्ही ही गटाकडून आज सोमवार दी 13 रोजी पाचव्या दिवशी या ठिकाणी 12 उमेदवारी अर्ज भरण्यात आलेली आहेत.  यामध्ये युवा नेते उत्तम पाटील गटाकडून व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले गटाकडून अपक्ष म्हणून 08 इतक्या लोकांनी उमेदवारी दाखल केली आहे तर आमदार खासदार प्रेमी गटाकडून एकूण 4 इतक्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. सध्या एकूण 12 उमेदवारी अर्जा पैकी 3 उमेदवार महिला व 9 पुरुष म्हणून उमेदवारी भरण्यात आलेली आहे.   वार्ड क्रमांक 1 मधून दोन अर्ज दाखल झाले असून एक भाजप तर दुसरा अपक्ष आहे, वार्ड 3 मधून एक अर्ज अपक्ष आहे,वार्ड 6 मधून एक अर्ज भाजप तर वार्ड 7 मधून एक अर्ज अपक्ष आहे. वॉर्ड 9 मधून एक बीजेपी, वार्ड 10 मधून एका अपक्ष, वार्ड 11 मधून दोन अपक...